थप्पड-शरद पवारांना की मुजोर झालेल्या लोकशाहीला?
साधारण आज दुपारी १ते२ च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. दिल्लीमधे मा.शरद पवार एका कार्यक्रमाहुन निघत असताना,एका तरुणाने (हरविंदरसींग) पवारांच्या दिशेनी चाल करत ''ये सब चोर है'' अशा आशयाची काही वाक्य उच्चारत पवारांना एक थप्पड लगावली.तो तरुण महागाइच्या कारणावरुन भडकुन तस वागला असं अता व्रुत्तवाहीनीवाले सगळेच सांगत आहेत. तो मनोरुग्ण आहे हेही याच व्रुत्तांतात ऐकायला मिळत आहे.अजुन आज रात्री/उद्या पर्वापर्यंत याचे अजुनही वेगवेगळे 'अर्थ' आपल्यासमोर येतिल. त्यात अण्णा हजारे यांनी एका कार्यक्रमातुन निघता निघता तिथल्या लोकांनी 'ही' माहीती दिल्यावर ,त्यावर आश्चर्य व्यक्त केल्याच्या आर्विभावात-''अरे चाटा मारा...!, एकही मारा...!? असे उद्गार काढले... उपस्थित लोकं हसली आणी अण्णा निघुन गेले.नंतर मिडिया अण्णांपर्यंत पोहोचली व विचारले की असे आपण का बोललात? तेंव्हा अण्णा सुरवातीला मी या घटनेचा निषेधच केलाय,मी अहिंसावादी आहे,असं बोलले.पण मिडियानी त्यांना उपरोक्त वाक्यांची अठवण करुन दिल्यावर अण्णांनी ''थप्पड मारली की अणखी काही केले?'' असे मी विचारले. अशी सारवासारव केली. पवारांपासुन सर्व पक्षांचे नेते लोकांना व आपल्या कार्यकर्त्यांना ''शांत'' रहाण्याचे आवाहन केले आहे.पण अनेक ठिकाणी बंद जाळपोळ तोडफोड ह्या घटना सुरु झाल्या आहेत... माझा प्रश्न असा की आपण ह्ल्ली ह्या असल्या होणाय्रा वाढत्या घटनांचा अन्वयार्थ लोकशाहीच्या संदर्भात कसा आणी काय लावायचा? या घटना स्वागतार्ह/ निषेधार्ह /चिंताजनक मानायच्या आणी गप्प बसायचे...की कोलमडु पहात असलेल्या किंवा अजुनही नीट न स्थिरावलेल्या भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी पुन्हा एकवार अभ्यास करुन नवे उपाय शोधायचे...कारण क्रांत्या हिंसेनी घडोत वा अहिंसेनी...त्यांच्या पाठचे हेतु न्याय्य असोत वा अन्याय्य... नंतर मिळालेलं स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीनी अव्याहतपणे टिकवण हेच तर अवघड असतं ना...?अन्याय दुर करणाय्रांनाही न्यायाची कल्पना असतेच अस नाही...त्यामुळे अश्या घटनांच नक्की फलीत काय?...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बंद हाणून पाडलाच पाहिजे. पण
पण
निश्चित जाणार!!
जाहीर सत्कार करायला पाहिजे
ही पहा अण्णांची* बालीश, पण
आण्णा गांधीवादी आहेत..
हास्यास्पद आहे पण
हास्यास्पद आहे खरे! पण मला
आमच्या साहेबांशी पंगा घेतला
मग आता त्या हरविंदर सिंग ला मारुन टाकणार का तुम्ही लोकं?
अगदी अगदी जे झाले त्याच्या
डोंबिवली फास्ट
अन्वयार्थ
महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल
टॉपिक काढणारा आणि इतर एकच मत
आपलं डोकं टीव्हीकडे देऊ नका,
+१
काही पत्रकारांना अशा वेळी काय
जे झाल ते चान्ग्ल झाल. आवडल.
एक गंमत वाटते...निवडणुका
खेद .. वाईट..अस्वस्थ करणारं
"मग खाऊ नका साखर. मधुमेह
ज्या हरविंदर पाजी चे इतके
ज्या हरविंदर पाजी चे इतके
तीव्र निषेध..!!!
अण्णा आवरा.
आदरणीय श्री अण्णांच्या मागे
>>>>देशातल्या नागरिकांच्या
असंतोष व्यक्त करण्याचे सनदशीर
खरेतरं ह्या विषयावर मौन
च्यायला, कशाला हवी दुपार. केला बॉ फोन.
श्री अण्णांच्या कृतीला आमच्या
सुधारणा झाली ही चांगलीच गोष्ट झाली.
बडे बडे
सहमत. पण कदाचित आर. आर. कडुन
कुंदन सेठ. जेलात गेलो तर जामिन घ्यायला येणार काय ? :)
........कृती
ह्या मूर्खपणाच्या कृतीचे
असे उलट का असावे?
हेच!
खुप मोठी राजकिय खेळी
+१
+१
काय हरकत आहे खरं बोलायला?
च्यायला !
:)
हम्म
>>तुझं 'सौंदर्य फुफाटा
हल्ल्याचा
ही नेते मंडळी देशाचे प्रश्न