विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे
https://www.misalpav.com/node/21605
https://www.misalpav.com/node/21686
https://www.misalpav.com/node/21734
https://misalpav.com/node/21765
https://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.
https://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे.
आज शेवटचा बारावा डाव. अजून कोंडी फुटलेली नाही. दोघेही साडेपाच-साडेपाच गुण घेऊन बरोबरीत आहेत.
आनंद डाव जिंकून चौथ्यांदा विजेतेपद राखेल का मिळालेल्या पहिल्यावहिल्या (आणि कदाचित शेवटल्या) संधीचा पुरेपुर फायदा उठवण्याच्या जिगरीने बोरिस काही अफलातून चमत्कार करुन आनंदला धूळ चारेल आणि विजेतेपदाचा मुकुट त्याच्याकडून काढून घेईल?
का पुन्हा एकदा बरोबरी होऊन सामना टायब्रेकर मध्ये ढकलला जाऊन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली जाईल?
या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चला बघूयात डाव बारावा!
-चतुरंग
मिसळपाव
प्रतिक्रिया
चिवाट हाये ते
In reply to चालू झाला रे. गेल्फंड लै टाइम by कवटी
घड्याळ खिशातच घालून खेळतय बग !! ..लास्ट च्या टायमाची चुक पुन्हा नाय करायच त्ये
आनंदला फक्त ड्रॉच हवा आहे!
आणि पुढल्या डावात तो पांढरा आहे. परंतु ज्या प्रकारे बोरिस खेळतो आहे त्यावरुन अजूनही स्थिती सोपी नाही.
आरे गेलफंड झोपला का?
आरे गेलफंड झोपला का?
आनंदचा बी८ ला अडकलेला उंट
त्रासदायक ठरणार! लवकर काहीतरी करायला हवे.
आता बी स्तंभात बोरिसची हत्तीची जोडी बसली तर अवघड होणार आहे.
आनंदला तो जागेची टंचाई निर्माण करुन चोक करतोय.
और ये गुस्से से भरे बोरिस क मुन्ह तोड जवाब
काफी शातीर चालो से आनंद को कर रहे है परेशान !!
कैसे बच पायेंगे आनंद बोरीस से ??
हार कि आग मे जलते बोरीस का करारा हमला ...आयिये देखते है :P
हिन्दी च्यानल लैच
In reply to और ये गुस्से से भरे बोरिस क मुन्ह तोड जवाब by कपिलमुनी
बघताय वाट्टं! ;)
तिसावी खेळी
आनंदने वजीरावजीरीचा प्रस्ताव देऊन किंचित वरचढ होण्याचा प्रयत्न केला आहे. बोरिसचे हत्ती नि उंट पाऽर दूर असल्याने आनंदने एक प्यादे देऊन राजाला एकटा पाडला आहे. वजीरावजीरी झाली तर बोरिसची स्थिती नाजूक होते.
बोरिस वेळातही पुन्हा मागे पडलाय!
In reply to तिसावी खेळी by रमताराम
साला पण त्याच्या नर्व्ज मानायला हव्यात राव. आधीचा डाव हरुन सुद्धा पठ्ठ्या जोमाने लढतोय! हॅट्स ऑफ!!
माघार
In reply to तिसावी खेळी by रमताराम
एवढ्या वेळ आनंदच्या राजावर डूख धरून बसलेला हत्ती अखेर माघारी आला बोरिसचा. जियो आनंद.
वजीरावजीरी झालीच. आता बोरिसला सगळी पोजिशन अनवाईंड करावी लागती आहे. आणि पुन्हा जेमतेम एक मिनिट उरले आहे आनंदच्या पंधरा मिनिटासमोर.
मामु ..टेंशन वाला बात
हो गया है ..कुछ तो जुगाड जल्दी करना पडैगा आनंद बाबु को ..
एक प्यादा जास्त आहे बोरीस कडे..
नवा धागा प्लिज! गेल्या
नवा धागा प्लिज!
गेल्या म्याचला लय धमाल आली. हाफिसातल्यांनाही ही लिंक दिल्याने आता अख्ख्या फोअरवर हेच ह्चालु आहे ;)
मस्त
मधली तीन प्यादी अशी मस्त बसली आहेत की मोहर्यांची देवाणघेवाण झाली की आनंदचे पहिल्या प्याद्याचा वजीर होणे टळत नाही. बोरिस काय उपाय काढतो पाहू या.
+१ येस मोठ्या
In reply to मस्त by रमताराम
कर्णात बसली आहेत. आणि आनंदचा घोडा सुद्धा मस्त पोझीशन पकडून आहे उंटा कुठूनही हत्तीवर हल्ला करता येत नाही! :)
:(
In reply to +१ येस मोठ्या by चतुरंग
लागली ना नजर
ए२ चा प्यादं का खात नाहिये
ए२ चा प्यादं का खात नाहिये आनंद? इतका कसला विचार करत असावा?
खाल्लं रे खाल्लं.. आता कसं
In reply to ए२ चा प्यादं का खात नाहिये by ऋषिकेश
खाल्लं रे खाल्लं.. आता कसं समसमान प्यादी झाली (आम्हाला इतकंच कळतं ;) )
खाल्लं खाल्लं!
In reply to ए२ चा प्यादं का खात नाहिये by ऋषिकेश
थोडा सायकॉलॉजिकल मामला असतो. अगदी ऑब्विअस मूव्जला सुद्धा वेळ लावला की समोरचा अस्वस्थ होतो!
प्यादं ई३ मधे सरकवायची खेळी
प्यादं ई३ मधे सरकवायची खेळी अजिबात कळली नाही? ते अमिष होतं? फक्त १ चेक देण्यासाठी? काहि कळेना झालंय
काय झालं??? .. माझी स्क्रीन
काय झालं??? .. माझी स्क्रीन फ्रिज झालीये का बोरिसची वेळ संपलीये?
सेम हिअर... आणि निक्काल पण
In reply to काय झालं??? .. माझी स्क्रीन by ऋषिकेश
सेम हिअर... आणि निक्काल पण सांगनात...
सेम
In reply to काय झालं??? .. माझी स्क्रीन by ऋषिकेश
हानामारीच्या षटकात सर्वच सायटी लटकल्या. :(
-दिलीप बिरुटे
ड्रॉ, ड्रॉ!!!!
मस्तच!! २-१ स्कोर
आनंद फक्त एक ड्रॉ लांब आहे विजेतेपदापासून!!
काहीतरी झालं, दोघंही उठुन
काहीतरी झालं, दोघंही उठुन गेले, बहुधा बरोबरी झाली असावी. मला सुद्धा फार कळत नाही, पण शेवटी आनंद राजा आणि एक हत्ती घेउन जे खेळत होता, ते पहायला जाम भारी होतं.
छ्या! इथे स्क्रीन अजूनही
छ्या! इथे स्क्रीन अजूनही ङंडलीये.
असो.
आता शेवटच्या टायब्रेकरसाठी तरी नवा धागा काढा हो .. नंतर आनंदचे अभिनंदनही तिथेच करूयात :)
जिंकला रे जिंकला
आनंद रिमेन्स द चॅम्प.