अशात काय पाह्यलंत???
आपल्याला नेहमी येता जाता कसलीतरी दृश्ये दिसतात आणि त्यातून काहीतरी मनात उमटतं. असल्या दृश्श्यांना, असल्या क्षणात घडून गेलेल्या किश्श्यांना नेहमीच काही विशेष अर्थ असतोच असे नाही. बस्स काहीतरी चटकन होऊन जातं आणि आपण तेवढ्यापुरतं आश्चर्य वाटून गप्प बसतो. त्याबद्दल कुठे बोलावं एवढं महत्त्व कदाचित त्या दृश्याला किंवा सहज घडून गेलेल्या किश्शाला कदाचित असत नाही. पण असली दृश्ये सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येत असतील हे नक्की. ती इथे कृपया सगळ्यांनी द्यावीत. ही दृश्ये बिनमहत्त्वाची असली तरी ती खरी असावीत, काल्पनिक नकोत. ती विनोदी, दु:खद, सुन्न करणारी, कुणाचातरी मूर्खपणा जाहिर करणारी कसलीही असू द्या, पण ती 'समथिंग रिअल फ्रॉम रिअॅलीटी' असावीत.
सुरुवात मी करतो.
-----------------------------------
आमची कॉलनी तशी रिटायर्ड लोकांची कॉलनी म्हणता येईल. पँटला पट्टा न लावता इन केलेले, पांढर्या सुती पँटी घालून सत्तरी-बहात्तरीतले आणि अनेक पावसाळ्या उन्हाळ्यातून आलेला घरंदाज जख्खपणा मिरवत सेकंड इनिंगवाले इकडेतिकडे फिरताना नेहमीच दिसतात. त्यामानाने तरुण मुले मुली तुरळक रस्त्यावर दिसतात - दिसले तरी भुर्रर्रकन गायब होण्यापुरतेच. मग पायी चालणारे हेच पैलतोगे काऊ कोकताहे वाल्या वृद्ध आणि वृद्धा!
कॉलनीतल्या कुठल्याही रस्त्यावर जा, शांतता तर एवढी की ही सुखवस्तू घरे उगाच बांधून ठेवली आहेत, तिथे खरंतर कुणीच रहात नाही, लोक घरे सोडून कुठेतरी निघून गेले आहेत असं वाटावं एवढी.
मी ज्या रस्त्याने ऑफिसकडे चालत येतो त्यावरील बंगल्यासमोर कधीकधी एक आजोबा बसलेले दिसतात. त्यांना कॅथेटर लावलेलं आहे. हे आजोबा पण जख्खच! ठेंगणी मूर्ती, गोल गरगरीत डोके आणि जाड गोलगोल वर्तुळे दिसणारा त्यांचा तो लठ्ठ काचेचा जुना चष्मा. बाबा सत्तरी-पंच्याहत्तरीचे सहज असतील, चेहेर्यावर मात्र दोन वर्षाच्या मुलाच्या चेहेर्यावर असतात तसे, जगाबद्दल कायम उत्सुक असल्यासारखे, आजूबाजूच्या हलणार्या जगाबद्दल परम आश्चर्य दाखवणारे भाव! आणि कधी कधी ते कॅथेटरची पिशवी हातात घेऊन बंगल्यासमोरच्या फूटपाथवरुन जवळपास दुडूदुडू धावत, त्याच नेहमीच्या आश्चर्यचकित चेहेर्याने इकडेतिकडे पहात शतपावली करतात ते पाहून तर 'वृद्धत्त्वी नीज शैशवास जाणे' या ओळी त्यांच्यात मूर्तीमंत झाल्यासारखे वाटते. सकाळी आणि सायंकाळी ते आपले आजूबाजूच्या हलत्या, चालत्या जगाचं निरीक्षण करीत, उत्सुक होऊन बसून असतात, हे मी नेहमी पहातो.
लांबून जवळ येणार्या माणसाकडे टक लाऊन पहाणे, आणि जवळ आल्यावरही कुणी त्यांच्या नजरेला नजर दिली की ते आजोबा नक्की काहीतरी बोलणार!
मलाही ते बर्याच वेळा बोलले आहेत - पण स्वत:च्या मनगटावर टिचकी मारुन त्यांचा तो ठरलेला प्रश्न!
''किती वाजलेत??''
किती वाजलेत हे त्यांना सांगताना मला फार आनंद होतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
परवाच -
यकु, अतिशय सुंदर कल्पना.
यकु छान लेख @ बि.का.तुमची
खायला कोंडा , निजेला.....
यकुचा वेगळ्या विषयावरचा धागा
वा!
सुंदर धागा
चांगला धागा
मस्त फोटो...धीट आणि खूप
मस्तच हां स्मिता. यकूंचा धागा
पक्ष्यांना ब्रेड किंवा तत्सम
क्लास !!
काय बोलणार?
मस्त धागा यकुशेठ!
चतुराई
धमाल किस्सा.
हा हा हा...
मस्त
नक्की...
छान धागा
आम्ही एकदा पिझ्झा खायला गेलो
अतिशय रुक्ष...
हो.
"श्री गुरुदेव दत्त "
आठवणी बर्याच आहेत. मनाच्या
माझ्याकडे सांगायाल काही
छोटे धमालपंत...
पोरगं
फंटूश!
सुपरलाईक!!!
सुपरलाईक!!!
मस्तच!!
एक आठवण
सोलापुर - सोरेगांव रस्त्यावर
चंद्याची आठवण.
अतिशय दुर्दैवी!! माझ्या
सांगण्यासारखे भरपूर आहे पण ते
हेच वाटत होत, मलाही, पण मग
छान.माझे पूर्वीचे शेजारी
सर्वप्रथम एका चांगल्या
आजच दुपारी टेंपलमध्ये (हो, हो
कल्पना आवडली
+१
हाती पायी धडधा़कट असणे ही मोठी देणगी आहे
हम्म !
प्रसंग!
कहर !
=)) =)) =)) =)) =))
खी: खी: खी:
:D