Skip to main content

पैंजणवाले जप जरा

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 21/04/2012 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
लचकत मुरडत चाले कामिनी दिपवत चमकत चपळ दामिनी वो बावळी ओ सावळी अगं ए चंचल क्षणभर थांब ना थांब ना थांब ना पैंजणवाले जप जरा, इथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना जशी दामिनी ती, मेघांतून उडे थोडी चाले पुढे, हलकेच वळे उचल ए, नयन तव काळे पण एवढे समज की, कुणाची लागो हाय ना कुठे जाशी अशी मदिराशी पिऊन मदमस्त पवन पदरात भरून आहे सारे जगच मस्तीभरे पाहा पण कधी, ऋतुआधी, रात काळी, येवो ना कधी ऐसे न हो, काही गोष्ट घडे फिरकी ही माझी, तुझा नाच बने नाच ना, ना बनून चकोरी घुंगरू कधी, स्पंदन माझे, होवोत ना एक राज की बात, सांगत आहेत किशोरदा. मात्र त्यांना शब्द कुणी पुरवले आहेत? तेच तर ओळखायचे आहे. हा मराठीतील आविष्कार मात्र माझाच आहे. http://anuvad-ranjan.blogspot.in/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
काव्यरस

वाचने 1228
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

नरेंद्र जी , भावानुवाद पटला . किशोरदाना अशा पद्द्नतीची गीते कमी गायला मिळाली. आनंद बक्शी नी लिहलेय व संगीत मेलोडियस चित्रगुप्त . जय मारू बिहाग ! आभारी आहे.