मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(बोंबाबोंब)

मूकवाचक · · जे न देखे रवी...
महिना अखेरी, कैसा थाटमाट लागताच वाट, पगाराची सोशिक बायको, खिसे ती तपासे टाकोनी उसासे, दर्दभरे उधारी करोन, आणते किराणा शोधते बहाणा, सयुक्तिक सार्याच वस्तूंचे, वाढले हो भाव मनी काही हाव, धरवेना मूक वाचकाचे, सणके मस्तक काव्य हेच एक, प्रकटन पुढार्यांचे बूड, घट्ट खुर्चीवरी, फुकाचीच सारी, बोंबा बोंब

वाचने 2129 वाचनखूण प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

पुढार्यांचे बूड, घट्ट खुर्चीवरी, फुकाचीच सारी, बोंबा बोंब
पण ह्या शेवटच्या ओळी काय फिट बसत नाहीत ह्या विडंबनात. मिपाच्या हाटेलात, कैसा थयथयाट पळताभुई थोडी, नवलेखकांची सोशिक संपादक, वाचनमात्र राही लॉग-इन न करी, दिवसभरी वैताग आणोन, टाकतो काथ्याकूट करतो हैराण, स्वप्रतिसादाने सगळ्याच धाग्यांचे, झाले हो अवांतर कशाला हवा वेगळा, खरडफळा सामान्य वाचकाचे, सणके मस्तक हेच काव्य, विडंबन खेचर पहिली फळी निसटली, दुसरी उभारली नेहमीचीच पुन्हा, बोंबा बोंब

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण ह्या शेवटच्या ओळी काय फिट बसत नाहीत ह्या विडंबनात ... सहमत. ('टॅक्स चोर येथे, रोज मजा मारी, आमचीच सारी, बोंबाबोंब' ठीक आहे का?)

पैसा 18/01/2012 - 15:03
का जखमेवर मीठ चोळताय? का बायकोने सगळे पॆसे संपवले ? @ मा. परा, लक्ष आहे बरं का!