Skip to main content

छोटे,मोठे तारे

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 16/07/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
छोटे,मोठे तारे . सुर्या किती रे गर्व करशील.... खरं आहे, प्रकाशमान आहेस तू!! मी तुझ्याच प्रकाशात बागडतो. तरी.. इथून काही योजनांवरून पाहा, तू ही छोटासा तारा दिसतोस! : : तू काय किंवा मी काय आपण फक्त मिणमिणतो.... रे तू जरा मोठा म्हणून जरा जास्त तेजःपुंज दिसतोस. इतकंच!! तेल संपलं की वात जाळत जाळत मी विझणार. तसाच तू ही.................. मी जरा लवकर संपेन!! तू थोडा जास्त तेवशील. एवढंच!! =========================== स्वती फडणीस .............................१०-०३-२००८
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2021
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

माझी कविता एका विडंबन काराला शब्द स्फुर्ति देऊन गेली हे काय कमी आहे :)

स्वातीताई, तुमची ही कविता तितकी आवडली नाही पावले मध्ये होता तो पंच (मराठी प्रतिशब्द??) ह्या कवितेत जाणवला नाही (सपष्ट)केशवसुमार नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा स्वगतः केश्या स्वातीताईंनी तो अधीच वाचलायं #:S वेळच्या वेळी प्रतिसाद द्यायला काय धाड बडवते का? X(

In reply to by केशवसुमार

हात उचलला की ठेसाच मारला जतो असे नाही ना!