Skip to main content

|| चिरन्जीवी परशुराम ||

लेखक मृगनयनी यांनी सोमवार, 14/05/2012 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
परशुराम ;- भगवान महाविष्णुचा सहावा अवतार असणार्‍या "परशुरामा"बद्दल काही जातीय कारणास्तव बरीच उलटीसुलटी चर्चा ऐकायला मिळते. परशुरामाबद्दल काही तरी ऐकीव माहितीआधारे बरेच लोक त्याला अविवेकी ठरवतात. परन्तु परशुरामाचे खरे रूप अत्यन्त सच्चे, मातृ-पितृ भक्त असेच आहे. तसेच त्याने कोणावरही कुठलाही अन्याय केलेला नाही...उलट भगवान परशुरामामुळे लोकांचे कल्याणच झाले आहे. यावर प्रकाश टाकणारा हा लेख! - महिष्मती नगरीचा क्षत्रियकुलोत्पन्न राजा क्रतुवीर व राणी राकावती यांना गुरु-दत्तात्रेय कृपेने पुत्रपाप्ती झाली. त्या पुत्राचे नाव- कार्तवीर्यार्जुन. यास जन्मतः दोन्ही हात नव्हते, पाचव्या वर्षानन्तर दत्तकृपेने अचानक हजार हात उत्पन्न झाले. म्हणून त्याला सहस्त्रार्जुन असेही म्हटले जाई. तेव्हा दत्तगुरुंनी त्यास उपदेश केला, की 'कार्तवीर्यार्जुन हा क्षत्रियांचा स्वामी होईल, तिन्ही लोकांत समर्थ्यवान होईल. पण लोभीपणा व दु:संगतीमुळे जर देव, गुरु, सन्त इ.चा अपमान, अव्हेर जर कार्तवीर्यार्जुनाकडून होईल.. तर त्याचा स्वतःचा तर नाश होईलच पण सार्‍या क्षत्रियकुलाचा विध्वंस होऊन तो अपकीर्तीला पात्र ठरेल." कार्तवीर्यार्जुन खूपच शक्तिशाली होता. त्याने लन्केचा राजा- रावण यासही बन्दीवान बनवून ठेवले होते. रावणाच्या वडिलांनी- पौलस्तिऋषींनी मध्यस्थी करून गोड बोलून रावणाची सुटका करवून घेतली. पण यामुळेच कार्तवीर्यार्जुनाचा मद दिवसेंदिवस वाढीस लागला. दत्तगुरुंनी सांगितलेल्या गोष्टी, नम्रपणा इ. तो विसरू लागला. ते पाहून नारद मुनींनी त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फल ठरला. सहस्त्रार्जुनाच्या राज्यात सज्जन, ऋषीमुनी यांचा छळ होऊ लागला होता. दत्तगुरुंच्या आशीर्वादामुळे आपल्या सहस्त्र बाहूंच्या शक्तीने तो इन्द्रलोकीची सम्पत्ती हिरावू इच्छित होता. त्यामुळे सर्व देवांनी शंकर आणि आदिमायेची प्रार्थना केली. व सहस्त्रार्जुनाचा नाश करण्याची भावना व्यक्त केली. शिवपार्वतीने 'तथास्तु' म्हणून त्यांची मनोकामना पूर्ण करन्याचे आश्वासन दिले. रेणुक राजा व भोगावती राणी यांनी 'त्रिवेणीसंगम' येथे जाऊन केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाचे फलित म्हणजेच "रेणुका" होय. जी साक्षात आदिमायेचे- पार्वतीचे रुप होती. अश्विनीकुमारांच्या कृपेने नवतारुण्य-आरोग्य प्राप्त झालेल्या, भृगुवन्शीय च्यवनऋषींचा पुत्र ऋचिक व गाधिराजाची कन्या सत्यवती यांच्या पोटी जन्मलेले "जमदग्नि" ऋषी हे साक्षात शंकराचे अंश होते. अगस्त्यमुनींच्या सांगण्याप्रमाणे पूर्वसन्केतानुसार ब्राह्मण जमदग्नीमुनी व क्षत्रिय रेणुकादेवी यांचा विवाह झाला. रेणुकेस वसु, विश्ववसु, बृहदभानु, बृहतकण्व असे चार पुत्र झाले. त्यानन्तर जमदग्निऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्धमन्त्र जपून एक "चरू" बनवून रेणुकेस दिला. त्यायोगे भगवान विष्णु पुत्ररुपाने जमदग्नि-रेणुका मातेच्या पोटी जन्माला आले. तो दिवस- अक्षयतृतीया. त्या समयी एकाएकी कार्तवीर्यार्जुनाच्या राजधानीचे शिखर फुटुन चुराडा झाले. क्षत्रिय बायकांच्या मन्गळसूत्राला हिसका बसला. हाच महाविष्णुचा सहावा अवतार! - 'परशुराम' इकडे नवीन बालकाचे नाव- "रामभद्र" असे ठेव्ले गेले. तेव्हापासून जमदग्नि ऋषी व इतर शिष्यांचे वसतिस्थान असणार्‍या 'सिद्धाचल पर्वता'स 'रामशृन्ग पर्वत' असे म्हटले जाऊ लागले. आठव्या वर्षी रामभद्राचा व्रतबन्ध झाल्यावर जमदग्निऋषींनी त्याच्याकडून अध्यायनही करवून घेतले. मातापित्याच्या सेवेत रामभद्र तत्पर असताना एके दिवशी क्षत्रियांच्या छळामुळे त्रासून गेलेले गालव, मातन्ग, शांडिल्य, कौंडिण्य इ महर्षि रामशृन्ग पर्वतावर जमदग्नि ऋषींच्या आश्रयास आले. ऋषी-महर्षिंना क्षत्रियांपासून होणार्‍या त्रासाचे वर्तमान कळताच त्या ऋषींना जमदग्निंनी आपल्या आश्रमात ठेवुन घेतले. रामभद्रा'ला धनुर्विद्या शिकण्यासाठी कैलास पर्वतावर पाठवले. व क्षत्रियांची मस्ती उतरवण्यासाठी जमदग्नींनी उग्र तपाला प्रारम्भ केला.. त्यामुळे 'क्रोधदेवता' त्यांना प्रसन्न झाली. त्यांचे तप चालू असताना ते भन्ग करण्यासाठी कार्तवीर्यार्जुनाने अनेक प्रयत्न केले. पण ते फोल ठरले. तिकडे "रामभद्र" कैलासपर्वतावर साक्षात शिवाकडून धनुर्विद्या शिकला. पार्वतीमातेकडून त्याने "अंबिकास्त्र" मिळवले. कार्तवीर्याकडून व इतर राजांकडून होत असलेला ऋषेमुनींचा छळ वाढतच होता. त्यामुळे जमदग्निंच्या आज्ञेनुसार रामभद्राने कैलासपर्वतावरील आपली साधना अधिक वाढवली. सासरच्या रीतीप्रमाणे लग्न झाल्यानन्तर रेणुकामाता रोज सकाळी नदीवर जाऊन वाळूची घागर बनवून त्यात पाणी भरून डोक्यावर सापाची चुम्बळ करून त्यावर घागर घेऊन शिवपूजेसाठी पाणी येत असे. परन्तु जमदग्नि ऋशींची तपस्या चालू असताना एके दिवशी पाण्यास रेणुकामाता गेली असता चित्ररथ नावाच्या गन्धर्वाची व त्याच्या पत्नीची जलक्रीडा तिच्या दृष्टीस पडली. ते पाहून आपल्यालाही आपल्या पतीसह अशीच क्रीडा करता आली असती तर!.. असा स्त्रीसुलभ विचार तिच्या मनात डोकावला. पण दुसार्‍याच क्षणाला मनाच्या चन्चलपणाचा धिक्कार करून तिने आपले मन पाणी भरण्याकडे केन्द्रित केले. पण त्यावेळी तिला रोजच्यासारखी वाळूची घागर बनवता नाही आली. सापाची चुम्बळ बनवताना साप हातातून निसटून गेला. व पाण्याशिवाय घरी यावे लागले. शिवपूजेला पाणी न मिळाल्याने क्रोधायमान झालेल्या जमदग्नि ऋषींनी तिला पाणी न आणण्याचे कारण विचारल्यावर तिने खरे काय ते सांगितले. त्यामुळे ते जास्तच चिडले व रेणुकेस चालते होण्यास सांगितले व तिस शाप दिला, की तुझे तोन्ड आणि शरीर काळे ठिक्कर पडेल. व तसे खरोखर झाले. बाहेर पडलेल्या रेणुकेला दु:ख अनावर होत होते. अश्या वेळी तिला "एकनाथ व जोगिनाथ" हे २ शिवयोगी भेटले. तिने त्यांना वन्दन केले. तेव्हा तिचे मनोगत जाणून शिवयोग्यांनी तिला सांगिअले, की "समोरील सरोवरात रोज स्नान करून शिवलिन्गाची पूजा कर. व पाच घरी भिक्षा मागून अर्धी भिक्षा आम्हास दे व अर्धी तू खा. तुझे शरीर व मन पुन्हा पूर्ववत होईल" त्याप्रमाणे रेणुका देवी वागल्यानन्तर ती पुन्हा गौरवर्णीय व स्थिरमनाची बनली. शिवयोग्यांचा निरोप घेण्यासाठी ती गेली असता ते म्हणाले,' अजून काही दिवसांनी तुला तीन घटका वैधव्य प्राप्त होईल. त्यानतर मात्र तुझे सौभाग्य अखंडित राहील." दुसर्‍या दिवशी शिवगुरुंचा आशीर्वाद घेऊन रेणुकादेवी आपल्या आश्रमाकडे निघाले. ती तिथे पोचताच जमदग्निंच्या वर प्रसन्न झालेल्या क्रोधदेवतेमुळे ते रेणुकेवर प्रचन्ड चिडले व क्रोधायमान होऊन म्हणाले," ज्याअर्थी तू इतके दिवस आश्रमाबाहेर होतीस.. त्या अर्थी तुला इथे थारा नाही. तू चालती हो!" त्यामुळे वारंवार माफी मागून रेणुकादेवीने त्यांना विनवले. जमदग्नि ऋषींचा सन्ताप अनावर होऊन त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना बोलावले व रेणुकेकडे बोट दाखवून सांगितले, की "तुमच्यापैकी कोणी हिचा वध करू शकत असेल.. तर करा." तेव्हा "पित्यापेक्षा माता हजार पटींनी श्रेष्ठ असते, त्यामुळे आम्ही हे अविचारी पापकृत्य करणार नाही." असे चारी पुत्रांनी पित्यास स्पष्ट सान्गितले. त्यामुळे जमगग्निंमधल्या क्रोधदेवतेने चौघा पुत्रांना "मृत व्हा" असा शाप दिला. व क्षणार्धात ते चारी जण मृत्यू पावले. रेणुकामाता ते पाहून शोक करू लागली. त्यावर जमदग्नींनी रामभद्राला हाक मारली. तोच रामभद्र कैलासपर्वतावरून आला. चारही पुत्रांप्रमाणे जमदग्निंनी त्यालाही मातेचा वध करायची आज्ञा केली. नाहीतर चौघा भावांप्रमाणेच त्याचाही वध करण्याची जमदग्निंनी तयारी होती. वडिलांवर प्रसन्न झालेली क्रोधदेवता रामभद्रास माहित होती. ऋषी-मुनी सज्जनांना छळणार्‍या कार्तवीर्यार्जुनादि क्षत्रियांच्या नाशासाठी प्रसन्न करून घेतलेल्या या क्रोधदेवतेचा उपयोग अ‍ॅक्चुली अनुचित कारणासाठी होतोय.. हे रामभद्राने जाणले. त्यामुळे नाईलाजाने मातेचा वध करण्यापलीकडे उपाय नाही, हेही रामभद्रास कळून चुकले. परन्तु मातेचा वध केल्यानंतर शान्त झालेल्या क्रोधदेवतेकडून जमदग्नि पुनश्च रेणुकामातेस जिवन्त करू शकतील.. असा विश्वासही त्यास होता. त्यामुळे सारासार विवेक बुद्धी वापरून रामभद्राने रेणुकामातेचा वध केला. व पित्याची आज्ञा अमलात आणली. साहजिकच खूष झालेल्या जमदग्निंनी रामभद्रास वर मागायला सांगितले. तेव्हा रामभद्राने " मातेस व चौघा बन्धुंस पुनः जिवन्त करावे आणि त्यांना मृत्यूचे स्मरणही राहू नये, असे करावे. तसेक्ष या सर्व गोष्टींना काराणीभूत असलेली जी क्रोधदेवता, तिचा त्याग करावा" असे सांगितले. त्याप्रमाणे रामभद्राचे वचन कबूल करून त्या पाचही जणांना जमदग्नि ऋषींनी उठवले. व क्रोधदेवतेला त्यांना जाण्याची आज्ञा केली. अणि त्यावर ते पूर्ववत् संसार करू लागले. परन्तु या सगळ्यामुळे रामभद्राला मातृहत्येचे पातक लागले. त्यामुळे या पापातून कसे मुक्त व्हावे, असा प्रश्न त्यांनी पित्याला विचारला. तेव्हा जमदग्नींनी त्यास मन्त्रोपदेश करून भागीरथीतीरी शिवाराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे रामभद्राने शन्करास प्रसन्न करून घेतले. शन्कराने रामभद्रास कैलास पर्वतावर बोलावून नेले. तिथेच षण्मुखस्वामींपासून रामभद्रास चौदा विद्या, चौसष्ठ कलांचे ज्ञान अवगत झाले. पुढे श्रीगणेशाला रामभद्रास "परशु" दिला. आणि रामभराचे "परशुराम" असे नामाभिधान केले. व मातापित्यांना भेटून येण्यास सांगितले. तेव्हा 'परशुराम' पुन्हा रामशृन्ग पर्वतावर येऊन मातापित्यांच्या सेवेत रत राहू लागले. परशुरामाने प्राप्त केलेल्या शस्त्रास्त्र विद्येमुळे, दिव्य परशुमुळे, शिवपार्वती व गणेशाच्या आशीर्वादामुळे जमदग्नि ऋषींनी सर्व ऋषीमुनींना निविघ्नपणे यज्ञयागादि करण्यास सांगितले. त्यावर काही कारणास्तव परशुराम पुन्हा कैलासावर गेले. इकडे नारदमुनी रामशृन्ग पर्वतावर जमदग्नि ऋषींच्या आश्रमात आले, तेव्हा जमदग्नि-रेणुकेचा इन्द्रदेवाने लग्नात भेट दिलेल्या कामधेनूच्या सहाय्याने चाललेला संसार पाहून त्यांना आनन्द झाला. आपल्या आराध्य दैवताच्या म्हणजे विष्णुच्या सहाव्या अवताराची-परशुरामाची व शन्कराची आठवण त्यावर ते कैलासावर गेले. शिवाने नारदांसमोर परशुरामाचे व त्याच्या सामर्थ्याचे वर्णन केले. ते ऐकून कार्तवीर्यार्जुनाचा नाश होण्याची वेळ जवळ आल्याचे नारदांनी ओळ्खले व त्यांना आनन्द झाला. त्या आनंदाच्या भरात ते कार्तवीर्यार्जुनाच्या महिष्मती नगराकडे वळले. व त्याचा अतिथीउपचार स्वीकारल्यावर त्यास जमदग्निंकडच्या कामधेनूबद्दल सांगून अशी दिव्य गोमाता सहस्त्रार्जुनाकडे असावयास हवी असेही आमिष त्याच्या मनात निर्माण केले. तसेच जमदग्निमुनींनी क्रोधदेवतेचा त्याग केल्यामुळे आता त्यांच्यापासून कार्तवीर्यास कोणताही धोका नसल्याचेही नारदांनी त्यास सांगितले. त्यावर नारदांच्या सांगण्यानुसार कार्तवीर्यार्जुन ७०० सैन्य व सातशे घोड्यांसह राम्शृन्ग पर्वतावर गेला. तेव्हा जमदग्नि-रेणुकामातेने त्यांचे उचित स्वागत करून सर्वांना पन्चपक्वान्नाचे जेवण दिले. तेव्हा कार्तवीर्यार्जुनाला जमदग्निंकडे असलेल्या 'कामधेनू'बद्दल खात्री पटली. व त्याने जमदग्निंकडे कामधेनू'ची मागणी केली. तेव्हा जमदग्नि म्हणाले," हे राजन, तुझ्याजवळ अलोट सम्पत्ती, हजारो दास-दासी व सेवक आहेत. तेव्हा तुला कामधेनू काय कामाची? आम्हा ऋषीमुनींकडे कामधेनू असल्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी, तसेच वातावरण पवित्र ठेवण्यासाठी यज्ञ याग करायला व हरिस्मरणाला आम्हाला भरपूर वेळ मिळत आहे. त्यामुळे ही कामधेनू आमच्याकडेच राहू देत." तेव्हा त्यांचे बोलणे न ऐकता कार्तवीर्यार्जुनाने बलात्काराने कामधेनू हरण करायचा प्रयत्न केला. तिचे चारी पाय दोरीने आवळून बान्धताच कामधेनूने ते बन्धन एका क्षणार्धात सोडून जमीनीवर जोराने पाय आपटले. व क्षणार्धात तेथे हजारो गाई उत्पन्न झाल्या. आणि त्यांनी शिन्गे खुपसून कार्तवीर्यार्जुनाच्या सैन्यास ठार मारले. व कामधेनू पुनश्च जमदग्निंच्या जवळ येऊन उभी राहिली. त्यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा अत्यंत सन्ताप झाला. व तो जमदग्निंना ठार मारण्यासाठी पुढे सरसावला. तोच कामधेनू त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या पुढे एखाद्या पहाडासारखी उभी राहिली. पण जमदग्नि तिला उद्देशून म्हणाएल," हे नदिनी, जे विधिलिखित आहे, ते तू पुसू नकोस. या राजाची इच्छा पुरी होऊ देत." त्यावर कामधेनू नाईलाजाने दूर झाली. व कार्तवेर्यार्जुनाने जमदग्निऋषींचा शिरच्छेद केला. तो दिवस म्हणजे- मार्गशीर्ष शुद्ध १४, कृत्तिका नक्षत्र व रात्रीचा पहिला प्रहर होता. त्यावर कार्तवीर्यार्जुन पुन्हा कामधेनूस धरायला गेला असता ती अदृश्य झाली. ते पाहून कार्तवीर्यार्जुन भयभीत झाला आणि आपल्या राजधानीस गेला. अश्याप्रकारे शिवयोगींनी रेणुकेस सांगितलेले भवितव्यही खरे ठरले. त्यामुळे रेणुका वैधव्यदु:ख असह्य होऊन "परशुरामा"स हाका मारू लागली. तोच परशुराम कैलासावरून क्षणार्धात आश्रमात आले. व त्यांनी मातेला धीर दिला, की " तू काळजी करू नकोस, सूर्योदय होताच स्थिती पालटुन्न जाईल." त्यावर ऋचिक, वसिष्ठ, अगस्त्य, विठोब, शिरशृन्ग इ. ऋषींनी रेणेकेस बोध केला. तोपर्यन्त अरुणोदय झाला. तेव्हा अगस्त्यमुनींनी वसिष्ठांच्या कमंडलूतील पाणी (जमदग्निंच्या वडिलांच्या)ऋचिक्मुनींच्या हातावर घातले. ऋचिकमुनींनी ते पाणी सन्जीवनी मन्त्राने अभिमन्त्रित करून जमदग्निंच्या मृत शरीरावर शिम्पडले. आणि भविष्यवाणीनुसार जमदग्नि पुन्हा शिवस्मरण करीत उठून बसले. तोच स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. नाना वाद्ये वाजू लागली. आनन्दोत्सव साजरा झाला. अगस्त्यमुनी व ऋचिक मुनींनी शिव-पार्वती-गणेशाची स्तुती करून परशुरामास सर्व देवांना शान्त करन्यासाठी शान्तीहोम करण्यास सांगितले. व ज्या कारणास्तव परशुरामाने आत्तापर्यन्त इतके सामर्थ्य मिळवले.. त्या कार्यास आरम्भ करण्यास सांगितले. म्हणजेच सर्वांचा छळ करणार्‍या कार्तवीर्यार्जुनाचा आणि इतर तत्सम क्षत्रियांचा नाश करून पृथ्वीवरील भार हलका करण्यास सांगितले. पितामहांकडून आलेली आज्ञा घेऊन परशुरामकार्तवीर्यार्जुनाच्या महिष्मती नगरीत आला व सामर्थ्याच्या बळाने मदोन्मत्त झालेल्या सहस्त्रार्जुनाकडे युद्धभिक्षा मागितली. कार्तवीर्यार्जुन परशुरामाला प्रथमच बघत होता. तोपर्यन्त त्याने परशुरामाबद्दल ऐकलेल्या गोष्टीची व त्याच्या पसरलेल्या कीर्तीची खात्री पटली. जरी कार्तवीर्यार्जुन युद्धाला उभा राहिला.. तरी त्याच्या दुष्कर्माचा अन्त जवळ आल्यामुळे मनातून तो अत्यन्त भयभीत झाला होता. "गोहत्या, स्त्रीहत्या, ब्रह्महत्या इ. पाप करण्याबद्दल नेहमी सावध रहा." हा दत्तगुरुंनी दिलेला उपदेश कार्तवीर्यार्जुनाने पालान केला नाही. त्यामुळे त्याच्याकडून गुरुआज्ञेचा भन्ग झाल्याचेही पाप घडले. परशुरामाने आधी शस्त्रास्त्रेकरून सहस्त्रार्जुनाचे सैन्य मारून टाकले. नन्तर अम्बिकास्त्र सोडून प्रथम कार्तवीर्यार्जुनाचे हात तोडले. परन्तु कार्तवीर्यार्जुनास सहस्त्र बाहूंचे वरदान असल्यामुळे एकीकडे परशुराम सहस्त्रार्जुनाचे हात तोडत आहे.. व दुसरीकडे ते परत उत्पन्न होत आहेत.. असे चालले. उत्प्न्न झालेल्या हातांमुळे कार्तवीर्यार्जुन युद्ध करतच राहिला. एकवीस वेळा असे घडल्यावर परशुराम चिन्तीत झाला. यामुळेच "परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली." असे म्हटले जाते. तोच आकाशवाणी झाली, की "अर्जुनाच्या पोटातील अमृताची कुपी काढलीस तर खचित विजयी होशील!" त्याप्रमाणे परशुरामाने केल्यावर सहस्त्रार्जुनाचा वध तो करू शकला. व स्वार्थी, क्षत्रियधर्म विसरलेल्या, ऋषीमुनींचा छळ करून अत्याचार करणार्‍या दुराचारी क्षत्रियांपासून पृथ्वीला मुक्त केले. त्यानन्तर परशुरामाने मातापित्यांस वन्दन करून सर्वांना अभयदान दिले. त्यावर अगस्तिमुनींनी सर्वांना याची आठवण करून दिली, की ""दुष्टांचा संहार करण्यासाठी व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी इन्द्रादि देवांनी प्रार्थना केल्यावरून देवमाता अदितीने दीर्घ तपश्चर्या करून शन्कराकडून वर मिळवला आणि र्णुक राजाच्या यज्ञ कुन्डात ती प्रकट झाली. तिने शिवस्वरूप असणार्‍या जमदग्निंना वरून परशुरामाला जन्म दिला. परशुराम भगवान विष्णुचा सहावा अवतार. त्याच्यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा नाश झाला. त्यामुळे महापतिव्रता रेणुकामातेला कुणी कधीही विसरू नका."" परशुरामाने दुश्ट क्षत्रियांचा संहार करताना जे चांगले सद्धर्मी क्षत्रिय होते.. ते वाचले व परशुरामाला शरण आले. त्या सर्वांना परशुरामाने माता रेणुकेचे दर्शन घडविले. व माता रेणुकेने त्या सर्वांना जोगिन्दर तीर्थात स्नान करून गोरग्रीबांना अन्नदान करन्यास सांगितले. त्यानतर चिरन्जीवी परशुराम पुन्हा हिमालयात निघून गेला. मिथिला नगरीचा क्षत्रिय राजा- जनक याच्याकडे परशुराम आपले शिवधनुष्य घेऊन आला असता लहान सीता त्याचा घोडा करून खेळू लागली.. तेव्हा चिरन्जीवी परशुरामाने जनकराजास सान्गितले, की "हिच्या स्वयंवरात जो कोणी हे धनुष्य पेलेल व याची प्रत्यंचा मोडेल.. त्याच्याशीच हिचा विवाह होईल." त्यानुसार महाविष्णुच्या सातव्या अवतारात प्रभू रामचन्द्राने या शिवधनुष्याची प्रत्यंचा मोडली व सीतेने त्यांस वरले. परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी सह्याद्री पर्वतावरून शरसन्धान करून अरबी समुद्रास मागे हटवले. व तिथे कोंकणभूमी वसविली. तसेच परशुरामाचे वास्तव्य कर्नाटकातील पवित्र 'गोकर्ण' क्षेत्री असल्याचेही मानतात. चिपळूण येथे 'लोटे परशुराम' हे त्यांचे जाज्वल्य स्थान मानले जाते. तसेच तळकोकणातील परशुराम मन्दिर प्रसिद्ध आहे. काही कोकणस्थ ब्राह्मणांचे कुलदैवत परशुराम आहे. परशुरामाची आई- माता रेणुका हिचे अस्तित्व 'माहूर गडा'वर असून ते साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. रेणुकामाता देखील महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुम्बांची कुलदेवता आहे. तिनेच आपल्या पुत्राला -रामभद्राला उर्फ परशुरामाला चिरन्जीवी बनवले होते.

वाचने 35370
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

परशुरामाचा माझ्यापुरतं महत्त्व : परशुरामाबद्दल इंटरव्युमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आणि मला त्याचं उत्तर आल्याने चांगले इंप्रेशन पडले असावे कदाचित.. परशुरामांबद्दल मला असलेली माहिती.. त्यांच्या आई-वडीलांचे नाव, व बापाच्या ऑर्डरवरुन आईची हत्या केली, हे पुराण.. जोगवामधील "लल्लाटी भंडार" ह्या गाण्यावरुन पुनर्जिवित झालेल्या रेणूकामातेलाच "यल्लम्मा" मानतात, हेही कळलं. अरुणाचल प्रदेशमधे एक "परशुराम कुंड" आहे. परशुरामाने मातृहत्या करुन त्याचा परशु इथे धुतला, असे मानतात. इथुनच जवळून "लोहीत" नदी वाहते (लोहीत म्हणजे रक्त), जी पुढे जावून ब्रम्हपुत्रेला मिळते.. ह्या मातृहत्याकारकशस्त्रप्राक्षलणामुळे ब्रम्हपुत्रेचे पाणी गढूळ असुन, हा नद पुजनीय नाही, असे माननारे मानतात..

In reply to by चिगो

परशुरामाबद्दल इंटरव्युमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता
कुठच्या कंपनीत हो? नाही म्हणजे माहिती असलेले बरे कारण उद्या मला पण तिथेच इंटरव्ह्यूला जायचे असेल तर परशुराम वाचायला हवा

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

संघ लोक सेवा आयोगाच्या इंटरव्युत विचारला होता.. आता आधीच्या चार-पाच जणांना इंटेलेक्चुअल टायपातले प्रश्न इचारुन बोर्डाचा चेअरमॅन पिकला होता, की तो टैमपास करत होता, की आमचं थोबाड पाहून त्याने हा प्रश्न विचारला हे त्याचं त्याला माहीत.. :D असं म्हणतात की ह्या इंटरव्युत "सूर्याखालच्या कुठल्याही विषयावर" (Anything under the Sun चा स्वैर अनुवाद) प्रश्न विचारला जाऊ शकतो.. त्याचंच उदाहरण समजा.. ;-)

In reply to by चिगो

चिगो, आमच्या क्रर्नाट्कात रेणुका देवीची २ रुपे मानतत. एक यल्लम्मा आणि दुसरी मरिअम्मा. परशुराम्ने रेणुका देवीबरोबरच तिच्या एका मेइत्रिणीचे पण डोके उडवले. अणि नन्तर चुकुन त्या दोन्ही मुंडक्याची अदलाबदली झाली व रेणुका देवीचे डोके तिच्या मएत्रीनीला आणि मेत्रिनीचे डोके रेनुकादेवीला बसवले गेले. ज्यला रेणुकादेवीचे डोके ते- यल्लम्मा आणि ज्याला तिच्या मेइत्रिणीचे डोके ती मरिअम्मा असे मानतात. अनि दोन्हीची पुजा करतात. आमच्या कडे सोउन्दत्ती या गावाला यल्लम्माचे खुप महतत्व आहे. पोत्तुराज मरीअम्माच्या नावाने स्वत>च्या अंगावर फट्के मरुन घेतो.

मृगनयनीने सांगितलेली परशुरामाची कथा दत्तगुरु, एकनाथ व जोगिनाथ यांवरून तर नाथपंथीच आहे हे सिद्ध होते. कल्की पुराण, विष्णू पुराण, गरूड पुराण आदी पुराणे अलीकडच्या काळात म्हणजे चौथ्या, पाचव्या शतकात आकारास आली, साहजिकच त्यात दत्तांचे उल्लेख आढळतात. दत्त ही वैदिक देवता नव्हे. महाभारतातही दत्ताचा उल्लेख एकदाच येतो तो सुद्धा परशुराम उपाख्यानातच. त्यामुळे हा भाग प्रक्षिप्त असावा असे मानायला पुरेसा वाव आहे. महाभारतात आरण्यक पर्वात परशुराम उपाख्यान आले आहे. जमदग्नी शीघ्रकोपी होते इतकाच उल्लेख आहे. क्रोधदेवता प्रसन्न होण्याचा काहीही उल्लेख नाही. आख्यानानुसार सहस्त्रार्जुन जमदग्नींच्या धेनूचे बळजबरीने हरण करून नेतो. इथे ही धेनू कामधेनू दाखवलेली नाही. ती तर गरीब बिचारी हतबल गाय दाखवलीय. (गाईच्या शरीरातून सैनिक बाहेर पडण्याचा प्रसंग वसिष्ठ-विश्वामित्राच्या आख्यानात आहे. राजा विश्वामित्र नंदिनीचे हरण करण्यासाठी येतात तेव्हा हतबल वसिष्ठ नंदिनीलाच सांगतात की तूच आता स्वतःला वाचव तेव्हा नंदिनीच्या मुखातून, शेपटातून विविध सैनिक उत्त्पन्न होऊन विश्वामित्राचा पराभव करतात.) परशुरामाला धेनूचे हरण झाल्याचे जमदग्नींकडून समजते तेव्हा तो कार्तवीर्याचा वध करतो. हजार हात पुन्हा पुन्हा उत्पन्न होत असे महाभारतात काहीही नाही. पित्याचा वध पाहून चिडलेली सहस्त्रार्जुनाची मुले जमदग्नींच्या आश्रमात घुसून जमदग्नींचा वध करतात. शोकाकूल परशूराम पृथ्वी नि:क्षत्रिय करीन अशी प्रतिज्ञा करून सहस्त्रार्जुनाचा निर्वंश करतो व पुन्हा पुन्हा अशी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करतो. आणि काश्यप ऋषींना पृथ्वी दान करतो तेव्हा ह्याने परत क्षत्रिय संहार करू नये म्हणून काश्यप त्या महेंद्र पर्वतावर जाण्यास सांगतात. बाकी परशुराम जरी चिरंजीवी म्हणून प्रसिद्ध असला तरी त्याचाही मृत्यु अटळ आहे असे महाभारतात म्हटले आहे. द्रोणपर्वात अभिमन्यू वधानंतर शोकाकुल झालेल्या युधिष्ठिराला समजावण्यासाठी नारद त्याला षोडशराजकीय आख्यान ऐकवतात. त्यात मांधाता, दाशरथी राम इत्यादी राजांबरोबरच परशुरामाचेही छोटेसे आख्यान आहे. नारद म्हणतात-....हे सृंजया !, चार श्रेष्ठ गोष्टींमुळे तुझ्या पुत्रापेक्षा अधिक श्रेष्ठ असलेला परशुरामही मृत्यु पावणार आहे. तेव्हा यज्ञ न करणार्‍या आणि दान न देणार्‍या तुझ्या पुत्राविषयी तू शोक करू नकोस. सृंजया हे तुझ्यापेक्षाही कित्येक पटीने श्रेष्ठ असलेले आधी मेलेले आहेत आणि पुढेही मरतील.

In reply to by प्रचेतस

आपल्या पत्नीच्या पोटीचा कोणाहीपासून झालेला पुत्र (कानीन पुत्र) हा बीजक्षेत्रन्यायाने (पक्ष्याच्या द्वारे शेतात पडलेल्या बीजापासून उत्पन्न झालेले धान्य हे शेतकर्‍याच्या मालकीचे असते) औरस पुत्राच्या इतक्याच योग्यतेचा मानावा असा शास्त्रनियम आहे. याच न्यायाने युधिष्ठिर व अन्य पांडव हे पांडूचे पुत्र मानले गेले. तेव्हा पुतण्याचे नाते आणले नाही तरी अभिमन्यु युधिष्ठिराचा पुत्र होतो.

In reply to by दिगम्भा

दिगम्भा, अभिमन्यू सुभद्रेचा ना? का सुभद्राही मागून आणलेली भिक्षा, अर्थात वस्तू समजली गेली? --- धागा आवडला. प्रतिसाद तेवढे रंजक नाहीत. गवि, परा, ५० फक्त, शिल्पा ब इत्यादी सर्व होतकरू लोकांनी पुराणातून रंजकता शिकावी अशी नम्र विनंती. बेटर लक नेक्स्ट टाईम.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दिगम्भा, अभिमन्यू सुभद्रेचा ना? का सुभद्राही मागून आणलेली भिक्षा, अर्थात वस्तू समजली गेली? ----------- हेच विचारायचे होते ......... प्रजा ही राजाचा जणू पुत्र असते.. या न्यायानेही नागरीक अभिमन्यु राजा युधिष्ठीराचा पुत्र होतो, असेही मग उत्तर येईल :)

In reply to by प्रचेतस

काश्यप ऋषींना पृथ्वी दान करतो तेव्हा ह्याने परत क्षत्रिय संहार करू नये म्हणून काश्यप त्या महेंद्र पर्वतावर जाण्यास सांगतात - जी पृथ्वी परशुरामाने दान केली, त्याच पृथ्विवरच्या महेंद्र पर्वतावर त्याला जायला सांगण्यामागं काय उद्देश असावा, याबद्द्ल कुणी सांगेल का ? की महेंद्र पर्वत हा पृथ्बी अनेक्स मध्ये होता /आहे.

In reply to by ५० फक्त

काश्यप ऋषींना पृथ्वी दान केल्यानंतर दान केलेल्या जमिनीवर कसं राहणार? म्हणून परशुरामाने समुद्र हटवून नवीन अशी कोकण भूमी (कुमारी भूमी) तयार केली आणि काही लोकांना तिथे नेऊन वसाहती केल्या अशी एक कथा आहे. त्यामुळे कोकणात परशुरामाची देवळे आढळतात. तसंच जोगेश्वरी (जोगुळांबा) म्हणजेच रेणुका असल्यामुळे कोकणातल्या अनेक लोकांची कुलदेवता जोगेश्वरी आहे.

सध्या श्री भगवान परशुराम (व सप्त चिरंजीव मंडळातले अन्य) कुठे असतात व काय करतात? कोणी सांगू शकेल काय?

In reply to by गवि

खरय गवि. आपण भेटल पाहिजे... टचमधे राहिले पाहिजे... ऐनवेळी कोण कुठय विचारल तर पत्ता लागत नाही. मी पन नवीमुंबैत नोकरी करतो

In reply to by गवि

तरी म्हणलं होतं तुम्हाला पुणे गेटच्या कट्ट्याला मला तुमच्या फेसबुकात अ‍ॅड करुन घ्या, टच मध्ये राहु, पण तुम्हाला पटलंच नाही, असो आता तरी करा अ‍ॅड. बाकी ऑर्कुटवर सगळे एकत्र होतं ना आपण, ते ऑर्कुट बंद झालं अन मग फार अवघड झालं आहे सगळं.

In reply to by गवि

खरंच एक कट्टा करायला हवा राव, म्हणजे भेट तरी होईल. जाहीर धागा काढला तर कदाचित पंचपतिव्रता, सोळा मातृका, चौसष्ट योगिनी, देवकन्या, नागकन्या आसरांच्या स्वार्‍यांसह हजेरी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्या पुत्राचे नाव- कार्तवीर्यार्जुन. यास जन्मतः दोन्ही हात नव्हते, पाचव्या वर्षानन्तर दत्तकृपेने अचानक हजार हात उत्पन्न झाले.
मजाच म्हणायची. असे हजार हात उत्पन्न व्हायला दत्तकृपा व्हायला हवी हे समजले. पण अशी दत्तकृपा व्हायला काय क्वालिफिकेशन लागते हो? आणि हजार हातांबरोबर हजार खांदे पण होते का की दोन खांद्यांवर प्रत्येकी ५०० असे हजार हात होते? कितीही प्रयत्न केले तरी असे चित्र डोळ्यासमोर आणता आले नाही.

कुणीतरी परशुरामांना बोलावणे धाडा रे. हे साले काही मिपासदस्य फार माजले आहेत. २१ वेळा मिपासुद्धा नि:सदस्य करा म्हणावं !

In reply to by परिकथेतील राजकुमार

बादवे, परशुरामाच्या इथली प्रसादाची खिचडी कोणी खाल्ली आहे का? डाळतांदुळाच्या गरमागरम अत्यंत स्वादिष्ट खिचडीसोबत लोणचं इतकाच प्रसाद असतो पण चटक लागावी इतका चवदार प्रकार आहे.

In reply to by गवि

हे गवि म्हणजे फारच अवघड ब्वा! बारसे ते बारावे आणि इतर सगळ्याच ठिकाणच्या सगळ्याच पाककृतींमध्ये गविंना फारच रस ! बाकी सगळंच जाऊ दे कुठंही, कधीही नी कसंही खाद्यपदार्थ आठवतात ह्यांना ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

नालायक माणसा, हसवून हसवून मारतो काय?

१) मनापासून सांगा. तुम्हाला ही गोष्ट खरी वाटते ? २) लेखाचे नाव चिरंजीव परशुराम हवे. चिरंजिवी हा एक नट आहे. चिरंजीवी हे चिरंजीव चे विभक्ती प्र्त्यय लावलेले रूप म्ह्णून लिहिले असेल तर व्याकरण चुकले आहे. परशुरामाला आवडायच नाही हं हे :प)

In reply to by राजघराणं

राजघराणं'जी... मी अर्थातच माझ्या विधानांशी आणि लेखाशी सहमत आहे. कारण परशुरामाची कथा कुणाला कितीही काल्पनिक वाटली, तरी ते त्यांच्या द्रुष्टीने बरोबर असू शकते. कारण सध्याच्या कलीयुगाच्या प्रभावानुसार आणि नियमांनुसार शस्त्र-अस्त्र विद्या, त्यांची साधना, मन्त्रविद्या इ. शक्ती प्राप्त होण्यासाठी अनुकुल परिस्थिती नाही. व तितकेसे पावित्र्यही नाही. त्यामुळे बर्‍याच जणांना या गोष्टी परिचितही नाहीत. "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" हा नियम या ठिकाणीदेखील वापरून बर्‍याच लोकांना असे वाटते, की या शस्त्र अस्त्र विद्या, सिद्धी, मेलेला माणूस पुन्हा जिवन्त करणे.. वगैरे गोष्टी आमच्या समोर घडल्या तरच आम्ही विश्वास ठेऊ.. साहजिकच या "विद्या" म्हणजे काही जादूचे प्रयोग नाहीत.. की लोकांच्या फर्माईशीवरून करून दाखवले. या शक्तीवर श्रद्धा असणार्‍या व तिची साधना करणार्‍यांना या उपासनेअंती व साधनेअन्ती साश्य होतात, हेही तितकेच खरे! असो.. वर काही ठिकाणी प्रतिसादांमध्ये "कामधेनू" या गायीबद्दल आक्षेप घेतला गेला आहे... मुळात ती जर एखादी साधी गाय असती, तर कार्तवीर्याजुनाने ती जमदग्निंकडे मागितलीच नसती. ही "कामधेनू" इन्द्राने जमदग्नि आणि रेणुकेच्या विवाहप्रसन्गी त्यांना भेट म्हणून दिली होती. तिच्यामुळेच रोज जमदग्नि आणि रेणुकेला रोज सर्वांसाठी उत्तम स्वयंपाक बनवून देऊ शकत होते. कार्तवीर्यार्जुनाच्या अत्याचाराला कन्टाळलेले ऋषीमुनी (लेखामध्ये यांचा उल्लेख आहे) आणि त्यांचे शिष्यगण हे रामशृंग पर्वतावर जमदग्निंकडे आश्रयास आलेले होते. परशुरामाने पितृआज्ञेनुसार केलेल्या मातृहत्येनन्तर.. त्याच्या आज्ञापालनामुळे जमदग्नि प्रसन्न झाले, तेव्हा त्यांनी परशुरामाकडे वर मागण्यास सांगितले तेव्हा परशुरामाने माता रेणुका व चारी भाऊ यांना पुनः जिवन्त करण्याची विनन्ती करुन जमदग्निंना क्रोधदेवतेचा त्याग करण्यास सांगितले त्यामुळे एकदा क्रोधदेवतेचा त्याग केल्यानन्तर जमदग्नि ऋषींकडे जेव्हा आश्रमात आलेल्या कार्तवीर्यार्जुनाने कामधेनू मागितली, तेव्हा जमदग्नि ऋषी त्याच्यावर क्रोधित होऊ शकत नव्हते. कार्तवीर्यार्जुनाकडे अफाट ऐश्वर्य होते, तरी नारदांनी केलेल्या कामधेनूच्या दैवी वर्णनामुळे तो आपल्या सैन्यासह रामशृंगावर गेला. तेव्हा काही वेळातच अतिथीधर्मानुसार जमदग्नि-रेणुकेने कामधेनूच्या सहय्याने त्यास व त्याच्या सैन्यास (घोड्यासकट सर्वांना) उत्तम भोजन दिले. त्यामुळे कार्तवेर्यास कामधेनूचा अधिकच मोह पडला.. व जमदग्निंनी ती त्यास न दिल्याने तो चिडला तसेच परशुराम तेव्हा कैलास पर्वतावर असल्यामुळे जमदग्निंचा वध करणे कार्तवीर्यास सोपे झाले. अर्थात विधिलिखितानुसार जमदग्निंचा मृत्यू काही काळाच टिकला. पुन्हा सन्जीवनीमन्त्राच्या साहाय्याने ते जिवन्त झाले. व नन्तर परशुरामाने कार्तवीर्याचा आणि तत्सम क्षत्रियांचा वध केला.. वाल्मिकींनी याचे वर्णन करताना "क्षात्रविमर्दन" असे न म्हणता "राजविमर्दन" असे म्हटले आहे. हेही तितकेच खरे, की कलीयुगात देवावरील किन्वा गुरुवरील असीम श्रद्धेशिवाय या गोष्टी शक्य नाही. महाराष्ट्रात काही सन्तांच्या बाबतीत मात्र या गोष्टी खर्‍या झालेल्याही आहेत. विठ्ठलभक्तीत निमग्न झालेल्या गोर्‍या कुम्भाराने माती तुडवता तुडवता आपल्या रांगत आलेल्या बाळाला चुकून तुडवले व ते बाळ मृत्यू पावले. त्याच्या बायकोने प्रचन्ड आक्रोश केला.. तेव्हा विठ्ठ्लाची करूणा भाकल्यावर गोर्‍या कुम्भारास त्याचे बाळ पुन्हा जसेच्या तसे जिवन्त मिळाले. रामदास स्वामींनी देखील कुलकर्णी नावाच्या एका पुत्रहीन अग्निहोत्री ब्राह्मणास तिरडीवरून उठवले होते.. या कुलकर्णीची बायको जेव्हा समर्थांच्या पाया पडली,तेव्हा त्यांनी तिस "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" असा आशीर्वाद देऊन तिच्या नवर्‍यास जिवन्त केले होते. सन्त तुकारामांचा भक्त असलेल्या एका तेल्याचा पाच वर्षाचा मुलगा मरणासन्न अवस्थेत असतानादेखील आणि बायको घरी शिव्या घालत असताना देखील तो तेली श्रद्धेपोटी तुकारामांच्या कीर्तनास आला होता. इकडे घरी मुलगा मरण पावल्यावर त्याची बायको मुलाचे प्रेत घेऊन कीर्तनाच्या ठिकाणी आली. व तुकारामांसमोर ते टाकून अत्यंत आक्रोशाने तिने टाहो फोडला.. तेव्हा तुकोबांनी सर्वांना विठ्ठलनामाचा गजर करण्यास सांगितला.. व तो मृत मुलगा हसत उठून बसला.... अर्थात या गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत होतातच असे नाही... मनाचे आणि शरीराचे पावित्र्य, मानलेल्या गुरुवरील, देवावरील एकनिष्ठता आणि श्रद्धा या गोष्टी असणार्‍या ल्कांना याची प्रचिती येते. ज्यांची श्रद्धा नाही त्यांच्यासाठी मग कदाचित या सगळ्या गोष्टी भाकडकथा बनून राहतात... आणि त्या तश्या राहिल्या.. तरी कुणालाच काहीच फरक पडत नाही.. कारण ज्याला जे मिळायचे आहे.. ते मिळतेच्च!!! __________________________________ अवांतर :- राजघराणं'जी... तुमची विनोदबुद्धी खूप चांगली आहे. पण तुमच्याकडे ... आयमीन तुमच्या फोटोकडे पाहून तसे वाटत नाही!.. सन. २००७ पासून ऑर्कुटवरती आणि सन. २०१० पासून चे.पु. वरती तुमचा एकच फोटो आहे म्हणून म्हटलं!! ;) ;) त्या फोटोत तुम्ही खूप शान्त, गम्भीर वाटता!!! :)

In reply to by मृगनयनी

झाल्यानंतर आता प्रतिसाद देणे म्हणजे टीआरपी वाढवण्यासाठीचे प्रयत्न आहेत असे समजल्यास त्याबद्दल मी जबाबदार नाही. ह. घ्या. असो. क्ष घराण्याचे कुळदैवत परशुराम आहे. अशा परशुरामाबद्दल आदर बाळगण्याची गरज क्ष घराण्याखेरीज इतरांना भासत नाही याबद्दल क्ष घराण्यातल्या व्यक्तीला वैषम्य वाटणे साहजिक आहे. त्याउलट आईला मारणार्‍या आज्ञाधारक वृत्तीचे, वडिलांना प्रश्न न करण्याच्या वृत्तीचे कौतुक होऊ नये असे वाटणार्‍यांनी परशुरामाच्या प्रचलित कथेवरून परशुरामाबद्दल काही उद्गार काढले तर तेही गैर नाही असे वाटते. >>मी अर्थातच माझ्या विधानांशी आणि लेखाशी सहमत आहे. कारण परशुरामाची कथा कुणाला कितीही काल्पनिक वाटली, तरी ते त्यांच्या द्रुष्टीने बरोबर असू शकते. कारण सध्याच्या कलीयुगाच्या प्रभावानुसार आणि नियमांनुसार शस्त्र-अस्त्र विद्या, त्यांची साधना, मन्त्रविद्या इ. शक्ती प्राप्त होण्यासाठी अनुकुल परिस्थिती नाही. व तितकेसे पावित्र्यही नाही. ...हेही तितकेच खरे, की कलीयुगात देवावरील किन्वा गुरुवरील असीम श्रद्धेशिवाय या गोष्टी शक्य नाही. मृगनयनी लिहीतात त्यावर त्यांचा गाढ विश्वास असल्याप्रमाणे वाटते. पण ऐकीव, चमत्काराने भरलेल्या कहाण्या ऐकून साधेभोळे, कोणावरही विश्वास टाकणारे, निरागस लहानपण मागे टाकून अनेक वर्षे झाल्यानंतरही गाढ विश्वास कसा काय बसू शकतो, याचे आश्चर्य वाटते. याला श्रद्धा हे उत्तर पुरेसे नाही. कोणाच्यातरी कपोलकल्पित चमत्काराने भरलेल्या कहाण्या ऐकून आज जर कोणी आपल्या बाळाला तुडवले तर अशांनी तुरुंगवासात काय करायचे ह्याचा प्रश्न नको. बाळ श्रद्धेमुळे परत जिवंत होण्याची वाट बघत बसणे हे खूपच मोठे वेळकाढू काम झाले. आत्ता तुडवून मग मूल परत जिवंत होत नाही ही कलियुगाची किमया ठरवली तर ही स्वतःची किंवा इतरांची फसवणूक ठरेल.. आज इतिहासात त्या कुंभाराच्या मुलाच्या तुडवल्या जाण्याने झालेल्या मृत्यूची कसलीही नोंद आहे का? गोर्‍या कुंभाराचे एखादे पद म्हटले तर चटकन आठवत नाही, पण ही गोष्ट मात्र सर्वांना आठवते कारण तशी ती आठवावी म्हणूनच कोणीतरी तयार केलेली आहे. समर्पणाने लोक लक्षात राहतात - म्हणून अशा काही तरी कथा रचण्याची पद्धत आहे. (अवांतर - आठवा 'एक दूजे के लिये' . ती रती अग्निहोत्री-कमल हसन लक्षात राहतात. पण आयुष्याची होळी न करता आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करून एकमेकांना तरी सुखी करणारे कोणाच्याही आठवणीत नसतात. ) कोणाचे भक्त किंवा प्रेमिक म्हणून श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा कोणाच्या तरी जीवनाचे समर्पण हा एकमेव मार्ग नाही. इतरही बरेच मार्ग आहेत आणि असावेत. असो.

In reply to by चित्रा

धाग्याचे रंजनमूल्य एकाएकी कमी करणार्‍या चित्राताईचा निषेध. ॥करील मनोरंजन जो मुलांचे। जडेल नाते प्रभूशी तयाचे॥ -- साने गुरूजी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

होय होय अगदी अगदी, नाहीतर या उकाड्यात तेवढीच घटका दोन घटका करमणुक होती, असो. कुणाकडे अजुन अशा चमत्कारी स्त्री पुरुषांची यादी आहे का बघा ना काढुन , अजुन एक दोन धागे काढा तेवढंच बरं असतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धागा लिहिणारी एक स्त्री. त्यावर विचारी भूमिकेतून समीक्षा करणारी एक स्त्री आणि तिचा निषेध करणारी एक स्त्री. ... बघा आम्ही म्हणतो त्यात काही खोटं आहे का? 'स्त्रीच स्त्रीची शत्रू' :) करील मनोरंजन जो मुलांचे.. ... मुलींचे मनोरंजन का नको? या भेदभावाचा स्पष्ट निषेध.

In reply to by योगप्रभू

यातला विनोद समजला नाही. लॉजिक असेल तर तेही समजलं नाही. Faus pas या शब्दाचा अर्थ पुरेपूर समजला. असो.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यातला विनोद समजला नाही. ... परमेश्वरा! मी समजतोय त्यापेक्षाही समाजाची स्थिती बिघडलीय का? तरी बरं. स्मायली टाकली होती वाक्यापुढे. लॉजिक असेल तर तेही समजलं नाही. ... लॉजिक नव्हतंच तर सापडणार कसं? Faus pas या शब्दाचा अर्थ पुरेपूर समजला. असो. ... समज तुमचे. गैरसमजही तुमचे. ह. घ्या. इतकेच म्हणू शकतो.

In reply to by योगप्रभू

योगप्रभू'जी... या लॉजिकवरून मला लहान मुलांचा एक "नॉनव्हेज जोक" आठवला..... ;) केळ एकदा सफरचन्दाला म्हणतो, की... अरेरे!..काय रे तुझी अवस्था.. सगळे लोक तुला कापून खातात!.. मग ... मग.... सफरचन्द त्याला म्हणतं..."अरे वेड्या मला तरी किमान कापून खातात.. पण तुला तर आधी आख्खं नागडं करतात. आणि मग चवीचवीने खातात!!!! अंहीही हीहीही हहहाहाहाआह्हाहा... ;) ;) =)) =)) =)) "नागडा" या शब्दामुळे लहान मुलांना हा जोक नॉनव्हेज वाटतो! :) तात्पर्यः प्रत्येकाची "लॉजिक" या शब्दाची व्याख्या वेगळी असते!!! म्हणजे लहान मुलांची वेगळी आणि आपल्यासारख्यांची वेगळी व्याख्या असते! :) असो!... ह्या मुलांनी "साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी" हे पुस्तक वाचावे.. म्हणजे त्यांच्यावर लॉजिकली चान्गले सन्स्कार होतील! :)

In reply to by योगप्रभू

+ {ln(e)+sin(0)}. असेच म्हणतो. सदासर्वदा सेन्सर लावून बळेच प्रतिसादी-विसंवादी भाले रोवण्याचा तीव्र निषेध. असो.

In reply to by चित्रा

>>मृगनयनी लिहीतात त्यावर त्यांचा गाढ विश्वास असल्याप्रमाणे वाटते. पण ऐकीव, चमत्काराने भरलेल्या कहाण्या ऐकून साधेभोळे, कोणावरही विश्वास टाकणारे, निरागस लहानपण मागे टाकून अनेक वर्षे झाल्यानंतरही गाढ विश्वास कसा काय बसू शकतो, याचे आश्चर्य वाटते. याला श्रद्धा हे उत्तर पुरेसे नाही. एका प्रतिसादात ( दुवा ) त्यांनी असे लिहिले आहे.. >>बाकी सप्तचिरंजीवींबद्दल माझे मत विचारत असाल, तर हो!.. माझा पूर्ण विश्वास आहे की परशुराम, अश्वत्थामा,बली, व्यास, हनुमान, बिभीषण आणि कृपाचार्य हे सर्वजण अमर आहेत!.. अर्थात विश्वास -अविश्वास हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण धार्मिक लोक चमत्कारांना / कथांना अजुनहि सारासार विवेक बुद्धी ना वापरता कसे काय विश्वास ठेवतात .. हे मोठे आश्चर्य आहे .

In reply to by मृगनयनी

मनाचे आणि शरीराचे पावित्र्य, मानलेल्या गुरुवरील, देवावरील एकनिष्ठता आणि श्रद्धा या गोष्टी असणार्‍या ल्कांना याची प्रचिती येते.
हे वाक्य खूप आवडले आहे. बाकीच्या टुकार आणि खोचक प्रतिसादांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. अशी लोकं असायचीच.

In reply to by अँग्री बर्ड

मनाचे आणि शरीराचे पावित्र्य, मानलेल्या गुरुवरील, देवावरील एकनिष्ठता आणि श्रद्धा या गोष्टी असणार्‍या ल्कांना याची प्रचिती येते.
हे वाक्य खूप आवडले आहे. बाकीच्या टुकार आणि खोचक प्रतिसादांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. अशी लोकं असायचीच.
धन्यवाद! अ‍ॅन्ग्री बर्ड! (रो.भि.) "अशी" लोकं असायचीच.... शेवटी ज्याचा त्याचा अनुभव आणि विश्वास!!! :)

In reply to by मृगनयनी

रामदास स्वामींनी देखील कुलकर्णी नावाच्या एका पुत्रहीन अग्निहोत्री ब्राह्मणास तिरडीवरून उठवले होते.. या कुलकर्णीची बायको जेव्हा समर्थांच्या पाया पडली,तेव्हा त्यांनी तिस "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" असा आशीर्वाद देऊन तिच्या नवर्‍यास जिवन्त केले होते. सन्त तुकारामांचा भक्त असलेल्या एका तेल्याचा पाच वर्षाचा मुलगा मरणासन्न अवस्थेत असतानादेखील आणि बायको घरी शिव्या घालत असताना देखील तो तेली श्रद्धेपोटी तुकारामांच्या कीर्तनास आला होता. इकडे घरी मुलगा मरण पावल्यावर त्याची बायको मुलाचे प्रेत घेऊन कीर्तनाच्या ठिकाणी आली. व तुकारामांसमोर ते टाकून अत्यंत आक्रोशाने तिने टाहो फोडला.. तेव्हा तुकोबांनी सर्वांना विठ्ठलनामाचा गजर करण्यास सांगितला.. व तो मृत मुलगा हसत उठून बसला....
रामदास आणि तुकाराम जर शिवरायांचे समकालीन होते तर असे चमत्कार त्यांनी (रामदास आणि तुकारामांनी) लढाईत मारल्या जाणार्‍या मावळ्यांच्या बाबतीत का बरे केले नसावेत? उगा आपलं हाताशी कीबोर्ड आहे म्हणून काहीही टंकायचं काय? अशीच एक ती ज्ञानदेव चरीत्रातील सच्चिदानंदबाबांची कथा. एखादयाच्या चरित्राचे उदात्तीकरण करायचे ठरवले, त्याला अमकातमक्याचा अवतार म्हणून जगासमोर ठेवलं की त्यांच्या नावावर चमत्कारांची बिलं फाडायला हे मोकळे. ज्ञानदेव, रामदास, तुकाराम किंवा ईतर कोणीही संत हे त्या त्या काळातील प्रगल्भ व्यक्तिमत्वे होती, त्यांना भल्या-बुर्‍याची जाण होती. त्यांनी जो काही उपदेश केला त्यातील आजच्या काळात जे जे सुसंगत आहे ते ते घेऊन पुढे चला ना. अमक्या संताने तमक्याला जीवंत केलं असल्या पुडया कशाला सोडता.

परशूराम, रमताराम अथवा नुस्ताच राम यांची नाराजी ओढवून घेण्याची इच्छा नाही म्हणून धाग्यावर हजेरी लावली आहे, बाकी चालू देण्यास आमची परवानगी लागत नाहीच* श्रेयअव्हेर - थत्तेचिच्चा अवांतर - हॅरी पॉटरने ड्रॅगन मारल्याची नोंद इतिहासात अथवा पुराणात नाही असे नोंदवतो.

चित्रा यांचा प्रतिसाद वाचून बरं वाटलं. -दिलीप बिरुटे

९९

In reply to by आर्य

आर्य आणि रा.घ... धन्यु!... आज तुम्ही लावलेल्या चिरन्जीवी भगवान परशुरामांच्या छायाचित्रांमुळे...वादांना माहित नाही... पण लेखाला मात्र 'मूर्तस्वरूप' आले हो!!! .... ||जय परशुराम|| :)

'आमचे अजून ग्रहण सुटले नाही' असं गोपाळ्राव आगरकर शंभर वर्षांपूर्वी म्हणाले होते. आजदेखील फार वेगळी परिस्थिती दिसत नाही. तेह्तीस कोटी देव जितक्या लवकर पेन्शनर बनतील तितकं बर. आणखीन काय बोलणार ?

सध्या चिरन्जीवी रामभद्र उर्फ परशुराम कुठे वास्तव्यास असतात ? :puzzled:

की हिटलरचे प्रेम लोकांना कसे वाटू शकते? त्याचे मूळ परशूरामाच्या कथेत सापडले.. एक अख्खी जमात डायरेक्ट २१ वेळा नष्ट! क्या बात है. फारच आदरणीय विचार. बिचार्‍या हिटलर कडून एकदाही पूर्ण झाले नाही ज्यूंना संपविणे. पण इन प्रिन्सिपल सेम सेम. (हिटलर प्रेमाची मूळ संगती लागल्याने आनंदी झालेला, ) गोपाळ

एखाद्या जाती/धर्माचा दूराभिमान व्यक्तीस किती भ्रमिष्ट व बावळट बनवतो याचे ज्वलंत उदा म्हणजे हा लेख व त्याखालील काही निवडक प्रतिसाद.