छोटे,मोठे तारे
.
सुर्या किती रे गर्व करशील....
खरं आहे, प्रकाशमान आहेस तू!!
मी तुझ्याच प्रकाशात बागडतो.
तरी..
इथून काही योजनांवरून पाहा,
तू ही छोटासा तारा दिसतोस!
:
:
तू काय किंवा मी काय
आपण फक्त मिणमिणतो.... रे
तू जरा मोठा
म्हणून जरा जास्त तेजःपुंज दिसतोस.
इतकंच!!
तेल संपलं की
वात जाळत जाळत मी विझणार.
तसाच तू ही..................
मी जरा लवकर संपेन!!
तू थोडा जास्त तेवशील.
एवढंच!!
===========================
स्वती फडणीस .............................१०-०३-२००८
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2021
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप खूप आनंद झाला
ह्म्म
ह्म्म
In reply to ह्म्म by केशवसुमार