✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन (अ‍ॅप)

न
नीलकांत यांनी
Wed, 02/01/2012 - 12:57  ·  लेख
लेख
नमस्कार, सर्व मिपाकरांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मिसळपाव.कॉम हे आता अ‍ॅन्ड्रॉईड फोनवरून सहज वाचता यावं यासाठी मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन बनवण्यात आले आहे. यामुळे मिपाचे पान उतरवून घेण्याचा वेग सामान्य ब्राऊजरच्या तुलनेत अधिक आहे. सध्या तरी मिपा वाचता यावं हा मुख्य भर आहे. सर्व अ‍ॅन्ड्रॉईड धारकांना विनंती आहे की हे अ‍ॅप वापरून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे यापुढील आवृत्तीमध्ये हवे ते बदल करता येतील. मिपा अ‍ॅप हे अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये मिसळपाव (misalpav) असे शोधल्यास सहज सापडेल. अ‍ॅपचा पत्ता - https://market.android.com/search?q=Misalpav हे अ‍ॅप मोफत आहे हे वेगळे सांगायची गरज नाही ;) तसेच सोबत क्युआर कोड देत आहे. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांची वाट बघतो आहे. या प्रतिक्रियांमुळे पुढील विकासकामास गती येईल. धन्यवाद. - नीलकांत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शिफारस
माहिती

प्रतिक्रिया द्या
9489 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

मस्त रे नीलकांता.... आता आधी

प्रभो
Wed, 02/01/2012 - 13:01 नवीन
मस्त रे नीलकांता.... आता आधी देवनागरी फाँट टाकतो माझ्या फोन वर.. :)
  • Log in or register to post comments

या नव्या पावलासाठी आपले

यकु
Wed, 02/01/2012 - 13:03 नवीन
या नव्या पावलासाठी आपले हार्दिक अभिनंदन !! चला, अ‍ॅन्ड्रॉईड फोन घ्‍यायला आणखी एक सबळ कारण मिळाले.
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Wed, 02/01/2012 - 13:17 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

+२

मोहनराव
Wed, 02/01/2012 - 13:52 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

+३

सुहास झेले
Wed, 02/01/2012 - 14:43 नवीन
ह्येच म्हणतो.... मनापासून अभिनंदन मालक !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

उत्तम. पण गरीबाकडं

गणपा
Wed, 02/01/2012 - 13:05 नवीन
उत्तम. पण गरीबाकडं अ‍ॅन्ड्रॉईड फोन नसल्यानं चेकवता येणार नाही. पुढील कार्यास शुभेच्छा. !!!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो. शुभेच्छा!

नगरीनिरंजन
Wed, 02/01/2012 - 13:12 नवीन
असेच म्हणतो. शुभेच्छा! पुढेमागे घेतला तर मिपावर १६ तास पडीक राहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मीसुध्दा असेच म्हणतो.

चिंतामणी
Wed, 02/01/2012 - 14:34 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मीसुध्दा असेच म्हणतो.

चिंतामणी
Wed, 02/01/2012 - 14:34 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

प्रतिसादाशी सहमत.

रेवती
Wed, 02/01/2012 - 21:10 नवीन
प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मिपाचे अँड्रोईड अ‍ॅप १५

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 13:07 नवीन
मिपाचे अँड्रोईड अ‍ॅप १५ दिवसांपूर्वीच उतरवून घेतले होते. मस्त चालतेय. वेग पण मस्त आहे. पण काहीवेळा एखादा धागा लोड होत असताना झूम करायचा प्रयत्न केला तर क्रॅश होते. मराठी टाईप करताना एकाच स्ट्रोक मध्ये केले तर व्यवस्थित टाईप होते. बॅक केलं की मग फाँट्स नाचायला लागतात. :)
  • Log in or register to post comments

मराठी टाईप करताना एकाच

गणपा
Wed, 02/01/2012 - 13:17 नवीन
मराठी टाईप करताना एकाच स्ट्रोक मध्ये केले तर व्यवस्थित टाईप होते. बॅक केलं की मग फाँट्स नाचायला लागतात.
अस नाय कराचं. तुमचा स्ट्रोक सुधारावा म्हणुन मुद्दाम ती सोय ठेवली असावी. सारख बॅक करावच का? अश्यानं तुमचं टंकलेखन सुधारणार कसं? सरस प्रतिसाद सर्वांनी हलक्यानेच घ्यावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@वल्ली

मी-सौरभ
Wed, 02/01/2012 - 13:24 नवीन
अश्या वेळि परत टायपायच्या आधी स्पेस टंकून बघ.. ही अडचण कदाचित येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

खी खी खी. आमचा स्ट्रोक

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 13:26 नवीन
खी खी खी. आमचा स्ट्रोक चांगलाच आहे हो. पण नवागतांकडं पण पाह्यला हवं की कुणीतरी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मिपाचे अँड्रोईड अ‍ॅप १५

गवि
Wed, 02/01/2012 - 13:29 नवीन
मिपाचे अँड्रोईड अ‍ॅप १५ दिवसांपूर्वीच उतरवून घेतले होते. मस्त चालतेय. वेग पण मस्त आहे. पण काहीवेळा एखादा धागा लोड होत असताना झूम करायचा प्रयत्न केला तर क्रॅश होते.
अगदी अगदी.. अँड्रॉईडफोनच्या नॉर्मल ब्राउझरमधे हे सर्व दोष आहेत आणि अ‍ॅपमधेही.. ब्राउझर फारच वरचेवर क्रॅश होतो. अ‍ॅप मात्र जास्त क्रॅश झाले नाही आत्तापर्यंतच्या वापरात तरी ..पण अ‍ॅपमधे काय किंवा ब्राउझरात काय.. टायपिंगचा घोळ भरपूर आहे. टाईप करताच येऊ नये इतका.. मला वाटतं गूगल क्रोम हा अँड्रॉईडमधला डिफॉल्ट ब्राउझर असावा आणि त्यात गमभन रन होताना हे घोळ होत असावेत. अगदी एका स्ट्रोकमधे अचूक टाईप केलं तरी मधेच डबल डबल अक्षरं यायला लागतात, ती सुधारायला गेलं की सगळा कंटेंट डबल होऊन पेस्ट होतो.. मग ते डुप्लिकेशन डीलीट करायला गेलं की शब्द एकमेकांना चिकटतात.. उदा. म्हणून यापुढील कॉमेंट इथेच मोबाईल अ‍ॅपवरुन टाकतो.. (क्रॅश न होता ब्राउझर किंवा अ‍ॅप दोन मिनिटे राहिले तर.. : ) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अगदी अगदीआआआअ‍ॅड्रॉईडच्या

गवि
Wed, 02/01/2012 - 13:37 नवीन
अगदी अगदीआआआअ‍ॅड्रॉईडच्या नॉर्मल ब्राउझरमधे हे दोष आहेआनिणिअअ‍ॅपमधे देखील क्रॅशस मातझाल्क्लेननाही अ‍ॅआआत्तापर्त्यंतच्या वापरात तरी. असो.. बास्सआआता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

येस. असेच फाँट नाचतात.

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 13:40 नवीन
येस. अगदी असेच फाँट नाचतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

Samsung Galaxy Y S5360 साठी

प्रशांत
Wed, 02/01/2012 - 13:57 नवीन
Samsung Galaxy Y S5360 वर अ‍ॅप एकदम मस्त चालते. मी १५ दिवसापासुन वापरत आहे अजुन एकदाहि क्रॅश झाले नाहि शिवाय लिहायला आणि वाचायला काहिच अडचण नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी सहमत!!

पैसा
Wed, 02/01/2012 - 14:07 नवीन
मी पण Samsung Galaxy Y S5360 वर वापरतेय. काही प्रॉब्लेम नाही. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे धमालराव बारामतीकरांनी लिंक दिलेला anysoft keyboard आणि devnagari for anysoft keyboard ही २ apps download करा. मी आरामात लॉगिन करून प्रतिक्रिया सुद्धा देते आहे. गणपा आणि इतर "गरीब" लोकांसाठी खास सूचना! Samsung Galaxy Y S5360 रु ७०००/- च्या आसपास, तर सर्वात स्वस्त Android phone ३५००/- पासून उपलब्ध आहेत. कसली वाट बघताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

अहो, एखाद्या मॉडेलवर नीट

गवि
Wed, 02/01/2012 - 14:12 नवीन
अहो, एखाद्या मॉडेलवर नीट चालतात फाँट्स असं असलं तरी आधीच असलेले फोन तेवढ्यासाठी कसे बदलणार. सहा महिन्यांपूर्वी घेतलेला सॅमसंग गॅलेक्सी प्रो आहे. त्यावर फ्रोयो आहे बहुधा.. इन दॅट केस, तुमच्या फोनवर ओ.एस. ची नवी एडिशन असेल आणि ओ.एस.च्या नव्या एडिशनमधे टाईपिंग चुकत नसावे असे म्हणता येईल.. पण टायपिंगचे हे जंबल "क्रोम"बाबत पी.सी आणि डेस्कटॉपवरसुद्धा होते असं ऐकलं आहे.. मग ठराविक फोनच्या मॉडेल/मेकने कसा सुटेल प्रश्न??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बरोबर आहे.

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 14:19 नवीन
एनीसॉफ्ट कीबॉर्डने व्यवस्थित टाइपता येते. पण ब्राऊझर मध्ये फाँट्स नाचतातच. माझी जिंजरब्रेड २.३.५ आहे. क्रोम गमभनशी वाकडं वागतो हे मात्र खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फोन बदलू नका हो!

पैसा
Wed, 02/01/2012 - 14:23 नवीन
ते "आम्ही गरीब"म्हणणार्‍या गणपासाठी स्पेश्शल होतं! टायपिंग जंबल डेस्कटॉपवर पण होतं हे खरंय. तुम्ही बॅकस्पेस वापरलंत तर वाट लागली. पण गॅलेक्सीवर फॉण्ट नीट येतात याचं कारण फोनच्या सॉफ्टवेअरमधे नसावं तर तर 'एनीसॉफ्ट कीबोर्ड'मधे असावं बहुतेक. मी एनीसॉफ्ट कीबोर्डचा चक्क मराठी कीबोर्ड वापरते. इंग्लिश कीबोर्ड वापरताना काय वाटेल ते टाईप होऊन येतं. :D तुम्हीही एनीसॉफ्ट कीबोर्ड वापरून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ते एनीसॉफ्ट बर्‍याचदा

गवि
Wed, 02/01/2012 - 14:41 नवीन
ते एनीसॉफ्ट बर्‍याचदा पुन्हापुन्हा इन्स्टॉल केलं पण फ्रोयोमधे चालत नाही असं दिसतंय.. :( ओ.एस. अपग्रेड करण्यात रिस्क आहे असं ऐकतो.. वॉरंटीही जाते म्हणे.. आणि अपग्रेड केल्यावर इतर नीट चालणार्‍या अ‍ॅप्समधे किंवा मेन्यूमधे काय घोळ सुरु होतील सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गविशेठ अँड्रॉईड ओएस अपग्रेड

पिंगू
Wed, 02/01/2012 - 22:46 नवीन
गविशेठ अँड्रॉईड ओएस अपग्रेड करताना रुटिंग करावे लागते, ज्यामुळे फोनची वॉरंटी जाते. तेव्हा १ वर्ष संपल्यावर ओएस अपग्रेड करायचा विचार करा. - (रुटींगवाला) पिंगू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गरज नाही भौ!

धमाल मुलगा
Sat, 02/04/2012 - 13:20 नवीन
ओएस, फर्मवेअर अपग्रेड करण्यासाठी रुटिंग केलंच पाहिजे असं नाही. अ‍ॅन्ड्रॉईडची हीच तर खरी मजा आहे. एकच काम वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतं. गविशेठ, तुमच्या सॅमसंग गॅलेक्सी प्रो साठी रुट न करता फ्रोयोवरुन जिंजरब्रेडला नेण्यासाठी इथल्या गाईडाचा वापर करु शकता. अपग्रेड करताना घ्यायची काळजी :
  • फोनची बॅटरी १००% चार्ज करुन घेणे.
  • आवश्यक गोष्टींचा पुर्ण बॅकअप घेणे. (फर्मवेअर्/ओएस अपग्रेडनंतर फोन फॅक्टरी सेटिंग्जना रिसेट होतो.)
  • फोनचे USB tethering चालू आहे ह्याची खात्री करुन घेणे.
  • मेमरी कार्ड, सिमकार्ड काढून घेणे.
  • ज्या काँप्युटरचा वापर करुन हे काम करायचे आहे,तो कॉम्प्युटर मध्येच बंद पडला तर फोन फ्राय झालाच समजा. त्यामुळे भारनियमनाच्या वेळा टाळून्/इन्व्हर्टर/युपीएस लाऊन काम करणे.
ह्याप्पी अपग्रेडींग :) -(अनरुटेड) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

धन्यु.

चिंतामणी
Sat, 02/04/2012 - 15:19 नवीन
कॉलींगला उशीरा का होईना प्रतिसाद दिल्याबद्दल आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अभिनंदन

जाई.
Wed, 02/01/2012 - 13:16 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

चांगली बातमी. माझ्या

बबलु
Wed, 02/01/2012 - 13:18 नवीन
चांगली बातमी. माझ्या अ‍ॅन्ड्रॉईड device वर डाउनलोड करतो आणि अभिप्राय कळवितो. बाकी... iOS वर मिपा अ‍ॅप कधी येणार ? (iPhone वर मिपा वाचण्यास उत्सुक).
  • Log in or register to post comments

अभिनंदन मालक आणी

निखिल देशपांडे
Wed, 02/01/2012 - 13:18 नवीन
अभिनंदन मालक आणी धन्यवाद मिपाचे अ‍ॅक साधारण १५ दिवसांपुर्वी उतरवुन घेतले... मला अ‍ॅप्लीकेशन मधेही कस्टम वेब व्हु मधे पेज लोड केलेले दिसते. ब्राउझर प्रमाणेच पुर्ण पेज दिसते. खरेतर हा अ‍ॅप म्हणजे एक प्रकारचे कस्टम ब्राउझर झाले आहे. मला तरी ब्राउझर पेक्षा अ‍ॅप वापरण्याचे फायदे कळले नाहीत. कुणी समजावुन सांगेल का??? माझ्या मिपाच्या अ‍ॅप कडुन अपेक्षा खालील प्रमाणे होत्या. १. यु आय चा भाग अ‍ॅप्लीकेशन मधे म्हणजेच दर वेळेस पेज लोड करताना फक्त नोड रिलेटेड डेटा मोबाईल वर येणे. २. मिपाचा फॉन्ट् अ‍ॅप मधे एंम्बेड करणे.. याने जा मोबाईल वर मराठी फॉन्ट नाहीत तिथे पण मिपा वाचता आले पाहिजे. याचे उदाहरण म्हणजे न्युज हंट नावाचे अ‍ॅप्लिकेशन ३. लॉगीन करुन प्रतिसाद देण्याची सोय. माझ्या फोन वर मराठी फॉन्ट नंतर टाकल्यामुळे मला अ‍ॅप मधुनही लॉगीन करता आले नाहीच. या सगळ्या गोष्टी मिपाच्या अ‍ॅप मधे पाहिला मिळोत आणि मिपा ची अशीच प्रगती होवो.
  • Log in or register to post comments

मला अ‍ॅप्लीकेशन मधेही कस्टम

गवि
Wed, 02/01/2012 - 13:31 नवीन
मला अ‍ॅप्लीकेशन मधेही कस्टम वेब व्हु मधे पेज लोड केलेले दिसते. ब्राउझर प्रमाणेच पुर्ण पेज दिसते. खरेतर हा अ‍ॅप म्हणजे एक प्रकारचे कस्टम ब्राउझर झाले आहे. मला तरी ब्राउझर पेक्षा अ‍ॅप वापरण्याचे फायदे कळले नाहीत. कुणी समजावुन सांगेल का???
हाच प्रश्न पडला होता.. बाकीचा पसारा टाळून वेगळ्या कॉम्पॅक्ट लेआउटमधे किमान आवश्यक गोष्टी लोड व्हाव्यात असं मोबाईल अ‍ॅप जास्त चांगलं वाटेल. अर्थात ही सुरुवात आहे.. आणि स्वागतार्हच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

फायदा म्हणजे एकाच क्लिक मध्ये

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 13:36 नवीन
फायदा म्हणजे एकाच क्लिक मध्ये मिपा उघडले जाते. ब्राऊझरमध्ये जाऊन परत अ‍ॅड्रेस टाका या भानगडी नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मिपाचे अ‍ॅप क्रोम बेस्ड

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 13:32 नवीन
मिपाचे अ‍ॅप क्रोम बेस्ड असावे. पण जिथे मराठी फाँट नाहीत तिथेही वाचता येते. ऑपेरामध्ये चौकोन दिसतात, डॉल्फिनमध्ये व्यवस्थित दिसते. शिवाय आपले लॉगिन करूनही प्रतिसाद देता येतात की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

देशपांडा रॉक्स!

धमाल मुलगा
Sat, 02/04/2012 - 14:08 नवीन
नेहमीप्रमाणे टेक्निकल अ‍ॅनलिस्ट देशपांडे ह्यांचे परफेक्ट मुद्दे! :)
मिपाचा फॉन्ट् अ‍ॅप मधे एंम्बेड करणे.. याने जा मोबाईल वर मराठी फॉन्ट नाहीत तिथे पण मिपा वाचता आले पाहिजे. याचे उदाहरण म्हणजे न्युज हंट नावाचे अ‍ॅप्लिकेशन
ही उत्तम सुचना आहे. केवळ वाचनमात्र असलेले खूप लोक आहेत त्यांना ह्याचा फायदा होईल. निख्या, पण फॉन्ट्स-पॅकमुळे अ‍ॅप कितपत हेवी होईल? नॉन-रेसिडन्ट फॉन्ट्समुळे रेंडरिंगसाठी कितपत सिस्टिम रिसोर्सेस वापरले जातात? अशा कॉनफिगमध्ये अ‍ॅप/फोन चा परफॉर्मन्स कसा असतो? कमी प्रोसेसिंगच्या चिप्सचे फोन्स हा लोड सहन करु शकतात का? ह्याबद्दल काही माहिती मिळू शकेल का रे?
लॉगीन करुन प्रतिसाद देण्याची सोय. माझ्या फोन वर मराठी फॉन्ट नंतर टाकल्यामुळे मला अ‍ॅप मधुनही लॉगीन करता आले नाहीच.
हे कसं काय भो? कोणता किबोर्ड वापरतोयस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

गुड!

दादा कोंडके
Wed, 02/01/2012 - 13:36 नवीन
विंडोजफोन असल्यामुळे (आणि पुढच्या ३-४ वर्षेतरी बदलण्याचा विचार नसल्यामुळे) उपयोग नाही. आणि परवाच अपडेट केलेल्या ओएस मध्ये सुद्धा युनिकोद सपोर्ट करत नसल्यामुळे वाईत वाटलं.
  • Log in or register to post comments

हेच बोल्तो

परिकथेतील राजकुमार
Mon, 02/06/2012 - 17:22 नवीन
विंडोजफोन असल्यामुळे (आणि पुढच्या ३-४ वर्षेतरी बदलण्याचा विचार नसल्यामुळे) उपयोग नाही.
+१ बाकी सकाळी एका मित्राच्या फोनवरती हे अ‍ॅप्लिकेशन ट्राय केले. मिपाच्या पेज खालती अ‍ॅप मध्ये काही जाहिराती बघून आश्चर्य वाटले. हे अ‍ॅप्लिकेशन 'फुकट पौष्टीक' बनवले आहे काय ? असल्यास हा त्याचा परिणाम आहे काय ? का ह्या जाहिरातींमागे काही वेगळे कारण आहे ? अर्थात एक उत्सुकता म्हणून हे प्रश्न विचारले आहेत, ह्याला जाब विचारणे वैग्रे समजू नये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

सदर अप्स महिन्याभरापूर्वीच

स्पा
Wed, 02/01/2012 - 13:48 नवीन
सदर अप्स महिन्याभरापूर्वीच उतरवलेले आहे मालकांनंतर आमचीच प्रतिक्रिया तेथे पाहता येईल धन्यवाद
  • Log in or register to post comments

मी पण 15 दिवसां पुर्वि हे

जोशी 'ले'
Wed, 02/01/2012 - 14:00 नवीन
मी पण 15 दिवसां पुर्वि हे app. उतरवले या application मधे जर back आणि forward बटन जर system cache memory वापरुन देता आले तर अजुनही फास्ट होइल ...बाकि उपक्रम सुत्यच , हार्दिक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

वा ह नीलकांतशेठ..

वाटाड्या...
Wed, 02/01/2012 - 14:04 नवीन
फारच छान ... आपण सुद्धा आय टेक्नॉलॉजीपेक्षा अ‍ॅन्ड्रॉईडलाच पसंती देतो बुवा. नवीनच सॅमसंग गॅलॅक्सी एस - २ घेतलाय..त्यावर थोडे दिवस चालवुन पहातो...तोपर्यंत जागा धरुन ठेवतो.. ;) - वा
  • Log in or register to post comments

मी पण 15 दिवसां पुर्वि हे

जोशी 'ले'
Wed, 02/01/2012 - 14:15 नवीन
दोआप्रकाटा
  • Log in or register to post comments

नीलकांत, अभिनंदन!

यशोधरा
Wed, 02/01/2012 - 14:35 नवीन
नीलकांत, अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments

वा!!! अभिनंदन!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/01/2012 - 14:49 नवीन
वा!!! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

कॉलींग धम्या.

चिंतामणी
Wed, 02/01/2012 - 15:36 नवीन
कुठे आहेस रे तु??
  • Log in or register to post comments

अरे वा!! आभिनंदन...ह्या अ‍ॅप

मनिष
Wed, 02/01/2012 - 15:57 नवीन
अरे वा!! आभिनंदन...ह्या अ‍ॅप मागील टीम कळेल का? म्हणजे त्यांना व्यक्तिशः धन्यवाद देता येतील!!! :-)
  • Log in or register to post comments

असच म्हणते. मिपा अ‍ॅप टीमचे

प्रीत-मोहर
Wed, 02/01/2012 - 16:01 नवीन
असच म्हणते. मिपा अ‍ॅप टीमचे अभिनंदन आणि आभार.!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

अभिनंदन, पण हे चेक करायला

५० फक्त
Wed, 02/01/2012 - 16:10 नवीन
अभिनंदन, पण हे चेक करायला बराच वेळ लागेल, अजुनही विंडोज मधुन बाहेर वाकुन पाहिलेले नाही मी.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विसुनाना
Wed, 02/01/2012 - 16:26 नवीन
मिपा अ‍ॅप उतरवून घेतो. पण एनीसॉफ्ट कीबोर्ड सरावाचा वाटत नाही. त्यापेक्षा होन्सो मल्टीलिंग( ;) !!!) कीबोर्ड बरा वाटतो. गमभनचे अ‍ॅप करता येणार नाही का? त्याचा फोनेटिक कीबोर्ड सरावाचा आणि त्यामुळे सोपा झाला आहे.
  • Log in or register to post comments

+१

विकास
Wed, 02/01/2012 - 19:35 नवीन
गमभनचे अ‍ॅप करता येणार नाही का? अगदी असेच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

जोशीबुवा..

धमाल मुलगा
Sat, 02/04/2012 - 13:27 नवीन
गमभनचे तिर्थरुप ॐकारशास्त्री जोशीबुवांना साकडं घाला की. गडी केव्हाचा गायबच आहे. खरं म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईडची धूम उडाली असता अत्तापर्यंत गमभनचा किबोर्ड मार्केटात यायला हवा होता. ॐकार लैच्च कामात बुडालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

अभिनंदन

योगी९००
Wed, 02/01/2012 - 16:35 नवीन
अभिनंदन.. मी galaxy tablet वर १० दिवसापुर्वी हे अ‍ॅप टाकले होते. एकदम व्यवस्थित चालले.. चांगला प्रयत्न आहे ...पण..खरे सांगायचे म्हणजे नॉर्मल मि.पा. पाहतोय असेच वाटले. browser मध्ये मिपा बघणे आणि हे अ‍ॅप वापरणे यात फरक कळला नाही. कदाचित हे अ‍ॅप अजून evolve होत असावे असे वाटले म्हणून काहीच feedback दिला नाही.
  • Log in or register to post comments

चला आता नविन पाऊल टाकूया

रघु सावंत
Wed, 02/01/2012 - 17:14 नवीन
चला आता नविन पाऊल टाकूया
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा