Skip to main content

वाळलेले दोन गजरे..

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 26/05/2012 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
माणसांशी वागतांना, चूक होणे टाळले मी माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी कायद्याने थांबवाव्या, मीलनाच्या चोरवाटा आसवांशी वैर घेतां, कायदे ते जाळले मी जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी - संध्या २० एप्रिल २०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5037
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

छान आहे पण ह्या गझलेचा अर्थ वाचायला आनखी आवडेल ,विषेश करुन शेवटच कडवं वाळलेले दोन गजरे हेच विषेशन का वापरलय?

"जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी" सुंदर.. आवडली ..

वाळलेले दोन गजरे हेच विषेशन का वापरलय? /////////////////////////////////// नायिका २ वेण्या घालत असतिल म्हणुन २ गजरे असे असावे

In reply to by अविनाशकुलकर्णी

आपले रसग्रहन वाचुन कवियत्रीने त्याच दोन वेण्यांनी गळफास घेतला असेल .. :)

धन्यवाद :) @ पूजा सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी सांजवेळ आयुष्याची आहे. वाट इतकी पाहिली कि गजरेही वाळून गेलेत...

ओह्ह ...... ह्म्म्म्म..... गॉट इट :)

रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी माझेच मनोगत तुमच्या शब्दात . वाळलेले च्या ऐवजी सुकलेले हा शब्द जास्त युक्त झाला असता का ? (पण बहुदा तो वृतात बसत नाहीय) . उदा गजरा असा फुलांचा सुकवून रात्र गेली - गजल नवाझ सुरेश भट . पु क शु.

In reply to by प्रचेतस

वल्ली, सुकलेला हा शब्द मलाही इथे रिदमिक वाटत नाही. त्यामुळे मी थोड्या शंकाग्रस्त मनानेत त्या बद्द्ल लिहिले आहे. पण वाळलेले याचा संबंध माळले याच्याची नाही तर माळले याचा संबंध जाळले , गाळले, पाळले, चाळले यांच्या शी आहे. त्यालाच काफिया रदीफ असे काहीसेसे म्हणतात .

In reply to by चौकटराजा

तसे यमक / काफिया रदीफ मी ही म्हणत नाही. कवितेमधली ही ओळ पाहा
क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी
इथे काळजी आणि काजळ या दोन शब्दांनी जसा परिणाम साधला गेलाय तसाच तो वाळलेले आणि माळले ह्या शब्दांनी साधला गेलाय.

In reply to by प्रचेतस

वल्ली, तू सांगितलेला योगायोग आहे कारण अशी रचना सांजसंध्या यानी मग हेतूपूर्वक प्रत्येक शेरात वापरली असती. तशी ती दिसत नाही !

In reply to by चौकटराजा

तसे वाटत नाही. बहुतेक ओळींत तशीच रचना आहे. माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती

In reply to by प्रचेतस

आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात फक्त कोरी पानेच असावीत असे काहीसे वाटले हा संवाद वाचून...

In reply to by मोदक

अगदी सहमत.. एकंदरीत काय तर फणस सोलतात तशी कविता सोलायची, गरे फेकून द्यायचे आणि साल चावत बसायचं. श्रेयअव्हेर: पु.ल.

In reply to by गणामास्तर

साल नाय रे गणामास्तर, चारखंड म्हणतात त्याला. ते नाय का ? 'तुम्ही खा गरे, आम्ही खातो गरे...म्हशीला काय ? चारखंड !!'

In reply to by मोदक

>>आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात फक्त कोरी पानेच असावीत असे काहीसे वाटले हा संवाद वाचून... त्याला 'डायरी' म्हणतात रे.... ;)

In reply to by चौकटराजा

"वाळलेले च्या ऐवजी सुकलेले हा शब्द जास्त युक्त झाला असता का ? (पण बहुदा तो वृतात बसत नाहीय) . उदा गजरा असा फुलांचा सुकवून रात्र गेली - गजल नवाझ सुरेश भट ." काक्काआआअ........................... नक्क्क्काआआआआआआआआआअ......... ;)

आप्लयाला यमक-बिमक्,व्रुत्त - बित्त ,छंद -बिंद अजुन काय काय....... काय कळत नाय ब्वॉ !!! सीधी बात नो बकवास ;) कविता आवडली :)

पोरीने किती छान कविता रचली आहे आणि काय मेलं त्या कवितेचं शवविच्छेदन करताय आँ?

विडम्बनाची तीव्र इच्छा होवून देखील दाबतो आहे... ;) फक्त एक शब्द बाहेर टाकतोय.. 'वाळलेले गजरे' वाचून 'वाळलेली गाजरे' ऐसे मनी आले.. आणि , माणसाना वाहताना, चूक होणे टाळले हो मी.. दगड धोंडे टाळताना, वाळूलाही चाळले मी .. ...... ..... वाळलेली गाजरे, मोहाची टाळते मी.. वाळलेली गाजरे' बाकी सर्व कष्टपूर्वक साभार परत .. बाकी चालू द्या.. 'कविता छान ' , 'यमक छान' वगैरे वगैरे ... :)

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ! अस्वस्थामा .. आभार. आपल्याकडून काही शिकता आलं तर भाग्यच समजेन :)

कायद्याने थांबवाव्या, मीलनाच्या चोरवाटा आसवांशी वैर घेतां, कायदे ते जाळले मी.. क्या बात ...सुरेख

जवळ जवळ दहा वेळा वाचल हे काव्य मी. पण नुसतच फार छान वा सुरेख म्हणुन पुढ जावस वाटत नाही. ना ही या गझलेच विच्छेदन करावस वाटत. ' या गझलेल्च्या बाबतीत ' सिर्फ एहसास है ये...' एव्ह्ढच म्हनावस वाटेल.

कसं काय जमतं राव......!!!! आयुष्यात एक छान कविता जमली तर घर डोक्यावर घेऊन नाचेन मी!!!!!!!!!!