Skip to main content

पुढे ही अनभिज्ञ तू

पुढे ही अनभिज्ञ तू

Published on बुधवार, 11/04/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
पुढे ही अनभिज्ञ तू, मागे ही अनभिज्ञ तू जे जे आहे ते, पळ हाच आहे साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते अनोळखी छायेचा, वाटेत डेरा आहे अदृष्य हातांचा, आम्हाला घेरा आहे पळ हा प्रकाशाचा, बाकी अंधेर आहे पळ हा गमवू नको, तो पळ तुझा आहे राहणार्‍या कर विचार, साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते ह्या क्षणीच्या तोर्‍याने, बैठक सावरलेली ह्या क्षणीच्या ऊर्जेने, धडधड चालवलेली ह्याच्या अस्तित्वाने, दुनिया आमची आहे शतके ओवाळून ह्या, पळा दिली आहेत राहणार्‍या कर विचार, साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते ह्या क्षणीच्या छायेत, आपले ठिकाण आहे या पुढल्या काळाचे, फसवे निशाण आहे कोण पाही भविष्य, कोण जाणी भविष्य ह्या क्षणानेच मिळेल, जे तुला मिळवायचे राहणार्‍या कर विचार, साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते "क्षणा"चे महत्त्व इतक्या दो-टूक शब्दांत सांगितलेले विरळाच आढळून येते. मूळ गीतकार ओळखा. हा मराठी आविष्कार मात्र माझाच आहे. http://www.youtube.com/watch?v=tVKxS9qmn5E

याद्या 2218
प्रतिक्रिया 13

काय ती काव्यप्रतिभा. आपण तर तुमच्या काव्यप्रतिभेपुढे नतमस्तक आहोत. खुप पूर्वी एका तळायाकाठी गफ्फा हाणायला जाणारे एक आजोबा असेच कवितांचे उत्कट भावानुवाद टाकायचे इकडे. त्यांची आठवण करुन दिलीत त्याबद्दल आभार.

In reply to by धन्या

+१ आपल्या काव्य प्रतिभेला आणि धन्या रावांच्या आठवणीला देखिल. ते आजोबा कुठे गायबलेत काही समजत नाही. :(

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

सहमत आहे. मला त्यांच्या बरोबरच रामदास स्वामींची देखील आठवण झाली. 'दिसामाजी काहीतरी(च) लिहित जावे...' बाकी ते मध्ये 'डायरीया' रोगावरती काही संशोधन चालू होते, त्यात कितपत यश आले आहे ? काही औषध वैग्रे सापडले का ?

माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक. चित्रपटही खासच आहे. गीतकार: अर्थात साहिर

मूळ गीतकार साहीर असावेत. कारण एक विषय घेऊन त्यावर निरनिराळ्या अर्थाची कडवी लिहिण्यात ते वाकबगार होते. उदा . ऐलान है आंखे, तुफान है आखे, पैगाम है आंखे , इस मुल्कके सरहद की निगहबान है आंखे . वक्तसे कल और आज , वक्तकी पाबंदीमे जो आती जाती रोनके, वक्त है फूलोकी सेज वगैरे. जिदगी के रंग कई रे ई गाणी . @गोळे साहेब , अंधेर हा शब्द मराठी आहे का ? मला वाटते आपण अंधार च म्हणतो. डोळ्यासमोर अंधारी आली म्हणतो. या क्षणीच्या छायेत की क्षणाच्या ? चिकित्सा केली म्हणून काही मिपाकरांची आताच क्षमा मागतो . बाकी तुमच्या भावानुवादाचा चाहता आहेच .

च्यायला आगे भी जाने नातू पीछे भी आने ना तू या ओळींचा अर्थ असा असू शकतो हे आज कळालं. इतके दिवस वाटायचं कुणी तरी अशा ठिकाणी अडकलंय कि नायिका म्हणतेय तू पुढेही जाऊ शकत नाहीस आणि मागेही येउ शकत नाहीस..

'जानना' याचे सर्वसाधारण भाषांतर 'माहित करून घेणे' असे असते असा आमचा समज आहे. अनभिज्ञ मधे अभिज्ञता आहे जी 'ज्ञाना'शी निगडित आहे. माहिती आणि ज्ञान यात अर्थाचा मोठाच फरक आहे. मूळ गाण्याला तुम्ही उगाचच प्रमोशन दिल्यासारखे वाटले.

In reply to by प्यारे१

दोन पावेल पुढे जाउन म्हणेन की आशाताईंनीच याच रिमिक्स गाव. आणि हेलन तैंच्या स्नुषेने* त्यावर नाच करावा. ;) * सावत्र तर सावत्र. आपल्या का काय त्याच?

In reply to by गणपा

गणपाभौंशी सहमत. शिवाय ह्या प्रक्रियेतून संधिवात बरा होत असल्याची बातमी आजच वाचली. तेव्हा कुणाला याचा 'वात' येतोय किंवा कसे ह्याची फिकीर न करता ही 'संधी' जनहितार्थ अधिकाधिक कलाकारांनी साधून घ्यावी, असं वाटतं.

या धाग्याच्या निमित्ताने हे गाणे परत आठवले, त्याचे शब्द शोधून काढले आणि वाचले. मग गाणे आणि त्यातील शब्द नीट ऐकले. I can not stop listening to it. I guess I can relate to it right now !!! अनेकानेक धन्यवाद :-) टीप :- यात काडीचाही उपरोध नाही. मी काल हे गाणे खरेच १०-१५ वेळा ऐकले सलग.

वा गोळे काका.. खूपच सुंदर लिहिता तुम्ही अप्रतिम.. अजून येउंद्या टीप :- यात काडीचाही उपरोध नाही. मी हि काल हे गाणे खरेच १०-१५ वेळा ऐकले सलग.