प्रचंड गारठा
------
भाग १:
------
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा !
सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा?
निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा....
माझ्या हातात तुझा हात उबदार जरा...
तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा....
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....!
------
भाग २:
------
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा....
पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा..
सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा?
आज रविवार! पुन्हा दुलई ओढून साखरझोप घ्यावी जरा.
मिळेल का आज अंथरुणातच गरमागरम चहा जरा?
"अहो, उठा! .... इतका आळस नाही बरा.
नळ जाण्याच्या आत अंघोळ करा."
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा...... !
आता उठा राव लवकर.. चढण्याआधी "हिचा" पारा.....!!
मस्त .. भाग १ अप्रतिम
कॉलिंग चतुर चाणक्य ....
चांगला प्रकार..
मस्तच !!!
मस्तच !!!
मस्त रे प्रशांत! भाग १
हो. भाग २ मधली यमके मलाही
छान!
भन्नाट आहे....
मस्त !
छान
मस्त... दोन्ही भाग आवडले