✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक

य
यकु यांनी
गुरुवार, 03/22/2012 - 15:24  ·  लेख
लेख
नुकताच झालेला, शेअर करण्‍यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे. आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत - ''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्‍शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली. दुकानदारी नजरेत आणि अत्यंत किंचीत तुच्छतेने पुन्हा नीट निरखून पहात - ''सब प्रकार के पीस मिलेंगे, आपका बजट कितना है ? '' म्हटलं बुवा चांगला असेल तर घेऊ सात आठशेपर्यंत. मग त्यानं आतून एक लाकडी केस आणून दाखवली. जिनहाओ - छोटे छोटे लाल डोळे असलेल्या बाकदार ड्रॅगनचं हूक आणि उत्थित चिनी अक्षरे, आकृत्यांनी सजवलेला फिकट राखाडी शाईपेन - व्वॉव्व! मी आपलं घिसाडघाईत खस्स्कन झाकण उघडलं. सुरी हातात घ्यावी तसं वाटतं होतं. दुकानदार महाशय जे पेटले ते तसं झाकण उघडलेलं पाहून, अरारा! ''आपके पास कितने पेन है? आपको ठिक से ढक्कन खोलना नहीं आता.'' मी चमकलो. नाटकी आवेशात हात जोडून म्हणालो - ''महाराज आपही कृपा करो'' पुन्हा त्याचा भडीमर - ''मुझसे कुछ सिख के जाईये, आप क्या खाक कलेक्शन में इसे रखोगे, इधर, इधर दिजीए. मै सिखाता हुं.'' म्हणून त्यानं एका हाताच्या तीन बोटांच्या आधारावर तर्जनी व अंगठ्यात शाईपेन पकडून, पायात मोडलेला काटा काढावा तसं हळुवार झाकणावर दाब दिला. क्लिक् ! वाजलेलं आम्हालासुद्धा ऐकू आलं. ''इसे ऐसा खोलते है, तलवार की तरह उखाडोगे तो इसका नीब् घीस घीस के खतम् हो जाता है, फिर इसमें मजा नहीं.. अब ये ध्‍यान में रखिए, यहांसे खरीद के ले गये तो भी...'' मग त्यानं त्या कोर्‍या पेनचं नीब् तसंच काळ्या शाईच्या दौतीत बुडवलं.. एकदोन रेषा काढून ''चलाईये, मख्खन की तरह चलता है'' ते पुरेसं वजनदार शाईपेन स्वत:च चालत असाव तसं हळुवारपणे नीब् मधून काळ्याभोर बाकदार महिरपी चितारु लागलं. आपण खलास! आत्मशून्याकडंही पेन दिलं - तो म्हणे अक्षर चांगलं नाहीय रे, तुच लिही. म्हटलं बघ तर. त्यानंही चालवून पाहिलं. तो म्हणे सेल्फ गायडेड मिसाईल आहे. ''चीज़ ही ऐसी रखतें है, हाथ में लोगे तो वापस नहीं रख पाओगे. जिंदगी गुजर गई कलम की दुनिया में, मै कोई दुकानदार लगता हुं?'' दुकानदार जबराट माणूस होता, ही खास इंदौरी दुकानदारी होती. दाम भी वाजिब, मुनाफा भी खरा. ग्राहकी नहीं, जैसे अपने ही घरवालों को कुछ बेच रहे हो. और जाओगे भी कहां? काही बोलण्‍यासारखं नव्हतंच, पण एवढं ज्ञान मिळाल्यानंतर महाराष्‍ट्रातले लोकही कृतज्ञ असतात, हे त्याला जाणवावं म्हणून म्हणालो - ''आप भी फाऊंटन के चहेते है.. कितने तक के फाऊंटन पेन रखते हैं...'' तो काही बोलला नाही - आत निघून गेला. त्या फारशा झकपट नसलेल्या त्याच्या दुकानाबद्दलच्या कात्रणांचे बाड घेऊन परत आला. हिंदुस्तान टाइम्स, ‍दैनिक भास्कर, दबंग ‍दुनियाची कात्रणे काऊंटरवर विखरुन टाकत - ''ये डेढ लाख, ये दो लाख.. ये साडेसात लाख'' इंदुरमध्‍ये तो लाख लाख रुपयांचा शाईपेन आला तेव्हा तेव्हा बातम्या आलेल्या होत्या. ''हमें तो आप जैसे परखी मिल जाए, ‍दुनिया के किसी भी कोने से जो चाहे वो फाऊंटेन पेन मँगवा लेते है'' ''ये अपने बस की बात नहीं.. मै तो बस ऐसे ही..'' वाक्ये आपोआप बाहेर पडली. ''हम किसलिए है, इसीलिए सभी की बस की चीज़ लिए बैठे है...'' आता त्यानं रजिस्टर काढलं. ''ये कौन है? प्रोफेसर श्रीवास्तव, इन्होंने डेढ हजार का लिया है, ये हमारे डाक्‍टर शुक्ला, आठ सौ का, ये यहां देखीए एडवोकेट भाटिया.. शोधूनशोधून तो नावं बघायला लावत होता.. डेढ हजार.. ये हमारे सालों से ग्राहक है.. पसंदीदा चीज आ जाए, तो बस इन्हे फोन करने की देरी.. आकर ले जाते है...'' ''बस, बस.. बस..इसको पैक कर दिजीए.. और आपका कार्ड हो तो दे दिजीए..'' कार्ड काही छापली नव्हती की संपली होती माहित नाही. रजिस्टरमध्‍ये नाव, फोन नंबर लिहून घेतला. शाईपेन कॅरीबॅगेत टाकलं, पैसे दिले. ''कुछ ऐसा ही आये तो जरुर बताईये.. मै आ जाऊंगा.'' ''मार्च के एंड में नया माल आनेवाला है, फोन करुंगा'' ''धन्यवाद!'' म्हणून बाहेर पडू लागलो. ''और एक बात..'' त्याला काहीतरी सांगायचं असावं. हात जोडून म्हटलं, ''महाराज!'' ''एकबार उस पेन का ढक्कन ठिक से खोलकर के दिखायेंगे..?'' खळखळून हसलो आणि जोडलेले हात डोक्यापर्यंत नेऊन झटकन् दुकानाबाहेर पडलो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
कथा
समाज
जीवनमान
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिसाद
आस्वाद
अनुभव
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
14025 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

ओहो..

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 15:36 नवीन
लव्हली.. -(यकुफॅन) गवि..
  • Log in or register to post comments

मिपवर असे किति यक्कु आहेत? कि

किचेन
गुरुवार, 03/22/2012 - 17:46 नवीन
मिपवर असे किति यक्कु आहेत? कि हि काहि पदवी वगैरे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

किचेनकाकू/ताई, केलात ना माझा

यकु
गुरुवार, 03/22/2012 - 18:37 नवीन
किचेनकाकू/ताई, केलात ना माझा बल्ल्या ऽ ! यक्कू एकटाच आहे, तो उगी सतत जिकडे तिकडे यक्कू, यक्कु लिहित रहातो.. तो यक्कु मीच आहे, ही अशी नावंपण बदलतो नेहमी.. सगळे दुर्गुण भरलेला महाहलकट माणूस आहे तो.. डोंट वरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

लोक तुम्हाला यक्कु म्हणतील

धन्या
गुरुवार, 03/22/2012 - 21:42 नवीन
लोक तुम्हाला यक्कु म्हणतील असा काही शाप मिळाला आहे का तुम्हाला ? पेनाचा किस्सा भन्नाट. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

@ धन्या

मी-सौरभ
गुरुवार, 03/22/2012 - 23:23 नवीन
अरे भावा, तू तुझ्या लहानपणि 'चंद्रकांता' नावाची मालिका पहिलेली दिसत नाहीस. त्यातल्या क्रूरसिंग चा हा मिपावतार आहे रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मख्खन ...

प्यारे१
गुरुवार, 03/22/2012 - 15:39 नवीन
मख्खन ...
  • Log in or register to post comments

आवडला आपल्याला हा प्राणी...

शैलेन्द्र
गुरुवार, 03/22/2012 - 15:42 नवीन
आवडला आपल्याला हा प्राणी... याला म्हणतात निष्ठा.. अशीच दर्यादीली, सराफा बाजारातल्या त्या दहीवडावाल्याकडे आहे.. बहुदा भट नाव आहे का त्याचं?
  • Log in or register to post comments

भारी........

मनराव
गुरुवार, 03/22/2012 - 15:48 नवीन
भारी........
  • Log in or register to post comments

मस्त

मी-सौरभ
गुरुवार, 03/22/2012 - 15:58 नवीन
किस्सा आवडेश :)
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
गुरुवार, 03/22/2012 - 16:01 नवीन
दुकानदार पण खास इंदुरी आणि लेखन खास यशवंत श्टाईल! वा!
  • Log in or register to post comments

क्या बात है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/22/2012 - 16:21 नवीन
व्वा....! सालं हा यक्कु लिहितो लै बेष्ट. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वा

सर्वसाक्षी
गुरुवार, 03/22/2012 - 16:30 नवीन
किस्सा आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त सही किस्सा आवडला.

निश
गुरुवार, 03/22/2012 - 16:32 नवीन
मस्त सही किस्सा आवडला. क्या बात है मस्त
  • Log in or register to post comments

अच्छा तर म्हणुन आयडि बदलला

५० फक्त
गुरुवार, 03/22/2012 - 16:50 नवीन
अच्छा तर म्हणुन आयडि बदलला होय, बाकी किस्सा भारीच होता, असे काही मोह होउ नये म्हणुन मी हल्ली असली दुकानंच टाळतो. शेवटचं पेन घेतलं ते जयंतसरांना देण्यासाठी, त्यानंतर या उद्योगाला गेलो नाही. आता परत खुमखुमी आली आहे. यकु, येताना माझ्यासाठी एक घेउन ये, तुझ्या लग्नपत्रिकेवर नावं टाकुन देईन त्या पेनानं.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी...सेम हियर..

मालोजीराव
गुरुवार, 03/22/2012 - 17:45 नवीन
असे काही मोह होउ नये म्हणुन मी हल्ली असली दुकानंच टाळतो
अगदी अगदी...सेम हियर...लिखाण आणि शैली जबराट एकदम...सलाम तुम्हाला यशवंतराव - मालोजीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

जरा खूलासा करणार का???

चिंतामणी
Sat, 03/24/2012 - 16:02 नवीन
>>>तुझ्या लग्नपत्रिकेवर नावं टाकुन देईन त्या पेनानं. तुझ्या लग्नपत्रिकेवर म्हणजे ............................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

एकदा भेटु वैद्यांच्याकडे

५० फक्त
Tue, 03/27/2012 - 12:03 नवीन
एकदा भेटु वैद्यांच्याकडे खुलाशासाठी, कधी या शुक्रुवारी जमवायचं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

यक्कुशेठ,

प्रास
गुरुवार, 03/22/2012 - 16:56 नवीन
तुस्सी ग्रेट हो.....! आयला, कुणी तरी सांगा रे याला, स्साला, काय नि कसली भाषांतरं करून जबरदस्त लेखन-प्रतिभा फुक्कट घालवतोय.....
  • Log in or register to post comments

@काय नि कसली भाषांतरं करून

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/22/2012 - 20:17 नवीन
@काय नि कसली भाषांतरं करून जबरदस्त लेखन-प्रतिभा फुक्कट घालवतोय....>>>++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

:-)

सहज
गुरुवार, 03/22/2012 - 17:15 नवीन
किस्साकथन आवडले!
  • Log in or register to post comments

इंदूर वास्तव्यामुळे असेल कदाचित पण-

विसुनाना
गुरुवार, 03/22/2012 - 17:36 नवीन
लेखकाच्या भाषेला भारदस्तपणा आलेला आहे हे स्पष्ट जाणवले. किस्सा आवडला.
  • Log in or register to post comments

भारद्स्त

श्रावण मोडक
गुरुवार, 03/22/2012 - 19:19 नवीन
भाषेच्या भारदस्तपणाविषयी सहमत. या किश्शावर गाडी थांबवू नकोस. हा माणूस व्यक्तिचित्राचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

मस्त रे.

चिंतामणी
गुरुवार, 03/22/2012 - 17:41 नवीन
"इंदुरी दुकानदारीची एक झलक:" आवडली.
  • Log in or register to post comments

स्सही किस्सा! शौकिन असावं तर

अन्या दातार
गुरुवार, 03/22/2012 - 17:42 नवीन
स्सही किस्सा! शौकिन असावं तर या दुकानदारासारखं. उगीच गोळ्या-चॉकलेटं विकल्यासारखे पेन विकत बसला नाही. यासाठी लागते ती पॅशन! पोटार्थ्याचे काम नाही हे. जाता जाता: सुधांशु यांचा शाईपेनावरचा लेख काय आला, सगळ्यांच्याच लेखण्या झरझरु लागल्या की. :)
  • Log in or register to post comments

शौकीन..

चिगो
Fri, 03/23/2012 - 15:54 नवीन
हेच म्हणतो. खरा दर्दी दुकानदार आहे, राव.. >>''एकबार उस पेन का ढक्कन ठिक से खोलकर के दिखायेंगे..?'' ह्याला म्हणतात पॅशन.. "विकलाय ना आता, मग काय करायचं ते कर." ही वृत्ती नाही बंद्यात.. साला, ही असली पॅशन, आपल्या कामाबद्दल, व्यवसायाबद्दल आत्मीयता (ह्यातूनच कधीकधी गर्वाचा भास होत असला तरी) असली तर मग खरी मजा येते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मस्त किस्सा

चाणक्य
गुरुवार, 03/22/2012 - 17:53 नवीन
आवडला. दुकानदार खरा पेन चा चाहता दिसतोय
  • Log in or register to post comments

झकास. यकु रॉक्स.

प्रचेतस
गुरुवार, 03/22/2012 - 18:34 नवीन
झकास. यकु रॉक्स.
  • Log in or register to post comments

मस्त !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/22/2012 - 18:47 नवीन
एकदम ओघवते लिखाण. संगणकाच्या जमान्यात तुम्हा दोघांचे (तूम्ही आणि दुकानदार) पेनावरचे प्रेम बघून खूप आनंद झाला.
  • Log in or register to post comments

+१

नंदन
गुरुवार, 03/22/2012 - 23:55 नवीन
सहमत आहे. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

चित्रा
Fri, 03/23/2012 - 07:09 नवीन
सहमत आहे. लेख आवडला. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

दर्दी दुकानदार

धनंजय
Sun, 03/25/2012 - 20:23 नवीन
+१ दुकानदार दर्दी दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

यक्कुशेठ, मला पण एक फांऊटन

पिंगू
गुरुवार, 03/22/2012 - 18:54 नवीन
यक्कुशेठ, मला पण एक फांऊटन पेन पाहिजे. पुण्यनगरीत कधी येणार आहेस ते सांग? म्हणजे ऑर्डर बुक करता येइल.. :) - (फांऊटन पेन आणि यक्कु दोघांचा पंखा) पिंगू
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव. फाऊंटन पेन मलाही

रेवती
गुरुवार, 03/22/2012 - 19:38 नवीन
मस्त अनुभव. फाऊंटन पेन मलाही आवडते पण सांभाळणे ही एक पेन असते. तुमच्या पेनाचा फोटू डकवा की 'महाराज'.;)
  • Log in or register to post comments

रेवतीआजी, हा बघा, हाच आहे

यकु
गुरुवार, 03/22/2012 - 23:19 नवीन
Image removed. चित्र जालावरुन विनाआभार सर्वांचे खूप खूप आभार. :) (आनंदीत) यक्कु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सही हो यकु!! मस्त

बॅटमॅन
गुरुवार, 03/22/2012 - 19:40 नवीन
सही हो यकु!! मस्त लेख.दुकानदाराचे चित्र डो ळ्यांसमोर उभे राहिले एकदम!
  • Log in or register to post comments

सही किस्सा!

मोहनराव
गुरुवार, 03/22/2012 - 19:58 नवीन
सही किस्सा!
  • Log in or register to post comments

अरे शापित गंधर्वा,,, मलापण

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/22/2012 - 20:23 नवीन
अरे शापित गंधर्वा,,, मलापण जगण्यावर असेच पूर्ण प्रेम करायचा एक शाप दे ना...! बाकी काय बोलू...? नेहमीची प्रतिक्रीया देतो आधी... यक्कूशेठ खतम झालो हाय...! आणी मे महिन्यात काय वाट्टेल ते झालं तरी इंदौरला खतम होण्यासाठिच येणार हाय...!
  • Log in or register to post comments

मलापण जगण्यावर असेच पूर्ण

प्रचेतस
गुरुवार, 03/22/2012 - 22:24 नवीन
मलापण जगण्यावर असेच पूर्ण प्रेम करायचा एक शाप दे ना...!
तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता. एकदाचे काय ते त्रुप्त व्हा. मग शाप वैग्रे द्यायची काही जरूर नाही.
इंदौरला खतम होण्यासाठिच येणार हाय..
आत्मा अमर, अविनाशी असतो ना? मग खतम कसा होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता.

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/24/2012 - 16:52 नवीन
@तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता. एकदाचे काय ते त्रुप्त व्हा. मग शाप वैग्रे द्यायची काही जरूर नाही. @आत्मा अमर, अविनाशी असतो ना? मग खतम कसा होईल? >>> दुष्ट... दुष्ट... दुष्ट... अग्यावेताळ... Image removed. तुंम्ही जिवंत माणस आंम्हा लोकांच्या मधे कशाला पडता हो...? तो यक्कू आणी मी आत्मू ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुमच्यासारखे आत्मे जेव्हा

प्रचेतस
Sat, 03/24/2012 - 18:19 नवीन
तुमच्यासारखे आत्मे जेव्हा आमच्यासारख्या मनुक्ष्यांच्या आसपास घुटमळायला लागतात तेव्हा आम्हाला मध्ये पडणे भाग असते हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@तेव्हा आम्हाला मध्ये पडणे

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/24/2012 - 22:22 नवीन
@तेव्हा आम्हाला मध्ये पडणे भाग असते हो.>>> ब्वार...ब्वार... पडा,पण चिडु नका ;-) अता आंम्ही अ***** ऐवजी मांत्रिकवल्ली म्हणणार... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान रंगवलाय प्रसंग!

दादा कोंडके
Fri, 03/23/2012 - 00:14 नवीन
_/\_ यकुशेठ!
  • Log in or register to post comments

किस्सा मस्तच रे यकु! आणि

किसन शिंदे
Fri, 03/23/2012 - 12:25 नवीन
किस्सा मस्तच रे यकु! आणि लिहलंय सुध्दा ब्येष्टच. पण आयडी कधी बदली केलास?
  • Log in or register to post comments

लेख एकदम आवडला.

यशोधरा
Fri, 03/23/2012 - 15:11 नवीन
लेख एकदम आवडला.
  • Log in or register to post comments

क्या बात.. मस्त किस्सा रे.

गणपा
Fri, 03/23/2012 - 17:16 नवीन
क्या बात.. मस्त किस्सा रे.
  • Log in or register to post comments

क्या बात.. मस्त किस्सा रे.

गणपा
Fri, 03/23/2012 - 17:19 नवीन
क्या बात.. मस्त किस्सा रे.
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा यशवन्ता.

भीमाईचा पिपळ्या.
Fri, 03/23/2012 - 20:19 नवीन
मस्त किस्सा यशवन्ता. ज्यान्च्या लिखाणावर जीव ओवाळून टाकावा अशी दोन माणसे मिपाचे एक गवि आणि दूसरा येसू.
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Fri, 03/23/2012 - 20:34 नवीन
किस्सा आवडला, अवांतर- शाई पेनाने लिहून युगं लोटली.. :( शाळेत असताना शाई पेनाने लिहिणे मस्ट असायचे,त्यातही हिरोपेनने लिहिणे म्हणजे एकदम भारी.. मग पुढे पायलट पेन्स आली आणि रेनॉल्ड ची बॉलपेनं आली आणि मग फाउंटनपेने मागेच पडायला लागली. स्वाती
  • Log in or register to post comments

रंजक

मन१
Fri, 03/23/2012 - 21:09 नवीन
पेन्-फुल(pen ful) किस्सा आवडला. दुकानात यकु पेनने टर उडवला गेलेला पेन्टर(पेन टर) ठरतो की कायसे वातून गेले.
  • Log in or register to post comments

मस्तच किस्सा

RUPALI POYEKAR
Sat, 03/24/2012 - 15:24 नवीन
मस्तच किस्सा
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा