Skip to main content

मुख न लपवून जगा

मुख न लपवून जगा

Published on 09/05/2012 - 12:09 प्रकाशित मुखपृष्ठ
मुख न लपवून जगा, आणि न मानही झुकू द्या की दुःख कोसळो कितीही, तुम्ही हसून जगा की अंधारात बुडून, तारे नाहीसे न होती अंधेर्‍या रात्रीच्या हृदयी, दिवे उजाळा, जगा कुणा पडावावरी, जीवन थांबू ना शकते दरेक पडावा नंतरही, पुढे मार्ग चला न जाणे कोणता क्षण, मृत्यूच्या सुपूर्त असेल क्षणोक्षणींच्या सुखांना, उरी धरून जगा हे मराठी शब्द माझेच आहेत. मूळ हिंदी शब्द कुणाचे आहेत, ते तुम्ही ओळखालच!

याद्या 4158
प्रतिक्रिया 23

न सर झुकाके जीयो... बाकी सुनील दत्तचा मुलगा एके५६ वैग्रे बाळगतो ह्याचे तरी भान ठेवा हो गोळे काका. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

बाकी सुनील दत्तचा मुलगा एके५६ वैग्रे बाळगतो ह्याचे तरी भान ठेवा हो गोळे काका.>>>> म्हणजे हो काय करायचे परिराज?

In reply to by स्पा

>>>>पहिल्याच ओळीत खपलो मीही मेल्या गेलो आहे. :) अहो, काका हे मुख न लपवून जगा. कसं तरी वाटतं हो....! -दिलीप बिरुटे

In reply to by स्पा

अतिशय सुमार दर्जाचा अनुवाद आहे.. चालायचंच मन्याशेठ, प्रत्येक वेळेस उत्तम अनुवाद होईलच असे नाही. एक गोष्ट खरी की, स्वतंत्र कविता वाटावी इतका उत्तम अनुवाद होत नाही. व्यवहारात वापरतो असे सहज शब्द अनुवादात आलेत तर अनुवाद मस्त होईल असे वाटते. गोळे साहेब, नावडते प्रतिसाद लिहिले म्हणून आमचं काही मनावर घेऊ नका. आणि उगाच कोणी प्रचंड टीका करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्यासारखा भारीतला उपाय नाही. -दिलीप बिरुटे

झक मारली अन त्याच मीटरमध्ये/चालीमध्ये गायचा प्रयत्न केला. तोंड दुखायला लागलेय आता. गोळेकाका, लै भारी बरं का.

In reply to by अन्या दातार

झक मारली अन त्याच मीटरमध्ये/चालीमध्ये गायचा प्रयत्न केला. तोंड दुखायला लागलेय आता.>>>> च..च् .. च गोळेकाका, लै भारी बरं का.>>>> धन्यवाद.

गोळेकाकांचे प्रशंसक (कृ. शब्द नोट करा) निर्माण झाल्यापासून ते मुद्दाम धन्न्य ;-) वाटेल अशा शब्दात गाणी भाषांतरित करीत आहेत असा दाट सौंशोव येतो ;-)

In reply to by यकु

मुद्दाम धन्न्य वाटेल अशा शब्दात गाणी भाषांतरित करीत आहेत असा दाट सौंशोव येतो >>>> हे काय नवेच?

In reply to by यकु

आणि प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन स्वतःचे लेखन सतत वरती आणि इतरांचे खाली ढकलण्याची त्यांची 'अदा' तर क्या कहने.

यावरुन अशाच काही ओळी आठवल्या.. ना डोके झुकले कधी न डोके झुकवू कधी.. जे आपल्या दमावर जगे तेच सत्य आयुष्य सही.. एचडीएफसी आता माझी फुकट पॉलिसी उतरवणार बहुधा.. .. :)

In reply to by कवितानागेश

म्हणूनच गवि जात नाहीत केशकर्तनालयात.
हॅ हॅ हॅ.. जातो की लहानपणापासून.. त्याशिवाय का मला "तमाशा देखनेवालों तमाशा देखिए" किंवा "जिसपे दिल आया वोही निकला बेवफा" किंवा "लिखनेवाले ने लिख दी है मिलन के साथ जुदाई" किंवा "नैन मिले, उसके बाद, फूल खिले, उसके बाद..चैन गया, उसके बाद, प्यार हुआ, उसके बाद, तेरी मेरी शादी होगी, देंगे लोग मुबारक बात" .. ही गाणी माहीत झाली..??

चौ रा मोड ऑन पडाव हा काय प्रकार आहे. टप्पा असा अर्थ असेल तर आपले काहीतरी चुकते आहे असे वाटते.पडाव याचा हिंदीतील व मराठीतील अर्थ वायले वायले आहेत. चु भु द्या घ्या. चौ रा मोड ऑफ ताबडतोब फिमेल आय डी( प्रेफरेबली नीरजा गवळी धारण करून हाच अनुवाद परत टाका . मग जादू पहा !

'चांदण्या रात्रीतले' या तुमच्या धाग्यावरचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचुन पहा, मुळ रचनांचा आशय फार महत्वाचा आहे, अनुवाद करताना. उगा शब्दाला शब्द का टंकताय ? या मुळे मुळ रचनांचा / रचनाकारांचा पण अपमान होतो आहे हे लक्षात येत नाही तुमच्या. अवांतर - हे मराठी शब्द माझेच आहेत. - तुम्ही पेटंट घेतलं आहे काय या शब्दांचं ?

आगामी आकर्षण कुठलं आहे?????? एक सुचवतोयः ओले ओठ तुझे, तहानलेलं काळीज माझं. मला वाटे नितळ तुझी ही काया.... ;)