Skip to main content

महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

लेखक महानगरी यांनी शुक्रवार, 10/02/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे. तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ? माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो. कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल युधिष्टिर - मनोज वाजपेयी भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व अर्जुन - अक्षय खन्ना कुंती - शबाना आझमी ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती

वाचने 17005
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व आक्षेप ,आक्षेप,,आक्षेप,!!!! ऋतिक रोशन या रोलमध्ये फिट बसणार नाही अस माझ मत आहे ;) कारण ऋतिक भलताच क्युट आहे ;) भिमाचा रोल दुसर्या कुणाला तरी ,द्या सन्जुबाबाला का नै देत ;) ( चला आजच्या टि.पी ची सोय झाली ;) )

In reply to by पियुशा

पियुशा बरोबर आहे!! भीम - ऋतिक रोशन ????????भलतच काही तरी!!!!!!!! त्याला हवे तर अर्जुन करा, कृष्ण करा!!!!!!!!!!

In reply to by पियुशा

माझाही आक्षेप! कारण हृतिक क्युट बीट काही नाही. मुलखाचा बोर आहे.कहो न प्यार हे च्या पहिल्या भागात फक्त तो क्युट दिसला होता.बास.त्याला भीम काय कोणाच्याच रुपात घेऊ नका.भीम साठी सलमान खान चांगला वाटेल.

In reply to by किचेन

दुर्योधन - मुकेश ऋषी ----- दिग्विजय सिन्घ कर्ण - अभिषेक बच्चन=== अरुण जेटली युधिष्टिर - सुनिल शेट्टी------एम.करुणानिधी भीम - सनी देओल-----नितीन गडकरी अर्जुन - इमरान हाश्मी--------लाल क्रुष्ण अ डवाणी द्रौपदी - राखी साव न्त, मल्लिका शेरावत, पुनम पान्डे--------???????(ब्रूनी कार्ला) ध्रुतराष्ट्र -शत्रुघ्न सिन्हा--------मनमोहन सिन्ग

In reply to by इरसाल

द्रौपदी - राखी साव न्त, मल्लिका शेरावत, पुनम पान्डे--------???????(ब्रूनी कार्ला)
दादा, तुम्ही महाभारत वाचले आहे का नक्की ?? द्रौपदी म्हटल्यावर फक्त वस्त्रहरणाचा प्रसंग डोळ्यासमोर येतो का काय तुमच्या ? द्रौपदीचे नाव पाच महान पतीव्रतांमध्ये घेतात. राखी सावंत ते काम करणार ? कुत्री पण फिरकणार नाहीत थेटरात.

In reply to by किचेन

माझाही आक्षेप! कारण हृतिक क्युट बीट काही नाही. मुलखाचा बोर आहे.कहो न प्यार हे च्या पहिल्या भागात फक्त तो क्युट दिसला होता.बास.
:( :( :(
त्याला भीम काय कोणाच्याच रुपात घेऊ नका.भीम साठी सलमान खान चांगला वाटेल.
:| ह्म्म्म्म---- आणि मग हिडिम्बेसठी कोण बरं- ऐश्वर्या की कतरीना ? ;) ;) आणि सलमान भीम झाला तर मग अर्जुन'साठी अरबाजला घ्या... आणि नकुल'साठी सोहेलला घ्या.... :)

(आडदांड) सन्जुबाबा बद्दल सहमत.

In reply to by मोदक

(आडदांड) सन्जुबाबा बद्दल सहमत. :| त्याचा तो आडदान्ड "कान्चा चीना" पाहिल्यावर बिचारी द्रौपदीच त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी दु:शासनाकडे पळत जाईल!.....

ह्रितिक -भीमाच्या भूमिकेत पण तो नाकपुड्या हलवत बसेल आणि आमीर इतका बुटका कर्ण?कोणीहि येत जाता कर्णाच्या डोक्यात टपली मारून जातंय असे दाखवायचंय का?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

ह्रितिक -भीमाच्या भूमिकेत पण तो नाकपुड्या हलवत बसेल
आई शप्पत =)) रडेल तो हे वाचलं तर

ते हॉलीवूडचं काय आपल्याला माहित नाही ब्वॉ.. पण मिपाभारत झालेच तर आमची पात्रयोजना अशी असेल. ;-) अक्रुर - गगनविहारी - मुद्याचं थोडक्यात आणि गरज पडली तर समोरच्याची बुद्धीच भ्रष्‍ट होईल इतपतही अघळपघळ मांडण्यात हातखंडा. अक्रूराच्या भूमिकेत फिट्ट बसतील. शकुनीमामा - परिकथेतील राजकुमार - यांचे ठेवणीतले प्रतिसाद पहाता हे शकुनीमामाच्या भूमिकेत. भीम - होऊन होऊन होणार कोण, टारझण शिवाय दुसरा कोण. ‍अर्जुन - झुल्पिखार उर्फ डॉणराव. हे आणि धमालबाबांच्या रुपातील कृष्‍ण अठरा अध्‍यायांच्या डेटा वर सुखसंवाद करीत आहेत हे दृश्‍य डोळ्यासमोर आणा. कृष्‍ण - धमालबाबा बारामतीकर. ऑलराऊंडर. संजय - या भूमिकेत श्रीयुत ‍अवलिया हे अगदी फिट्ट. भीष्‍माचार्य - 50 फक्त... (उत्तरायणाची वाट पहात बाणशय्येवर झोपल्याची कल्पना करा) धृतराष्‍ट्र -ही भूमिका पितवर्णी डांबिसकाकांना द्यावी युधिष्‍ठीर - नकुल - सहदेव - टार्गेटेड पण कोणती भूमिका द्यावी याबद्दल संभ्रमात: नगरीनिरंजन, युयुत्सू, विंग कमांडर ओक, प्रा. डॉ. बिरुटे सर, बिपीन कार्यकर्ते . बाकी पात्रे आणि कलाकार सांगा.. (वरच्या सगळ्या आयडींनी कृहघे हेवेसांन)

In reply to by यकु

ते अर्जुन वगैरे ठिक आहे हो. पण ह्या युद्धाच्या भांजगडीत आणि पळापळीत केसं उगाच विस्कटतात ही आमची तक्रार आहे. शिवाय त्या युद्धभुमीवरची धूळ, उनं, वारा ..... छे छे छे, साला आमच्या केसांची खंप्लिट वाट लागायचा धंदा आहे हा. बाकी धम्या जर 'कृष्ण' होणार असेल तर जो कोणी 'दुर्योधन' होणार असेल त्याने व्यनीतुन आमच्याशी संपर्क साधावा. धम्याच्या बडबड आणि कुत्सित बोलणे ऐकण्यापेक्षा आम्ही दुर्योधनाशी दोस्ती वगैरे करुन प्रकरण मिटवुन घेऊ, असो. - (अजुन पत्ते न खोललेला आणि अर्जुन न झालेला, तूर्तास ) छोटा डॉन

In reply to by यकु

'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा प्रकारची मराठीत जी म्हण आहे त्याचे हे परफेक्ट उदाहरण आहे. इन्फॅक्ट हा आमच्याविरुद्ध रचलेला कट आहे अशी शंका आता आम्हाला येत आहे. सध्या आम्ही सदर प्रसंगाचा बिंदुगामी पद्धतीने विचार करत आहोत व हे आत्मचिंतन पुर्ण झाल्यावर काय आहे ते सांगण्यात येईल, तोवर बाकी चालुद्यात. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

>>>'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा प्रकारची मराठीत जी म्हण आहे त्याचे हे परफेक्ट उदाहरण आहे. इन्फॅक्ट हा आमच्याविरुद्ध रचलेला कट आहे अशी शंका आता आम्हाला येत आहे. ---- बघा, तुमची अर्जुनाच्या रोलसाठी केलेली निवड किती पर्फेक्ट आहे.. त्याच्याही समोर असंच झालं होतं म्हणे - इकडे आड, तिकडे विहीर..

In reply to by कवितानागेश

>>> यकु कर्ण! छ्या: छ्या: मी कस्चा कर्ण? ती भूमिका मुद्दाम चेतन सुभाष गुगळे यांच्यासाठी राखून ठेवलीय. आठवा >>>>>> असली कवचकुंडलं ल्यालेले त्यांचे प्रतिसाद आणि प्रतिसादाच्या चिखलात वारंवार फसणारं त्यांच्या रथाचं चाक.

In reply to by यकु

ते 'नकु' म्हनतायत! तुमीच र्‍हावा... मूकवाचकना विदूर करा, (त्यांचे म्हणने ज्यांना उद्देश्युन लिहिलय, त्यांना कधी कळतच नाही, किंवा कळलेच तर फार उशीरा कळते!) ;) शिवाय स्पा पेंद्या, ( त्याला 'ए कुत्ना, बल्लामा, हात!' टाइप्स संवाद द्यायचे)..... :) स्वगतः पळ्ळा...

In reply to by कवितानागेश

विदुराची भूमिका श्रामोंकडे आपोआप जाणार आहे हो.. त्यामुळं स्वारी ;-) मूकवाचक यांना द्रोणाचार्य, कृपाचार्य वगैरे आचार्यांपैकी त्यांना पसंत असेल ती भूमिका देऊ.. आणि स्पावड्याचं म्हणाल तर त्याला कपाळावर जखम करुन शूलपाणीच्या जंगलात पाठवायचंय. त्यामुळं स्पावड्या अश्वत्थामा.

In reply to by यकु

स्पावड्याचं म्हणाल तर त्याला कपाळावर जखम करुन शूलपाणीच्या जंगलात पाठवायचंय. त्यामुळं स्पावड्या अश्वत्थामा. नर्मदे हर्र...... हम आसन लगाते हे अभी :)

In reply to by स्मिता.

नेमके हेच म्हणतो! :) - (बाल्कनीत बसून यकुचे महाभारत पहाणारा) सोकाजी

In reply to by यकु

@छ्या: छ्या: मी कस्चा कर्ण? ती भूमिका मुद्दाम चेतन सुभाष गुगळे यांच्यासाठी राखून ठेवलीय.>>> संपुर्ण अमान्य...चे सु गुं साठी एकच भुमिका योग्य---माहात्मा विदुर

In reply to by यकु

च्यायला! यकु, अ‍ॅट लीस्ट दु:शासन तरी! पण आता केलंच आहे दुर्योधन तर कर्ण मी चूझ करणार. आणि श्रीकृष्ण म्हणजे केवळ केवळ मिष्टर मोडक! दुसरं कॉणच नाय!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>>>> च्यायला! यकु, अ‍ॅट लीस्ट दु:शासन तरी! ---- सबूर, बिका सबूर.. इथं द्रौपदीचाच पत्ता नाही आणि तुम्ही दु:शासनाचे कपडे घालून तयार ;-) >>>>>> पण आता केलंच आहे दुर्योधन तर कर्ण मी चूझ करणार. ---- म्हणजे? तुम्हाला चेतन सुभाष गुगळे कर्णाच्या भूमिकेत पसंत नाहीत? ;-) >>>>>> आणि श्रीकृष्ण म्हणजे केवळ केवळ मिष्टर मोडक! दुसरं कॉणच नाय! ---- पहा ब्वॉ, त्या डॉणरावची गोची होईल.कृष्‍णाच्या रुपातले श्रामो अर्जुन झालेल्या डॉणरावला मरायला किंवा मारायला उद्युक्त करतील काय?

In reply to by यकु

मायला! त्या डान्याला काय पण करायला उद्युक्त करायला सोप्पंय हो! उठ म्हण्लं उठतंय आन बस म्हण्लं की बसतंय त्ये! अजून एक प्रश्न! धृतराष्ट्र कोण?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>>मायला! त्या डान्याला काय पण करायला उद्युक्त करायला सोप्पंय हो! उठ म्हण्लं उठतंय आन बस म्हण्लं की बसतंय त्ये! ----- श्रामो सांगणार दोन ओळीत गीता. त्यातही 'मोठे व्हा, मोठे व्हा'च जास्त असणार... पार अठरा अध्‍याय नुसतं मोठे व्हा वाचायला बोर होईल.. त्यातही श्रामोंना 'कदाचित मी समजून घ्यायला चुकत असेन' असंली वाक्य म्हणायची सवय आहे.. कृष्‍ण जर असली वाक्ये बोलू लागला तर गीता पूर्ण होणार कधी? >>>>अजून एक प्रश्न! धृतराष्ट्र कोण? धृतराष्‍ट्राच्या रोलसाठी पिडांकाकांच पर्फेक्‍ट वाटतात. पण बघा बुवा, तुमच्या मनात धृतराष्‍ट्राच्या रोलसाठी तात्या असतील तुम्हीच त्यांच्याशी बोला..

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>>>विदुर = विजुभाऊ! पर्यायच नाही! फर्फेक्‍टच! पण शिष्‍टाईच्या बैठकीत विजूभौंचे बासरी वाजवणे, गजला म्हणून दाखवणे हे छंद उफाळून येऊ नयेत म्हणजे मिळवली. ;-) =)) =)) =))

In reply to by चिंतामणी

चिंतूकाका, भीमाच्या भूमिकेत गदाधारी टारझण असणार आहे हे थत्ते चाचा आणि बिका दोघांनाही माहित नाही. कशाला जागे करताय त्यांना? ;-) दोघांपैकी एकजण मागे हटला तर तुम्हालाच दु:शासन किंवा दुर्योधन व्हावं लागेल. =)) =)) =)) =))

In reply to by यकु

यदाकदाचित ची आठवण झाली.
अक्रुर - गगनविहारी - मुद्याचं थोडक्यात आणि गरज पडली तर समोरच्याची बुद्धीच भ्रष्‍ट होईल इतपतही अघळपघळ मांडण्यात हातखंडा. अक्रूराच्या भूमिकेत फिट्ट बसतील. शकुनीमामा - परिकथेतील राजकुमार - यांचे ठेवणीतले प्रतिसाद पहाता हे शकुनीमामाच्या भूमिकेत. भीम - होऊन होऊन होणार कोण, टारझण शिवाय दुसरा कोण. ‍अर्जुन - झुल्पिखार उर्फ डॉणराव. हे आणि धमालबाबांच्या रुपातील कृष्‍ण अठरा अध्‍यायांच्या डेटा वर सुखसंवाद करीत आहेत हे दृश्‍य डोळ्यासमोर आणा. कृष्‍ण - धमालबाबा बारामतीकर. ऑलराऊंडर.
:D :D हहपुवा. धमालबाबा कृष्ण असतील तर आम्ही आनंदाने बलराम व्हायला तयार आहोत.

In reply to by यकु

शकुनीमामा - परिकथेतील राजकुमार - यांचे ठेवणीतले प्रतिसाद पहाता हे शकुनीमामाच्या भूमिकेत.
असे असेल तर मग आमच्या कांताला युधिष्ठीर करा. साला आधी सगळे संपादक, मग छुपे संपादक आणि शेवटी मिपा लावून घेतो पणावर.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हाहाहा... वेरी फनी... "भीष्म" म्हणून "तात्या अभ्यंकर" शोभतील!! आणि तात्यांना सर्वाधिक व्यनि करणारे लोक्स- तसेच सम्पादक मन्डळा'लाही मिपावरच्या छोट्या छोट्या गोष्टी कळवणारे लोक "सन्जय"च्या भूमिकेत शोभतील!!!! ;)

ऐश्वर्या ? कत्रीना ? करीना ??

In reply to by स्पा

झेपले नाही. दोन्ही लिहिणारे मग सांगणारे कोण.? महाभारत व्यासांनी सांगितलय. गणपतीचा उल्लेख हा प्रक्षिप्त आहे. व्यासांनी वैशंपायनाला, वैशंपायनांकडून त्यांच्या शिष्यांना (सौती वगैरे) स्पाभाउ, इतिहासाचे असे विच्छेदन करत जाऊ नका.

In reply to by प्रचेतस

मग धागा उडवला गेला तरी हरकत नाही वल्ली सेठ नि एकदा सांगितले कि सांगितले बस.. धागा उडवला गेलाच पाहिजे ;)

In reply to by नितिन थत्ते

>>>>> (दु:शासन) नितिन थत्ते पियुशा यांनी द्रौपदीची भूमिका स्वीकारावी अशी विनंती करण्‍यात येत आहे.

In reply to by यकु

पियुशा यांनी द्रौपदीची भूमिका स्वीकारावी अशी विनंती करण्‍यात येत आहे. नोप्प आम्ही कटाप यातुन ;) कै च्या कै बोलु नका द्येवा उचल रे ह्या य.कु.ला ;)

In reply to by पियुशा

कशाला उगाच घाबरताय??? भीमण्णा दु:शासन झालेल्या थत्तेचाचांची मांडी फोडणार आहेत ;-) =)) =)) =))

In reply to by अन्या दातार

य कु अन अन्या मी कटाप आहे यातुन आधीच सान्गितल ना ? प्लिज माझे नाव नका घेउ यात गम्मत्-जम्मत म्हनुन्देखील नकोच अजिबात

In reply to by नितिन थत्ते

>>>छ्या, अभ्यास कच्चा आहे. मांडी दुर्योधनाची फोडली जाईल. ब्वॉर्र! :p या मिपा महाभारताची सहिंता रामदास यांच्याकडून लिहून घेण्‍यात येईल. तेव्हा योग्य ती व्यवस्था करुच.

In reply to by यकु

@भीमण्णा दु:शासन झालेल्या थत्तेचाचांची मांडी फोडणार आहेत यक्कूशेठ अहो आज काय आरंभलय काय..? बेफ्फाम ब्याटींग करताय

मुख्य पात्रे- युधिष्ठीर - राजेश खन्ना (बाबूमोशाय , येह तुमने ठीक नाही किया!) भीम - धर्मेंद्र ( द्रौपदी वस्त्रहरणानंतर प्रतिज्ञा करेल - कमीने, कुत्ते , मी तेरा खून पी जाऊंगा) अर्जुन - अक्षय कुमार ( आंखे मध्ये आंधळा असताना सुद्धा अचूक नेम होता) नकुल-सहदेव - रितेश देशमुख, तुषार कपूर (कोणीच गंभीरपणे घेत नाही!) द्रौपदी - विद्या बालन ( हम्म! ) कुंती - रेखा कृष्ण - रजनीकांत (काय बोलाल पुढे!) धृतराष्ट्र - परेश रावल ( गोलमाल, आंखे ) गांधारी - सुश्मिता मुखर्जी ( गोलमाल ) दुर्योधन - प्रकाश राज ( सिंघम ) दुशःसन - शायनी आहुजा (समजून घ्या) कर्ण - अमीर खान ( सगळं करतो, पण कधी अवार्ड घ्यायला पुढे येत नाही ) शकुनी - विजय राज ( पहा )

In reply to by sagarpdy

पण यात काही बदल करावा म्हणजे अधिक सत्यवादी वाटेल- म्हणजे- भिम= खली दुश:सन= शक्ति कपूर आणि कृष्ण= इम्रान हाशमी! ;)