महिना अखेरी, कैसा थाटमाट
लागताच वाट, पगाराची
सोशिक बायको, खिसे ती तपासे
टाकोनी उसासे, दर्दभरे
उधारी करोन, आणते किराणा
शोधते बहाणा, सयुक्तिक
सार्याच वस्तूंचे, वाढले हो भाव
मनी काही हाव, धरवेना
मूक वाचकाचे, सणके मस्तक
काव्य हेच एक, प्रकटन
पुढार्यांचे बूड, घट्ट खुर्चीवरी,
फुकाचीच सारी, बोंबा बोंब
काव्यरस
वाचने
2160
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !
पण ह्या शेवटच्या ओळी काय फिट बसत नाहीत ह्या विडंबनात.
मिपाच्या हाटेलात, कैसा थयथयाट
पळताभुई थोडी, नवलेखकांची
सोशिक संपादक, वाचनमात्र राही
लॉग-इन न करी, दिवसभरी
वैताग आणोन, टाकतो काथ्याकूट
करतो हैराण, स्वप्रतिसादाने
सगळ्याच धाग्यांचे, झाले हो अवांतर
कशाला हवा वेगळा, खरडफळा
सामान्य वाचकाचे, सणके मस्तक
हेच काव्य, विडंबन खेचर
पहिली फळी निसटली, दुसरी उभारली
नेहमीचीच पुन्हा, बोंबा बोंब
दोन्ही विडंबने भारीच.
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
दोन्ही विडंबने भारीच.
आपले कधी....?
In reply to दोन्ही विडंबने भारीच. by प्रचेतस
आपले कधी....?
सध्या फक्त प्रतिसादात्मकच
In reply to आपले कधी....? by पक पक पक
सध्या फक्त प्रतिसादात्मकच लिखाण करायचा निर्णय घेतला आहे.
रिकामटेकडा
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
रिकामटेकडा* झालेला दिसतोस. ;)
* तो नव्हे. ;)
शेवटच्या ओळी
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
पण ह्या शेवटच्या ओळी काय फिट बसत नाहीत ह्या विडंबनात ... सहमत.
('टॅक्स चोर येथे, रोज मजा मारी, आमचीच सारी, बोंबाबोंब' ठीक आहे का?)
मस्त जमलंय.
मस्त जमलंय. :)
मुकोबा
का जखमेवर मीठ चोळताय? का बायकोने सगळे पॆसे संपवले ?
@ मा. परा, लक्ष आहे बरं का!
दोन्ही विडंबने मस्त जमलीत
दोन्ही विडंबने मस्त जमलीत
दोन्ही विडंबने मस्तच . पण
दोन्ही विडंबने मस्तच .
पण प्रेरणा द्या की मुळ ;)
मूक-वाचक आणी प.रा... दोनोने
मूक-वाचक आणी प.रा... दोनोने मिलके शिक्शर मारेला है.. ;-)