तेझ : एका तिकिटात ५ चित्रपट
लहानपणी 'एका तिकिटात दोन बालनाट्ये आणि आइसक्रीम मोफत' अशा जाहिराती आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत. मध्ये कुठल्याश्या फेस्टिवल मध्ये एका तिकिटात दोन चित्रपट ही बातमी देखील वाचनात आली. मात्र तेझ हा चित्रपट एकाच तिकिटावरती, एकाच पडद्यावरती आणि एकाच चित्रपटाद्वारे आपल्याला पाच चित्रपटांचा आनंद मिळवून देतो. स्पीड, बुलेट ट्रेन, पोलिस स्टोरी ३, ट्वायलाईट ह्या चार इंग्रजी चित्रपटांसह द बर्निंग ट्रेन ह्या हिंदी चित्रपटाचा उपभोग आपल्याला ह्या चित्रपटात मिळतो. कथा, अभिनय, संवाद, डबिंग, लोकेशन्स,संगीत, स्टंट्स इ. सर्व फालतू गोष्टी फाट्यावरती मारल्या, की जे काही निर्माण होईल ते म्हणजे 'तेझ' हा चित्रपट. चित्रपट किती बिनडोक असावा ह्याचे सुंदर उदाहरण. अनिल कपूर, बोमन इराणी, अजय देवगण, झायेद खान, कंगना राणावत आणि समीरा रेड्डी अशी भरभक्कम स्टारकास्ट आणि खुद्द प्रियदर्शन सारखा माणूस देखील २५ च्या वरती प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचू शकत नाही, ह्यावरून काय तो अंदाज बांधावा.
आकाश राणा अर्थात महादू देवगण हा अनाधिकृतपणे इंग्लंडमध्ये राहणारा एक इंजिनिअर. त्याला एकटे एकटे वाटू नये म्हणून त्याच्या प्रेमात पडलेली एका बड्या आसामीची मतिमंद (म्हणजे अभिनयात मतिमंद) कन्या कंगना राणावत. आता अशा कार्ट्याला (खरे तर नववृद्धाला*) कोण आपली पोरगी देईल ? हिचा बाप पण नकार देतो. मग ही घर सोडून अजय देवगण बरोबर बाहेर पडते. साडे चौथ्या मिनिटाला तिला बँकेतून लोन मिळते आणि सातव्या मिनिटाला त्यांचे नवीन ऑफिस सुरू देखील होते. ह्या ऑफिसात काम करणारे अदिल खान अर्थात झायेद खान अर्थात छोटा टॉम क्रूझ आणि मेघा म्हणजे समीरा रेड्डी हे दोघे देखील अजय देवगणच्याच जातकुळीचे, अर्थात चोरून इंग्लंडात राहणारे.
मग एके दिवशी अचानक इमिग्रेशन डिपार्टमेंटवाले ह्याच्या हापिसात धाड टाकतात. झायेद खान आणि समीरा रेड्डीला अजय देवगण पळवून लावतो पण स्वतः मात्र अधिकार्यांच्या ताब्यात सापडतो. मग कोर्टात लगेच त्याचे लग्न देखील बेकायदेशीर ठरवले जाते आणि त्याला लाथ मारून परत भारतात हाकलले जाते. त्याला कसाई बकरे घेऊन जातात तसे एयरपोर्टवरून घेऊन जात असताना बाहेरच्या काचेतून स्वतःच्या पोटावर थापट्या मारत ती मतिमंद कंगना काहीतरी ओरडताना दाखवली आहे. ती आधी काय कोकलते आहे तेच कळत नाही. "माझे पोट बिघडले आहे", किंवा "फुकट मिळते आहे म्हणून विमानात जास्ती खाऊ नकोस' असे काहीतरी ती बोलते आहे असे वाटते. अजय देवगणच्या चेहर्याकडे बघून, त्याला देखील असेच काहीसे वाटत असावेसे वाटते. काही काळाने मत ती "मी प्रेग्नंट आहे" असे कोकलते आहे हे लक्षात येते. ह्यानंतर मग एकदम चार वर्षाचा काळ गेलेला दाखवलेला आहे. आणि अचानक मग एके दिवशी 'बदले की आग' हृदयात घेऊन अजय देवगण पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये दाखल होतो.
आल्या आल्या त्याला रिसिव्ह करायला जुना सहकारी झायेद खान आलेला आहे. तो ताबडतोब अजयला घेऊन एका खुंखार गुंडाकडे जातो. तिथे ते 'एक्स्प्लोझिव्ह' खरेदी करणार असतात म्हणे. पुन्हा एकदा पोलिस आडवे येतात आणि त्या अड्ड्यावरती धाड पडते. इंग्लंडमधले पोलिस हे मौजे बुद्रुकवाडीच्या साखर कारखान्याच्या वॉचमनपेक्षा देखील मूर्ख आणि सुस्त असल्याने देवगण साहेब आणि खान मियाँ त्यांना सहज उल्लू बनवून पळ काढतात. पळतात ते एकदम 'देसी बार' नावाच्या अड्ड्यावरती पोचतात. तिथे रुमालाची चोळी आणि रुमालाची लुंगी घालून 'लैला लैला' करत मलिका शेरावत कवायत करताना दाखवली आहे. ती 'देसी बार' ची पाटी आणि इंग्लंडचे हिंदी बोलणारे पोलिस बघून, आता आपल्याला पुढचे दोन अडीच तास कुठल्या भीषण प्रसंगाला तोंड द्यायचे आहे ह्याचा आपल्याला अंदाज येतो आणि एशीत देखील घाम फुटतो. ह्या चित्रपटात सर्व परदेशी पोलिस, एजंट आणि काही अनिल कपूरचे संवाद हे मुळात इंग्रजीत आहेत, जे नंतर हिंदीत डब केले आहेत. ते इतके भयावह आणि अंगावरती काटा आणणारे आहेत की विचारू नका.
हान तर आता बदले की आग मे जलनेवाला अजय देवगण एका प्रवासी ट्रेन मध्ये बॉम्बं लावतो आणि लगेच रेल्वे खात्याला तसे कळवून टाकतो. आता एंट्री घेतो रेल्वे कंट्रोल ऑफिसर संजय रैना म्हणजेच बोमन इराणी. त्याची पोरगी त्या रेल्वेतूनच प्रवास करत असते. मग पाठोपाठ अँटी टेरिरिझम ऑफिसर अर्जुन खन्ना अर्थात अनिल कपूर आणि त्याच रेल्वेतून प्रवास करणारा पोलिस ऑफिसर शिवनं नायर म्हणजे मोहनलाल ह्यांचे आगमन होते. इंग्लंडवासीयांमधे शिक्षण, बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, देशभक्ती ह्या सर्वांचीच कमतरता असल्याने तिथे सगळ्या महत्त्वाच्या पदावरती भारतीय व्यक्ती कार्यरत असतात हे आतापावेतो आपल्या लक्षात आले असेलच. तर आता ह्या ट्रेनचा स्पीड ६० पेक्षा कमी झाला की तो बॉम्बं फुटणार असतो. आता हा स्फोट थांबवणे आणि गुन्हेगारांना पकडणे ह्या महान कार्याची सुरुवात होते.
अजय देवगण सारखे सारखे फोन करत धमक्या देत शहरभर हिंडत असतो, त्याच्या मागे मागे अनिल कपूर. अजय देवगण नेहमीप्रमाणे पोलिस खात्याला२/५ वेळा हातोहात मूर्ख बनवतो. मात्र पुढे पुढे अतिशय विनोदी पद्धतीने केलेला पाठलाग, पोलिसांच्या धाडी इ. इ. होत असल्याने अनुक्रमे समीरा रेड्डी आणि झायेद खान हे (एकदाचे) मारले जातात. समीरा रेड्डी मोटरसायकलवरून शहरभरच्या पोलिसांना गुंगारा देत ५०/६० किलोमीटर जे काही गोल गोल फिरताना दाखवली आहे त्याला तोड नाही. एका शॉट मध्ये तर ती चिरंजीवीसारखी बंद ट्रकच्या खालून मोटार सायकल घसरवत नेते. आता बोला !
तर आता सगळे सहकारी मेल्याने अजय देवगण बायको पोराला घेऊन (ह्याच्या पोराचे नाव पण बायकोने आकाशच ठेवलेले असते) परत भारतात जायचा निर्णय घेतो, मात्र अनिल कपूरच्या जाळ्यात अडकला जातो. पुढे काय होते, ट्रेनमधली लोकं वाचतात का इ. इ. प्रश्नांसाठी चित्रपटच पहा. म्हणजे पाहाच असे नाही, हो उगाच कशाला तुमचे वाईट चिंतू मी ?
चित्रपटात मोहन लाल ह्या चांगल्या अभिनेत्याने काय बघून भूमिका स्वीकारली असावी असा पहिला प्रश्न डोक्यात येतो. आपण चक नॉरीस नाही हे अनिल कपूरच्या आणि आपण टॉम क्रूझ नाही हे झायेद खानच्या लक्षात यायला अजून किती कालावधी जायला लागणार आहे ? नुसते ओरडून बोलणे आणि सतत तोंडाचा 'आ' करणे म्हणजे अभिनय नाही हे बोमन इराणीच्या कधी लक्षात येणार आहे ? रँप आणि चित्रपटाचा सेट ह्यातला फरक कंगना राणावतला कधी समजणार आहे ? लोकं आपल्याला बघायला येतात, आपल्या अभिनय क्षमतेला नाही ह्याचे ज्ञान समीरा रेड्डीला कधी होणार आहे ? आणि रतन जैन म्हणजे झामु सुगंध नाही हे प्रियदर्शनच्या डोक्यात कधी घुसणार आहे हे अजून काही पडलेले प्रश्न.
*श्रेयाव्हेर : नंदन

*श्रेयाव्हेर : नंदनवर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्य आहे.....
भारी.. नुसते परीक्षण वाचून
कित्ती चांगला
तरीच मला शंका .....
आताशा परा भौ
परीक्षण एकदम फर्मास.
ही ही ही ही !! पाहिल्या
ट्रेलर मुळे फसणार होतो..
खी खी खी
आता तिची लावणीही
@रुमालाची चोळी माझे अंग अंग
चित्रपट परीक्षण फर्मास. २३० +
खर सांग.... चित्रपट
=)
मानलं
कधीतरी, कोणीतरी, चांगला हिंदी
बरं झालं वेळ वाचला.
सहन शक्तीला सलाम करून सांगतो
सुंदर परिक्षण...
+१
हेच..
:)
लै भारी..
हे वाचून आता
तीला प्रत्यक्षात एकदा बघायची
काजोलसुद्धा (म्हणजे या
होय. काजोलही गोरीपान वगैरे
आणि प्रियांका...
फिल्मींडस्ट्री बंद करायची आहे का पराशेठ? ;-)
जबरा परिक्षण.!!
आणि म्हणुनच मी हिंदी पिच्चर
एकतर महादू देवगण हा
हीहीही!
परा, परिक्षण वाचून आणि फोटो पाहून
अरे किती पिडशील
हाहा!
अनस्टॉपेबल
प्रत्येक कोल साठी नवीन फोन
ह्या चित्रपटात काय आनि कोन
एकच नंबर.
हा हा हा ... लैच.