Skip to main content

महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

लेखक महानगरी यांनी शुक्रवार, 10/02/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे. तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ? माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो. कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल युधिष्टिर - मनोज वाजपेयी भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व अर्जुन - अक्षय खन्ना कुंती - शबाना आझमी ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती

वाचने 17008
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

दुर्योधन / दुशासन- त्या तीन मंत्र्यांपैकी कोणी ही एक कर्ण - पतंगराव कदम ( सदैव दुर्लक्षित) युधिष्टिर - मोठे साहेब भीम - दादा ऊर्फ छोटे साहेब अर्जुन - नेमबाजी करत फिरणारे आबा नकुल सहदेव : अनुक्रमे गवई गट आणि ढसाळ कुंती - नो कमेंट्स ध्रुतराष्ट्र - खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग ( नो एक्सप्रेशन्स अ‍ॅट ऑल, शिवाय स्वकींयाच्या दुष्कृत्याच्या पुढे डोळे झाक आहेच) ;) बाकी , रामाच्या भुमिकेत कोणी शिरणे सध्या राजकारणात शक्य नाही हे माझे वैयक्तीक मत ;)

In reply to by सुहास..

बाकी , रामाच्या भुमिकेत कोणी शिरणे सध्या राजकारणात शक्य नाही हे माझे वैयक्तीक मत
=)) =)) =)) =)) महाभारतात राम :D

In reply to by सुहास..

सुहास...... झ का स्स!!!! :) दुर्योधन / दुशासन- त्या तीन मंत्र्यांपैकी कोणी ही एक ह्म्म.... :| एक दु:शसन, एक दुर्योधन.. आणि एक जयद्रथ!!!! कर्ण - पतंगराव कदम ( सदैव दुर्लक्षित) हीहीही... तरी बरं... भारती विद्यापीठ' आधीच उभारून ठेवल्यामुळे अगदीच्च उपासमारी वैग्रै होत नैये.... ;) ;) ;) ;) ;) युधिष्टिर - मोठे साहेब पक्षी: शर्द पवार अस्तील.. तर त्यान्च्यासाठी हे नाव थोडे आव्हानात्मक वाट्टे... कारण युधिष्ठिर सत्यवचनी होता... त्याच्या आयुक्षात एकदाच्च "नरो वा कुन्जरो वा" झालं होतं!.. पण शर्द पवाराअन्नी आयुष्यात किती नरान्चे कुन्जर केले आणि किती कुन्जरान्चे (पक्षी: हत्ती) नर बनवून हातोहात विकले.. यची गणतीच नाही!!.. :) भीम - दादा ऊर्फ छोटे साहेब भीम जर अझित दादा पवार अस्तील.. तर मग हिडिम्बा आणि घटत्कोच कोण बरं! ;) या दादांचं वस्त्रहरण करण्याची इच्छा अनेक लोकान्च्या मनात आहे!!! ;) अर्जुन - नेमबाजी करत फिरणारे आबा ठ्ठो$$ठ्ठॉ.......ठ्ठो$$ठ्ठॉ.......ठ्ठो$$ठ्ठॉ....... एक विनन्ती: कृपया नेम साधायची खूण ४ फूट खाली घेतल्या गेली पायजे!!!.. तर्रच्च आम्ही नेम नक्की कुटे सादायचये.. ते पाहू शकू!!! ;) =)) =)) नकुल सहदेव : अनुक्रमे गवई गट आणि ढसाळ ;) नो कमेन्ट्स... बिच्चारे नकुल आणि सहदेवच का अशे नेह्मी नेहमी असे बदनाम होतात बरं!! ;) ध्रुतराष्ट्र - खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग ( नो एक्सप्रेशन्स अ‍ॅट ऑल, शिवाय स्वकींयाच्या दुष्कृत्याच्या पुढे डोळे झाक आहेच) +++१ सहमत!... आणि राहुलबाबा - शिखन्डी!!!! ;) ;) ;) आणि आणि आणि... विलासराव देश्मुक- कृष्ण किन्वा पेन्द्या!!... तसेही फिल्म इन्डस्ट्रीशी त्यान्चे जवळचे नाते आहे.. आणि ते "वर्षा"वर राहायला यायच्या आधीपासून अगदी कधीकाळी सोलापूरात असल्यापासून "ऊस" गोड लाग्ला म्हणून मुळासकट खायची सवय आहे त्यान्ना... अगदी "गावा"कडे असल्यापासून्नच्च!!.... ;) ;) ;) भारद्वाजांच्या कृष्णाची "उत्तरा" बिच्चारी फसली!! ;) "त" वरून ताकभात ओळखावे!!!! ;) ;) ;) ;) आदर्श अश्या "अशोका" च्या झाडाला जेव्हा जेव्हा "रेशम" कोशात गुन्डाळून घ्यावेसे वाटले... आणि "सोनसळी" अर्धपन्जाबी अप्सरान्ना म्हाडात फुकट घरं द्यावीशी वाटली... तेव्हा तेव्हा विलासरावा'तल्या कुऋष्णाला जेलस्स वाटल्या गेले...... अवान्तर : जेनेलिया तै डीसुझा-देश्मुक काकूना स्वतःच्याच लग्नात केस अर्धेमुर्धे बान्धून लिम्बाची डहाळी हातात घेऊन कुणाच्या तरी खान्द्यावर बसून भन्नाट कोळीनृत्य करताना पाहिले..तेव्हा अगदी धन्य धन्य झाल्यासारखे वाटले!!! ;) ;) ;)

In reply to by मृगनयनी

आदर्श अश्या "अशोका" च्या झाडाला जेव्हा जेव्हा "रेशम" कोशात गुन्डाळून घ्यावेसे वाटले... आणि "सोनसळी" अर्धपन्जाबी अप्सरान्ना म्हाडात फुकट घरं द्यावीशी वाटली... तेव्हा तेव्हा विलासरावा'तल्या कुऋष्णाला जेलस्स वाटल्या गेले...... >>>>> अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग !! नयनी देवी दंडवत च !! धन्य आहेस _/\_

यक्कु लेका... आज सचिनच्या जागी तुला उतरवलं तर त्याचं शतकांच शतक होउन जाइल असं वाट्टंय... मस्त मज्जा सुरुये या धाग्यावर... चालु द्या... चालु द्या...

In reply to by धमाल मुलगा

धमालराव, तुमची भीती रास्त आहे. एवढा प्रयोग होईपर्यंत प्याल्यांपासून तेवढे दूर रहा. मग तसं काही होणार नाही. ;-)

In reply to by यकु

एवढा प्रयोग होईपर्यंत प्याल्यांपासून तेवढे दूर रहा. मग तसं काही होणार नाही.>>>. राम..राम....राम...राम...अवरा हो य्क्कू अवरा...

In reply to by अत्रुप्त आत्मा

पराग सर, तुमच्या खणखणीत आवाजाही वापर करुन घ्‍यावा म्हणतोय.. प्रॉम्प्‍टींग करणार का विंगेत बसून..;-)

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

एक हातपंखा रिकामा आहे अजुन, धृतराष्ट्राच्या उजव्या हातचा... घेताय का? (मी द्युतात शिट्ट्या वाजवणार आहे... ;)) कोण ए रे तिकडं, द्युतात शिट्ट्या कशाला पाहिजेत म्हणणारं...

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

तुझ्यासारखं हाउसफुल्ल जाणार्‍या शोची तिकिटे "दस का बीस" करत बसणार नै मी... त्यापेक्षा द्युतात शिट्ट्या वाजवणे कधीही बेहत्तर....

In reply to by वपाडाव

तुझ्यासारखं हाउसफुल्ल जाणार्‍या शोची तिकिटे "दस का बीस" करत बसणार नै मी... त्यापेक्षा द्युतात शिट्ट्या वाजवणे कधीही बेहत्तर....
अरे वप्या वडापाव विकून, मागून वारा सरेप्रयन्त शिट्ट्या फूकण्यापरीस तिकीटे ब्लॅक करणे केव्हाही चांगले..... कसें...... "जन्मभर जपत आलो, शिवा मला पाव; शिवा काही पावला नाही, आता विकतोय वडापाव"

पिपळ्या, तुम्ही कृष्‍ण म्हातारा झाल्यावर त्याच्या टाचेत बाण मारणार का
नुसत्या कृष्णालाच काय ह्या मृतप्राय कर्मकांडी धर्माला सुध्दा शेवटचा बाण मारायला आतूर आहे ;)

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

धर्म कर्मकांडी होता ? कै च्या कै, बिचारा सत्यवचनी होता हो ! एकदाच काय ते नरो वा कुंजरो वा असंच कायसं केलंन् .

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

@ह्या मृतप्राय कर्मकांडी धर्माला सुध्दा शेवटचा बाण मारायला आतूर आहे >>>...मला वाटतं तुमचं गाव लातूर आहे... ;-)

महाभारतातील कथानक आणि त्यातील घटना ह्या खुपच रोमांचकारी आहेत. मी त्याची सत्यप्रत कधीच वाचली नाही परंतु ज्यांनी वाचली असेल त्यांना याची माहीती असेल. => यात अनेक वेगवेगळ्या कथांचा अगदी उत्कृष्ट पद्धतीने संगम केला आहे. => थ्रिल आणि सस्पेंन्सने भरलेल्या या कथांना वास्तवाची छाक दिसते. => मुख्य म्हणजे आजच्या कित्येक आधुनिक आणि सुखसोयींच्या वस्तुंचे वर्णन त्यात आढळते. => आश्चर्य म्हणजे त्यावेळी कोणालाच ज्ञात नसलेल्या अशा आत्ताच्या कित्येक मॉडर्न गोष्टींचे तंतोतंत उल्लेख त्यात मिळतात. => कृष्ण हा चॉकलेट हिरो असला तरी त्याची बुद्दिमत्ता आणि आक्कल हुशारी कौतुकास्पद आहे. => तसेच कृष्णाने सांगितलेल्या गितेतले कित्येक शब्द हे वास्तवाला धरुन आहेतच परंतु ज्या गोष्टी पुर्वी शास्त्रज्ञांनाही माहीत नव्हत्या त्या अनेक गोष्टी त्याने गितेत स्पष्ट करुन सांगितल्या आहेत! Smiley यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्यु- Smiley . . . . जाऊ दे पुढच आठवल्यानंतर सांगतो.

In reply to by अन्नू

@परंतु ज्या गोष्टी पुर्वी शास्त्रज्ञांनाही माहीत नव्हत्या त्या अनेक गोष्टी त्याने गितेत स्पष्ट करुन सांगितल्या आहेत! >>> टाळ्या ....धागा दिड शतकी व्हायची सोय केल्याबद्दल...टाळ्या

>>> तसेच कृष्णाने सांगितलेल्या गितेतले कित्येक शब्द हे वास्तवाला धरुन आहेतच परंतु ज्या गोष्टी पुर्वी शास्त्रज्ञांनाही माहीत नव्हत्या त्या अनेक गोष्टी त्याने गितेत स्पष्ट करुन सांगितल्या आहेत! अन्नू बाप दाखवा, नाहीतर श्राद्द घाला... - पिंगू

In reply to by पिंगू

शांत गदाधारी पिंगू, शांत ;) नव्या वादाला तोंड नको उगाच. आधीच महानगरी साहेब/तै, जे कोणी असतील ते, काडी टाकून मज्जा बघत बसलेत. धाग्यात विशेष असे काहीही नसूनही १०० च्या आसपास प्रतिक्रिया आलेल्या आहेत (ही बहुदा ९९वी आहे). यात तेल ओतून २०० करायची काही गरज नाही.

In reply to by पिंगू

याबद्दल सविस्तर माहीती माझ्याकडे नाही पण जास्त करुन कृष्णाने स्वतःचे स्वरुप स्पष्ट करताना विज्ञानाची संकल्पना तसेच विश्वाच्या निर्मितीचे घटक यांचा उल्लेख केला आहे. कृष्णाने यामध्ये एका ठीकाणी मी अनंत आहे, हे ब्रम्हांड माझ्यात सामावले आहे असे सांगितले आहे. तसेच ब्लॅक होल च्या बाबतही त्यात पुसटसा उल्लेख आहे.=> "एक अंधारी काळ" धिस ऑर समथिंग डिंफ्रन्ट वे. अधिक माहीतीसाठी स्वतः गीता वाचून पडताळणी करावी. ( स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. ;) )
@ते, काडी टाकून मज्जा बघत बसलेत.
Smiley असं का?

१००

महाभारतातील इतर सगळ्या भूमिका मिपाकरांनी वाटून घेतल्या तरी चालतील. मला मात्र बकासुराची भूमिका करायला आवडेल. मूळ कथेचा शेवट बदलला तरी चालेल. म्हणजे बकासुराच्या गाडाभर अन्न खाण्याने एकचक्रा नगरीतले ग्रामस्थ हैराण झालेले असतात. अखेर भीम बनलेला मिपाकर आरोळ्या ठोकत येतो आणि बकासुर लगेचच त्याच्याशी तडजोड करतो. एकचक्रा नगरीतील जागुताई, सानिका-स्वप्निल, गणेशा, गवि या ग्रामस्थांनी बनवलेल्या सुग्रास खाद्यपदार्थांचा डबा आणि सोबत सोकाजीची बहारदार कॉकटेल्स एवढेच अन्न देण्याची मागणी बकासुर करतो आणि शांतपणे जंगलात जाऊन जेवत बसतो. सगळ्यांना सुखशांती लाभते आणि एकचक्रा नगरीचे लोक मिसळपाव खाऊन आनंद साजरा करतात. :)

In reply to by योगप्रभू

नाय हो, तुम्हाला 'अजि अक्रूर हा नेतो...' मधल्या अक्रूराची भूमिकाच फिट्ट बसेल. स्वगतः अजून दुर्वासाची भूमिका कोणाला द्यावी यावर काही चर्चा वा प्रस्ताव कसे आले नाहीत?

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्ली. चूक मान्य आहे. गणेशाच्या कविता ऐकत मी गणपाभौंच्या रेसिपी खाऊ इच्छितो.

गेली दोन वर्षे निरनिराळे डाव खेळून झाले . सारी आयुधे वापरली पण महागाईच्या चक्रव्यूहातून काही सुटका नाही. म्हणून अभिमन्यूचा रोल भारतीय जनतेला द्या. ध्रुतराष्ट्राच्या रोल वर माझा पहिला हक्क आहे . तो दुसर्‍याला दिला तर काय करेन...? ...... काहीच करणार नाही. " असा फोन आताच मला नरसिंह रावांक डून आला आहे !

इथे आता साक्षात आम्ही उपस्थित झालो आहोत.. म्हणून कोणी तोतयास आमचा पार्ट देण्याचा विचार देखील न करावा.. ( फक्त तेवढा रोल वाढवा आणि एक हिरोईन पण द्या बाबा.. दर वेळेस सगळ्यात शेवटी एन्ट्री आणि मेलोड्रामा मिळतो.. लई कंटाळा आलाय त्याचा..)

In reply to by चिंतामणी

आम्हाला कळतो.. पण हा आमचा अंतरजालावरचा आय डी आहे.. किती वर्षे ते जुने नाव सांगत फिरायचे.. आता कुणी तेल पण देत नाय वो त्या नावावर.. (उधारी बंद म्हनतेत..) म्हणून जरा चेंज केला तर तुम्हाला लगेच 'चिंता' काय.. ( बदवे ते नाचरी चित्रे कशी टाकायची सांगता काय? आमच्यावेळी नव्हते अशे काय.. म्हणून विचारतोय... )

In reply to by अस्वस्थामा

@बदवे ते नाचरी चित्रे कशी टाकायची सांगता काय?>>> http://www.freesmileys.org/emoticons.php ही घ्या लिंक नाचर्‍या चित्राची