या वेळी कट्टा जाहिर धागा काढुन ठरलेला असल्यामुळे,इतर अनेक मि.पा.करांप्रमाणे कट्ट्याविषयीची कल्पनाचित्र(जागा आधीच माहित असल्यमुळे ;-) ) आंम्ही मनात तयार केलेली होती.परंतू प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र,हाटीलच्या भायेर(च)-''बनीयन ट्री''खाली(आमच्या आधी)जमलेली मेंबरं पाहुन आमी जरा शंकाकुल झालो होतो,म्हटलं...आधी आलेल्या बनीयन लेंगा प्रस्तावानुसार शेजारच्या गाडीत ती व्यवस्था केलेली आहे कि काय..?आणी नंतर सगळी मेंबरं.सॉरी सॉरी सभासद(हां आता कंसं सभ्य वाटलं बरं..!)जमल्यावर प्रत्येकाचं माप-काढुन त्या प्रमाणे ड्रेपरी वाटप वगैरे ठरलय की काय..?पण हाटीलच्या दरवाज्याजवळ गाडी(सॉरी टू व्हिलर ;-) )लावल्यावर आत डोकावल्या नंतर लक्षात आलं,की मंडळी तयार आहेत,पण अजुन मांडव 'तयार' झालेला नाहीये(बनीयन ट्री कार्यालय नविन असल्याचा परिणाम,दुसरं काय..? ) पण नंतर थोड्याच अवधीत सर्व कोरम हळुहळू भरत गेल्यावर,,मांडवाबाहेरचा 'अंदाज' घेऊन रस्त्यावर दंगा होण्यापेक्षा हे नामी वर्हाड आत बोलावलेलं बरं असा (मुळात भटजी असल्यामुळे ;-) ) कार्यालय वाल्याच्या बाजूनी विचार करत..सोकाजीरावांसारखा भारदस्त मामा हाताला घेऊन आंम्ही मांडवात शिरलो...
बनियन ट्री कर्यालयाच्या म्यानेजरला अदल्यादिवशी मेनु बघायचं निमित्त करुन दस्तुरखुद्द ५०राव यांनी-''उद्या आपल्या इथे काय काय घडू शकणार आहे..(पक्षी-तुंम्हाला सहन करावं लागणार आहे)"याची आगाऊ-कल्पना दिलेलीच होती...पण कार्यालय नवं असलं तरी म्याने-जर जुना मंजे 'तयार' का नेमतात याची प्रचिती संपूर्ण कट्टा होईपर्यंत वारंवार आली..बाकी १मात्र आहे हां..बनीयन ट्री कट्टा-मग्न होण्याकरता १नंबर जागा आहे,हे आसनस्थ व्हायच्या आधीच पटलं.बसाबस झाली..पण हॉटेलचे भटजी नविन असल्यामुळे आपल्या पाटासमोर नुसतच पळीभांड/ताम्हन लावलय,आणी कार्यारंभ करायला कोणीच येत नाही हे पाहुन,वर्हाड अंमळ खिन्न झाल्यासारखं झालं आणी जागा सोडून काही अग्निउपासक हाटिलच्या भायेर,तर आम्च्या सारखे मळीसम्राट तंबाखू साठी वेगवेगळे कोपरे धुंडाळू लागले.पण म्यानेजरच्या करड्या नजरेतनं हे सुटलं नाही,त्यानी लगेच भटजी आले,भटजी आले..चला..चला..अश्या हाळ्या मारत पांगलेलं वर्हाड पुन्हा आसनस्थ केलं. हा मोका साधुन कट्टा आयोजक श्री.पन्नासराव यांनी-''कोणताही कार्यक्रम निर्विघ्न व्हायचा असेल तर,गणंपतिंचं पूजन करण्याशिवाय गत्यंतर नसतं''.या धार्मिक रुढिला अनुसरुन,खादाडीची सुरवात गोडानी केली की पुढे पदार्थ कोणत्या(ही) स्वरुपात आले,तरी चवीत विघ्न येत नाही,अश्या अंदाजानी सगळ्या मेंबरांची तोंडं त्या लाजवाब चॉकलेटयुक्त केकानी खदाडीसाठी तयार केली.काही मिनिटं केक साफ करण्यात जातायत नाही,एवढ्यात कार्यालयात जशी चहा/कॉफी विचारणारी 'पोरं' वर्हाडाच्या मागे मागे 'ट्रे' घेऊन हुभी र्हातात,तशी काही वेटर कम आर्डर घेणारी २ पोरं पन्नासरावांच्या मागं दिमतीला आल्याच्या थाटात हुभी ठाकली..मग सौरभ आणि पन्नासरावांनी पहिल्या आर्डर दिऊन,वेटरना मार्गी लावलं..तो इकडे सगळया मंडळींनी मि.पा.च्या कट्टा संस्कृतीला अनुसरुन दंगा करायला सुरवात केली होती.गप्पा टप्पा,एकमेकाची खेचणं,आणी ओक साहेब आलेले असल्यामुळे एकामेकाच्या नाड्याही खेचायला सुरवात झालेली होती.
हे सर्व यथास्थित चालू असताना ,पूर्वी जशी खास पुणेरी कार्यालयात ''लवकरची पंगत धरुन कामावर जाणारी मंडळी दिसायची'' त्याच प्रमाणे प.रा...आणी मंडळी लवकर जायचं असल्यामुळे हळुहळू आमचा निरोप घेत बाहेर पडली...पका काका तर फ्लाईंग व्हिजिटलाच आले होते त्यामुळे तेही दरम्यान केंव्हातरी ''गमन करिते जाहले'' त्यामुळे मि.पा.धर्माचा स्विकार केलेल्या काही नव प्रवेशितांचे(आणी माझे देखिल) या मंडळींना जाणुन घेण्याचे मनसुबे उधळले गेले,आणी मन जरा खट्टू झालं...सोकाजीरावसुद्धा आम्ही आणलेल्या ''१६०-पानाला'' आणि आंम्हाला सोडून त्यांना जायच होतं म्हणुन गेले,पण आमचं कट्टामानस चित्र त्यामुळे काही प्रमाणात भंगल :-( त्यामुळे आमची अवस्था-'कट्टा आला पण सोकाजी गेला' अशी काही काळ झाली खरी... पण या अवस्थेतून आंम्हाला बाहेर काढायला एक नामी त्रिकुट-वपाडाव,धनाजीराव,आणी वो किस्ना है असं पाहाता क्षणीच ओळखू येणारा आमचा किसन द्येव,यांनी मांडवात हजेरी लावली...मागोमाग...सुहास डॉट-डॉट,गणेशा आणी इतर काही स्वयंभू देवता मांडवात शिरल्या आणी मग मात्र कट्टा खर्या अर्थानी रंगात आला...
लाजवाब पालक शोरबा व इतर काही नेहमीच्या सूपनी कट्टा एक्सप्रेस धडधडत धाऊ लागली,भट्टीमधे तितक्याच चांगल्या-पनीर,मश्रूम,चिकन अश्या स्टाटर्सचा नामी कोळसा पडल्यावर मेन खादाडीचा लोणावळा कधी आला ते कळलं सुद्धा नाही...पण तो पर्यंत रविवार-नवं कार्यालय-त्रेधा तिरपिट योगाच्या फेर्यात अडकलेल्या कार्यालयाच्या पोरांमुळे आमची गाडी-मेनकोर्स नावाचा विधि कधी होतो..?अशी वाट बघत काही काळ लोणावळ्यात घुटमळली...मग एकदा गाडी थांबली की प्रवासी शीटावर थोडेच स्वस्थ बसणार,पुन्हा विडीकाडी.पान.चुना,तंबाखू...आणी धिंगाण्याला ऊत आला...शेजारच्या डब्यातले प्र-वासी आमच्या डब्यात डोकावून''कुठनं आली ही जत्रा..?'' असा चेहेरा करून बघायला लागलेच होते...पण पुढचा राग रंग ओळखुन त्या महान म्यानेजरनी आंम्हाला सगळ्यांना एकदाचं-खाली बशिवलं...आणी आधी नुसत्याच रोट्या/नान वगैरेंची रेलचेल सुरू केली.अता मेन कोर्सच्या डिश जर का लवकर पाठवल्या नाहीत,तर लहान पोरांच्या शाळेत जसं..सगळ्यांचा डबा संपल्यावर-शेवटच्याचा डबा हिसकावतात,,,तशी लोणची/कांद्याच्या सगळ्या प्लेटांची अवस्था होइल हे ओळखून पुन्हा त्याच तत्पर आणि तयार म्यानेजरनी मेन कोर्सची ऑर्डर टेबलांवर आणुन रोट्यांवर होऊ घातलेला अनुचित हल्ला रोखला,मग काय..? सग्ळी गप्पा/हलकल्लोळ करुन थकलेली हात आणी तोंडं समरांगणावर एकदम चाल करुन ग्येली...पहिली दहा मिनिटं शत्रूची अशी बेजान कत्तल करण्यात गेली...की पुढच्या डिशची पलटण आंम्हा खादाड योद्ध्यांपुढे आल्या/आल्या नरम पडावी...परिणामी जेवण संपेपर्यंत म्हणजे युद्ध शेवटच्या टप्यात आल्यावर मधेच वेळ काढुन जरा परत गप्पा/टप्पा वगैरे चालू झाल्या...पण शत्रू रणांगणावर शिल्लक राहू द्यायचा नाही,अश्या बेतानीच हल्ला चालला होता...आणी अश्या युद्धाची अंतिम परिणिती अव्वल विजयात होत असते,हे ऐतिहासिक वचन अखेर सर्व मिपाधर्मियांनी सार्थ करुन दाखवलं...म्यानेजरही मनात म्हणला असेल,,,''मायला असलं वर्हाड बघितलं नव्हतं'' अश्या तर्हेनी एकमेकांचा परिचय करुन घेत, मो.नंबरर्सची देवाण घेवाण होत...नेहमीच्या दिमाखदार पद्धतीने मि.पा.कट्टा-खादाड कंपू-२०१२ यथास्थित पार पडला...
कार्य संपलं की शेवटी ग्रुप फोटोंची परंपरा असतेच...त्या प्रमाणे 'भायेर'-वडाच्या झाडाखाली-कट्ट्याला आलेल्या सर्व अवतारी पुरुषांचे वेगवेगळ्या पोज मधले ग्रुप फोटो होऊन...बाहेर पेटलेल्या थंडिचा अंदाज घेत घेत,,,सर्व मेंबरं घराच्या दिशेनी पांगली सुद्धा...
गणपतिंचे पूजन करण्यासाठी ५०रावांनी अणलेला खास नैवेद्य
लवकर सोडुन जाणार्या :-( सदस्यांपैकी १-मि>ध.मु. आणी मिपाकरांनी केलेली त्यांची हास्यबोळवण
बोळवणीला हातभार लावणारे-डाविकडून...सुहास..,पाठिमागे प्यारे१,कडेला आंम्ही,आणी आमच्या पाठिशी विंग कमांडर-ओक
स्टाटरवरचा हल्ला-अनुक्रमे...वल्ली,पिंगू,फक्त५०
रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-१...गणेशा,प्रशांत,सूड,धनाजीराव,किसन-द्येव,आणी शामियान्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी एकरुप झालेले-मालोजीराव
रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-२...डावी बाजू-मि.ओक,प्रशांत,..उजवी बाजू-मृत्युंजय,पन्नासराव,गंभीरराव,धन्या
रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-३(वरचेच सर्व,परंतू-सर्व फोटोंमधिल काही नावे माहित नसल्यामुळे टाकु शकलो नाही..क्षमस्व)
रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-४ या रांगेत-सुहास.. पिंगू (कदाचित वेळ जात नसल्यामुळे-नाकात तपकिर लावत असावे ;-) )
रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-५ या पाचही फोटोंचा अर्थ- रविवार-नवं कार्यालय-त्रेधा तिरपिट योग
यात-कोपर्यातुन-मोदक(चमच्यानी साजुकतूप पोटात पाडून घेत असलेले),त्याच्यापुढे... ,नंतर वपाडाव,,आमच्या आणी वपाडावच्या मधेच दडलेले-मनोबा-यांचा या फोटोत,केवळ हात आहे ;-) ,मग आंम्ही,आणी आमच्या(च)शेजारी पक-पक-पक...
तिच बेचैनी आणी मिपाकर,पण बेचैनी नुसतीच एंजॉय कशी करावी हे शिकवण्याच्या प्रयत्नात-कोपर्यात बसलेले अव्वल मिपाकर-श्री.प्यारे१(थम्स अप पोज),आणी किसनद्येवांच्या शेजारी 'श्रीरंग'-काय जोडी जमलीये नाई ;-)
वेटरला(आता)बैल होऊन तरी अंगावर ये...असं सुचवणारे गवताळ टिमचे सदस्य-म्हणजे दस्तुरखुद्द आंम्ही(लाल कपडा) यात असलेले-समोरुन..वल्ली-मोबॉइल,वपाडाव,मन-१(मनोबा),बुल-फायटर-आंम्ही, व सूड
खाद्य चिंतनात मग्न असलेले मिपाकर
सूप आणी तितक्याच गरम गप्पांना आलेला ऊत-यात ओकांबरोबरच्या गप्पांमुळे वल्लींचा चेहेरा कसा आनंदानी फुलुन आलाय याची प्रचिती येतीये..पुढे त्या गप्पांमधुन यशस्वीपणे अंग काढून घेतलेले-प्रशांत आणी सौरभ
वल्ली आणी ओकांची गुप्त खलबतं-भाग-१
गुप्त खलबतं-भाग-२
स्टाटर बसलं ;-) आणी सुटली गाडी एकदाची म्हणुन प्रसन्न झालेले धनाजीराव वाकडे ऊर्फ धन्या
मेन कोर्सच्या प्रतिक्षेत
एक गंभीरराव आणी एक खंबीरराव
हाटीलचा एक उत्साहशामक केंद्रबिंदू(ओळखा पाहु हे काय असेल..?) गो-पी,आणी गो-पी--का(?) मंजे यात किस्नाला जागाच नाय,,,अरं..रं रं...द्येव मानसात आला तर त्याची कशी जागा जाते बगा.... ;-)
अवतारी पुरुषांची सभा-१..डावीकडुन-वपाडाव,मालोजीराव,आंम्ही,आम्च्या मागे-नि३,नंतर मोदक,शेजारी प्रशांत,त्या दोघांच्या मागे सुहास..,(खांद्याला झोळी लाऊन)संन्यस्त-प्यारे-१,शेजारील गंभीरराव(हेच भरत असावे का?),किसनराव
सभेतले अवतारी पुरुष-२डावीकडुन-प्रशांत,श्रीरंग,सुहास..,पिंगु,सुड,धन्या,वल्ली,कट्टा आयोजक-फक्त५०,५०आनी माझ्या पाठिशी-नि३,मोदक,नंतर प्यारे१,वपाडाव आणी शेवटी पक पक पक
ता>क>-(प्यायचं नव्हे-पचवायचं ;-) )-मेन कोर्स हा युद्धमग्न परिस्थितीत घडून गेला असल्या कारणानी त्यावेळेसचे फोटो नीट निघुच शकलेले नाहीत..सबब ज्यांना ते याची देही/याची डोळा पहायची इच्छा असेल..त्या सदस्यांनी पुढील युद्धात सामिल व्हावे..ही णम्र इनंती...
अजुन १वाटी ता>क>-- फ्लाईंग व्हिजिट देऊन गेलेले सदस्य-प्रकाश घाटपांडे,परिकथेतील राजकुमार,धमाल मुलगा,विवेक मोडक,प्रीत-मोहर,सोकाजीराव त्रिलोकेकर,नावत काय आहे,गणेशा.. :-)
वाचने
22676
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! मजा केलीत म्हणायची! आमचं
असचं म्हणतो. खरं सांगा कुणा
In reply to वा! मजा केलीत म्हणायची! आमचं by बिपिन कार्यकर्ते
व्यनीमधुन सांगितले तर
In reply to असचं म्हणतो. खरं सांगा कुणा by गणपा
पुढील युद्धाची वेळ..?
सॉलिड धम्माल... एकदम मस्त
उत्तम संख्येने मिपाकर आलेले
हो ना....
In reply to उत्तम संख्येने मिपाकर आलेले by गवि
@-तुमच्या कळफलकावरील "एंटर
In reply to उत्तम संख्येने मिपाकर आलेले by गवि
व्वा ss
In reply to @-तुमच्या कळफलकावरील "एंटर by अत्रुप्त आत्मा
या कट्ट्यावर समस्त महिला
@-या कट्ट्यावर समस्त महिला
In reply to या कट्ट्यावर समस्त महिला by किचेन
फोतोत नाहियेत...
In reply to @-या कट्ट्यावर समस्त महिला by अत्रुप्त आत्मा
अहो..
In reply to फोतोत नाहियेत... by किचेन
फोतोत नाहियेत...>>> त्या
In reply to फोतोत नाहियेत... by किचेन
लौकर गेल्या.
In reply to फोतोत नाहियेत... by किचेन
गेल्या??
In reply to लौकर गेल्या. by मोदक
ब्बॉर..
In reply to गेल्या?? by मी-सौरभ
माताय
In reply to ब्बॉर.. by मोदक
हा हा हा..
In reply to माताय by मी-सौरभ
अहो तै
In reply to या कट्ट्यावर समस्त महिला by किचेन
मी येणार होते पण महिला
In reply to अहो तै by मी-सौरभ
काय काकू...
In reply to मी येणार होते पण महिला by किचेन
मि स्वताच लिहिलाय. काहि शंका?
In reply to काय काकू... by मोदक
बिल्कुल नाही...
In reply to मि स्वताच लिहिलाय. काहि शंका? by किचेन
प्र का टा आ
In reply to मि स्वताच लिहिलाय. काहि शंका? by किचेन
@कोण जाणे सगळ्याचं बिल मला
In reply to मी येणार होते पण महिला by किचेन
म्हणजे हुतात्मा जन्मावा, पण
In reply to मी येणार होते पण महिला by किचेन
अरेरे
In reply to मी येणार होते पण महिला by किचेन
पूढील युद्धाचे रणमैदान..?
@-पूढील युद्धाचे
In reply to पूढील युद्धाचे रणमैदान..? by पक पक पक
मी सांगतो की...
In reply to @-पूढील युद्धाचे by अत्रुप्त आत्मा
थोडं थांबा, एप्रिल मे मध्ये
In reply to मी सांगतो की... by मोदक
+१०००००००००००००००००००००००००
In reply to थोडं थांबा, एप्रिल मे मध्ये by ५० फक्त
याला कितीही + दिले तरी ते
In reply to +१००००००००००००००००००००००००० by मोदक
चाळीसेक वाट्या आमरस !!
In reply to याला कितीही + दिले तरी ते by प्रचेतस
[:)] हसतो आहे ... चाळीसीक
In reply to चाळीसेक वाट्या आमरस !! by स्वानन्द
संजयाने देखील ध्रुतराषट्राला
क्षमस्व
कट्ट्याचा वृत्तांत नादखुळा
व्वा!!
'सन्माननीय प्री-मो तै' णि
In reply to व्वा!! by मी-सौरभ
जौ द्या बुवा
In reply to 'सन्माननीय प्री-मो तै' णि by अत्रुप्त आत्मा
जौ द्या बुवा
In reply to 'सन्माननीय प्री-मो तै' णि by अत्रुप्त आत्मा
झकास वृत्तांत भटजीबुवा. लई
छान फोटो आलेत!!.... पण माननीय
In reply to झकास वृत्तांत भटजीबुवा. लई by प्रचेतस
वृत्तांत झकासच पण...
In reply to छान फोटो आलेत!!.... पण माननीय by मृगनयनी
बास काय बिरुटेसाहेब,
In reply to वृत्तांत झकासच पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो कसे खंग्री पाहिजेत.
In reply to बास काय बिरुटेसाहेब, by प्रास
नाय हो प्राडॉ,
In reply to फोटो कसे खंग्री पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तो मी आहे..
In reply to नाय हो प्राडॉ, by प्रास
मोदकाण्णा,
In reply to तो मी आहे.. by मोदक
राम राम
In reply to मोदकाण्णा, by प्रास
लैच अवघड आहे बॉ ही माणसांची कोडी.
In reply to नाय हो प्राडॉ, by प्रास
भटजीबुवांनी अगदी मंत्रपठण
बुच मारल्याबद्दल स्वारी
In reply to भटजीबुवांनी अगदी मंत्रपठण by सुहास..
व्रुत्तांत झकास ... फोटु
मस्त मस्त मस्त आणि मस्तच , लई
आनी ओ ५०
In reply to मस्त मस्त मस्त आणि मस्तच , लई by ५० फक्त
जे नै आले तेंच क्काय?? - हा
In reply to आनी ओ ५० by मी-सौरभ
लई भारी
In reply to मस्त मस्त मस्त आणि मस्तच , लई by ५० फक्त
नि३ !! लईच येगळं पोरगं आहे
पहिलाच टायम हाय, त्यात
In reply to नि३ !! लईच येगळं पोरगं आहे by सुहास..
एका फोटूत धन्या फारच हसून
ते खोटे खोटे हास्य आहे..
In reply to एका फोटूत धन्या फारच हसून by बिपिन कार्यकर्ते
यातून धन्या खरे खरे हसेल असे
In reply to ते खोटे खोटे हास्य आहे.. by मोदक
भारी रे!!
वॄतांत झकास,.......
कट्ट्यावर येण्याची पहिलीच वेळ
आणी हो, अत्रुप्त आत्मा यांनी
In reply to कट्ट्यावर येण्याची पहिलीच वेळ by श्रीरंग
हाहाहा! लोकांना बाटली म्हणता
In reply to आणी हो, अत्रुप्त आत्मा यांनी by अत्रुप्त आत्मा