✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खादाड कंपू-२०१२

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Tue, 01/10/2012 - 17:56  ·  लेख
लेख
या वेळी कट्टा जाहिर धागा काढुन ठरलेला असल्यामुळे,इतर अनेक मि.पा.करांप्रमाणे कट्ट्याविषयीची कल्पनाचित्र(जागा आधीच माहित असल्यमुळे ;-) ) आंम्ही मनात तयार केलेली होती.परंतू प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र,हाटीलच्या भायेर(च)-''बनीयन ट्री''खाली(आमच्या आधी)जमलेली मेंबरं पाहुन आमी जरा शंकाकुल झालो होतो,म्हटलं...आधी आलेल्या बनीयन लेंगा प्रस्तावानुसार शेजारच्या गाडीत ती व्यवस्था केलेली आहे कि काय..?आणी नंतर सगळी मेंबरं.सॉरी सॉरी सभासद(हां आता कंसं सभ्य वाटलं बरं..!)जमल्यावर प्रत्येकाचं माप-काढुन त्या प्रमाणे ड्रेपरी वाटप वगैरे ठरलय की काय..?पण हाटीलच्या दरवाज्याजवळ गाडी(सॉरी टू व्हिलर ;-) )लावल्यावर आत डोकावल्या नंतर लक्षात आलं,की मंडळी तयार आहेत,पण अजुन मांडव 'तयार' झालेला नाहीये(बनीयन ट्री कार्यालय नविन असल्याचा परिणाम,दुसरं काय..? ) पण नंतर थोड्याच अवधीत सर्व कोरम हळुहळू भरत गेल्यावर,,मांडवाबाहेरचा 'अंदाज' घेऊन रस्त्यावर दंगा होण्यापेक्षा हे नामी वर्‍हाड आत बोलावलेलं बरं असा (मुळात भटजी असल्यामुळे ;-) ) कार्यालय वाल्याच्या बाजूनी विचार करत..सोकाजीरावांसारखा भारदस्त मामा हाताला घेऊन आंम्ही मांडवात शिरलो... बनियन ट्री कर्यालयाच्या म्यानेजरला अदल्यादिवशी मेनु बघायचं निमित्त करुन दस्तुरखुद्द ५०राव यांनी-''उद्या आपल्या इथे काय काय घडू शकणार आहे..(पक्षी-तुंम्हाला सहन करावं लागणार आहे)"याची आगाऊ-कल्पना दिलेलीच होती...पण कार्यालय नवं असलं तरी म्याने-जर जुना मंजे 'तयार' का नेमतात याची प्रचिती संपूर्ण कट्टा होईपर्यंत वारंवार आली..बाकी १मात्र आहे हां..बनीयन ट्री कट्टा-मग्न होण्याकरता १नंबर जागा आहे,हे आसनस्थ व्हायच्या आधीच पटलं.बसाबस झाली..पण हॉटेलचे भटजी नविन असल्यामुळे आपल्या पाटासमोर नुसतच पळीभांड/ताम्हन लावलय,आणी कार्यारंभ करायला कोणीच येत नाही हे पाहुन,वर्‍हाड अंमळ खिन्न झाल्यासारखं झालं आणी जागा सोडून काही अग्निउपासक हाटिलच्या भायेर,तर आम्च्या सारखे मळीसम्राट तंबाखू साठी वेगवेगळे कोपरे धुंडाळू लागले.पण म्यानेजरच्या करड्या नजरेतनं हे सुटलं नाही,त्यानी लगेच भटजी आले,भटजी आले..चला..चला..अश्या हाळ्या मारत पांगलेलं वर्‍हाड पुन्हा आसनस्थ केलं. हा मोका साधुन कट्टा आयोजक श्री.पन्नासराव यांनी-''कोणताही कार्यक्रम निर्विघ्न व्हायचा असेल तर,गणंपतिंचं पूजन करण्याशिवाय गत्यंतर नसतं''.या धार्मिक रुढिला अनुसरुन,खादाडीची सुरवात गोडानी केली की पुढे पदार्थ कोणत्या(ही) स्वरुपात आले,तरी चवीत विघ्न येत नाही,अश्या अंदाजानी सगळ्या मेंबरांची तोंडं त्या लाजवाब चॉकलेटयुक्त केकानी खदाडीसाठी तयार केली.काही मिनिटं केक साफ करण्यात जातायत नाही,एवढ्यात कार्यालयात जशी चहा/कॉफी विचारणारी 'पोरं' वर्‍हाडाच्या मागे मागे 'ट्रे' घेऊन हुभी र्‍हातात,तशी काही वेटर कम आर्डर घेणारी २ पोरं पन्नासरावांच्या मागं दिमतीला आल्याच्या थाटात हुभी ठाकली..मग सौरभ आणि पन्नासरावांनी पहिल्या आर्डर दिऊन,वेटरना मार्गी लावलं..तो इकडे सगळया मंडळींनी मि.पा.च्या कट्टा संस्कृतीला अनुसरुन दंगा करायला सुरवात केली होती.गप्पा टप्पा,एकमेकाची खेचणं,आणी ओक साहेब आलेले असल्यामुळे एकामेकाच्या नाड्याही खेचायला सुरवात झालेली होती. हे सर्व यथास्थित चालू असताना ,पूर्वी जशी खास पुणेरी कार्यालयात ''लवकरची पंगत धरुन कामावर जाणारी मंडळी दिसायची'' त्याच प्रमाणे प.रा...आणी मंडळी लवकर जायचं असल्यामुळे हळुहळू आमचा निरोप घेत बाहेर पडली...पका काका तर फ्लाईंग व्हिजिटलाच आले होते त्यामुळे तेही दरम्यान केंव्हातरी ''गमन करिते जाहले'' त्यामुळे मि.पा.धर्माचा स्विकार केलेल्या काही नव प्रवेशितांचे(आणी माझे देखिल) या मंडळींना जाणुन घेण्याचे मनसुबे उधळले गेले,आणी मन जरा खट्टू झालं...सोकाजीरावसुद्धा आम्ही आणलेल्या ''१६०-पानाला'' आणि आंम्हाला सोडून त्यांना जायच होतं म्हणुन गेले,पण आमचं कट्टामानस चित्र त्यामुळे काही प्रमाणात भंगल :-( त्यामुळे आमची अवस्था-'कट्टा आला पण सोकाजी गेला' अशी काही काळ झाली खरी... पण या अवस्थेतून आंम्हाला बाहेर काढायला एक नामी त्रिकुट-वपाडाव,धनाजीराव,आणी वो किस्ना है असं पाहाता क्षणीच ओळखू येणारा आमचा किसन द्येव,यांनी मांडवात हजेरी लावली...मागोमाग...सुहास डॉट-डॉट,गणेशा आणी इतर काही स्वयंभू देवता मांडवात शिरल्या आणी मग मात्र कट्टा खर्‍या अर्थानी रंगात आला... लाजवाब पालक शोरबा व इतर काही नेहमीच्या सूपनी कट्टा एक्सप्रेस धडधडत धाऊ लागली,भट्टीमधे तितक्याच चांगल्या-पनीर,मश्रूम,चिकन अश्या स्टाटर्सचा नामी कोळसा पडल्यावर मेन खादाडीचा लोणावळा कधी आला ते कळलं सुद्धा नाही...पण तो पर्यंत रविवार-नवं कार्यालय-त्रेधा तिरपिट योगाच्या फेर्‍यात अडकलेल्या कार्यालयाच्या पोरांमुळे आमची गाडी-मेनकोर्स नावाचा विधि कधी होतो..?अशी वाट बघत काही काळ लोणावळ्यात घुटमळली...मग एकदा गाडी थांबली की प्रवासी शीटावर थोडेच स्वस्थ बसणार,पुन्हा विडीकाडी.पान.चुना,तंबाखू...आणी धिंगाण्याला ऊत आला...शेजारच्या डब्यातले प्र-वासी आमच्या डब्यात डोकावून''कुठनं आली ही जत्रा..?'' असा चेहेरा करून बघायला लागलेच होते...पण पुढचा राग रंग ओळखुन त्या महान म्यानेजरनी आंम्हाला सगळ्यांना एकदाचं-खाली बशिवलं...आणी आधी नुसत्याच रोट्या/नान वगैरेंची रेलचेल सुरू केली.अता मेन कोर्सच्या डिश जर का लवकर पाठवल्या नाहीत,तर लहान पोरांच्या शाळेत जसं..सगळ्यांचा डबा संपल्यावर-शेवटच्याचा डबा हिसकावतात,,,तशी लोणची/कांद्याच्या सगळ्या प्लेटांची अवस्था होइल हे ओळखून पुन्हा त्याच तत्पर आणि तयार म्यानेजरनी मेन कोर्सची ऑर्डर टेबलांवर आणुन रोट्यांवर होऊ घातलेला अनुचित हल्ला रोखला,मग काय..? सग्ळी गप्पा/हलकल्लोळ करुन थकलेली हात आणी तोंडं समरांगणावर एकदम चाल करुन ग्येली...पहिली दहा मिनिटं शत्रूची अशी बेजान कत्तल करण्यात गेली...की पुढच्या डिशची पलटण आंम्हा खादाड योद्ध्यांपुढे आल्या/आल्या नरम पडावी...परिणामी जेवण संपेपर्यंत म्हणजे युद्ध शेवटच्या टप्यात आल्यावर मधेच वेळ काढुन जरा परत गप्पा/टप्पा वगैरे चालू झाल्या...पण शत्रू रणांगणावर शिल्लक राहू द्यायचा नाही,अश्या बेतानीच हल्ला चालला होता...आणी अश्या युद्धाची अंतिम परिणिती अव्वल विजयात होत असते,हे ऐतिहासिक वचन अखेर सर्व मिपाधर्मियांनी सार्थ करुन दाखवलं...म्यानेजरही मनात म्हणला असेल,,,''मायला असलं वर्‍हाड बघितलं नव्हतं'' अश्या तर्‍हेनी एकमेकांचा परिचय करुन घेत, मो.नंबरर्सची देवाण घेवाण होत...नेहमीच्या दिमाखदार पद्धतीने मि.पा.कट्टा-खादाड कंपू-२०१२ यथास्थित पार पडला... कार्य संपलं की शेवटी ग्रुप फोटोंची परंपरा असतेच...त्या प्रमाणे 'भायेर'-वडाच्या झाडाखाली-कट्ट्याला आलेल्या सर्व अवतारी पुरुषांचे वेगवेगळ्या पोज मधले ग्रुप फोटो होऊन...बाहेर पेटलेल्या थंडिचा अंदाज घेत घेत,,,सर्व मेंबरं घराच्या दिशेनी पांगली सुद्धा... गणपतिंचे पूजन करण्यासाठी ५०रावांनी अणलेला खास नैवेद्य लवकर सोडुन जाणार्‍या :-( सदस्यांपैकी १-मि>ध.मु. आणी मिपाकरांनी केलेली त्यांची हास्यबोळवण बोळवणीला हातभार लावणारे-डाविकडून...सुहास..,पाठिमागे प्यारे१,कडेला आंम्ही,आणी आमच्या पाठिशी विंग कमांडर-ओक स्टाटरवरचा हल्ला-अनुक्रमे...वल्ली,पिंगू,फक्त५० रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-१...गणेशा,प्रशांत,सूड,धनाजीराव,किसन-द्येव,आणी शामियान्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी एकरुप झालेले-मालोजीराव रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-२...डावी बाजू-मि.ओक,प्रशांत,..उजवी बाजू-मृत्युंजय,पन्नासराव,गंभीरराव,धन्या रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-३(वरचेच सर्व,परंतू-सर्व फोटोंमधिल काही नावे माहित नसल्यामुळे टाकु शकलो नाही..क्षमस्व) रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-४ या रांगेत-सुहास.. पिंगू (कदाचित वेळ जात नसल्यामुळे-नाकात तपकिर लावत असावे ;-) ) रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-५ या पाचही फोटोंचा अर्थ- रविवार-नवं कार्यालय-त्रेधा तिरपिट योग यात-कोपर्‍यातुन-मोदक(चमच्यानी साजुकतूप पोटात पाडून घेत असलेले),त्याच्यापुढे... ,नंतर वपाडाव,,आमच्या आणी वपाडावच्या मधेच दडलेले-मनोबा-यांचा या फोटोत,केवळ हात आहे ;-) ,मग आंम्ही,आणी आमच्या(च)शेजारी पक-पक-पक... तिच बेचैनी आणी मिपाकर,पण बेचैनी नुसतीच एंजॉय कशी करावी हे शिकवण्याच्या प्रयत्नात-कोपर्‍यात बसलेले अव्वल मिपाकर-श्री.प्यारे१(थम्स अप पोज),आणी किसनद्येवांच्या शेजारी 'श्रीरंग'-काय जोडी जमलीये नाई ;-) वेटरला(आता)बैल होऊन तरी अंगावर ये...असं सुचवणारे गवताळ टिमचे सदस्य-म्हणजे दस्तुरखुद्द आंम्ही(लाल कपडा) यात असलेले-समोरुन..वल्ली-मोबॉइल,वपाडाव,मन-१(मनोबा),बुल-फायटर-आंम्ही, व सूड खाद्य चिंतनात मग्न असलेले मिपाकर सूप आणी तितक्याच गरम गप्पांना आलेला ऊत-यात ओकांबरोबरच्या गप्पांमुळे वल्लींचा चेहेरा कसा आनंदानी फुलुन आलाय याची प्रचिती येतीये..पुढे त्या गप्पांमधुन यशस्वीपणे अंग काढून घेतलेले-प्रशांत आणी सौरभ वल्ली आणी ओकांची गुप्त खलबतं-भाग-१ गुप्त खलबतं-भाग-२ स्टाटर बसलं ;-) आणी सुटली गाडी एकदाची म्हणुन प्रसन्न झालेले धनाजीराव वाकडे ऊर्फ धन्या मेन कोर्सच्या प्रतिक्षेत एक गंभीरराव आणी एक खंबीरराव हाटीलचा एक उत्साहशामक केंद्रबिंदू(ओळखा पाहु हे काय असेल..?) गो-पी,आणी गो-पी--का(?) मंजे यात किस्नाला जागाच नाय,,,अरं..रं रं...द्येव मानसात आला तर त्याची कशी जागा जाते बगा.... ;-) अवतारी पुरुषांची सभा-१..डावीकडुन-वपाडाव,मालोजीराव,आंम्ही,आम्च्या मागे-नि३,नंतर मोदक,शेजारी प्रशांत,त्या दोघांच्या मागे सुहास..,(खांद्याला झोळी लाऊन)संन्यस्त-प्यारे-१,शेजारील गंभीरराव(हेच भरत असावे का?),किसनराव सभेतले अवतारी पुरुष-२डावीकडुन-प्रशांत,श्रीरंग,सुहास..,पिंगु,सुड,धन्या,वल्ली,कट्टा आयोजक-फक्त५०,५०आनी माझ्या पाठिशी-नि३,मोदक,नंतर प्यारे१,वपाडाव आणी शेवटी पक पक पक ता>क>-(प्यायचं नव्हे-पचवायचं ;-) )-मेन कोर्स हा युद्धमग्न परिस्थितीत घडून गेला असल्या कारणानी त्यावेळेसचे फोटो नीट निघुच शकलेले नाहीत..सबब ज्यांना ते याची देही/याची डोळा पहायची इच्छा असेल..त्या सदस्यांनी पुढील युद्धात सामिल व्हावे..ही णम्र इनंती... अजुन १वाटी ता>क>-- फ्लाईंग व्हिजिट देऊन गेलेले सदस्य-प्रकाश घाटपांडे,परिकथेतील राजकुमार,धमाल मुलगा,विवेक मोडक,प्रीत-मोहर,सोकाजीराव त्रिलोकेकर,नावत काय आहे,गणेशा.. :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
22512 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

वा! मजा केलीत म्हणायची! आमचं

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/10/2012 - 18:03 नवीन
वा! मजा केलीत म्हणायची! आमचं येणं हुकलं ब्वॉ! समक्ष्व!
  • Log in or register to post comments

असचं म्हणतो. खरं सांगा कुणा

गणपा
Wed, 01/11/2012 - 12:15 नवीन
असचं म्हणतो. खरं सांगा कुणा कुणाच्या पोटात दुखलं दुसर्‍या दिवशी? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

व्यनीमधुन सांगितले तर

प्रशांत
Wed, 01/11/2012 - 14:03 नवीन
व्यनीमधुन सांगितले तर चालेल का रे गणपाभाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

पुढील युद्धाची वेळ..?

मोदक
Tue, 01/10/2012 - 18:05 नवीन
पुढील युद्धाची वेळ..? मोदक
  • Log in or register to post comments

सॉलिड धम्माल... एकदम मस्त

सुहास झेले
Tue, 01/10/2012 - 18:11 नवीन
सॉलिड धम्माल... एकदम मस्त कट्टा झालेला दिसतोय ...... स्वारी, जमलं नाही ह्यावेळी.... पुढल्यावेळी नक्की हजेरी लावणार :) :)
  • Log in or register to post comments

उत्तम संख्येने मिपाकर आलेले

गवि
Tue, 01/10/2012 - 18:12 नवीन
उत्तम संख्येने मिपाकर आलेले पाहून मिपाधर्म वाढत असल्याचा आनंद झाला. नावे दिली फोटोखाली तर चांगले होईल. मस्त कट्टा झाला आहे. अवांतरः तुमच्या कळफलकावरील "एंटर की" तुटली आहे का?
  • Log in or register to post comments

हो ना....

प्रास
Tue, 01/10/2012 - 18:42 नवीन
हेच बोलतो.... मिपाकट्टा मस्त होतोच....! पण
तुमच्या कळफलकावरील "एंटर की" तुटली आहे का?
हेपण्बोल्तो......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

@-तुमच्या कळफलकावरील "एंटर

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/10/2012 - 19:00 नवीन
@-तुमच्या कळफलकावरील "एंटर की" तुटली आहे का? >>> मी कमप्युतल नव-अशिक्षित हाये... ;-) मी ह्या धा-गेवल अचानक(बदली) खेलायला हुबा ल्हायलो हाये..त्या मुले या वेली--शॉली.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

व्वा ss

अन्नू
Tue, 01/10/2012 - 19:48 नवीन
एक्दम झ्याक! फोटु पण मस्त!! चांगलीच मौज लुटलेली दिसतेय.
मी कमप्युतल नव-अशिक्षित हाये... मी ह्या धा-गेवल अचानक(बदली) खेलायला हुबा ल्हायलो हाये..त्या मुले या वेली--शॉली..
:lol: :lol: :lol: :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

या कट्ट्यावर समस्त महिला

किचेन
Tue, 01/10/2012 - 18:15 नवीन
या कट्ट्यावर समस्त महिला वर्गाने बहिष्कार तकला होता का?
  • Log in or register to post comments

@-या कट्ट्यावर समस्त महिला

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/10/2012 - 18:30 नवीन
@-या कट्ट्यावर समस्त महिला वर्गाने बहिष्कार तकला होता का? :-D छे..!छे..! असं कसं..? उलट महिला वर्गाचा एक'मताने विजय झाला होता... प्रीत मोहर आल्या होत्या ना..! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

फोतोत नाहियेत...

किचेन
Tue, 01/10/2012 - 18:31 नवीन
फोतोत नाहियेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अहो..

मी-सौरभ
Tue, 01/10/2012 - 18:34 नवीन
त्यांची भेट एवढी धावती होती की फोटो सुद्धा काढायची संधी मिळाली नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

फोतोत नाहियेत...>>> त्या

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/10/2012 - 18:35 नवीन
फोतोत नाहियेत...>>> त्या सुरवातीच्या शीघ्र गंतव्य मंडळाच्या 'सह' आलेल्या होत्या... सबब फोतू न्हाईत..शॉली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

लौकर गेल्या.

मोदक
Tue, 01/10/2012 - 18:36 नवीन
लौकर गेल्या. ट = Shift + t
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

गेल्या??

मी-सौरभ
Tue, 01/10/2012 - 18:45 नवीन
आहेत रे अजून ;) लौकर= चूक लवकर=बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ब्बॉर..

मोदक
Tue, 01/10/2012 - 19:03 नवीन
ष्री र्राज्मान्य र्‍राजेष्रि सओर्भ "साहेब" तेवढी एकच (करण्यासारखी) चूक होती त्या दोन शब्दात. ;-) आणि त्या "लवकर" वरून धन्या (आणखी) एखादा श्लेष साधायचा. मोदक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

माताय

मी-सौरभ
Tue, 01/10/2012 - 19:16 नवीन
काय कराव ह्या मोदकाचं??? कुस्करुन तूप टाकून खौनच टाकतो....:D धन्या: तुझ्याबद्दल काय म्हणतोय बघ, लग्न कर की लव कर ते एकदा क्लीअर करुन घे रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हा हा हा..

मोदक
Tue, 01/10/2012 - 19:53 नवीन
खौनच = चूक खावूनच = बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

अहो तै

मी-सौरभ
Tue, 01/10/2012 - 18:32 नवीन
तुम्ही पण पुणेकर आणि मिपाकर आहात ..... आपलं येण झालं असतं तर महिला आघाडी ला पण प्रतिनिधीत्व लाभलं असतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मी येणार होते पण महिला

किचेन
Tue, 01/10/2012 - 20:16 नवीन
मी येणार होते पण महिला सदस्यांची संख्या किती असेल, असतील कि नाही, मग मी एकटी पडेल वगैरे चिंतांनी ग्रस्त झाल्यामुळे मी येण टळल.लोक किती असतील बिल किती येईल, कोण भरेल, t t m m का t t m t अस असेल असे अनेक प्रश्न समोर असल्याने येण टाळल.तसंही तुम्ही सगळी टवाळ कार्टी आणि खादाड खाऊ.वर शब्दांवर प्रभुत्व.मी आपली नवाखी आणि भोळी .कोण जाणे सगळ्याचं बिल मला भाराव लागल असत. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

काय काकू...

मोदक
Tue, 01/10/2012 - 20:34 नवीन
प्रतिसाद कोणी लिहून दिला..? टवाळ कार्टा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मि स्वताच लिहिलाय. काहि शंका?

किचेन
Tue, 01/10/2012 - 22:40 नवीन
मि स्वताच लिहिलाय. काहि शंका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बिल्कुल नाही...

मोदक
Tue, 01/10/2012 - 23:42 नवीन
बिल्कुल नाही... बाकी सगळे लिखाण पण त्याच कोलिती ने लिहा... ;-) ह.घ्या. मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

प्र का टा आ

मोदक
Tue, 01/10/2012 - 23:44 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

@कोण जाणे सगळ्याचं बिल मला

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/10/2012 - 20:32 नवीन
@कोण जाणे सगळ्याचं बिल मला भाराव लागल असत.>>> ह्हा ह्हा ह्हा अहो तै असं कसं होइल.. हो?असो... ज्या ज्या गोष्टींचं आपल्याला भय वाटत होतं,त्या होत नाहीत अमच्या कट्ट्यात...!अता कोअर कमिटिने तसे नियमच केलेत..त्या मुळे या वेळचं,,असू द्या..पण पुढच्या वेळी मात्र नक्की यायचं हं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

म्हणजे हुतात्मा जन्मावा, पण

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 01/10/2012 - 20:42 नवीन
म्हणजे हुतात्मा जन्मावा, पण तो शेजारच्या घरात काय ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

अरेरे

मी-सौरभ
Wed, 01/11/2012 - 14:56 नवीन
तसंही तुम्ही सगळी टवाळ कार्टी आणि खादाड खाऊ
बॉर्र, आमचं एवढ कौतुक आजवर कुणीच्च केल नव्हतं
वर शब्दांवर प्रभुत्व.मी आपली नवाखी आणि भोळी
=)) गडाबडा लोळून हसणारी स्मायली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

पूढील युद्धाचे रणमैदान..?

पक पक पक
Tue, 01/10/2012 - 18:18 नवीन
पूढील युद्धाचे रणमैदान..?
  • Log in or register to post comments

@-पूढील युद्धाचे

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/10/2012 - 18:26 नवीन
@-पूढील युद्धाचे रणमैदान..?>>> <<< शत्रू अजुन कळायचाय...! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

मी सांगतो की...

मोदक
Tue, 01/10/2012 - 18:41 नवीन
आता एखादा कट्टा "जनसेवा" सारख्या पिव्वर महाराष्ट्रीयन (आणि अनलिमिटेड) थाळी देणार्‍या ठिकाणी होवून जावूदे... मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

थोडं थांबा, एप्रिल मे मध्ये

५० फक्त
Tue, 01/10/2012 - 19:59 नवीन
थोडं थांबा, एप्रिल मे मध्ये गणेशा तुम्हाला दर रविवारी दुर्वांकुरची यात्रा घडवेल, काळजीच करु नका. वल्ली, +१००० टाका या प्रतिसादाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

+१०००००००००००००००००००००००००

मोदक
Tue, 01/10/2012 - 20:02 नवीन
+१००००००००००००००००००००००००० कॉलिंग वल्ली.. कॉलिंग वल्ली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

याला कितीही + दिले तरी ते

प्रचेतस
Tue, 01/10/2012 - 23:12 नवीन
याला कितीही + दिले तरी ते कमीच आहे कारण या गणेशाला दुर्वांकुर मध्ये चाळीसेक वाट्या आमरस फस्त करताना याची देही याची डोळा पाहिलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

चाळीसेक वाट्या आमरस !!

स्वानन्द
Wed, 01/11/2012 - 12:26 नवीन
:-o
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

[:)] हसतो आहे ... चाळीसीक

गणेशा
Wed, 01/11/2012 - 14:33 नवीन
[:)] हसतो आहे ... चाळीसीक नसतील त्या ३० च असतील अशी आशा करतो ... बाकी आमरस खाण्यासाठी भरपुर खाण्यासाठी आणि वजन अतिरिक्त न वाढण्यासाठी मी डिसेंबर पासुनच व्यायामाला सुरुवात करतो ( यावेळेस आताशी सुरवात झाली आहे) ... त्यामुळे विशेष परिनाम होत नाही.. आणखि एक .. आता आपल्या घरी पण यायचे आमरस खायला ... कारण सांगायची गरज नक्कीच नसेन ... उ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

संजयाने देखील ध्रुतराषट्राला

पक पक पक
Tue, 01/10/2012 - 18:21 नवीन
संजयाने देखील ध्रुतराषट्राला महाभारत रणसंग्रामाचे इतके सुंदर वर्णन करुन सांगितले नसेन.....
  • Log in or register to post comments

क्षमस्व

अनुराग
Tue, 01/10/2012 - 18:26 नवीन
क्षमस्व ! या वेळी येवु शकलो नाहि. पुन्हा नक्कि येउ. फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

कट्ट्याचा वृत्तांत नादखुळा

मालोजीराव
Tue, 01/10/2012 - 18:27 नवीन
कट्ट्याचा वृत्तांत नादखुळा आणि ठसकेबाज झालाय गुरुजी ! - मालोजीराव
  • Log in or register to post comments

व्वा!!

मी-सौरभ
Tue, 01/10/2012 - 18:29 नवीन
भटजी बुवा तुमचं काव्यात्म कट्टा वर्णन त्या सर्व आठवणी पुन्हा जाग्या करतात अन् कामावरच लक्ष उडतं.. रच्याकने: या बिंधास्त कट्ट्याला 'सन्माननीय प्री-मो तै' णि पाशवी मंडळाच्या वतीने पाहुणी उपस्थिती नोंदवली होती हा उल्लेख राहून गेला :(
  • Log in or register to post comments

'सन्माननीय प्री-मो तै' णि

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/10/2012 - 18:45 नवीन
'सन्माननीय प्री-मो तै' णि पाशवी मंडळाच्या वतीने पाहुणी उपस्थिती नोंदवली होती हा उल्लेख राहून गेला :-( >>> खरं आहे... हा असला आव्हानपूर्ण धागा प्रथमच काढत असल्यामुळे बर्‍याच चुका झालेल्याच आहेत... मेंबरांची नावं र्‍हायली,,, फोटुंना अकडे लावले,पण द्यायचे र्‍हायले ;-) ,,,मेन कोर्स मधली नावं इसरलो... परिच्छेद-पाडता येत नसल्यामुळे वृत्तांत वस्तुनिष्ठपणे 'सलग' झाला... तस्मात>>> स्वारी सर्वेषांम ... म्हणुन म्हणतो-पहिली(च) खेप आहे सांभाळुन घ्या... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

जौ द्या बुवा

मी-सौरभ
Tue, 01/10/2012 - 18:46 नवीन
तुमी जेवड लिवलय ते भारीच लिवलयं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जौ द्या बुवा

मी-सौरभ
Tue, 01/10/2012 - 18:48 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

झकास वृत्तांत भटजीबुवा. लई

प्रचेतस
Tue, 01/10/2012 - 18:35 नवीन
झकास वृत्तांत भटजीबुवा. लई झ्याक लिवलय.
  • Log in or register to post comments

छान फोटो आलेत!!.... पण माननीय

मृगनयनी
Tue, 01/10/2012 - 19:20 नवीन
छान फोटो आलेत!!.... पण माननीय 'परा'साहेब दिसत नाहीत कुठे फोटोत!!!! की ते देखील "शीघ्रगन्तव्य"च्च होते? ;) एक विनन्ती:... :- वरील फोटोंमध्ये प्रत्येक मिपा-सदस्याची सिरियली- फोटोतील आसनरचनेनुसार नावे टाकलीत... तर आम्हालादेखील कळेल.. कोण कोण आहेत ते.... वरील फोटोंमध्ये फक्त शशिकान्त'जी, धम्या, वल्ली आणि अत्रुप्त आत्मा'जी- तुम्ही स्वतः... इतकेच्च जण आम्ही (मी) ओळखू शकतो(ते).......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वृत्तांत झकासच पण...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 01/10/2012 - 19:26 नवीन
एक विनन्ती:... :- वरील फोटोंमध्ये प्रत्येक मिपा-सदस्याची सिरियली- फोटोतील आसनरचनेनुसार नावे टाकलीत... तर आम्हालादेखील कळेल.. कोण कोण आहेत ते.... असेच म्हणतो. वरील फोटोंमध्ये फक्त शशिकान्त'जी, धम्या, वल्ली आणि अत्रुप्त आत्मा'जी- तुम्ही स्वतः... इतकेच्च जण आम्ही (मी) ओळखू शकतो(ते)....... धम्या, वल्ली आणि ओक यांना ओळखता येत आहे. बाकी, कोणी ओळखता येत नाही. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

बास काय बिरुटेसाहेब,

प्रास
Tue, 01/10/2012 - 19:35 नवीन
एका फोटोत अंगठेबहाद्दर 'प्यारे१' अख्खे ओळखता येतायत की... की ते कोरडे राहणार असल्याने ओळखू आलेले नाहीत? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो कसे खंग्री पाहिजेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 01/10/2012 - 20:06 नवीन
रिकाम्या प्लेटा समोर असतांना आवडतं सूप चमच्याने चाखणारे प्यारे१ ओळखता येत आहेत. पण एवढ्या एका फोटोतील ओळखीने आपण भविष्यात एकमेकांच्या समोरुन आलो-गेलो तर ओळखता येईल याची शक्यता खूपच कमी वाटत आहे. :) च्यायला, तुम्ही सर्व मिळून औरंगाबादला कट्टा करा राव. मी येईन पाहुण्यासारखा वेळेवर. ;) -दिलीप बिरुटे (आळशी सदस्य /संयोजक, संभाव्य औरंगाबाद कट्टा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

नाय हो प्राडॉ,

प्रास
Tue, 01/10/2012 - 20:14 नवीन
चमच्याने चाखणारे प्यारे१
ते प्यारे१ नव्हेतंच की! प्यारे१ म्होरल्या फोटूत अंगठे दाखवतायत (असं वाटतंय)...... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तो मी आहे..

मोदक
Tue, 01/10/2012 - 20:22 नवीन
भडक लाल रंगाच्या, म्हणजे गेलाबाजार एखादा रेडा नाही तर शेळीला तरी पाठलाग करण्याचा मोह व्हावा अशा शर्टामध्ये मी आहे. मो द क.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा