Skip to main content

क्रांतीतै चे अभिनंदन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 28/11/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

वाचने 7310
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

क्रांती तै, मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!!

हार्दिक अभिनंदन. मिपावर 'क्रान्ती' आणि 'क्रान्ति' अशा दो क्रांत्या आहेत ('क्रांती' नांवाने कोणी सदस्य नाही), त्यातील नक्की कुठली????

In reply to by परिकथेतील राजकुमार

हम्म्म्म.... तो दुवा आहे हे लक्षातच नाही आले. अर्थात ती माझीच चुक. क्षमस्व.

आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा. उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो.

अनेकानेक अभिनंदन.. सुरेश भटांनंतर विदर्भाचा गझलेचा वारसा पुढे चालवण्यास आपणांस यश लाभो, हीच प्रार्थना..

हार्दिक अभिनंदन अन् खूप खूप शुभेच्छा! :)

अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा!

सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद! मिसळपाव हे माझ्या आंतरजालीय प्रवासातलं सगळ्यांत पहिलं संस्थळ, ज्यानं मला कवयित्री म्हणून वारंवार प्रोत्साहन दिलं. त्यामुळे माझ्या प्रत्येक उपलब्धीचे श्रेय सगळ्यात आधी मिपाला ! :) परा, नीलकांत, चतुरंग, रेवती, बिपीनदा, श्रावण मोडक, तात्या, मदनबाण, प्रमोद देव काका, नंदन, धनंजय, प्राजू, जागू, धमु, टारू, सुहास, रामदासकाका आणि सगळ्याच मिपाकरांच्या सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वाद यांचं हे फळ! :) हर्षद, माझा पहिलावहिला पुरस्कार आहे हा. तुला यायचंच आहे. :)

अभिनंदन क्रांती आणि परा ही बातमी सांगितल्याबद्दल धन्यु.. स्वाती

क्रांतितैच्या कविता आपल्या फेवरेट. अभिनंदन क्रांतीताई!! :-)