✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन (अ‍ॅप)

न
नीलकांत यांनी
Wed, 02/01/2012 - 12:57  ·  लेख
लेख
नमस्कार, सर्व मिपाकरांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मिसळपाव.कॉम हे आता अ‍ॅन्ड्रॉईड फोनवरून सहज वाचता यावं यासाठी मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन बनवण्यात आले आहे. यामुळे मिपाचे पान उतरवून घेण्याचा वेग सामान्य ब्राऊजरच्या तुलनेत अधिक आहे. सध्या तरी मिपा वाचता यावं हा मुख्य भर आहे. सर्व अ‍ॅन्ड्रॉईड धारकांना विनंती आहे की हे अ‍ॅप वापरून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे यापुढील आवृत्तीमध्ये हवे ते बदल करता येतील. मिपा अ‍ॅप हे अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये मिसळपाव (misalpav) असे शोधल्यास सहज सापडेल. अ‍ॅपचा पत्ता - https://market.android.com/search?q=Misalpav हे अ‍ॅप मोफत आहे हे वेगळे सांगायची गरज नाही ;) तसेच सोबत क्युआर कोड देत आहे. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांची वाट बघतो आहे. या प्रतिक्रियांमुळे पुढील विकासकामास गती येईल. धन्यवाद. - नीलकांत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शिफारस
माहिती

प्रतिक्रिया द्या
9489 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

अभिनंदन!

विकास
Wed, 02/01/2012 - 19:18 नवीन
चांगले पुढचे पाऊल! मी एचटीसी इवो आणि तोशिबा टॅब्लेट मधे (दोन्ही अँड्रॉईड ३+) घालून पाहीले आणि चांगले दिसते. टंकताना कधी कधी सोपे जाते तर कधी कधी वर गवींनी/वल्लींनी म्हणल्यासारखे होते. तो प्रॉब्लेम मला फक्त मिपा अथवा या अ‍ॅपसंदर्भातच नाही तर एकंदरीतच क्रोमवर पण येतो आणि अँड्रॉईडवर पण येतो. बाकी वर निखिलरावांच्या आणि इतरांच्या सुचना चांगल्या आहेत. त्याचा विचार होईल अशी आशा करतो. :-)
  • Log in or register to post comments

चांगली सुरवात

मराठे
Wed, 02/01/2012 - 21:32 नवीन
चांगली सुरवात. अ‍ॅप डाउनलोडवले. (ड्रॉइड-२) त्यातले फॉन्ट्स थोडे विचित्र दिसताहेत (पण निदान दिसत तरी आहेत. आधी ऑपेराशिवाय पर्याय नव्हता) म्हणजे 'सदस्य' हा शब्द 'स द स् य' असं दिसतं त्यामुळे वाचताना थोडं विचित्र वाटतं. आधी म्हंटल्याप्रमाणे चांगली 'सुरूवात' आहे. सुधारणेला बराच वाव आहे.
  • Log in or register to post comments

तुमची ओएस फ्रोयो असल्याने होत

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 21:35 नवीन
तुमची ओएस फ्रोयो असल्याने होत असावे हे कदाचित. जिंजरब्रेडला एकदम व्यवस्थित दिसते. देवनागरी पॅक उतरवून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

माझ्या अँड्रॉइड फोनवर युनिकोड नाही

धनंजय
Wed, 02/01/2012 - 22:18 नवीन
माझ्या अँड्रॉइड फोनवर युनिकोड नाही. हा अँड्रॉइड फोनचा (माझ्या मॉडेलचा - एच टी सी ईव्हो, स्प्रिंट सेवादाता-लॉक) सगळ्यात मोठा दोष आहे. मी मराठी संकेतस्थळे "ऑपेरा मिनी"प्रणालीत वाचतो. यात संकेतस्थळे थेट दिसण्याऐवजी त्यांची प्रकाशचित्रे दाखवली जातात.
  • Log in or register to post comments

लँडलाईन फोन माहित होते,

पाषाणभेद
Wed, 02/01/2012 - 22:27 नवीन
लँडलाईन फोन माहित होते, वायरलेस फोन माहित होते, सेल फोन माहित होते, मोबाईल फोन माहित होते पण हे अ‍ॅन्ड्रॉईड फोन काय आहे? मी जर अ‍ॅन्ड्रॉईड खरेदी केले तर त्याबरोबर फोन मोफत भेटतो काय? संस्कारभारती रांगोळी माहित होती, ठिपक्यांची रांगोळी माहित होती, चित्रकलेतील रांगोळी माहित होती पण ही क्युआर कोडची रांगोळी आज पहिल्यांदाच पाहीली. फारच छान कलाकारी आहे नीलकांताची. मिपा तंत्रज्ञानात पुढे राहो या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

आताच उतरवुन घेतले आणि त्यतुनच

टुकुल
Wed, 02/01/2012 - 23:00 नवीन
आताच उतरवुन घेतले आणि त्यतुनच हा प्रतिसाद देतोय.. ---टुकुल
  • Log in or register to post comments

आता हा प्रतिसाद संगणकावरुन..

टुकुल
Wed, 02/01/2012 - 23:07 नवीन
आता हा प्रतिसाद संगणकावरुन.. मि सॅमसंग गॅलेक्सी एस वापरत आहे आणि वर सर्वानी सांगितल्या प्रमाणे मला पण टंकताना त्रासच झाला. जरी असे असले तरी अ‍ॅप पहिल्यांदा पाहुन खुपच आनंद झाला आणी हि सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन. --टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

आय फोन चे अ‍ॅप आहे का?

निल्या१
गुरुवार, 02/02/2012 - 07:49 नवीन
आय फोन चे अ‍ॅप आहे का?
  • Log in or register to post comments

समाधान वाटले.. नीलकांताचे

विसोबा खेचर
Sat, 02/04/2012 - 11:40 नवीन
समाधान वाटले.. नीलकांताचे आभार आणि मिपासाठी अनेकानेक शुभेच्छा.. (संस्थापक) तात्या.
  • Log in or register to post comments

बेष्ट बेष्ट बेष्ट!!!!

धमाल मुलगा
Sat, 02/04/2012 - 13:59 नवीन
apk dev टीमचे अभिनंदन आणि आभार! :) misalpav 1.0 हे अ‍ॅप म्हणजे मिपाने क्रॉस प्लॅटफॉर्म फंक्शनॅलिटीमध्ये उचललेलं एक उत्तम पाऊल आहे. दर वेळी मोबाईल ब्राऊझरमध्ये टंकायचं किंवा फेव्हरिट्समधून शोधून उघडायचं ह्याला आता फाटा मिळाला आहे. त्यामुळं माझ्यासारख्या आळशी लोकांची झकास सोय झालीए. :) ह्या अ‍ॅपच्या पुढिल व्हर्जन्सकडून माझ्या अपेक्षा अशा असतील -
  • स्क्रीनफ्रेंडली :- फोन्सचे स्क्रिन हे कॉम्प्युटरच्या स्क्रिनच्या तुलनेत खूप छोटे असल्याने कमीत कमी जागेत वाचण्याइतपत माहिती/चित्रे इ. दृष्य व्हावे लागते. त्यामुळे पुर्ण 'नवे लेखन' हे पान लोड होण्याएवजी सर्वात वरचे ५-७ धागे दिसावेत आणि त्याखाली नेव्हिगेशनचे पुढे-मागे असे बटण्/लिक्स असाव्यात. थोडक्यात अ‍ॅपमध्ये 'नवे लेखन'चे पान साधारणतः ५-७ धाग्यांचे असावे
  • अ‍ॅक्सेसिबिलिटी :- अ‍ॅप उघडल्यानंतर नवे लेखन पान उघडते त्या पानाच्या हेडर्/फूटरमध्ये लॉगिन करण्याची सोय द्यावी. लॉगिन झाल्यानंतर येणारा मेन्यु जसे खरडवही, संदेश, नवे लेखन इत्यादींच्या लिंक्स हेडर/फुटरमध्ये याव्यात. जेणेकरुन उजवीकडे असलेल्या मेन्युमुळे अडणारी स्क्रीनची जागा वाचेल आणि धागा उघडल्यानंतर अधिक टेक्स्ट वाचायला मिळेल.
  • इनपुट फॉन्ट्स कंपॅटिबिलिटी :- अ‍ॅन्ड्रॉईडच्या मुळ ब्राऊझरमध्ये टंकनला होणारा घोळ पाहता, शक्य झाल्यास डॉल्फिन ब्राऊझरसारख्या ब्राऊझरशी अ‍ॅप संलग्न असावे. उदा. अ‍ॅपच्या कोडमध्ये डिफॉल्ट ब्राऊझर डॉल्फिन सेट करावा. होस्टिंग फोनवर डॉल्फिन नसल्यास तसे रेकमंडेशन वापरकर्त्याला द्यावे आणि जर डॉल्फिन नसेल तर डिफॉल्ट ब्राऊझर वापरुन अ‍ॅप चालावे अशी सोय ठेवावी.
-(UAT) ध मा ल. :) आणि हो, आम्ही आपले वाटेल ते बोलून बसतो, लै टेन्शन घ्याचं न्हाई बरं भौ. जसं सवड मिळेल, जमंल तसं करा. हितं काय कुनाला गडबड न्हाई जी. :) ब्येस काम करताय गड्यांहो! कवतिक वाटतं. -(टेष्टरातून माणसात परत आलेला) धम्या. ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा