✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(काय साला त्रास आहे!)

म — मेघवेडा, गुरुवार, 12/15/2011 - 01:27
प्रेरणा : - अर्थात हीच! मिसळलेला काव्यप्रेमी यांनी ह. घ्यावं. मूळ कविता फारच सुंदर आहे. तिला मी दिलेली दाद समजावी. :) भर दुपारी चाललेला गायनाचा तास आहे सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे झोप येता धावली ती बावळी कार्टीं तुझी गं सोड तू छंदास या, हा मद्गळ्यासी फास आहे तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला! वनवास आहे 'सा' मधूनी 'रे' निघाला, बांधली पेटी कुणी गं? सूरसूर्या लागलेले त्वदग्रहण खग्रास आहे! रोज शिक्षा कृष्ण-पाण्याची, जरा बक्षी जिवाला चार क्षण झोपेन म्हणता, काय साला त्रास आहे! |- त्रासलेला निद्राप्रेमी -| (रोजचंच आहे. तारीख कुठली द्यायची?) मात्रा : गानत्रागा गानत्रागा गानत्रागा गानत्रागा वृत्त : नीजभंगा

प्रतिक्रिया द्या
9158 वाचन

💬 प्रतिसाद (37)

चांगल 'खत' मिळाल्याने हल्ली

गणपा
गुरुवार, 12/15/2011 - 01:31 नवीन
चांगल 'खत' मिळाल्याने हल्ली विडंबकांचं पीक ही जोर धरु पहातय. ;) मस्त रे.
  • Log in or register to post comments

शेवटच्या कडव्याची पहिली ओळ

पुष्करिणी
गुरुवार, 12/15/2011 - 02:17 नवीन
शेवटच्या कडव्याची पहिली ओळ नाही बसत मिटरमधे..
  • Log in or register to post comments

मूळ कवितेत त्या ओळीत यतिभंग

मेघवेडा
गुरुवार, 12/15/2011 - 02:23 नवीन
मूळ कवितेत त्या ओळीत यतिभंग असल्याकारणाने इथंही तेच. विडंबनांत मूळ कवितेतल्या यतिमात्रादि जशाच्या तशा उतराव्यात या मताचा मी असल्याने इथंही ते तसंच उतरवलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

मुळ कविताही सुंदर आणि विडंबनही झकास :)

वीणा३
गुरुवार, 12/15/2011 - 04:17 नवीन
मुळ कविताही सुंदर आणि विडंबनही झकास :)
  • Log in or register to post comments

+ १

सुहास झेले
गुरुवार, 12/15/2011 - 06:28 नवीन
ह्येच म्हणतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

झक्कास.

प्रचेतस
गुरुवार, 12/15/2011 - 08:48 नवीन
झक्कास.
  • Log in or register to post comments

मात्रा : गानत्रागा गानत्रागा

यशोधरा
गुरुवार, 12/15/2011 - 08:54 नवीन
मात्रा : गानत्रागा गानत्रागा गानत्रागा गानत्रागा वृत्त : नीजभंगा LOL! :D कामं नाहीयेत का रे ऑफिसमध्ये मेव्या सद्ध्या! :)
  • Log in or register to post comments

भारी!!!!!

क्रान्ति
गुरुवार, 12/15/2011 - 08:59 नवीन
अफाट विडंबन! मात्रा आणि वृत्तनिर्मितीबद्दल साष्टांग दंडवत...................... :)
  • Log in or register to post comments

खूप -

विदेश
गुरुवार, 12/15/2011 - 09:15 नवीन
" मस्त " लगावली : त्रासगात्रा त्रासगात्रा त्रासगात्रा त्रासगात्रा वृत्त : रोजदंगा
  • Log in or register to post comments

परफेक्ट मीटरात

गवि
गुरुवार, 12/15/2011 - 09:23 नवीन
परफेक्ट मीटरात विडंबन.. ठ्ठो... ठार... खल्लास... क्या बात.. क्या बात.. क्या बात...
  • Log in or register to post comments

यशोमावशीशी पुर्णतः सहमत

प्रीत-मोहर
गुरुवार, 12/15/2011 - 09:29 नवीन
यशोमावशीशी पुर्णतः सहमत ... मेव्याला सध्या हापिसात काम नाहीये. :) :)) =
  • Log in or register to post comments

मावशी होंगे हमारे दुश्मन!

यशोधरा
गुरुवार, 12/15/2011 - 14:13 नवीन
मावशी होंगे हमारे दुश्मन! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

भगल करी होतंय गो...

प्रीत-मोहर
गुरुवार, 12/15/2011 - 15:10 नवीन
बरां तर यशोताय मिया तुका मावशी म्हणानय ना आयच्यान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

बाप्रे. एकदम आईपरेंत पोहोचू

यशोधरा
गुरुवार, 12/15/2011 - 15:34 नवीन
बाप्रे. एकदम आईपरेंत पोहोचू नको गं. :) बाकी ठीक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

अग बै आजपासुन म्हणा होतय मी.

प्रीत-मोहर
गुरुवार, 12/15/2011 - 15:59 नवीन
अग बै आजपासुन म्हणा होतय मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

LOL! असंय होय! वक्के, वक्के

यशोधरा
गुरुवार, 12/15/2011 - 16:27 नवीन
LOL! असंय होय! वक्के, वक्के मग. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

खलास रे मेवे!

चतुरंग
गुरुवार, 12/15/2011 - 09:34 नवीन
काल कविता वाचली तेव्हाच म्हंटलं हाप्पिच डिलिवरी आहे कुणी स्टेडियम बाहेर कशी नाही टोलवली! ;) गानत्रागा आणि नीजभंगासाठी पेश्शल मार्क्स! ;) (समानशील) चतुरंग
  • Log in or register to post comments

सत्ते पे सत्ता.............

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/15/2011 - 09:36 नवीन
सत्ते पे सत्ता............. :-)
  • Log in or register to post comments

ठ्यां

रमताराम
गुरुवार, 12/15/2011 - 09:52 नवीन
ये म्मारा. हा मेव्या साला केसुगुर्जींची उणीव भासू देत नाही हल्ली. मात्रा : गानत्रागा गानत्रागा गानत्रागा गानत्रागा वृत्त : नीजभंगा येकदम हिट्टं.
  • Log in or register to post comments

खी खी खी खी. (हे कवितेसाठी की

प्यारे१
गुरुवार, 12/15/2011 - 09:54 नवीन
खी खी खी खी. (हे कवितेसाठी की विडंबनासाठी असे कृपया विचारु नये . ;) )
  • Log in or register to post comments

च्यायला!

कवितानागेश
गुरुवार, 12/15/2011 - 09:55 नवीन
च्यायला! :D
  • Log in or register to post comments

वाह !!

सूड
गुरुवार, 12/15/2011 - 09:57 नवीन
वाह !!
  • Log in or register to post comments

ख्या : ख्या : __/\__

स्पा
गुरुवार, 12/15/2011 - 09:59 नवीन
ख्या : ख्या : :D __/\__
  • Log in or register to post comments

चपखल विडंबन

लीलाधर
गुरुवार, 12/15/2011 - 10:17 नवीन
चपखल विडंबन फारच चान चान :)
  • Log in or register to post comments

झकास विडंबन

जाई.
गुरुवार, 12/15/2011 - 10:18 नवीन
झकास विडंबन
  • Log in or register to post comments

अप्रतिम विडंबन.... खल्लास...

उदय के'सागर
गुरुवार, 12/15/2011 - 10:48 नवीन
अप्रतिम विडंबन.... खल्लास... हहपुवा....मार डाला :D
  • Log in or register to post comments

फोटो छान आलेले आहेत. शेवटून

पाषाणभेद
गुरुवार, 12/15/2011 - 10:57 नवीन
फोटो छान आलेले आहेत. शेवटून दुसर्‍या फोटोत आनंद बक्षी आहे काय? कॅमेरा कुठला वापरलात?
  • Log in or register to post comments

झकास

sneharani
गुरुवार, 12/15/2011 - 14:38 नवीन
झकास जमलय विडंबन!!
  • Log in or register to post comments

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 12/15/2011 - 16:06 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

जबराट विडंबन.

५० फक्त
गुरुवार, 12/15/2011 - 16:38 नवीन
जबराट विडंबन.
  • Log in or register to post comments

वाहवा !!!!! वाहवा

देविदस्खोत
गुरुवार, 12/15/2011 - 19:37 नवीन
वाहवा !!!!! वाहवा !!!!! अतिउत्तम !!!!!!
  • Log in or register to post comments

मस्त... सुरेख.पहिल्या आणि

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/15/2011 - 19:43 नवीन
मस्त... सुरेख. पहिल्या कडव्याची शेवटची ओळ सोडली तर वृत्तातही चपखल.. सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे (इथे 'सांग कैसी पटवू पोरगी, बाप हा गावास आहे' कसे वाटते?) मला वाटतं, वृत्तातही ही ओळ तांत्रिकदृष्ट्या बसते आहे. पण "काढु" या दोनाक्षरी जडाक्षराने अविचारी ताण बसतो आहे.. वृत्तात म्हणताना नेमके "काढु" वर तोडावे (काळजी घेण्याचे ठिकाण) लागत असल्याने बोचरा कोपरा झाला असावा.. हे एरवी जाणवायचं अजिबात कारण नव्हतं. पण बाकीच्या ओळी बर्मुडात आणि हिच ओळ टाईटस असल्यानेच जाणवतंय रे.. तुझ्या कवितांमधे हाच प्रॉब्लेम असतो. हँड रमी सारखी नशिबवान असते त्यामुळे टेबलावरती एकच नोट असल्यासारखे बोचतं..
  • Log in or register to post comments

एकदम भन्नाट!!

किसन शिंदे
गुरुवार, 12/15/2011 - 19:45 नवीन
मुळ कविता आणी दोन्ही विडंबनं(एक विजुभौंनी केलेलं आणी दुसरं हे) मस्तच आहेत.
  • Log in or register to post comments

झकास...

मदनबाण
गुरुवार, 12/15/2011 - 20:09 नवीन
झकास...
  • Log in or register to post comments

ह्म्म!! बरं झालंय विडंबन...

प्रभो
गुरुवार, 12/15/2011 - 22:49 नवीन
ह्म्म!! बरं झालंय विडंबन...
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sat, 12/17/2011 - 22:48 नवीन
सध्या मेवेला हापिसात झोपा काढायला मिळत नाहीत बहुतेक! सगळाच त्रास एकदम आठवलाय!
  • Log in or register to post comments

हाण्ण हाण्ण लेका !! तान

सुहास..
Sun, 12/18/2011 - 11:17 नवीन
हाण्ण हाण्ण लेका !! तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला! वनवास आहे =)) =)) =)) मान मोडिशी कामाशी , वृषभास जुंपल्याशी वक्र गतीच त्या खुरांची..त्रासच ! मुंग्यास आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा