✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

थप्पड-शरद पवारांना की मुजोर झालेल्या लोकशाहीला?

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
गुरुवार, 11/24/2011 - 16:55  ·  लेख
लेख
साधारण आज दुपारी १ते२ च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. दिल्लीमधे मा.शरद पवार एका कार्यक्रमाहुन निघत असताना,एका तरुणाने (हरविंदरसींग) पवारांच्या दिशेनी चाल करत ''ये सब चोर है'' अशा आशयाची काही वाक्य उच्चारत पवारांना एक थप्पड लगावली.तो तरुण महागाइच्या कारणावरुन भडकुन तस वागला असं अता व्रुत्तवाहीनीवाले सगळेच सांगत आहेत. तो मनोरुग्ण आहे हेही याच व्रुत्तांतात ऐकायला मिळत आहे.अजुन आज रात्री/उद्या पर्वापर्यंत याचे अजुनही वेगवेगळे 'अर्थ' आपल्यासमोर येतिल. त्यात अण्णा हजारे यांनी एका कार्यक्रमातुन निघता निघता तिथल्या लोकांनी 'ही' माहीती दिल्यावर ,त्यावर आश्चर्य व्यक्त केल्याच्या आर्विभावात-''अरे चाटा मारा...!, एकही मारा...!? असे उद्गार काढले... उपस्थित लोकं हसली आणी अण्णा निघुन गेले.नंतर मिडिया अण्णांपर्यंत पोहोचली व विचारले की असे आपण का बोललात? तेंव्हा अण्णा सुरवातीला मी या घटनेचा निषेधच केलाय,मी अहिंसावादी आहे,असं बोलले.पण मिडियानी त्यांना उपरोक्त वाक्यांची अठवण करुन दिल्यावर अण्णांनी ''थप्पड मारली की अणखी काही केले?'' असे मी विचारले. अशी सारवासारव केली. पवारांपासुन सर्व पक्षांचे नेते लोकांना व आपल्या कार्यकर्त्यांना ''शांत'' रहाण्याचे आवाहन केले आहे.पण अनेक ठिकाणी बंद जाळपोळ तोडफोड ह्या घटना सुरु झाल्या आहेत... माझा प्रश्न असा की आपण ह्ल्ली ह्या असल्या होणाय्रा वाढत्या घटनांचा अन्वयार्थ लोकशाहीच्या संदर्भात कसा आणी काय लावायचा? या घटना स्वागतार्ह/ निषेधार्ह /चिंताजनक मानायच्या आणी गप्प बसायचे...की कोलमडु पहात असलेल्या किंवा अजुनही नीट न स्थिरावलेल्या भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी पुन्हा एकवार अभ्यास करुन नवे उपाय शोधायचे...कारण क्रांत्या हिंसेनी घडोत वा अहिंसेनी...त्यांच्या पाठचे हेतु न्याय्य असोत वा अन्याय्य... नंतर मिळालेलं स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीनी अव्याहतपणे टिकवण हेच तर अवघड असतं ना...?अन्याय दुर करणाय्रांनाही न्यायाची कल्पना असतेच अस नाही...त्यामुळे अश्या घटनांच नक्की फलीत काय?...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33202 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

आज

चिरोटा
गुरुवार, 11/24/2011 - 17:08 नवीन
बर्‍याच दिवसांनी चांगली बातमी वाचली. त्या तरुणाने सुखराम ह्यांनाही थप्पड मारली होती.
माझा प्रश्न असा की आपण ह्ल्ली ह्या असल्या होणाय्रा वाढत्या घटनांचा अन्वयार्थ लोकशाहीच्या संदर्भात कसा आणी काय लावायचा?
संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.!
  • Log in or register to post comments

संशोधन संस्थेवर हल्ला,

मदनबाण
गुरुवार, 11/24/2011 - 17:18 नवीन
संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.! चिरोट्या तुझ्याशी सहमत हाय रे... :) त्यावर आश्चर्य व्यक्त केल्याच्या आर्विभावात-''अरे चाटा मारा...!, एकही मारा...!? असे उद्गार काढले... उपस्थित लोकं हसली हे वाचुन मी पण गदागदा हासतोय ! ;) विशेष :--- संपादकांना विशेष लक्ष द्यावा लावणारा धागा ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

विशेष :--- संपादकांना विशेष

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/24/2011 - 19:58 नवीन
विशेष :--- संपादकांना विशेष लक्ष द्यावा लावणारा धागा ! >>> मदन-बाणा थांब की जरा... :-) कशाला देतोस धनुष्य फुका संपादकांच्या खांद्यावर। आंम्ही शोधतो ती मुळे सापडव्,नी मग लक्ष दे फांद्यांवर॥ ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

संशोधन संस्थेवर हल्ला,

मृगनयनी
Sun, 12/04/2011 - 13:24 नवीन
संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.! =)) =)) =)) =)) =)) या सगळ्यामुळेच शरद पवाराना थोबाडीत मारल्याच्या घटनेचे समर्थन करावेसे वाटते... कारण "पेरावे तसे उगवते".. अर्थात शरद पवार'ऐवजी तिथे "अजित पवार" असते... तर नक्कीच फटाके फोडले असते..... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) परवा शरद पवारान्ना माननीय शिवसैनिक "मनोहर जोशी साहेबां"च्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित पाहून ...( तेही माननीय शिवचरित्रकार- ज्येष्ठ इतिहासकार श्री. बाबासाहेब पुरन्दरे यान्च्याबरोबर एकाच्च स्टेजवर ;) :) ) अम्मळ मौज वाटली..... ;) ;) ;) बाकी अण्णांची खरी प्रतिक्रिया खूपच बोलकी होती.... ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आवडली.... :) _________________ "प्रकरण" कोणतेही असो...पण भ्रष्टाचाराच्या सोप्या मार्गाने आपला फायदा करून त्यातून सहीसलामतपणे शरद पवार आजपर्यन्त सुटत आलेले आहेत... "सत्य" समोर दिसत असतानाही पुराव्याअभावी कुणीही त्यान्चे काहीही बिघडवू शकलेले नाही... अगदी शरद पवारान्चे दाऊद इब्राहिम'बरोबर असलेले सम्बन्ध देखील सर्वज्ञात आहेत... काल कुठल्याश्या समारम्भात शरद पवारान्च्या डोक्यावर सीलिन्ग फॅन पडता पडता राहिला... एक फूट पलिकडे पडल्याने पवार साहेब वाचले..... बहुधा आत्माहत्या केलेल्या शेतकर्यान्चे शिव्याशाप त्यान्ना तितकेसे लागलेले नसावेत..... असो.... पण निसर्गाचे हे "दैवी" इशारे वेळीच ओळखून पवार काका-पुतण्यानी देशद्रोही कारस्थानान्ना वेळीच आवर घालावा... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

+ १

दादा कोंडके
गुरुवार, 11/24/2011 - 17:32 नवीन
चांगली बातमी.:) अशा घटणा घडणारच. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच जागं व्हावं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

+१०००००००००००००००

युयुत्सु
गुरुवार, 11/24/2011 - 18:01 नवीन
+१०००००००००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

@-पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/24/2011 - 19:36 नवीन
@-पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.!... >>>चिरोटा साहेब मारणारा माणुस महागाइची कारणं आणी निव्वळ भाषणबाजी करत असल्याची कारणं सांगत होता हो...आपण लावलेला अन्वयार्थ विसंगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

काय पण 'राष्ट्रवादि'

जोशी 'ले'
गुरुवार, 11/24/2011 - 17:13 नवीन
काय पण 'राष्ट्रवादि' कार्यकर्ते आहेत, आता त्या हरविंदर ला फाशी च्या शिक्षेची मागनी करा म्हणाव..हाय काय नाय काय
  • Log in or register to post comments

पवार- मिर्झा राजे जयसींग

शिंगाड्या
गुरुवार, 11/24/2011 - 17:19 नवीन
पवारांचे नाव आले कि ह्ट्कुन एक ऐतिहासीक चरीत्र आठवते..- मिर्झा राजे जयसींग.. स्वकीय आणी स्वधर्माची धुळ्धाण करणारी व्यक्ती....
  • Log in or register to post comments

शिंगाड्या तुझ्याशी सहमत रे आपण

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/24/2011 - 20:03 नवीन
अतीशय योग्य दाखला दिलास रे... अगदी यथायोग्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिंगाड्या

है शाब्बास!!! अगदी योग्य

शिल्पा ब
Fri, 11/25/2011 - 00:08 नवीन
है शाब्बास!!! अगदी योग्य दाखला दिलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिंगाड्या

चांगलेच झाले एका

मोहनराव
गुरुवार, 11/24/2011 - 17:20 नवीन
चांगलेच झाले एका अर्थी!! अवांतर- एक विनोद जालावरुन साभार- सोनिया - राहुल ,दिग्विजय ,सिब्बू ,लुंगी कुठे निघालात एकदम एव्हढ्या घाईघाईने . . . . ... . . सगळे एका सुरात - हेल्मेट आणायला ....!!!!
  • Log in or register to post comments

आता शरद पवार म्हणत असेल..

सुहास झेले
गुरुवार, 11/24/2011 - 17:24 नवीन
आता शरद पवार म्हणत असेल.. "Why this Kolaveri Kolaveri Kolaveri Da" ;)
  • Log in or register to post comments

हे हे हे.

चिंतामणी
Sun, 11/27/2011 - 09:21 नवीन
हे बघा. (त्या दिवशी कोणीतरी अपलोड केले आहे हे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

- (हेल्मेट घालून बसलेला)

सोत्रि
गुरुवार, 11/24/2011 - 17:29 नवीन
- (हेल्मेट घालून बसलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

अजितदादा एका पत्रकार परिषदेत

मस्त कलंदर
गुरुवार, 11/24/2011 - 17:44 नवीन
अजितदादा एका पत्रकार परिषदेत सांगत होते की, साहेबांना 'जसा जाता जाता एखाद्याला लागतो तसा' धक्का लागला असं साहेबांनी त्यांना सांगितलं आहे. ;;-)
  • Log in or register to post comments

TOI वर या बातमीला एव्हाना

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 11/24/2011 - 17:47 नवीन
TOI वर या बातमीला एव्हाना १८०० कमेंट आल्या आहेत. :-)
  • Log in or register to post comments

TOI वर या बातमीला एव्हाना

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/24/2011 - 20:10 नवीन
TOI वर या बातमीला एव्हाना १८०० कमेंट आल्या आहेत.>>>हा धागा कॉमेंट्री साठी काढला नाहीये... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

चिरोटा शी १००% सहमत.

दत्ता काळे
गुरुवार, 11/24/2011 - 17:54 नवीन
चिरोटा शी १००% सहमत.
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया

तिमा
गुरुवार, 11/24/2011 - 18:47 नवीन
प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले. शरद पवारांविषयी तुमचे मत काही असू दे. अशा तर्‍हेने हल्ला करणे हे चुकीचे आहे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे. अण्णांची प्रतिक्रिया मीही टी.व्ही. वर पाहिली. ती त्यांना अजिबात शोभणारी नाही. अशा वागणुकीला प्रोत्साहन देऊन आपण अराजकालाच आमंत्रण देत आहोत.
  • Log in or register to post comments

अण्णा X पवार

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 11/24/2011 - 19:06 नवीन
शरद पवारांनी अण्णांना बराच त्रास दिला आहे. त्यांच्यातले वैर उघड आहे. त्यामुळे अण्णांचा उद्वेग बाहेर पडला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

-१

दादा कोंडके
गुरुवार, 11/24/2011 - 19:35 नवीन
प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले
लोकांमध्ये प्रचंड असंतोष भरलाय. तो असा बाहेर पडणारच.
अशा तर्‍हेने हल्ला करणे हे चुकीचे आहे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे
हम्म. वेनसडे मधल्या "स्ट्युपिड कॉमन मॅन"चं, "आज मे तरीके के बारेमे नही नतीजे के बारेमे सोच रहा हुं", "लोगों मे गुस्सा बहोत है, उन्हे आजमाना बंद किजिये", वगैरे आठवलं.
अशा वागणुकीला प्रोत्साहन देऊन आपण अराजकालाच आमंत्रण देत आहोत
एक झापड म्हणजे अराजक? मग मावळ गोळीबार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या काय आहेत? एक राष्टीय नेता आणि गरीब शेतकरी म्हणून एव्हडी पार्श्यालिटी? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

सहमत

सुधांशुनूलकर
गुरुवार, 11/24/2011 - 21:07 नवीन
१०१% सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

+ २

सुहास झेले
Fri, 11/25/2011 - 06:25 नवीन
ह्येच म्हणतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

अण्णांनी मैन सोडू नये तेच योग्य आहे. अण्णांचा निषेध

कापूसकोन्ड्या
गुरुवार, 11/24/2011 - 18:47 नवीन
हा युवक माथेफिरू आहे हे प्रुव्ह झालेले आहेच. १) अण्णांनी मैन सोडू नये तेच योग्य आहे. नडले होते का बोलायचे? -''काय ? एकच मारली?'' २) आता घ्या ! एकापाठोपाठ शहरे बंद होत आहेत. आता कुणाचा पुतळा हटवणार? ३) रशीद साहेबाना यात बिजेपी चा हात आहे अशी शंका आहेच 'परिवारा'' वर आता कडक नजर ठेवावी लागेल.
  • Log in or register to post comments

आयला अण्णा पण !

सुहास..
गुरुवार, 11/24/2011 - 18:58 नवीन
एक सामान्य माणुस म्हणुन अण्णांची उस्फुर्तपणे येणारी प्रतिक्रिया आवडली . माझी प्रतिक्रिया : " हाण्ण तुझ्या ****** "
  • Log in or register to post comments

व्यंगचित्र

मोहनराव
गुरुवार, 11/24/2011 - 19:46 नवीन
Image removed. जालावरुन साभार!!
  • Log in or register to post comments

मस्त व्यंगचित्र.

सुमो
गुरुवार, 11/24/2011 - 20:17 नवीन
आता घड्याळ सोडून 'हाता' कडे परतावे का?.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

हा हा हा

jaypal
गुरुवार, 11/24/2011 - 20:12 नवीन
आम आदमी का हात एन.सी.पी. के साथ ;-) Image removed.
  • Log in or register to post comments

भन्नाट

मन१
गुरुवार, 11/24/2011 - 22:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

पंजाची थप्पड

वैकुंठ
गुरुवार, 11/24/2011 - 20:16 नवीन
माझ्या मते ही तर फक्त एक तीव्र प्रतिक्रिया आहे वाढत्या महागाईची. सरकारच्या महागाईच्या निर्ल्लज्य आकड्यांना दिलेले common man चे अगतिक उत्तर. आता फक्त एक करा.... निवडून देताना विचार करा!
  • Log in or register to post comments

झापडा मारण्यासाठी नेतेच हवे

यकु
गुरुवार, 11/24/2011 - 20:25 नवीन
झापडा मारण्यासाठी नेतेच हवे असणारा मनोरूग्ण पहिल्यांदाच पाहिला. पण शरद पवारांच्या वयाकडे पाहता त्यांना झापड खावी लागली याचा खूप खेद वाटतो. अण्णांची प्रतिक्रिया वाचुन भस्सकन हसू आले..! कशाचा अर्थ काय वगैरे चर्चा करण्यात मजा नाही. एवढी ढळढळीत झापड पाहूनही कुणाला चर्चा करायच्याच असतील तर करा बुवा.. आम्ही त्यापण वाचूच.
  • Log in or register to post comments

तुझ्याशीही सहमत रे

मन१
गुरुवार, 11/24/2011 - 22:45 नवीन
च्यायला... आज काही लिहावं म्हणेपर्यंत तुम्ही सगळच आधी लिहून मोकळेही झालत. पण हो, प्रतिसादातला टोन, वगैरे वगैरे अगदि जुळलं. अण्णांची प्रतिक्रिया ऐकून(तीही त्यांनी त्यांच्या ष्टायलीत्,उच्चारात कशी म्हटली असेल ह्याचा विआचार करुन हापिसात चहा सांडून बसलोय.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अण्णांच्या प्रतिक्रियेवर टिका

मराठी_माणूस
गुरुवार, 11/24/2011 - 20:35 नवीन
अण्णांच्या प्रतिक्रियेवर टिका होतेय , पण ति प्रत्येक सामान्य माणसाची उस्फुर्त प्रतिक्रिया आहे. मध्ये इथेच एक योग्य प्रितिक्रिया वाचलि होति ति म्हणजे अशा गुन्हेगारांची लवकरात लवकर तिहार मधे रवानगी व्हावी नाहीतर अशा अर्धवट घटनानि उगीच प्रसिध्दि आणि अनाठाई मोठेपणा मिळण्याची शक्यता वाढते. (उदा:कार्यकरत्यांनी संयम पाळावा, मि त्याला माफ केले आहे वगैरे)
  • Log in or register to post comments

निषेध! निषेध! निषेध!

नगरीनिरंजन
गुरुवार, 11/24/2011 - 20:59 नवीन
या थप्पड मारण्याच्या घटनेचा जितका निषेध करू तितका कमीच आहे. लोकांमध्ये जी आनंदाची लहर उमटली आहे ती पाहून तर उद्वेग वाटतो. जणू काही फक्त राजकारणीच अकार्यक्षम, भ्रष्टाचारी वगैरे आहेत. बाकी ज्याची त्याची समज अक्कल वगैरे. चालू द्या.
  • Log in or register to post comments

शाब्दिक विरोध

lakhu risbud
Fri, 11/25/2011 - 09:45 नवीन
शाब्दिक विरोध,आरोप एका बाजूला आणि हा लाजीरवाणा प्रकार दुसऱ्या बाजूला.परिस्थिती कशीही असली तरी या असल्या हल्ल्याचे समर्थन होत नाही. या घटनेमुळे आता अशा अनेक माथेफिरूंना खुमखुमी येऊन या प्रकारे हल्ल्यांचे प्रमाण वाढेल.(COPY CAT !) अवांतर : पवार साहेबांच्या राजकारणाचा एकंदर इतिहास पाहता, तो हरमिंदर दिल्ली/पंजाब जिथला कुठला रहिवासी असेल त्या ठिकाणच्या "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा " येणाऱ्या १-२ वर्षात अध्यक्ष झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

परत निषेध निषेध निषेध!

दादा कोंडके
Fri, 11/25/2011 - 15:44 नवीन
ह्या बातमी वरून हरविंदरला न्यायालयाच्या आवारातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलिये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

होय निषेधच!

नगरीनिरंजन
Mon, 11/28/2011 - 09:16 नवीन
दोन्हीही हल्ल्यांचा किंबहुना कोणत्याही हल्ल्याचा निषेधच. एका हल्ल्याची बाजू घेणार्‍याचा दुसर्‍या हल्ल्याचा निषेध करण्याचा अधिकार आपोआप नष्ट होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

साहेबांचं राजकारण बघता कदाचित

मालोजीराव
Mon, 11/28/2011 - 14:30 नवीन
साहेबांचं राजकारण बघता कदाचित अजून १-२ वर्षांनी हरविंदर नावाच्या माणसाचं अस्तित्व दिल्लीतून नाहीसं होईल आणि सरकारी रेकॉर्ड्स वरून पण ;) -मालोजीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हम्म...

दादा कोंडके
Mon, 11/28/2011 - 14:59 नवीन
आणि भर न्यायालयाच्या आवारातच मारहाण करणार्‍या त्या कार्यकर्त्यांवर कोणती कारवाई करणार? हे निष्ठावंत आणि तो माथेफिरू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

हे निष्ठावंत आणि तो

मदनबाण
Mon, 11/28/2011 - 15:10 नवीन
हे निष्ठावंत आणि तो माथेफिरू? हॅहॅहॅ... नाही नाही... हे गांधीवादी आणि तो नथुराम भक्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आत्ताच सकाळ वर जावून ती बातमी

इरसाल
गुरुवार, 11/24/2011 - 21:13 नवीन
आत्ताच सकाळ वर जावून ती बातमी पहिली.बातमीखालील सगळ्या प्रतिक्रिया विकत घेवून छापल्या सारख्या वाटत आहेत.एक प्रतिक्रिया पवारांच्या विरोधात नाहीये.हेच जेव्हा लुंगीवर झाले होते तेव्हा सगळे लुंगीला दोष देत होते.(चप्पल फेक ) असो आता पवार टीवी वर म्हणत आहेत "कोई एक इन्सान ने पीछेसे मुझपर हमला किया मैने एक स्टेप आगे बढाया तो उनका हाथ यहासे ऐसे निकाल गया !(म्हणजे गालाला स्पर्श न होता) छान. थांबा थांबा .....आजतक वर जितेंद्र आव्हाड मिठाला जागत आहे (दिग्विजयची फाटली आहे)
  • Log in or register to post comments

७० वर्षांच्या माणसाला थप्पड

श्रीरंग
गुरुवार, 11/24/2011 - 21:15 नवीन
७० वर्षांच्या माणसाला थप्पड खाताना पाहणं खूप अस्वस्थ करणारं आहे हे खरंच. पण तरीही हे बघून बहुतेक लोकांना आनंद झालेला दिसतोय. हे माननीय श्री शरच्चंद्ररावजी पवार साहेबांनी स्वत। कमावलं आहे...
  • Log in or register to post comments

:(

छोटा डॉन
गुरुवार, 11/24/2011 - 21:27 नवीन
झालेली घटना पटली आणि आवडली नाही. महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल सरकार, संस्था आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर राग आहे, जनता वैतागली आहे वगैरे सगळे मान्य आहे आणि पटतेही आहे. पण त्याचा निषेध करण्याचा हा मार्ग नव्हे असे वाटते. एका संपुर्ण संस्थेच्या कारभाराबद्दल किंवा त्याच्या अपयशाबद्दल एखाद्या व्यक्तीवर असा हात उचलणे पटले नाही. पवारांना त्यांची चूक दाखवुन द्यायची असेल तर आता निवडणुका आहेतच, त्यावेळी त्याची चुणुक मतदानातुन दाखवता आली असती. ह्यातुन 'अराजक' आले आहे की काय असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही परंतु जे काही घडते आहे ते नक्कीच योग्य नाही. अवांतर १ : पवारांचे वय पाहता ह्या घटनेचे जास्तच वाईट वाटले. अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा हजारेंचे 'खरी' प्रतिक्रिया पाहुन तर अजुनच वाईट वाटले. 'गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज आले' असे म्हणणार्‍या एका गांधीवाद्याची अशा 'हिंसक' प्रकरणावरची 'एकच मारली का?' अशी कुत्सित प्रतिक्रिया देखजनक आहे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा

मराठी_माणूस
गुरुवार, 11/24/2011 - 21:33 नवीन
अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा हजारेंचे 'खरी' प्रतिक्रिया पाहुन तर अजुनच वाईट वाटले. 'खरी' , ह्या शब्दातच सगळे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

गल्लत होते आहे ....

छोटा डॉन
गुरुवार, 11/24/2011 - 21:42 नवीन
'खरी' ह्या शब्दातच सगळे येत नाही, तो शब्द कुठे येतो त्यात बरेच काही येते. 'खरी' याचा माझ्या वाक्यातील अर्थ 'आण्णा हजारे यांच्या मनात असलेली प्रतिक्रिया' असा आहे, ती बाकीच्यांना किती खरी अथवा किती खोटी वाटते ह्याच्याबद्दल मला बोलायचे नाही. मात्र आण्णा पटकन त्यांना जे बोलायचे आहे ते बोलुन बसले आणि नंतर मग सारवासारव चालु केली/आहे. नंतर मग जे आण्णांचे मारहाणीला समर्थन नाही हे सिद्ध करण्यासाठी जे 'शब्दांचे खेळ' चालु आहेत ते पाहुनच आम्ही पहिल्या प्रतिक्रियेला 'खरी' असे संबोधतो, असो. -छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

'एकच मारली का?' एक थप्पड आणि

मराठी_माणूस
Fri, 11/25/2011 - 15:10 नवीन
'एकच मारली का?' एक थप्पड आणि शेकडो शेत्कर्‍यांच्या आत्महत्या आणि त्यांची उध्वस्त कुटूंबे हे समिकरण अण्णांना पटले नसेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

प्रकटाआ

मदनबाण
Fri, 11/25/2011 - 15:25 नवीन
प्रकटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

बाय द वे, एखाद्या शहराचा

श्रीरंग
गुरुवार, 11/24/2011 - 21:27 नवीन
बाय द वे, एखाद्या शहराचा महापौरच शहर बंद चे आवाहन करतो, तेही आपल्या पक्षाच्या मालकानी थप्पड खाल्ली म्हणून!! हद्द आहे लाळघोटेपणाची. मोहनसिंघ राजपाल अत्यंत टुक्कार महापौर आहे.
  • Log in or register to post comments

बंद ?

गणपा
गुरुवार, 11/24/2011 - 21:34 नवीन
उलट मी तर म्हणतो की उत्तम संधी आहे पुणेकरांना. असंतोष आहे ना पवार गटाबद्दल? तर मग हाणुन पाडा त्यांचा बंद. हा मार्ग जास्त संयुक्तिक नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा