पुढे ही अनभिज्ञ तू
पुढे ही अनभिज्ञ तू, मागे ही अनभिज्ञ तू
जे जे आहे ते, पळ हाच आहे
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते
अनोळखी छायेचा, वाटेत डेरा आहे
अदृष्य हातांचा, आम्हाला घेरा आहे
पळ हा प्रकाशाचा, बाकी अंधेर आहे
पळ हा गमवू नको, तो पळ तुझा आहे
राहणार्या कर विचार,
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते
ह्या क्षणीच्या तोर्याने, बैठक सावरलेली
ह्या क्षणीच्या ऊर्जेने, धडधड चालवलेली
ह्याच्या अस्तित्वाने, दुनिया आमची आहे
शतके ओवाळून ह्या, पळा दिली आहेत
राहणार्या कर विचार,
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते
ह्या क्षणीच्या छायेत, आपले ठिकाण आहे
या पुढल्या काळाचे, फसवे निशाण आहे
कोण पाही भविष्य, कोण जाणी भविष्य
ह्या क्षणानेच मिळेल, जे तुला मिळवायचे
राहणार्या कर विचार,
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते
"क्षणा"चे महत्त्व इतक्या दो-टूक शब्दांत सांगितलेले विरळाच आढळून येते.
मूळ गीतकार ओळखा.
हा मराठी आविष्कार मात्र माझाच आहे.
http://www.youtube.com/watch?v=tVKxS9qmn5E
याद्या
2218
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
जबरदस्त !!!!
+१
In reply to जबरदस्त !!!! by धन्या
+२
In reply to +१ by मिसळलेला काव्यप्रेमी
बस यही इक पल है!!
"साहीर". दुसरा कोण असणार ?
च्यायला आगे भी जाने नातू पीछे
जाने ना
सहमत आहे
In reply to जाने ना by रमताराम
आशातै, हेलन नि ईतरेजनांना
दोन पावेल पुढे जाउन म्हणेन की
In reply to आशातै, हेलन नि ईतरेजनांना by प्यारे१
सहमत / संधिवात
In reply to दोन पावेल पुढे जाउन म्हणेन की by गणपा
या धाग्याच्या निमित्ताने हे
धन्यवाद