आपल्याला नेहमी येता जाता कसलीतरी दृश्ये दिसतात आणि त्यातून काहीतरी मनात उमटतं. असल्या दृश्श्यांना, असल्या क्षणात घडून गेलेल्या किश्श्यांना नेहमीच काही विशेष अर्थ असतोच असे नाही. बस्स काहीतरी चटकन होऊन जातं आणि आपण तेवढ्यापुरतं आश्चर्य वाटून गप्प बसतो. त्याबद्दल कुठे बोलावं एवढं महत्त्व कदाचित त्या दृश्याला किंवा सहज घडून गेलेल्या किश्शाला कदाचित असत नाही. पण असली दृश्ये सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येत असतील हे नक्की. ती इथे कृपया सगळ्यांनी द्यावीत. ही दृश्ये बिनमहत्त्वाची असली तरी ती खरी असावीत, काल्पनिक नकोत. ती विनोदी, दु:खद, सुन्न करणारी, कुणाचातरी मूर्खपणा जाहिर करणारी कसलीही असू द्या, पण ती 'समथिंग रिअल फ्रॉम रिअॅलीटी' असावीत.
सुरुवात मी करतो.
-----------------------------------
आमची कॉलनी तशी रिटायर्ड लोकांची कॉलनी म्हणता येईल. पँटला पट्टा न लावता इन केलेले, पांढर्या सुती पँटी घालून सत्तरी-बहात्तरीतले आणि अनेक पावसाळ्या उन्हाळ्यातून आलेला घरंदाज जख्खपणा मिरवत सेकंड इनिंगवाले इकडेतिकडे फिरताना नेहमीच दिसतात. त्यामानाने तरुण मुले मुली तुरळक रस्त्यावर दिसतात - दिसले तरी भुर्रर्रकन गायब होण्यापुरतेच. मग पायी चालणारे हेच पैलतोगे काऊ कोकताहे वाल्या वृद्ध आणि वृद्धा!
कॉलनीतल्या कुठल्याही रस्त्यावर जा, शांतता तर एवढी की ही सुखवस्तू घरे उगाच बांधून ठेवली आहेत, तिथे खरंतर कुणीच रहात नाही, लोक घरे सोडून कुठेतरी निघून गेले आहेत असं वाटावं एवढी.
मी ज्या रस्त्याने ऑफिसकडे चालत येतो त्यावरील बंगल्यासमोर कधीकधी एक आजोबा बसलेले दिसतात. त्यांना कॅथेटर लावलेलं आहे. हे आजोबा पण जख्खच! ठेंगणी मूर्ती, गोल गरगरीत डोके आणि जाड गोलगोल वर्तुळे दिसणारा त्यांचा तो लठ्ठ काचेचा जुना चष्मा. बाबा सत्तरी-पंच्याहत्तरीचे सहज असतील, चेहेर्यावर मात्र दोन वर्षाच्या मुलाच्या चेहेर्यावर असतात तसे, जगाबद्दल कायम उत्सुक असल्यासारखे, आजूबाजूच्या हलणार्या जगाबद्दल परम आश्चर्य दाखवणारे भाव! आणि कधी कधी ते कॅथेटरची पिशवी हातात घेऊन बंगल्यासमोरच्या फूटपाथवरुन जवळपास दुडूदुडू धावत, त्याच नेहमीच्या आश्चर्यचकित चेहेर्याने इकडेतिकडे पहात शतपावली करतात ते पाहून तर 'वृद्धत्त्वी नीज शैशवास जाणे' या ओळी त्यांच्यात मूर्तीमंत झाल्यासारखे वाटते. सकाळी आणि सायंकाळी ते आपले आजूबाजूच्या हलत्या, चालत्या जगाचं निरीक्षण करीत, उत्सुक होऊन बसून असतात, हे मी नेहमी पहातो.
लांबून जवळ येणार्या माणसाकडे टक लाऊन पहाणे, आणि जवळ आल्यावरही कुणी त्यांच्या नजरेला नजर दिली की ते आजोबा नक्की काहीतरी बोलणार!
मलाही ते बर्याच वेळा बोलले आहेत - पण स्वत:च्या मनगटावर टिचकी मारुन त्यांचा तो ठरलेला प्रश्न!
''किती वाजलेत??''
किती वाजलेत हे त्यांना सांगताना मला फार आनंद होतो.
वाचने
29312
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
In reply to आमचेही दोन पैसे by प्रीत-मोहर
खूपच छान! लोकांनीही वाट
In reply to आमचेही दोन पैसे by प्रीत-मोहर
हा अनुभव पुण्यातला वाटत नाही,
In reply to आमचेही दोन पैसे by प्रीत-मोहर
इथल्या आजी असल्या गोष्टींना घाबरत नाहीत
In reply to हा अनुभव पुण्यातला वाटत नाही, by ५० फक्त
५० फक्त. हा अनुभव तुमच्या
In reply to हा अनुभव पुण्यातला वाटत नाही, by ५० फक्त
पुण्यातील आजी...
In reply to हा अनुभव पुण्यातला वाटत नाही, by ५० फक्त
आवडला अनुभव
In reply to आमचेही दोन पैसे by प्रीत-मोहर
रेवतीचा अनुभव वाचून स्तब्ध
२००५ मधली गोष्ट. तेव्हा मंचर
मागच्या महिन्यात सूड बरोबर बदलापूरला जातानाची गोष्ट...
>>> "तो बघ बैल" उशीरा 'नाव'
In reply to मागच्या महिन्यात सूड बरोबर बदलापूरला जातानाची गोष्ट... by मोदक
खरंय हो उशिराच लक्षात आलं
In reply to >>> "तो बघ बैल" उशीरा 'नाव' by प्यारे१
>>"अय्या ते बघ बदक!!" --- आणि
In reply to खरंय हो उशिराच लक्षात आलं by सूड
बदक कसलं रे? आम्हाला बघून
In reply to खरंय हो उशिराच लक्षात आलं by सूड
आमच्या समोरच उभ्या असलेल्या
In reply to बदक कसलं रे? आम्हाला बघून by प्यारे१
सूड ला उठवून दोनच्या सीट वर आम्ही तिघे अॅडजेस्ट केले असते रे...
In reply to आमच्या समोरच उभ्या असलेल्या by प्रचेतस
हा धागा आणि प्रतिक्रिया
इनिगोय+१
In reply to हा धागा आणि प्रतिक्रिया by इनिगोय
सुंदर
एक आळसावलेला शनिवार..
एक चांगला धागा परत वरती आणतोय
"How's the weather up there?"
In reply to एक चांगला धागा परत वरती आणतोय by बहुगुणी
मी अनुभवलेला एक लिफ्टमधला
In reply to "How's the weather up there?" by पिलीयन रायडर
Now I never will!
In reply to एक चांगला धागा परत वरती आणतोय by बहुगुणी
यकुचे धागे नका काढू यार वर...
+ १००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
In reply to यकुचे धागे नका काढू यार वर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to यकुचे धागे नका काढू यार वर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यकुचा माझा वैयक्तिक परिचय