✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उत्कल दिवस २०१२

अ
अन्या दातार यांनी
Sun, 04/29/2012 - 02:33  ·  लेख
लेख
आय आय टी खडगपूरमध्ये मला देशाच्या विविध भागातील लोकांचा सहवास मिळाला. त्यांच्या चालीरिती, सण वगैरे जवळून बघायला मिळाले. अर्थात अन्य प्रांतात स्थायिक झालेल्या कुणालाही मिळू शकते. गेल्या महिन्यात मला अजुन एक असाच कार्यक्रम बघायला मिळाला, तो म्हणजे उत्कल दिबस (हो, पूर्व भारतात (बंगाल, ओडिशा, बिहार इ.) व चा उच्चार ब/भ असाच केला जातो) एका रुढार्थाने मागास राज्याचा स्थापना दिवस म्हणजे नक्की असणार तरी काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे; पण या कार्यक्रमाचा आयोजक माझा मित्रच असल्याने थोडेफ़ारतरी भव्य-दिव्य असणार याची कल्पना आधीच मिळाली होती. असो, आता वळू मुख्य कार्यक्रमाकडे. भाषिक रचनेच्या आधारे भारतातील स्वतंत्र राज्य म्हणून उदयास येणारे पहिले राज्य म्हणजे सध्याचे ओदिशा/ओडीशा. १ एप्रिल १९३६ रोजी इंग्रजांनी उत्कल प्रांतास स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. प्रचंड वनसंपत्ती, खनिज विपुलता, बौद्ध धर्माचा ऐतिहासिक वारसा व जोडीला नृत्यनाट्यनिपुण कलाकारांची खाण असलेल्या या राज्याची प्रगती डोळ्यात भरेल अशी झाली नाही. एरवी राज्यस्थापनादिवस म्हणले की स्वत:ची पाठ थोपटून घेण्यापलिकडे काही न करणारे राज्यकर्ते बघितले असलेने, इथे काही विशेष घडेल असे वाटले नव्हते. पण निदान या निमित्ताने तरी ओदिशाची ओळख तरी होईल इतकाच उद्देश ठेवून मी कार्यक्रमास हजेरी लावली होती. अन इथेच माझा अंदाज चुकला. कार्यक्रमाची सुरवात जरा चुकलीच माझी. सुरवातीस उत्कल जननीचे स्तवन गाणारे गीत गायले गेले. यानंतर थोडा धक्का देणारा एक सेमिनार झाला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते डॉ. मृणाल चॅटर्जी, जे इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ़ मास कम्युनिकेशन (भारतीय जन संचार संस्थान), धेनकानल येथे प्रोफ़ेसर व केंद्रप्रमुख म्हणून काम करतात. विविध वर्तमानपत्रांमधून काम करत असताना सामाजिक जाणीव आपसूकच कशी वाढत जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मृणाल चॅटर्जी. त्यांच्या खात्यावर ११ ललित पुस्तके, ३ mass media शी संबंधित पुस्तके, ६ भाषांतरीत पुस्तके जमा आहेत. विविध दूरदर्शन मालिकांसाठीही त्यांनी लेखन केले आहे. प्रचंड अभ्यास, शैक्षणिक अर्हता व वृत्तपत्रातील संपादकीय कामाचा अनुभव या जोरावर अल्पावधीतच भारतीय जन संचार संस्थान येथे ते केंद्रप्रमुख बनले आहेत. चित्र १: डॉ. मृणाल चॅटर्जी बोलण्यासाठी उभे असताना आपल्या सेमिनारमध्ये त्यांनी ओदिशाच्या विकासाचा मार्ग या विषयाचा अत्यंत सुरेख पद्धतीने उहापोह केला. संयत व साधी भाषा, बलस्थानांची व संभाव्य धोक्यांची जाणीव करुन देणे याची सांगड घालत सामान्य जनतेने काय केले पाहिजे हे अगदी सुरेख शब्दात सांगितले. या सगळ्यात तासभर कधी निघून गेला हे कळलेही नाही. चित्र २: डॉ. मृणाल चॅटर्जी बोलताना: त्यानंतर ओरिया हास्यकवी डॉ. कुलंगार यांनी आपली कला सादर केली. ओरिया कळत नसल्याने इथे जरा कंटाळा आला. अन यानंतर ज्या कार्यक्रमासाठी मी कॅमेरा सज्ज करुन गेलो होतो तो ओडीसी नृत्याचा कार्यक्रम चालू झाला. प्रसिद्ध नर्तकी पुष्पिता मिश्रा व सहकारी यांनी हा कार्यक्रम सादर केला. ओडिसी नृत्य हे भारतातील सर्वात जुना व अद्याप टिकून असलेला नृत्यप्रकार मानला जातो. त्याची काही दृष्ये: ओदिशातील प्रमुख आदिवासी नृत्य म्हणजे संबळपुरी नृत्य. याची झलक दाखवली शशांक दुबे व सहकारी यांनी. त्याची काही दृष्ये: महाराष्ट्रात राज्य पातळीवर असा आढावा कदाचित घेतला जात असेलही; पण शाळा-महाविद्यालयांमध्ये आपला संबंध फ़क्त सुट्टीपुरताच असतो. फ़ारफ़ार तर ५०० लोकांच्या समूहासाठी आयोजित केलेला, कोणताही गाजावाजा न करता, आम्हीच महान वगैरे असा आवेश न आणता ज्या प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला, त्यामुळेच मला जास्त भावला. फ़क्त इतिहासात रमण्याची मनोवृत्ती सोडून काय केले पाहिजे हे यातून शिकायला मिळाले. म्हणूनच कदाचित येणाया १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वेगळेपण दाखवून गेला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
संस्कृती
समाज
जीवनमान
भूगोल
राजकारण
शिक्षण
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
3567 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

हांगाश्शी

बॅटमॅन
Sun, 04/29/2012 - 03:13 नवीन
हांगाश्शी :)
  • Log in or register to post comments

मंग आप्ल्या म्हाराष्ट्र दिसा

पाषाणभेद
Sun, 04/29/2012 - 05:36 नवीन
मंग आप्ल्या म्हाराश्ट्र दिसा निमीत्त झकास लावन्यांचा कारयक्रम व्हईल की. आन त्यामधी इदर्भातले, कोक्नात्ले, मर्‍हाटवाड्यात्ले, सांग्लीसोलापुरकोलापुरसातारचे मान्स जमतील. मस्त मजा येयील बगा. लगोलग टिवीवर्ती बी दाखवतील हा कार्येक्रम. तेवडीच आप्ली जन्ता भारनियमन, दुश्काळ, पानीटंचाई विसरल बगा. मंग बगाच तुमी. म्हाराश्ट्राला कमी समजले का काय तुमी?
  • Log in or register to post comments

लेख आवडला!

संजय क्षीरसागर
Sun, 04/29/2012 - 07:29 नवीन
आणि फोटो मस्त आहेत, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्त लेख

पैसा
Sun, 04/29/2012 - 08:47 नवीन
आणि फोटो पण मस्तच!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

प्रचेतस
Sun, 04/29/2012 - 10:13 नवीन
हेच म्हणतो. नृत्यातल्या भावमुद्रा सुरेख टिपल्यास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

असंच म्हणतो.. सुंदर

गवि
Mon, 04/30/2012 - 11:57 नवीन
असंच म्हणतो.. सुंदर वृत्तांत... धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+1

यकु
Mon, 04/30/2012 - 15:24 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नृत्यातल्या भावमुद्रांचे सुरेख चित्रण

चित्रगुप्त
Sun, 04/29/2012 - 10:27 नवीन
छान. मनुष्यदेह किती सुंदर प्रकारे वळवता-वाकवता येऊ शकतो, शिवाय त्यात स्थैर्य आणि गतिमानता, चेहर्‍यावरील हाव-भाव यातून एक संपूर्ण र्सौदर्यानुभव कसा निर्मित केला जाऊ शकतो, याचे ओडिसी नृत्य हे उत्तम उदाहरण. रेखाचित्रण करण्यासाठी सुद्धा छान आहेत या मुद्रा. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अन्या लेका , नशीबवान आहेस !!

सुहास..
Sun, 04/29/2012 - 10:36 नवीन
अन्या लेका , नशीबवान आहेस !! फ़क्त इतिहासात रमण्याची मनोवृत्ती सोडून काय केले पाहिजे हे यातून शिकायला मिळाले. म्हणूनच कदाचित येणाया १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वेगळेपण दाखवून गेला. :) असतात काही कार्यक्रम " गाजा-वाजा " नसणारे :)
  • Log in or register to post comments

मस्त कार्यक्रम आणि तितकाच मस्त लेख...

amit_m
Sun, 04/29/2012 - 11:56 नवीन
अवांतर: मागं पडद्यावर लिहिलंय ते तुला वाचता येत होतं काय?
  • Log in or register to post comments

या कार्यक्रमामागच्या डोक्याचे

अन्या दातार
Mon, 04/30/2012 - 11:12 नवीन
या कार्यक्रमामागच्या डोक्याचे कौतुक करणे गरजेचे वाटते. सर्व सव्यापसव्य करण्याचे श्रेय जाते माझा मित्र गोर्वाचोव्ह पोथाल याला. @ पाभे: +१. @ चित्रगुप्तः जर तुम्ही या छायाचित्रांवरुन रेखाचित्रे बनवण्यास उत्सुक असाल तर बिनधास्त वापरा ही छायाचित्रे. अजुनही काही आहेत, पाहिजे असतील तर इमेल करतो. @amit_m: अरे ती भाषा वाचता येणे गरजेचे नव्हते ;) सर्व प्रतिसादकांचे व वाचनमात्रांचे आभार. :)
  • Log in or register to post comments

वृत्तांत आणि छायाचित्रे

रेवती
Mon, 04/30/2012 - 19:46 नवीन
वृत्तांत आणि छायाचित्रे आवडली.
  • Log in or register to post comments

छान..

स्वाती दिनेश
Mon, 04/30/2012 - 20:58 नवीन
वृत्तांत आणि फोटो दोन्ही छान! स्वाती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा