कलियुगाचे वायदे नि, कायदे ही फोल सारे
गीता वचने खरी इथे ना, शपथांना दे, मोल ना रे ........||धृ||
मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे
मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे
दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे
उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|१|
शापित जरी त्या आणाभाका, जपले बंधही सरणाने
करार नामे अती जाहले, पाळले ना मरणाने
शिळा बनावे, कसे कुणी ..ना, राम स्पर्शितो चरणाने
आज कुणी का राम व्हावे, भरत इथे निर्मळ ना रे......... |२|
- संध्या
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3070
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
माफ करा.. करुण रस सिलेक्ट
माफ करा.. करुण रस सिलेक्ट केलं होतं. पोस्ट करताना चुकलं काहीतरी :(
चालतय हो काळ्जी नसावी... एकदम
In reply to माफ करा.. करुण रस सिलेक्ट by सांजसंध्या
चालतय हो काळ्जी नसावी...
एकदम भन्नाट ..जब्बरद्दस्त्..कातिल्...अन काय अन काय ......शब्द संपले... :)
खुप खुप आवड्ले... :)
अडगळीत फोटो अस्ताव्यस्त
अडगळीत फोटो अस्ताव्यस्त पडलेले असतात तसे वाटले.
एकेका फोटोकडे पाहून एकएक शब्द लिहून गप्प राहात फोटोंकडे पहात मध्येच बोलावं तशी धृवपदं आलीत..
चौरा सही बोल्या था.
मृगासवे परिमाळीत गेले, गंधित
मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे
मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे
विशेश आवड्ले आहे.. :)
शिळा बनावे, कसे कुणी ..ना,
सुंदर.
काव्य आवडले आहे.
खरच अशा कविता वाचण्याकरता
खरच अशा कविता वाचण्याकरता मिपावर यावेसे वाटते.
यक्कूशेठशी सहमत..
काय मांडायचं ते कळलं...पण अजुन थोडी सुसूत्रता आणी एकसंधता हवी होती...
धन्यवाद सर्वांचे आयुष्यभर
धन्यवाद सर्वांचे
आयुष्यभर इतरांसाठी खस्ता खाल्लेल्या, इतरांच्या आनंदासाठी झिजलेल्या पण आता थकलेल्या कित्येकांच्या वाटेला जे काही येतं ते मांडण्याचा हा प्रयत्न. ज्यांच्यासाठी जीवन उधळले त्यांच्या हातून शेवटचे दोन थेंबही मिळण्याचं भाग्य लाभत नाही. शपथा, वचने यांना मोल नसलेल्या या जगात शिळा बनून आयुष्य संपण्याची वाट पहावी लागते. आता कुणी रामही उद्धार करायला येणार नसतो आणि राम तरी आजच्या जगात का यावा जेव्हां भरत देखील तितका निर्मळ राहीलेला नाही असा काहीसा आशय आहे.
अर्थात एकदा कविता पोस्ट केल्यानंतर वाचकांना काय वाटतं हे माझ्या लेखी महत्वाचं.. कविता आवडल्याचं कळवणा-या प्रतिक्रियांसोबतच परखड अभिप्राय देखील तितकेच महत्वाचे !!
ए, शब्द तर छान चान आहेत !
शब्द 'दाह" शब्द " वाह" शब्द घन रास्त ते
शब्द फुले, मनी झुले रेशमीही वस्त्र ते
शब्द तारे शब्द वारे भासते जादूगिरी
शब्दांच्या टोचणीने जखम होतसे उरी
यातील शब्द दाह शब्द वाह ही कामगिरी फक्त माझी बाकी कविता उसनी आहे. व १९७२ च्या दरम्यान लिहिली गेली आहे. कवितेची ही एक पटकथा
असली पाहिजे. तशी इथे ती दिसत नाही. दुसरे असे की अस्ताई व अंतरा यांचे वृत्त एक नाही असे दिसते . ही रचना का कवयित्रीने केली असावी ?
सहजच आठवण आली .
भावार्थ असा
नागरिकाने संशयिली, सीता अग्नित प्रवेशली
धरती माता आसावली, कन्येला पोटी घेती झाली
आजची नारी अशीच परिक्षा देत असते
पोटात घ्यायला हजर धरती माता मात्र नसते !
वरील अर्थाची मूळ कविता बहुदा इंदिरा संत यानी लिहिली असावी.
परी की सवे ?
परी की परि ( प्रमाणे ) यात माझा जरा गोंधळ होतोय. पण कवियित्रीचा एक गोंधळ मला कळलेला नाही.
कोणत्या मृगासवे तू गेलीस ? तुला मृगाप्रमाणे मी सुगंध वाटीत गेले तरीही माझ्या वाट्याला..... असे म्हणायचे असेल तर मृगापरि असे
शब्दयोजन हवे . नको का?
कवियित्री का कवयित्री यात
In reply to परी की सवे ? by चौकटराजा
कवियित्री का कवयित्री यात आमचाही जरा गोंधळच होतो आहे. शब्दाचे योग्य रूप हे कवयित्री असावे असेच शब्द योजन हवे, नाही का?
अहो! अहो!! वल्ली! २०१३ ला ६०
In reply to कवियित्री का कवयित्री यात by प्रचेतस
अहो! अहो!! वल्ली!
२०१३ ला ६० वर्षे पूर्ण होणार आहेत चौरांना, हे विसरु नका.
इतर शब्द एवढे अचूक तेही स्वतः कॉम्प्युटर टाईप केले आहेत त्याबद्दल धन्यवाद द्या. ;-)
एखादी वेलांटी पडली असेल चुकून.
अहो यकुशेठ, चौकटराजांना
In reply to अहो! अहो!! वल्ली! २०१३ ला ६० by यकु
अहो यकुशेठ,
चौकटराजांना धन्यवाद आणि त्यांच्या शुद्धलेखनाबद्दल कौतुक आहेच.
पण त्यांचा जसा परि का परी असा गोंधळ झाला तसाच आमचाही कवियित्री का कवयित्री यावरून झाला इतकेच. ;)
बा###
In reply to अहो यकुशेठ, चौकटराजांना by प्रचेतस
साला मी इथे हजर असताना ह्या शब्दावरती चर्चा करण्याचा अधिकार तुम्हा लोकांना दिलाच कोणी ?
त्वरीत खुलासा करावा.
मग?
In reply to बा### by परिकथेतील राजकुमार
काय बरोबर ते सांगून टाक बघू!
त्याच्या आयडीतच त्याचं उत्तर
In reply to मग? by पैसा
त्याच्या आयडीतच त्याचं उत्तर आहे.
अगदि अगदि सहमत काय आहे नक्कि
In reply to कवियित्री का कवयित्री यात by प्रचेतस
अगदि अगदि सहमत
काय आहे नक्कि , कवयित्रि कि कवियित्रि?
@अगदि अगदि सहमत काय आहे नक्कि
In reply to अगदि अगदि सहमत काय आहे नक्कि by जेनी...
@अगदि अगदि सहमत
काय आहे नक्कि , कवयित्रि कि कवियित्रि?>>> सांगा हो अता लवकर कुणीतरी ;-)
काय आहे नक्कि , कवयित्रि कि
In reply to @अगदि अगदि सहमत काय आहे नक्कि by अत्रुप्त आत्मा
कवयित्रि पण नाही आणि कवियित्रि पण नाही.
कवयित्री म्हणा. :P
धन्य-वाद
In reply to काय आहे नक्कि , कवयित्रि कि by प्रचेतस
धन्य-वाद :-)
मृगापरि असे शब्दयोजन हवे .
मृगापरि असे
शब्दयोजन हवे . नको का?
मान्य आहे. धन्यवाद :)
ही रचना छंदोबद्ध नाही. गेय पण मुक्तछंद आहे..
खुप
खुप छान रचना:
हे कडवे फाराच आवडले.
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार :)
अरे हा हत्न हत्न
हमारा जरा चुक्याच ! घाईत चौका मारताना चौ.का. च्या बोट फळी का बाहरका किनारा ट़ंक़कळीला लागला. पहिल्या स्लीपमधे वल्ली दुसरीत
आमचा खोंड नातू येशू मग आजा आउट !