वाळलेले दोन गजरे..
लेखनविषय:
माणसांशी वागतांना, चूक होणे टाळले मी
माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी
रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले
तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी
कायद्याने थांबवाव्या, मीलनाच्या चोरवाटा
आसवांशी वैर घेतां, कायदे ते जाळले मी
जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना
क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी
सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती
वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी
- संध्या
२० एप्रिल २०१०
वाचने
5026
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
छान आहे पण ह्या गझलेचा अर्थ वाचायला
आनखी आवडेल ,विषेश करुन शेवटच कडवं
वाळलेले दोन गजरे हेच विषेशन का वापरलय?
सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती
वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी .... लागी कलेजवा कटार --^--^--^--
"जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना
क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी
सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती
वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी"
सुंदर.. आवडली ..
वाळलेले दोन गजरे हेच विषेशन का वापरलय?
///////////////////////////////////
नायिका २ वेण्या घालत असतिल म्हणुन २ गजरे असे असावे
In reply to वाळलेले दोन गजरे हेच विषेशन by अविनाशकुलकर्णी
आपले रसग्रहन वाचुन कवियत्रीने त्याच दोन वेण्यांनी गळफास घेतला असेल .. :)
In reply to आपले रसग्रहन वाचुन कवियत्रीने by शैलेन्द्र
I is dying...
In reply to वाळलेले दोन गजरे हेच विषेशन by अविनाशकुलकर्णी
@नायिका २ वेण्या घालत असतिल म्हणुन २ गजरे असे असावे>>> बाप रे..! 

धन्यवाद :)
@ पूजा
सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती
वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी
सांजवेळ आयुष्याची आहे. वाट इतकी पाहिली कि गजरेही वाळून गेलेत...
ओह्ह ......
ह्म्म्म्म.....
गॉट इट :)
रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले
तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी
माझेच मनोगत तुमच्या शब्दात .
वाळलेले च्या ऐवजी सुकलेले हा शब्द जास्त युक्त झाला असता का ? (पण बहुदा तो वृतात बसत नाहीय) .
उदा गजरा असा फुलांचा सुकवून रात्र गेली - गजल नवाझ सुरेश भट .
पु क शु.
In reply to हे तर माझेच मनोगत by चौकटराजा
मग ते वाळणे आणि माळणे या सारख्या यमकात कसे बसले असते?
कविता छानच.
आवडली.
In reply to मग ते वाळणे आणि माळणे या by प्रचेतस
वल्ली,
सुकलेला हा शब्द मलाही इथे रिदमिक वाटत नाही. त्यामुळे मी थोड्या शंकाग्रस्त मनानेत
त्या बद्द्ल लिहिले आहे. पण वाळलेले याचा संबंध माळले याच्याची नाही तर माळले याचा
संबंध जाळले , गाळले, पाळले, चाळले यांच्या शी आहे. त्यालाच काफिया रदीफ असे काहीसेसे म्हणतात .
In reply to त्याचा संबंध by चौकटराजा
तसे यमक / काफिया रदीफ मी ही म्हणत नाही.
कवितेमधली ही ओळ पाहा
क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मीइथे काळजी आणि काजळ या दोन शब्दांनी जसा परिणाम साधला गेलाय तसाच तो वाळलेले आणि माळले ह्या शब्दांनी साधला गेलाय.
In reply to तसे यमक / काफिया रदीफ मी ही by प्रचेतस
वल्ली, तू सांगितलेला योगायोग आहे कारण अशी रचना सांजसंध्या यानी मग हेतूपूर्वक प्रत्येक शेरात वापरली असती. तशी ती दिसत नाही !
In reply to वल्ली तो योगायोग by चौकटराजा
तसे वाटत नाही.
बहुतेक ओळींत तशीच रचना आहे.
माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी
रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले
क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी
सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती
In reply to तसे वाटत नाही. बहुतेक ओळींत by प्रचेतस
आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात फक्त कोरी पानेच असावीत असे काहीसे वाटले हा संवाद वाचून...
In reply to आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात... by मोदक
अगदी सहमत..
एकंदरीत काय तर फणस सोलतात तशी कविता सोलायची, गरे फेकून द्यायचे आणि साल चावत बसायचं.
श्रेयअव्हेर: पु.ल.
In reply to अगदी सहमत.. एकंदरीत काय तर by गणामास्तर
साल नाय रे गणामास्तर, चारखंड म्हणतात त्याला. ते नाय का ? 'तुम्ही खा गरे, आम्ही खातो गरे...म्हशीला काय ? चारखंड !!'
In reply to आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात... by मोदक
>>आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात फक्त कोरी पानेच असावीत असे काहीसे वाटले हा संवाद वाचून...
त्याला 'डायरी' म्हणतात रे.... ;)
In reply to हे तर माझेच मनोगत by चौकटराजा
नाहि सुकलेला हा शब्द चुकुन सुद्धा सुट होत नाहि
संध्याने छान शब्द वपरलेत
....अगदि साजेसे ...
In reply to हे तर माझेच मनोगत by चौकटराजा
"वाळलेले च्या ऐवजी सुकलेले हा शब्द जास्त युक्त झाला असता का ? (पण बहुदा तो वृतात बसत नाहीय) .
उदा गजरा असा फुलांचा सुकवून रात्र गेली - गजल नवाझ सुरेश भट ."
काक्काआआअ........................... नक्क्क्काआआआआआआआआआअ......... ;)
आप्लयाला यमक-बिमक्,व्रुत्त - बित्त ,छंद -बिंद अजुन काय काय....... काय कळत नाय ब्वॉ !!!
सीधी बात नो बकवास ;)
कविता आवडली :)
क्या बात है!!!!
आवडली!!
पोरीने किती छान कविता रचली आहे आणि काय मेलं त्या कवितेचं शवविच्छेदन करताय आँ?
विडम्बनाची तीव्र इच्छा होवून देखील दाबतो आहे... ;)
फक्त एक शब्द बाहेर टाकतोय..
'वाळलेले गजरे' वाचून 'वाळलेली गाजरे' ऐसे मनी आले..
आणि ,
माणसाना वाहताना, चूक होणे टाळले हो मी..
दगड धोंडे टाळताना, वाळूलाही चाळले मी ..
......
.....
वाळलेली गाजरे, मोहाची टाळते मी..
बाकी सर्व कष्टपूर्वक साभार परत ..
बाकी चालू द्या.. 'कविता छान ' , 'यमक छान' वगैरे वगैरे ... :)
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !
अस्वस्थामा .. आभार. आपल्याकडून काही शिकता आलं तर भाग्यच समजेन :)
कायद्याने थांबवाव्या, मीलनाच्या चोरवाटा
आसवांशी वैर घेतां, कायदे ते जाळले मी..
क्या बात ...सुरेख
जवळ जवळ दहा वेळा वाचल हे काव्य मी.
पण नुसतच फार छान वा सुरेख म्हणुन पुढ जावस वाटत नाही. ना ही या गझलेच विच्छेदन करावस वाटत. ' या गझलेल्च्या बाबतीत ' सिर्फ एहसास है ये...' एव्ह्ढच म्हनावस वाटेल.
वा फारच छान .अशी पाहिजे कविता
पुन्हा पुन्हा वाचावी अशीच कविता
रघू
पुन्हा पुन्हा वाचली!!!!!
मस्त
कसं काय जमतं राव......!!!!
आयुष्यात एक छान कविता जमली तर घर डोक्यावर घेऊन नाचेन मी!!!!!!!!!!
छान आहे पण ह्या गझलेचा अर्थ