✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खादाड कंपू-२०१२

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Tue, 01/10/2012 - 17:56  ·  लेख
लेख
या वेळी कट्टा जाहिर धागा काढुन ठरलेला असल्यामुळे,इतर अनेक मि.पा.करांप्रमाणे कट्ट्याविषयीची कल्पनाचित्र(जागा आधीच माहित असल्यमुळे ;-) ) आंम्ही मनात तयार केलेली होती.परंतू प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र,हाटीलच्या भायेर(च)-''बनीयन ट्री''खाली(आमच्या आधी)जमलेली मेंबरं पाहुन आमी जरा शंकाकुल झालो होतो,म्हटलं...आधी आलेल्या बनीयन लेंगा प्रस्तावानुसार शेजारच्या गाडीत ती व्यवस्था केलेली आहे कि काय..?आणी नंतर सगळी मेंबरं.सॉरी सॉरी सभासद(हां आता कंसं सभ्य वाटलं बरं..!)जमल्यावर प्रत्येकाचं माप-काढुन त्या प्रमाणे ड्रेपरी वाटप वगैरे ठरलय की काय..?पण हाटीलच्या दरवाज्याजवळ गाडी(सॉरी टू व्हिलर ;-) )लावल्यावर आत डोकावल्या नंतर लक्षात आलं,की मंडळी तयार आहेत,पण अजुन मांडव 'तयार' झालेला नाहीये(बनीयन ट्री कार्यालय नविन असल्याचा परिणाम,दुसरं काय..? ) पण नंतर थोड्याच अवधीत सर्व कोरम हळुहळू भरत गेल्यावर,,मांडवाबाहेरचा 'अंदाज' घेऊन रस्त्यावर दंगा होण्यापेक्षा हे नामी वर्‍हाड आत बोलावलेलं बरं असा (मुळात भटजी असल्यामुळे ;-) ) कार्यालय वाल्याच्या बाजूनी विचार करत..सोकाजीरावांसारखा भारदस्त मामा हाताला घेऊन आंम्ही मांडवात शिरलो... बनियन ट्री कर्यालयाच्या म्यानेजरला अदल्यादिवशी मेनु बघायचं निमित्त करुन दस्तुरखुद्द ५०राव यांनी-''उद्या आपल्या इथे काय काय घडू शकणार आहे..(पक्षी-तुंम्हाला सहन करावं लागणार आहे)"याची आगाऊ-कल्पना दिलेलीच होती...पण कार्यालय नवं असलं तरी म्याने-जर जुना मंजे 'तयार' का नेमतात याची प्रचिती संपूर्ण कट्टा होईपर्यंत वारंवार आली..बाकी १मात्र आहे हां..बनीयन ट्री कट्टा-मग्न होण्याकरता १नंबर जागा आहे,हे आसनस्थ व्हायच्या आधीच पटलं.बसाबस झाली..पण हॉटेलचे भटजी नविन असल्यामुळे आपल्या पाटासमोर नुसतच पळीभांड/ताम्हन लावलय,आणी कार्यारंभ करायला कोणीच येत नाही हे पाहुन,वर्‍हाड अंमळ खिन्न झाल्यासारखं झालं आणी जागा सोडून काही अग्निउपासक हाटिलच्या भायेर,तर आम्च्या सारखे मळीसम्राट तंबाखू साठी वेगवेगळे कोपरे धुंडाळू लागले.पण म्यानेजरच्या करड्या नजरेतनं हे सुटलं नाही,त्यानी लगेच भटजी आले,भटजी आले..चला..चला..अश्या हाळ्या मारत पांगलेलं वर्‍हाड पुन्हा आसनस्थ केलं. हा मोका साधुन कट्टा आयोजक श्री.पन्नासराव यांनी-''कोणताही कार्यक्रम निर्विघ्न व्हायचा असेल तर,गणंपतिंचं पूजन करण्याशिवाय गत्यंतर नसतं''.या धार्मिक रुढिला अनुसरुन,खादाडीची सुरवात गोडानी केली की पुढे पदार्थ कोणत्या(ही) स्वरुपात आले,तरी चवीत विघ्न येत नाही,अश्या अंदाजानी सगळ्या मेंबरांची तोंडं त्या लाजवाब चॉकलेटयुक्त केकानी खदाडीसाठी तयार केली.काही मिनिटं केक साफ करण्यात जातायत नाही,एवढ्यात कार्यालयात जशी चहा/कॉफी विचारणारी 'पोरं' वर्‍हाडाच्या मागे मागे 'ट्रे' घेऊन हुभी र्‍हातात,तशी काही वेटर कम आर्डर घेणारी २ पोरं पन्नासरावांच्या मागं दिमतीला आल्याच्या थाटात हुभी ठाकली..मग सौरभ आणि पन्नासरावांनी पहिल्या आर्डर दिऊन,वेटरना मार्गी लावलं..तो इकडे सगळया मंडळींनी मि.पा.च्या कट्टा संस्कृतीला अनुसरुन दंगा करायला सुरवात केली होती.गप्पा टप्पा,एकमेकाची खेचणं,आणी ओक साहेब आलेले असल्यामुळे एकामेकाच्या नाड्याही खेचायला सुरवात झालेली होती. हे सर्व यथास्थित चालू असताना ,पूर्वी जशी खास पुणेरी कार्यालयात ''लवकरची पंगत धरुन कामावर जाणारी मंडळी दिसायची'' त्याच प्रमाणे प.रा...आणी मंडळी लवकर जायचं असल्यामुळे हळुहळू आमचा निरोप घेत बाहेर पडली...पका काका तर फ्लाईंग व्हिजिटलाच आले होते त्यामुळे तेही दरम्यान केंव्हातरी ''गमन करिते जाहले'' त्यामुळे मि.पा.धर्माचा स्विकार केलेल्या काही नव प्रवेशितांचे(आणी माझे देखिल) या मंडळींना जाणुन घेण्याचे मनसुबे उधळले गेले,आणी मन जरा खट्टू झालं...सोकाजीरावसुद्धा आम्ही आणलेल्या ''१६०-पानाला'' आणि आंम्हाला सोडून त्यांना जायच होतं म्हणुन गेले,पण आमचं कट्टामानस चित्र त्यामुळे काही प्रमाणात भंगल :-( त्यामुळे आमची अवस्था-'कट्टा आला पण सोकाजी गेला' अशी काही काळ झाली खरी... पण या अवस्थेतून आंम्हाला बाहेर काढायला एक नामी त्रिकुट-वपाडाव,धनाजीराव,आणी वो किस्ना है असं पाहाता क्षणीच ओळखू येणारा आमचा किसन द्येव,यांनी मांडवात हजेरी लावली...मागोमाग...सुहास डॉट-डॉट,गणेशा आणी इतर काही स्वयंभू देवता मांडवात शिरल्या आणी मग मात्र कट्टा खर्‍या अर्थानी रंगात आला... लाजवाब पालक शोरबा व इतर काही नेहमीच्या सूपनी कट्टा एक्सप्रेस धडधडत धाऊ लागली,भट्टीमधे तितक्याच चांगल्या-पनीर,मश्रूम,चिकन अश्या स्टाटर्सचा नामी कोळसा पडल्यावर मेन खादाडीचा लोणावळा कधी आला ते कळलं सुद्धा नाही...पण तो पर्यंत रविवार-नवं कार्यालय-त्रेधा तिरपिट योगाच्या फेर्‍यात अडकलेल्या कार्यालयाच्या पोरांमुळे आमची गाडी-मेनकोर्स नावाचा विधि कधी होतो..?अशी वाट बघत काही काळ लोणावळ्यात घुटमळली...मग एकदा गाडी थांबली की प्रवासी शीटावर थोडेच स्वस्थ बसणार,पुन्हा विडीकाडी.पान.चुना,तंबाखू...आणी धिंगाण्याला ऊत आला...शेजारच्या डब्यातले प्र-वासी आमच्या डब्यात डोकावून''कुठनं आली ही जत्रा..?'' असा चेहेरा करून बघायला लागलेच होते...पण पुढचा राग रंग ओळखुन त्या महान म्यानेजरनी आंम्हाला सगळ्यांना एकदाचं-खाली बशिवलं...आणी आधी नुसत्याच रोट्या/नान वगैरेंची रेलचेल सुरू केली.अता मेन कोर्सच्या डिश जर का लवकर पाठवल्या नाहीत,तर लहान पोरांच्या शाळेत जसं..सगळ्यांचा डबा संपल्यावर-शेवटच्याचा डबा हिसकावतात,,,तशी लोणची/कांद्याच्या सगळ्या प्लेटांची अवस्था होइल हे ओळखून पुन्हा त्याच तत्पर आणि तयार म्यानेजरनी मेन कोर्सची ऑर्डर टेबलांवर आणुन रोट्यांवर होऊ घातलेला अनुचित हल्ला रोखला,मग काय..? सग्ळी गप्पा/हलकल्लोळ करुन थकलेली हात आणी तोंडं समरांगणावर एकदम चाल करुन ग्येली...पहिली दहा मिनिटं शत्रूची अशी बेजान कत्तल करण्यात गेली...की पुढच्या डिशची पलटण आंम्हा खादाड योद्ध्यांपुढे आल्या/आल्या नरम पडावी...परिणामी जेवण संपेपर्यंत म्हणजे युद्ध शेवटच्या टप्यात आल्यावर मधेच वेळ काढुन जरा परत गप्पा/टप्पा वगैरे चालू झाल्या...पण शत्रू रणांगणावर शिल्लक राहू द्यायचा नाही,अश्या बेतानीच हल्ला चालला होता...आणी अश्या युद्धाची अंतिम परिणिती अव्वल विजयात होत असते,हे ऐतिहासिक वचन अखेर सर्व मिपाधर्मियांनी सार्थ करुन दाखवलं...म्यानेजरही मनात म्हणला असेल,,,''मायला असलं वर्‍हाड बघितलं नव्हतं'' अश्या तर्‍हेनी एकमेकांचा परिचय करुन घेत, मो.नंबरर्सची देवाण घेवाण होत...नेहमीच्या दिमाखदार पद्धतीने मि.पा.कट्टा-खादाड कंपू-२०१२ यथास्थित पार पडला... कार्य संपलं की शेवटी ग्रुप फोटोंची परंपरा असतेच...त्या प्रमाणे 'भायेर'-वडाच्या झाडाखाली-कट्ट्याला आलेल्या सर्व अवतारी पुरुषांचे वेगवेगळ्या पोज मधले ग्रुप फोटो होऊन...बाहेर पेटलेल्या थंडिचा अंदाज घेत घेत,,,सर्व मेंबरं घराच्या दिशेनी पांगली सुद्धा... गणपतिंचे पूजन करण्यासाठी ५०रावांनी अणलेला खास नैवेद्य लवकर सोडुन जाणार्‍या :-( सदस्यांपैकी १-मि>ध.मु. आणी मिपाकरांनी केलेली त्यांची हास्यबोळवण बोळवणीला हातभार लावणारे-डाविकडून...सुहास..,पाठिमागे प्यारे१,कडेला आंम्ही,आणी आमच्या पाठिशी विंग कमांडर-ओक स्टाटरवरचा हल्ला-अनुक्रमे...वल्ली,पिंगू,फक्त५० रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-१...गणेशा,प्रशांत,सूड,धनाजीराव,किसन-द्येव,आणी शामियान्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी एकरुप झालेले-मालोजीराव रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-२...डावी बाजू-मि.ओक,प्रशांत,..उजवी बाजू-मृत्युंजय,पन्नासराव,गंभीरराव,धन्या रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-३(वरचेच सर्व,परंतू-सर्व फोटोंमधिल काही नावे माहित नसल्यामुळे टाकु शकलो नाही..क्षमस्व) रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-४ या रांगेत-सुहास.. पिंगू (कदाचित वेळ जात नसल्यामुळे-नाकात तपकिर लावत असावे ;-) ) रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-५ या पाचही फोटोंचा अर्थ- रविवार-नवं कार्यालय-त्रेधा तिरपिट योग यात-कोपर्‍यातुन-मोदक(चमच्यानी साजुकतूप पोटात पाडून घेत असलेले),त्याच्यापुढे... ,नंतर वपाडाव,,आमच्या आणी वपाडावच्या मधेच दडलेले-मनोबा-यांचा या फोटोत,केवळ हात आहे ;-) ,मग आंम्ही,आणी आमच्या(च)शेजारी पक-पक-पक... तिच बेचैनी आणी मिपाकर,पण बेचैनी नुसतीच एंजॉय कशी करावी हे शिकवण्याच्या प्रयत्नात-कोपर्‍यात बसलेले अव्वल मिपाकर-श्री.प्यारे१(थम्स अप पोज),आणी किसनद्येवांच्या शेजारी 'श्रीरंग'-काय जोडी जमलीये नाई ;-) वेटरला(आता)बैल होऊन तरी अंगावर ये...असं सुचवणारे गवताळ टिमचे सदस्य-म्हणजे दस्तुरखुद्द आंम्ही(लाल कपडा) यात असलेले-समोरुन..वल्ली-मोबॉइल,वपाडाव,मन-१(मनोबा),बुल-फायटर-आंम्ही, व सूड खाद्य चिंतनात मग्न असलेले मिपाकर सूप आणी तितक्याच गरम गप्पांना आलेला ऊत-यात ओकांबरोबरच्या गप्पांमुळे वल्लींचा चेहेरा कसा आनंदानी फुलुन आलाय याची प्रचिती येतीये..पुढे त्या गप्पांमधुन यशस्वीपणे अंग काढून घेतलेले-प्रशांत आणी सौरभ वल्ली आणी ओकांची गुप्त खलबतं-भाग-१ गुप्त खलबतं-भाग-२ स्टाटर बसलं ;-) आणी सुटली गाडी एकदाची म्हणुन प्रसन्न झालेले धनाजीराव वाकडे ऊर्फ धन्या मेन कोर्सच्या प्रतिक्षेत एक गंभीरराव आणी एक खंबीरराव हाटीलचा एक उत्साहशामक केंद्रबिंदू(ओळखा पाहु हे काय असेल..?) गो-पी,आणी गो-पी--का(?) मंजे यात किस्नाला जागाच नाय,,,अरं..रं रं...द्येव मानसात आला तर त्याची कशी जागा जाते बगा.... ;-) अवतारी पुरुषांची सभा-१..डावीकडुन-वपाडाव,मालोजीराव,आंम्ही,आम्च्या मागे-नि३,नंतर मोदक,शेजारी प्रशांत,त्या दोघांच्या मागे सुहास..,(खांद्याला झोळी लाऊन)संन्यस्त-प्यारे-१,शेजारील गंभीरराव(हेच भरत असावे का?),किसनराव सभेतले अवतारी पुरुष-२डावीकडुन-प्रशांत,श्रीरंग,सुहास..,पिंगु,सुड,धन्या,वल्ली,कट्टा आयोजक-फक्त५०,५०आनी माझ्या पाठिशी-नि३,मोदक,नंतर प्यारे१,वपाडाव आणी शेवटी पक पक पक ता>क>-(प्यायचं नव्हे-पचवायचं ;-) )-मेन कोर्स हा युद्धमग्न परिस्थितीत घडून गेला असल्या कारणानी त्यावेळेसचे फोटो नीट निघुच शकलेले नाहीत..सबब ज्यांना ते याची देही/याची डोळा पहायची इच्छा असेल..त्या सदस्यांनी पुढील युद्धात सामिल व्हावे..ही णम्र इनंती... अजुन १वाटी ता>क>-- फ्लाईंग व्हिजिट देऊन गेलेले सदस्य-प्रकाश घाटपांडे,परिकथेतील राजकुमार,धमाल मुलगा,विवेक मोडक,प्रीत-मोहर,सोकाजीराव त्रिलोकेकर,नावत काय आहे,गणेशा.. :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
22512 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

मोदकाण्णा,

प्रास
Tue, 01/10/2012 - 20:36 नवीन
राम राम! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

राम राम

मोदक
Tue, 01/10/2012 - 20:52 नवीन
:-) मी पहिल्यांदाच आलो होतो कट्ट्याला. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

लैच अवघड आहे बॉ ही माणसांची कोडी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 01/10/2012 - 20:25 नवीन
जाऊ द्या. पुन्हा कोणत्या तरी कट्ट्यात बाकी राहीलेले मिपाकर ओळखण्याचा प्रयत्न करीन. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

भटजीबुवांनी अगदी मंत्रपठण

सुहास..
Tue, 01/10/2012 - 18:47 नवीन
भटजीबुवांनी अगदी मंत्रपठण (लग्नाचे) केल्यासारखा वृतांन्त लिहीला आहे ;) (तिथं कुट एन्टर असत का ;) ) असो ...फोटो छान आलेत, वृतान्त ही आवडला ...बाकी लिहितो थोड्या वेळात ;)
  • Log in or register to post comments

बुच मारल्याबद्दल स्वारी

प्यारे१
Wed, 01/11/2012 - 12:42 नवीन
बुच मारल्याबद्दल स्वारी वाश्या . भटाने अगदी मंत्रपठण (लग्नाचे) केल्यासारखा किंवा श्रावणातली सत्यनारायणाची पूजा सांगावी असा वृत्तांत लिहीला आहे. (मध्ये मध्ये येणार्‍या कॉल्ससकट ;) ) बाकी >>>तिथं कुट एन्टर असत का >>> लग्नात नाही पण 'नंतर' एन्टर असतं. ;) असो. आमच्या कोरडेपणाबद्दल, अंगठ्याबद्दल बोलले गेल्याने जनतेचे गरीबाकडे लक्ष आहे हे जाणवून ड्वाळे पाणावले. :) बाकी आम्ही धम्याचे 'जीवश्च कंठश्च मित्र' बनण्याचा केलेला प्रयत्न अंधार्‍या फटुमुळे कळला नाही काय लोकांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

व्रुत्तांत झकास ... फोटु

गणेशा
Tue, 01/10/2012 - 19:37 नवीन
व्रुत्तांत झकास ...
  • Log in or register to post comments

मस्त मस्त मस्त आणि मस्तच , लई

५० फक्त
Tue, 01/10/2012 - 19:14 नवीन
मस्त मस्त मस्त आणि मस्तच , लई भारी लिवलंय भट्जी बुवा, खरंच मजा आली त्यादिवशी. एवढे मिपाकर एकत्र पाहुन डोळे पाणावले नसते तर मग कसले ते मिपाकर अन कसले ते त्यांचे डोळे.. असो, बाकी जेवण उत्तम होतं, डिलिव्हरी टाइम ,सर्विस चांगली होती, आणि महत्वाचं म्हणजे खर्च दरडोई २३०/- फक्त झाला. एक राहुन गेलं माझ्याकडुन ते म्हणजे, बहुधा पुढच्या महिन्यात कोकण ट्रिप करायचं ठरतंय त्याबद्दल जास्त बोलणं झालं नाही, असो, कोअर कमिटि निर्णय घेउन आगाउ कळवेलच अगदी खर्चाच्या आकड्यासहित, तेंव्हा पण असाच लोभ ठेवुन प्रतिसाद द्यावा ही विनंती. नि३,विवेक मोडक आणि नाकाआ सगळ्यात प्रथम पोहोचले होते, धाग्यावर आणि व्यनितुन जेवढ्यांनी कबुल केलं होतं त्यापैकी बहुतेक सगळे आले होते, त्याबद्दल अतिशय धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आनी ओ ५०

मी-सौरभ
Tue, 01/10/2012 - 19:18 नवीन
जे नै आले तेंच क्काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

जे नै आले तेंच क्काय?? - हा

५० फक्त
Tue, 01/10/2012 - 19:36 नवीन
जे नै आले तेंच क्काय?? - हा एक लई मह त्वाचा प्वाईंट अन मुद्याची कल्पना हाय, यावर पण कोअर कमिटि निर णय घेई ललव करच. का लोक शाई धरमाला अनु सरु न एक धागा काडावा, मदत हवी आहे, येतो म्हणुन कट्टयाला न येणा-या सदस्यांना/चे काय करावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

लई भारी

प्रशांत
Tue, 01/10/2012 - 21:15 नवीन
एकंदरीत कट्टा खुपच मस्त झाला. भटजीबुवाच्या शब्दात सांगायचे झाल्यास "अत्रुप्त आत्मा तृप्त झाला"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

नि३ !! लईच येगळं पोरगं आहे

सुहास..
Tue, 01/10/2012 - 19:22 नवीन
नि३ !! लईच येगळं पोरगं आहे राव !! कितीक बोलला ? काय बी नाय , पण छाप पाडुन गेलं, नाही का ?? तसच पक पक पक :)
  • Log in or register to post comments

पहिलाच टायम हाय, त्यात

५० फक्त
Tue, 01/10/2012 - 19:33 नवीन
पहिलाच टायम हाय, त्यात तुम्ही, भटजी , वप्या आणि धन्यासारके डुडूळगावचे गोलंदाज समोर, बॅट सावरावी का पॅड असं झालेलं असेल, घ्या सावरुन पुढच्या टायमाला मारतील कवर ड्रायव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

एका फोटूत धन्या फारच हसून

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/10/2012 - 20:05 नवीन
एका फोटूत धन्या फारच हसून र्‍हायलाय बे! ;)
  • Log in or register to post comments

ते खोटे खोटे हास्य आहे..

मोदक
Tue, 01/10/2012 - 20:16 नवीन
लोहगड ट्रेक, जाताना आणि येतानाची चालकाची भूमीका (कारण इतर ३ अशिक्षीत होते) दिवसभर झालेली उपासमार, कट्ट्याआधी १ तास खाल्लेले तन्दूरी चिकन, आणि दिवसभरची कंपनी (मी, वपाडाव आणि किसन) यातून धन्या खरे खरे हसेल असे वाटते काय.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

यातून धन्या खरे खरे हसेल असे

धन्या
Tue, 01/10/2012 - 21:10 नवीन
यातून धन्या खरे खरे हसेल असे वाटते काय..
खिक्क खिक्क !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

भारी रे!!

प्रभो
Tue, 01/10/2012 - 20:16 नवीन
भारी रे!!
  • Log in or register to post comments

वॄतांत झकास,.......

निवेदिता-ताई
Tue, 01/10/2012 - 20:18 नवीन
वॄतांत झकास,.......
  • Log in or register to post comments

कट्ट्यावर येण्याची पहिलीच वेळ

श्रीरंग
Tue, 01/10/2012 - 20:21 नवीन
कट्ट्यावर येण्याची पहिलीच वेळ होती. खूप मजा आली. मस्त झाला कट्टा. यापुढेही नियमीत हजेरी लावीनच म्हणतो. :) आणी हो, अत्रुप्त आत्मा यांनी आणलेल्या बाटलीचा उल्लेख राहिलाच. धन्यवाद, गुरुजी.
  • Log in or register to post comments

आणी हो, अत्रुप्त आत्मा यांनी

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/10/2012 - 20:56 नवीन
आणी हो, अत्रुप्त आत्मा यांनी आणलेल्या बाटलीचा उल्लेख राहिलाच. धन्यवाद, गुरुजी.>>> अरे...श्रीरंगा..! मजला मुक्ती देण्याच्या विचारत आहेस काय? :-D बाटलीचा उल्लेख मजकडूनी राहिला परि तुझ्याकडुनी तो ऐसा कैसा जाहला...। बाटली म्हटली की काय-काय अठवते रे, पण मी तर सु-गंधी अत्तरवाला...॥ ;-) अवांतर-अत्तर कोणतं होतं..? असे बरेच जण विचारत आहेत...अत्तराचे नाव-कस्तुरी/हीना :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

हाहाहा! लोकांना बाटली म्हणता

श्रीरंग
Tue, 01/10/2012 - 21:06 नवीन
हाहाहा! लोकांना बाटली म्हणता जे स्मरायचे ते स्मरु द्या. आम्हाला बुवा जाम आवडली कस्तुरी/हीना. म्हणूनच आवर्जून आठवण करून दिली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आम्हाला बुवा जाम आवडली

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/10/2012 - 21:29 नवीन
आम्हाला बुवा जाम आवडली कस्तुरी/हीना. म्हणूनच आवर्जून आठवण करून दिली...खुलाश्याबद्दल थँक्यू :-) अता निघालीच आहे अत्तराची चर्चा तर त्याची लेखात लिहायची र्‍हायलेली अख्खी अठवणच शेअर करतो--- पन्नासरावांनी केकचा नैवेद्य देऊन गणपतिंचे पुजन करण्या आधी मी सगळ्या पंगतीला खुर्च्यांमागुन अत्तराचे मंगलाचरण करत सुटलो होतो...माझी गाडी ओककाकां-जवळ आली,,तेवढ्यात १/२मेंबरं का कोण जाणे हसली..आणी त्याचा परिणाम म्हणुन की काय,कुणास ठाऊक...ओककाकांनी अत्तर लाऊन घेण्यासाठी-मला मिष्किलपणे-''कोणता हात पुढे करू?'' असे विचारले..मग मी ही -''जो लवकर नाकाजवळ जाइल तो...!'' असे उत्तर मुष्किलपणे दिले... (हीह्हा ;-) ) त्यामुळे माझ्या आजुची आणी बाजुची अशी सर्व मंडळी हसली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

अरे हो

प्रशांत
Tue, 01/10/2012 - 21:24 नवीन
ओक काकांनी केलेला समारोप आणि फक्त ५० नी सांगितलेला जोक्स.. हे लिहायला विसरले तुम्हि आणि हो तुम्हाला वेळेवर सुचलेल्या त्या कवितेच्या चार ओळि त्या पण....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हो त्ये येक र्‍हायलच...!

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/10/2012 - 21:33 नवीन
हो त्ये येक र्‍हायलच...! ओकांचा समा-रोप मला का कोण जाणे अठवत नाही... आणी फक्त५० यांचा जोक त्यांनाच सांगु दे की राव.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

छान...

मन१
Tue, 01/10/2012 - 20:44 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

आपले लेखनकौशल्य महान

रेवती
Tue, 01/10/2012 - 20:51 नवीन
आपले लेखनकौशल्य महान आहे. 'कट्टा आला पण सोकाजी गेला' हे मात्र भारी. बरेच फोटू हे खाद्यपदार्थांची वाट बघतानाचे असल्याने बरे वाटले. आम्ही तरी दरवेळी आमच्याच डोळ्यांना शिक्षा का म्हणून द्यायची? एकंदरीत कट्टा चांगला झाला असल्याचे भासत आहे.;)
  • Log in or register to post comments

आपले लेखनकौशल्य महान

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/10/2012 - 21:00 नवीन
आपले लेखनकौशल्य महान आहे. 'कट्टा आला पण सोकाजी गेला' हे मात्र भारी.... :-) धन्यु @-बरेच फोटू हे खाद्यपदार्थांची वाट बघतानाचे असल्याने बरे वाटले.आम्ही तरी दरवेळी आमच्याच डोळ्यांना शिक्षा का म्हणून द्यायची?>> :-D आssssआssss लागलंss लागलंss
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

धमाल कट्टा झालेला दिसतोय!

पैसा
Tue, 01/10/2012 - 21:29 नवीन
प्रीतमोहर बै यानी का पलायन केलं हे हळूच विचारून घेण्यात येईल. पुढच्या कट्ट्याला आयोजकांमधे महिलांना प्रतिनिधित्व द्या, आणि ड्रेसकोडची भीती घालू नका, म्हणजे महिला आरक्षणाची मागणी करायची वेळ येणार नाही. ;)
  • Log in or register to post comments

भटजी वृत्तांत झकास लिहीलाय,

सूड
Tue, 01/10/2012 - 22:05 नवीन
भटजी वृत्तांत झकास लिहीलाय, एकदम मस्त!! कट्ट्याबद्दल बहुत काय बोलणे.
  • Log in or register to post comments

एकदम मस्त!

सोत्रि
Tue, 01/10/2012 - 22:15 नवीन
लैच भारी वृत्तांत गुर्जी! मझा आला. मी आणि पिंगू ५० रावांना फोनवत फोनवत ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. पोहोचल्यावर बघितले तर मिपाकर बाहेरच घोळका करू उभे होते. बरेचसे प्रथमच भेट्णारे. घाटपांडेकाका, नाकाआ, प्रशांत, भरत हे पहिल्यांदाच भेटणारे मिपाकर तर परा, ५० फक्त, नुकतीच हुच्चभ्रु झालेली प्रीमो आणि अतृप्त आत्मा हजर होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर गुर्जींनी (अतृप्त आत्मा) आधि कबूल केल्याप्रमाणे माझ्यासाठी आणलेला 'केसर चुना' माझ्या हवाली केला. गुर्जी लै वेळा धन्यवाद हो ! मग लगेच त्यांच्या आज्ञेचा मान राखून त्यांच्याबरोबर जागेची सोय करायला व्यवस्थापकाकडे गेलो आणि त्याला टेबले लावायला सांगीतलं. त्यानंतर हळू हळू गप्पा टप्पा चालू झाल्या. मी आपली सवयीप्रमाणे 'चैतन्यकांडी' पेटवली तोच वेटरकडून 'बनियान ट्री' मधे 'स्मोकिंग अलावूड नाय' अशी शिकवणी घेणे झाले. मग बाहेर जावेच लागले :( ह्या मोक्यावर सर्व इच्छुकांनी चौका मारून घेतला आणि पुन्हा बाहेर एक घोळका जमा झाला :) चैतन्यकांडी संपेपर्यंत सूड्चे आगमन झाले. स्वारगेट ते राजाराम पूल हा प्रवास अडीच तासांच्या विक्रमी वेळात पूर्ण करून त्यांनी इतिहासचं घडवला. ह्या विक्रमाबद्दल पुढच्या कट्ट्याला त्याचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा असा प्रस्ताव मी ह्या ठिकणी मांडू इच्छितो. वास्तविक सूड माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर नाही पण जवळच रहातो तरीही......असो. पुन्हा आत आलो तर चॉकलेट केकचे वाटप सुरू होऊन आडवा हात मारणे चालू झाले होते. प्रीमोने लगेच हावरटासारखे आख्खे ३ केक, हो हो... 'तीनं' केक साफ केले. त्यामुळे मला मग प्यारेच्या केक मधला एक तुकडा खाऊन समाधान मानावे लागले. प्यारे, देव तुझे भले करो. अरे हो डब्बल भले करो, प्यारेने मला त्याच्याकडे असलेला दुबईहून आणलेला एक शॉट ग्लास भेट दिला त्यादिवशी. आता कोरम पूर्ण भरला होता. गवि म्हणाल्याप्रमाणे मिपाधर्म वाढीला लागलेला पाहून ऊर भरून आला अगदी. डोळे अंमळ पाणावत होते तोच प्रीमोला घरी सोडण्याची तीने आ़ज्ञा केली. आजकालच्या मुलींना विनंती हा शब्द माहीतच नाही :( बरं आ़ज्ञातर केलीच पण वरून माझी शोफर अशी संभावना ही केली. :( त्यामुळे आणि मिपा कट्ट्याला महिला आयडींनी लावलेल्या अनुपस्थितीचा निषेध म्हणून लवकर निघायचा निर्णय घेतला. असे भरलेल्या पानावरून ऊठून जिवावर आले होते पण..... गुर्जी आणि ५० फक्त, नियोजन आणि आयोजन ह्याबद्दल मनापासून आभार. उपस्थित मिपाकरांचेही हजेरी लावून मिपाधर्म वाढवल्याबद्दल आभार! मिपाकर्स रॉक्स.... - (पुढील कट्ट्याच्या प्रतिक्षेत असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

. स्वारगेट ते राजाराम पूल हा

सूड
Tue, 01/10/2012 - 22:46 नवीन
. स्वारगेट ते राजाराम पूल हा प्रवास अडीच तासांच्या विक्रमी वेळात पूर्ण करून त्यांनी इतिहासचं घडवला. वास्तविक पाहता हा प्रवास अवघ्या वीस मिनीटात पूर्ण केल्या गेला होता. उरल्या वेळाचे संदर्भासहित स्पष्टीकरण दिल्या गेले होते तरीही असो. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

भटजीबुवा तुम्ही फुलांच्या

भिकापाटील
Tue, 01/10/2012 - 22:36 नवीन
भटजीबुवा तुम्ही फुलांच्या रांगोळ्या नाही काढल्या का इथे. :) असो! मजा केलेली दिसते. पुढच्या वेळेस मलाही अ‍ॅड करा.
  • Log in or register to post comments

@-भटजीबुवा तुम्ही फुलांच्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/11/2012 - 00:17 नवीन
@-भटजीबुवा तुम्ही फुलांच्या रांगोळ्या नाही काढल्या का इथे. :-) >>> थितं नै तं,,,हितं घ्या... :-) Image removed. आता खुष...? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिकापाटील

चिंचवडहून मी आणि पक पक पक

प्रचेतस
Wed, 01/11/2012 - 09:14 नवीन
चिंचवडहून मी आणि पक पक पक बरोबरच निघालो. साक्षात भगवान किसनदेवांची आज्ञा झाल्यामुळे अप्पा बळवंत चौकात त्यांच्यासाठी सुशिंचे 'बरसात चांदण्यांची' घेणे क्रमप्राप्तच होते. आख्खा अप्पा बळवंत चौक पालथ्या घातल्यानंतर एक अखेरचाच प्रयत्न केलेल्या दुकानात मात्र नेमके ते मिळाले आणि आमचा जीव भांड्यात पडला. हाटेलजवळ पोहोचलो तेव्हा ७/८ मिपाकर आलेलेच होते. प्रथमच भेटत असलेल्या काहींशी नव्याने ओळख झाली. तितक्यात गुरुजी आलेच. हळूहळू बाकीची मंडळीही आलीच मग एकच दंगा सुरु. काही वेळाने मग ओक काकांबरोबर खलबते सुरु झाली. महाराष्ट्रातील किल्ल्यांची बांधणी आजच्या काळातही त्यानुरूप करता येईल का या विषयावर काथ्याकूट करण्यात आला, मृत्युंजयचाही त्यात सहभाग होता. सुहासशी गप्पा मारतांना अनेक नवनविन किस्से समजले. पहिल्यांदाच मिपा कट्ट्याला हजेरी लावणारे काही मिपाकर शांत शांत होते. पुढच्या कट्ट्याला ते नक्की खुलतीलच. एकंदरीत कट्टा एकदम मस्त झाला. पण जेवणानंतर पान खायचे राहिलेच. त्याची कमी मग मी आणि पक पक पक यांनी नळस्टॉपवरील शौकीनचे मघई पान खाउन भरून काढली. तिथे एक पुणेरी पाटी पाहून उर भरून आला. Image removed. पुणेरीपाट्या यासंथळावरून साभार (या संस्थळावर आम्हीसुद्धा ८९ पाट्या टाकल्या आहेत) ;)
  • Log in or register to post comments

फारच गमतीशीर वर्णन कट्याचं

पाषाणभेद
Wed, 01/11/2012 - 03:04 नवीन
फारच गमतीशीर वर्णन कट्याचं
  • Log in or register to post comments

आवडला

स्मिता.
Wed, 01/11/2012 - 03:52 नवीन
परिच्छेद आणि महिला सभासद नसलेल्या कट्ट्याचे वर्णन आवडले ;) आजकाल कट्ट्याच्या धाग्यांवर जास्त न बोलायचं ठरवलंय.
  • Log in or register to post comments

परिच्छेद आणि महिला सभासद

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/11/2012 - 09:06 नवीन
परिच्छेद आणि महिला सभासद नसलेल्या कट्ट्याचे वर्णन आवडले>>> <<< परि-च्छेद----पाडलेला अवडला ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

मस्त.. बरीच मोठी जत्रा भरली

मराठमोळा
Wed, 01/11/2012 - 05:19 नवीन
मस्त.. बरीच मोठी जत्रा भरली होती म्हणजे.. ;) कुणीतरी कट्टा चालू असताना फोन केला होता.. ती व्यक्ती म्हणत होती की मासळी बाजारात फोन केला असे वाटत होते.. ;) बाकी लवकरच एका कट्ट्यात हजेरी लावणारच. :)
  • Log in or register to post comments

@ती व्यक्ती म्हणत होती की

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/11/2012 - 09:13 नवीन
@ती व्यक्ती म्हणत होती की मासळी बाजारात फोन केला असे वाटत होते..>>>त्या दिवशी फक्त मासेबाजार होता.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

वा जेब्बात

स्पा
Wed, 01/11/2012 - 08:14 नवीन
वा जेब्बात!!! धमाल केलीत म्हणायची... कट्ट्याला येऊ शकलो नसलो.. तरी फोटो भरपूर वेण्जोय केले बरेच नवीन चेहरे दिसत आहेत , नाव टाकली असतीत तर बर झाल असत :)
  • Log in or register to post comments

@कट्ट्याला येऊ शकलो नसलो..

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/11/2012 - 09:03 नवीन
@कट्ट्याला येऊ शकलो नसलो.. तरी फोटो भरपूर वेण्जोय केले>>> <<< आज अकरा तारिख आहे.... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

खुप मजा आली.

किसन शिंदे
Wed, 01/11/2012 - 09:18 नवीन
बदली फलंदाज म्हणून आलेल्या भटजी बुवांनी अगदी धडाक्यात चौकार-षटकार ठोकलेत कि.! :)
  • Log in or register to post comments

हम्म!!!

अन्या दातार
Wed, 01/11/2012 - 09:34 नवीन
गप्प रहायचे ठरवले आहे ;)
  • Log in or register to post comments

अरे व्वा ! झक्कास झाला कट्टा

पियुशा
Wed, 01/11/2012 - 09:40 नवीन
अरे व्वा ! झक्कास झाला कट्टा बरेच नविन चेहरे दिसले यावेळी. पुढल्या कट्ट्याला आगाऊ ( ;) शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

@पुढल्या कट्ट्याला आगाऊ (

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/11/2012 - 09:59 नवीन
@पुढल्या कट्ट्याला आगाऊ ( ;-) शुभेच्छा ! >>> अंsss अच नै... अता आमाला याच्यावल येक (आ-गाऊ) गाणं पायजे ... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

(आ-गाऊ) गाणं ? त्ये काय असत

पियुशा
Wed, 01/11/2012 - 10:14 नवीन
(आ-गाऊ) गाणं ? त्ये काय असत ? ;) धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

@(आ-गाऊ) गाणं ? त्ये काय असत

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/11/2012 - 11:28 नवीन
@(आ-गाऊ) गाणं ? त्ये काय असत ? >> आपण गायला लागल्यावर,लोकं आsss वासून बघु लागतात... ते आ-गाऊ गाणं ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

मस्त झालाय कट्टा, पण एक

RUPALI POYEKAR
Wed, 01/11/2012 - 12:33 नवीन
मस्त झालाय कट्टा, पण एक विचारते तुमच्याकडे तुमच्या सहचारीणीला घेउन जाण्याची रित नाही का हो? एकाचीहि मिसेस नाहि हे विषेश
  • Log in or register to post comments

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/11/2012 - 12:38 नवीन
मस्त झालाय कट्टा, पण एक विचारते तुमच्याकडे तुमच्या सहचारीणीला घेउन जाण्याची रित नाही का हो? एकाचीहि मिसेस नाहि हे विषेश
पुरुषांच्या मंगळागौरीला बायकांना आणि बायकांच्या मंगळागौरीला पुरुषांना नेण्याची पद्धत नसते. ;) अर्थात प्रीमो ही अमानवी असल्याने तिला ह्यातून वगळण्यात आले आहे.
  • Log in or register to post comments

तेज्याय्लाअर्थात प्रीमो ही

प्रीत-मोहर
Wed, 01/11/2012 - 13:01 नवीन
तेज्याय्ला
अर्थात प्रीमो ही अमानवी असल्याने तिला ह्यातून वगळण्यात आले आहे
हो आम्ही आमच्या बेलाच्या व अत्यंत प्रिय अश्या एडवर्डच्या जमातीतलेच आहोत. धन्यवाद परा. तुच रे तो मला ओळखणारा!!!! बाकी @ सोत्रि मी हावरट काय? आता पुढच्या कट्ट्याच्या वेळी हावरटपणाचा डेमो दिल्या जाईल. याची नोंद घेतल्या जावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बघा.... असं असावं माणसानं,

सूड
Wed, 01/11/2012 - 15:19 नवीन
बघा.... असं असावं माणसानं, पराशेटना पुरषांच्या मंगळागौरीचीही रीतभात माहीत आहे. आमच्यासाठी हे काहीतरी नवीनच कानी पडतंय. इथे मंगळागौरीची पूजा करुन नंतर ते पुरषांच्या मंगळागौरीचं जागरण करायला गेले होते तर !! आणि आम्ही म्हणतोय पराशेट लवकर का गेले. भारी धार्मिक हो !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा