✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

थप्पड-शरद पवारांना की मुजोर झालेल्या लोकशाहीला?

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
गुरुवार, 11/24/2011 - 16:55  ·  लेख
लेख
साधारण आज दुपारी १ते२ च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. दिल्लीमधे मा.शरद पवार एका कार्यक्रमाहुन निघत असताना,एका तरुणाने (हरविंदरसींग) पवारांच्या दिशेनी चाल करत ''ये सब चोर है'' अशा आशयाची काही वाक्य उच्चारत पवारांना एक थप्पड लगावली.तो तरुण महागाइच्या कारणावरुन भडकुन तस वागला असं अता व्रुत्तवाहीनीवाले सगळेच सांगत आहेत. तो मनोरुग्ण आहे हेही याच व्रुत्तांतात ऐकायला मिळत आहे.अजुन आज रात्री/उद्या पर्वापर्यंत याचे अजुनही वेगवेगळे 'अर्थ' आपल्यासमोर येतिल. त्यात अण्णा हजारे यांनी एका कार्यक्रमातुन निघता निघता तिथल्या लोकांनी 'ही' माहीती दिल्यावर ,त्यावर आश्चर्य व्यक्त केल्याच्या आर्विभावात-''अरे चाटा मारा...!, एकही मारा...!? असे उद्गार काढले... उपस्थित लोकं हसली आणी अण्णा निघुन गेले.नंतर मिडिया अण्णांपर्यंत पोहोचली व विचारले की असे आपण का बोललात? तेंव्हा अण्णा सुरवातीला मी या घटनेचा निषेधच केलाय,मी अहिंसावादी आहे,असं बोलले.पण मिडियानी त्यांना उपरोक्त वाक्यांची अठवण करुन दिल्यावर अण्णांनी ''थप्पड मारली की अणखी काही केले?'' असे मी विचारले. अशी सारवासारव केली. पवारांपासुन सर्व पक्षांचे नेते लोकांना व आपल्या कार्यकर्त्यांना ''शांत'' रहाण्याचे आवाहन केले आहे.पण अनेक ठिकाणी बंद जाळपोळ तोडफोड ह्या घटना सुरु झाल्या आहेत... माझा प्रश्न असा की आपण ह्ल्ली ह्या असल्या होणाय्रा वाढत्या घटनांचा अन्वयार्थ लोकशाहीच्या संदर्भात कसा आणी काय लावायचा? या घटना स्वागतार्ह/ निषेधार्ह /चिंताजनक मानायच्या आणी गप्प बसायचे...की कोलमडु पहात असलेल्या किंवा अजुनही नीट न स्थिरावलेल्या भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी पुन्हा एकवार अभ्यास करुन नवे उपाय शोधायचे...कारण क्रांत्या हिंसेनी घडोत वा अहिंसेनी...त्यांच्या पाठचे हेतु न्याय्य असोत वा अन्याय्य... नंतर मिळालेलं स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीनी अव्याहतपणे टिकवण हेच तर अवघड असतं ना...?अन्याय दुर करणाय्रांनाही न्यायाची कल्पना असतेच अस नाही...त्यामुळे अश्या घटनांच नक्की फलीत काय?...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33202 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

बंद हाणून पाडलाच पाहिजे. पण

श्रीरंग
गुरुवार, 11/24/2011 - 22:32 नवीन
बंद हाणून पाडलाच पाहिजे. पण आपण कोणत्या पदावर आहोत हे विसरून फक्त पवारांची चमचेगिरी करणारा ट दर्जाचा माणूस आज आमचा महापौर आहे याची लाज वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

पण

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/24/2011 - 22:58 नवीन
तुमच्यात दम नाही काही करायचा. इथे टंकणार फक्त. जा पाहू उद्या कामावर किंवा उघडा आपले दुकान?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

निश्चित जाणार!!

श्रीरंग
गुरुवार, 11/24/2011 - 23:07 नवीन
निश्चित जाणार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

जाहीर सत्कार करायला पाहिजे

अप्रतिम
गुरुवार, 11/24/2011 - 21:33 नवीन
जाहीर सत्कार करायला पाहिजे हरविन्दरचा.
  • Log in or register to post comments

ही पहा अण्णांची* बालीश, पण

यकु
गुरुवार, 11/24/2011 - 21:52 नवीन
ही पहा अण्णांची* बालीश, पण खदखदून हसवणारी प्रतिक्रिया.
  • Log in or register to post comments

आण्णा गांधीवादी आहेत..

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 11/24/2011 - 22:12 नवीन
आण्णा गांधीवादी आहेत.. गांधीवाद्यानी एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करायचा असतो.. म्हणून त्यानी एकच गाल का असे विचारले असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हास्यास्पद आहे पण

विकास
गुरुवार, 11/24/2011 - 22:53 नवीन
हास्यास्पद आहे खरे! पण मला वाटते हे हिंदी बोलता येत नसल्याचा परीणाम आहे. त्यांनी नंतर केलेला खुलासा या संदर्भात सारवासारव वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हास्यास्पद आहे खरे! पण मला

यकु
गुरुवार, 11/24/2011 - 23:17 नवीन
हास्यास्पद आहे खरे! पण मला वाटते हे हिंदी बोलता येत नसल्याचा परीणाम आहे.
नाही, नाही.. हा हिंदी न येण्याचा प्रकार नाही... ही सारवासारव अण्णांनी पश्चातबुद्धीनं केली आहे; कारण फक्त तेवढीच प्रतिक्रिया देऊन, लोकांचं हसू वसूल करुन अण्णा कॅमेर्‍यासमोरुन उठून आत निघून गेले. दुसरी प्रतिक्रिया नंतरची. बाकी अण्णाचं हिंदी किती पक्कं आहे याचा दाखला इथे दिलेल्या दुसर्‍या व्हिडिओमध्येच मिळतो. ते म्हणतात 'मै समझ सकता हूं.. आज भ्रष्टाचार से लोक बाज आ गये है..' http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=205622
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आमच्या साहेबांशी पंगा घेतला

वसईचे किल्लेदार
गुरुवार, 11/24/2011 - 22:11 नवीन
आमच्या साहेबांशी पंगा घेतला ना? आता बघा त्या हरविंदरसींगाचे काय होते ते ... हम्म !
  • Log in or register to post comments

मग आता त्या हरविंदर सिंग ला मारुन टाकणार का तुम्ही लोकं?

वाहीदा
गुरुवार, 11/24/2011 - 22:23 नवीन
महागाईने सामान्य माणसाचा प्रक्षोभ झाला तर त्याला मानसिक रुग्ण ठरवायला पण तुम्ही लोकं कमी नाही करत. तरिही वयस्कर व्यक्तीवर हाथ उगारणे अयोग्य पण आता सामान्य माणसाच्या पेशन्स हा स्टेक वर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वसईचे किल्लेदार

अगदी अगदी जे झाले त्याच्या

वसईचे किल्लेदार
गुरुवार, 11/24/2011 - 22:31 नवीन
अगदी अगदी जे झाले त्याच्या परीणामांचे काय ... ह्याचा परीणाम काय होईल (कुणावर होईल) एव्ह्ढाच काय तो प्रश्न!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

डोंबिवली फास्ट

शाहिर
गुरुवार, 11/24/2011 - 22:31 नवीन
मावळ मधे शेतकर्यांवर गोळीबार करताना यांना अहिंसा आठवली नाही.. आणि तेव्हा रास्ता रोको करणर्या वर कारवाइ केलि आता चुप चाप बसले... हा उद्रेक अहे. ... भाषण देणे सोपे असते परंतु व्यवस्थे विरुद्ध लढने अवघड...कारण सत्ता नितीमता पाळत नहिये.. लोकांचे कसे असते ना, लवासा , मावळ झाले कि यांचा निषेध आणी यांना हाणले कि त्यांचा निषेध... प्रतेक जण संयमी विवेकी नसतो.. आणि असला तरी् "डोंबिवली फास्ट" होतो हो कधी तरी
  • Log in or register to post comments

अन्वयार्थ

विकास
गुरुवार, 11/24/2011 - 22:52 नवीन
या घटनेचे वेगवेगळे अन्वयार्थ निघू शकतील. वर यशवंत एकनाथांनी म्हणल्याप्रमाणे खेद वाटला. मात्र असा खेद आणण्यासारखी परीस्थिती आणण्याचे पितृत्व हे पवार आणि तत्सम राजकारण्यांकडे आहे असेच वाटते. आज भारतात "मध्यम वर्ग आणि वर" अशा जनतेचे सुदैवाने चांगले चालले असले तरी बाकी परिस्थिती भिषण आहे असे वाटते. (अमेरीकेत पण असेच आहे). जर याकडे सामायीक दॄष्टीने पाहीले नाही तर भडका कधीही उडू शकेल...आणि त्यात केवळ राजकारणीच पोळणार नाहीत. मराठीत म्हण आहे: "सुक्या बरोबर ओलेही जळते..." या संदर्भात आयबीएन वरील चित्रफीत बराच इतिहास सांगते. कदाचीत एखादी थप्पड-चप्पल ही राजकीय नेतृत्वाच्या बायोडेटाचा भाग झाला तरी आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments

महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल

अशोक पतिल
गुरुवार, 11/24/2011 - 22:53 नवीन
महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल सरकार, संस्था आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर राग आहे, जनता वैतागली आहे वगैरे सगळे मान्य आहे आणि पटतेही आहे, परन्तु हे थप्पड प्रकरण म्हणजे नाटक जास्त वाटते.ज्याने ती मारली,त्याने असा पराक्रम अगोदरपण केला आहे. म्हणजे तो सरावलेला राजकिय कार्यकर्ता असावा. जेव्हापासुन जार्ज बुश याना बुट फेकुन मारला,तेव्हापासुन सवग लोकप्रियतेची जणु लाट्च आली आहे. ह्या घटनेवर आण्णा हजारेंची प्रतिक्रिया पाहुन त्यानच्या प्रतीमेशी विसन्ग्त असे वाटत आहे. त्यानची लोकप्रियता जशी अचानक वर गेली तशी कमीही होवु शकते. खर मुद्दा वाढती महागाइचा , वाढती लोकसन्ख्या, कमी होणारे शेती क्षेत्र ( शहरीकरण), वाढते प्रदुषण( वाढ्ती कार्/बाइक इ.वाहणे) मा़झ्या मते आहेत. त्याला जबाबदार आतापर्यतची सरकारे व आपण सुद्धा आहोत. पुर्वी चन्गळपणा कमी होता. तो आता वाढलाय.२०-२५ आगामी वर्षात जेव्हा कोळसा,पेट्रोल, गॅस इ कमी होतील्,तेव्हा वाढती ट्चाइ, महागाई कोणाला जबाबदार धराल ? आणी ती कोण रोखु शकेल. लक्षात घ्या, आगामी काळात धनधान्याच्या किमती ह्या कमी होणार नाहीत ( वाढती लोकसन्ख्या, कमी होणारे शेती क्षेत्र ), आणी याचे नियोजन कोणी करावे. १०००० ते २००० वर्षापुर्वी पर्यत जगाची लोकसन्ख्या हि प्रमाणात होती. त्याला दुष्काळ, रोगराइ,लढाया ही ( काही प्रमाणात निसर्ग निर्मीत ) कारणे होती. आता मानवाच्या प्रगती मुळे ही कारणे कमी झाली, परन्तु जेव्हा याचा विस्फोट होइल तेव्हा निसर्गाची थप्पड कोणा एकाला पडणार काय?
  • Log in or register to post comments

टॉपिक काढणारा आणि इतर एकच मत

आशु जोग
गुरुवार, 11/24/2011 - 22:56 नवीन
टॉपिक काढणारा आणि इतर एकच मत नोंदवतो टी वी च्या चॅनेलमुळे बरीच माहिती कानावर आदळते पण त्या माहितीच्या रद्दीला ज्ञान समजू नये आपण कोणत्या विषयावर विचार करायचा, कोणत्या विषयावर गप्पा मारायच्या दुपारच्या टायमाला डबा खाताना कोणत्या विषयाची चर्चा करायची हेही टीवीच ठरवतो आपलं डोकं टीव्हीकडे देऊ नका, टीव्हीचे व्यसन सोडा
  • Log in or register to post comments

आपलं डोकं टीव्हीकडे देऊ नका,

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/25/2011 - 23:50 नवीन
आपलं डोकं टीव्हीकडे देऊ नका, टीव्हीचे व्यसन सोडा.... >>> अनाहुत सल्ल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे... माहीतीच्या रद्दीतुन नेमका प्रश्न काय विचारलाय हेच आपणास कळ्लेले नाही....त्यामुळे अता आणखी स्पष्टीकरण काय देणार...तुमच्यापुढे आमचा णाविलाज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

+१

शाहिर
Sat, 11/26/2011 - 00:03 नवीन
फ्री सल्ल्यांचा प्रमाण वाढल आहे अजकाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काही पत्रकारांना अशा वेळी काय

आशु जोग
गुरुवार, 11/24/2011 - 23:02 नवीन
काही पत्रकारांना अशा वेळी काय बोलावे खरच सुचत नाही. मनातलं बोलता येत नाही मग गोलमाल गोलमाल बोलत बसतात. इतर वेळी पोटासाठी जिसका खंबा उसकी लाल याप्रकारे पाल्हाळीक व न पटणारी बाजू घेउन बोलत बसतात
  • Log in or register to post comments

जे झाल ते चान्ग्ल झाल. आवडल.

विवेक वाटवे
गुरुवार, 11/24/2011 - 23:39 नवीन
जे झाल ते चान्ग्ल झाल. आवडल. आता हे अस पुन्हा पुन्हा घड्नार. घडायलाच हव.
  • Log in or register to post comments

एक गंमत वाटते...निवडणुका

शिल्पा ब
Fri, 11/25/2011 - 00:21 नवीन
एक गंमत वाटते...निवडणुका आल्यावर अशा थपडा खाण्याच्या लायकीच्या लोकांनाच का निवडुन देतात?
  • Log in or register to post comments

खेद .. वाईट..अस्वस्थ करणारं

कोदरकर
Fri, 11/25/2011 - 04:56 नवीन
हे सगळे खोटे आहे... बर्‍याच जनांना मनापासुन करावी वाटणारी गोष्ट हरविंदर पाजी ने करुन टाकली आहे नी मिडियाने दाखवुन टाकली आहे... रात्री झोपताना पवारांना एकदा जरी विचार करावा वाट्ला की असे का घडले तरी हरविंदर चे आणि सर्व सामान्याचे भले होऊ शकेल... साखर ३३ रु झालीय.....
  • Log in or register to post comments

"मग खाऊ नका साखर. मधुमेह

श्रीरंग
Fri, 11/25/2011 - 10:39 नवीन
"मग खाऊ नका साखर. मधुमेह वगैरे वाढवणारी साखर तुम्हाला हवीच आहे कशाला?" अशा आशयाचे पत्रके वगैरे वाटण्याची मुजोरी नडली पवारांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोदरकर

ज्या हरविंदर पाजी चे इतके

अशोक पतिल
Fri, 11/25/2011 - 06:31 नवीन
ज्या हरविंदर पाजी चे इतके विशेष वाटते, तो तर छान सुखवस्तु ,अपडुटेड इसम दिसतोय. रन्जला गान्जलेला तर बिलकुल दिसत नाही. बाकी यशवन्त सिन्हा व अण्णाची प्रतिक्रीया बघुन हे व्यवस्थित प्लान केलेले वाट्तेय. ( ह्या घटनेचा व संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.! लावलेला अर्थ हेच सान्गतो ) बाकि शरद पवार हे पुर्वी पॅलवान होते असे एकुन आहे. हरविंदर ने चुलेन्ज देवुन मारली असती व पवारानी खाल्ली असती तर ते विशेष झाले असते.
  • Log in or register to post comments

ज्या हरविंदर पाजी चे इतके

इरसाल
Fri, 11/25/2011 - 12:07 नवीन
ज्या हरविंदर पाजी चे इतके विशेष वाटते, तो तर छान सुखवस्तु ,अपडुटेड इसम दिसतोय. रन्जला गान्जलेला तर बिलकुल दिसत नाही. अशोक पतिल साहेब जगभरात कोठेही जा "भिकारी शीख" किंवा "भिकारी सरदार " तुम्हाला कोठेही आढळणार नाही. किंबहुना तो धर्मच आपल्या लोकांची काळजी घेतो कि कोणी भिकारी असूच नये.असो. बाकि शरद पवार हे पुर्वी पॅलवान होते असे एकुन आहे. हरविंदर ने चुलेन्ज देवुन मारली असती व पवारानी खाल्ली असती तर ते विशेष झाले असते. भ्रष्टाचार वगैरे करण्यासाठीही पूर्वी काही असावे लागते काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल

तीव्र निषेध..!!!

अजातशत्रु
Fri, 11/25/2011 - 08:41 नवीन
संहिष्णुता हरवत चाललेल्या मनांचा तीव्र निषेध, लोकशाहि राष्ट्रात चिंतनीय घटना : (
  • Log in or register to post comments

अण्णा आवरा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/25/2011 - 09:18 नवीन
वैफल्यग्रस्त आणि मानसिकद्रष्ट्या विकलांग असलेल्या हरविंदरसिंगची कृती मूर्खपणाचीआहे, यात काही वाद नाही. घटनेमागील अन्वयार्थ काय असेल ते भविष्यात समजेलही. पण मौनी आणि आमचे आदरणीय श्री अण्णा हजारेंचा बालीशपणा आणि विचार मांडण्याची पद्धत हरविंदरसिंगाच्या मानसिक अवस्थेपेक्षा पुढची पायरी वाटली. [कोणाच्या भावना-बिवना दुखावल्या असतील तर खरड करावी] आदरणीय श्री अण्णांच्या मागे सर्व देश उभा राहील्यामुळे आदरणीय श्री अण्णांना आपण काहीही बोललो तरी चालतं असं त्यांना वाटायला लागलं आहे. च्यायला, दुपारी राळेगणच्या श्री अण्णांच्या कार्यालयात फोन करुन श्री अण्णांना आवरा किंवा मौन बाळगायला सांगा असे म्हणतोच. -दिलीप बिरुटे [स्पष्ट]
  • Log in or register to post comments

आदरणीय श्री अण्णांच्या मागे

मदनबाण
Fri, 11/25/2011 - 09:38 नवीन
आदरणीय श्री अण्णांच्या मागे सर्व देश उभा राहील्यामुळे आदरणीय श्री अण्णांना आपण काहीही बोललो तरी चालतं असं त्यांना वाटायला लागलं आहे. मला नाही असं वाटत... देशात अनेक नेत्यांनी काहीच्या काही विधाने केली आहेत आणि नंतर त्या विधानां बाबत यु टर्न मारलेला आहे... शरदचंद्र पवार यांना थप्पड मारल्याचे कॄत्य समर्थनीय जरी नसले तरी देशातल्या नागरिकांच्या मनात असंतोष खदखदतो आहे हे नाकारता येणे शक्य नाही. सगळे राजकारणी सारखेच नसले तरी भ्रष्ट राजकारण्यांची संख्या थोडकी नाही ! कॉमन वेल्थ खेळांमधे झालेल्या भ्रष्टाचारामुळे आणि खेळाच्या आधीच एक पुल कोसळल्यामुळे जगभर आपल्या देशाची प्रतिमा मलिन झाली ! हे भ्रष्ट राजकारण्यांमुळेच झाले ना ? देशाला धड सुरक्षा देउ शकत नसलेल्या राजकारण्यांना मात्र झेडप्लस सुरक्षा हवी असते ! आता तशी पवार साहेबांना सुद्धा पुरवली जाईल ! पण सामान्य जनतेचे काय? त्यांच्या आयुष्याला काही किंमतच नाही का ? कसाब सारखे अतिरेकी इथे येत राहतात आणि आपण शहीदांचे पुतळे उभारत राहतो ! अजुन किती आणि कोणाचे पुतळे उभारायचे आहेत ? या देशात धड रस्ते नाहीत्,पाण्याची बोंब आणि विजेचे भारनियमन ही गोष्ट इथल्या जनतेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग नाही का ? ही आपल्या देशातील राजकारण्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी केलेली प्रगती म्हणायची काय ? सगळीकडे या लोकांचे वाढदिवसाचे पोस्टरर्स/बॅनर्स,फलक लागतात्,हल्ली तर टिव्हीवर सुद्धा यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांच्या जाहिराती दिसतात ! असा काय जगावेगळा पराक्रम या सुपुत्रांनी हिंदुस्थानात जन्म घेउन केला आहे ? जाता जाता :--- हरविंदरसिंग जर मनोरुग्ण असेल तर इतक्या लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या(ज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.) ते सर्व मनोरुग्ण होते काय ? त्यांना आत्महत्येस प्रवॄत्त करण्यासाठी जी परिस्थीती कारणीभुत झाली त्याला नेते मंडळी कारणीभुत नाहीत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>देशातल्या नागरिकांच्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/25/2011 - 09:51 नवीन
>>>>देशातल्या नागरिकांच्या मनात असंतोष खदखदतो...... असंतोष व्यक्त करण्याचे सनदशीर मार्ग असतात. महागाई, भ्रष्टाचार, वगैरे प्रश्नांनी प्रत्येक माणसाच्या मनात असंतोष आहे, हे मान्य. सर्वसामान्य माणसाच्या मनात असंतोष आहे म्हणून उठसुठ कोणा नेत्याचे थोबाडात मारणार काय ? >>>> शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या(ज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.) ते सर्व मनोरुग्ण होते काय ? स्वतंत्र काथ्याकुटाचा विषय आहे. शेतक-यांच्या आत्महत्त्या हा वेगळा विषय आणि त्याची वेगवेगळी अशी कारणं आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

असंतोष व्यक्त करण्याचे सनदशीर

मदनबाण
Fri, 11/25/2011 - 10:06 नवीन
असंतोष व्यक्त करण्याचे सनदशीर मार्ग असतात. महागाई, भ्रष्टाचार, वगैरे प्रश्नांनी प्रत्येक माणसाच्या मनात असंतोष आहे, हे मान्य. सर्वसामान्य माणसाच्या मनात असंतोष आहे म्हणून उठसुठ कोणा नेत्याचे थोबाडात मारणार काय ? नक्कीच नाही ! आणि समर्थनीय सुद्धा नाही ! पण मग राजकारण्यांनी सुद्धा सनदशीर मार्गाने वागायला हवे ना ? लवासा बांधकाम सनदशीर मार्गाने झाले आहे काय ? तेव्हा कुठे जाते लोकशाही आणि लोकशाहीची तत्वे ? ज्या सोनिया गांधीला विदेशी म्हणुन हिणवले आणि वेगळा पक्ष काढला तेच आता त्यांच्याशी सुत जमवुन बसलेत ना ? ही यांच्या पक्षाची तत्त्वे ? शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या(ज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.) ते सर्व मनोरुग्ण होते काय ? स्वतंत्र काथ्याकुटाचा विषय आहे. शेतक-यांच्या आत्महत्त्या हा वेगळा विषय आणि त्याची वेगवेगळी अशी कारणं आहेत. ठीक आहे,पण श्री.शरद पवार केंद्रीय कॄषीमंत्री आहेत ना ? कापुस,उस,कांदा यासाठी आंदोलने करायची का वेळ येते मग ? सोडवा की प्रश्न शेतकर्‍यांचे त्यासाठीच तर ते पद भुषवित आहेत ना ? की लवासा/क्रिकेट शिवाय यांच्याकडे इतर गोष्टी पहायला वेळ नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरेतरं ह्या विषयावर मौन

सोत्रि
Fri, 11/25/2011 - 11:41 नवीन
खरेतरं ह्या विषयावर मौन पाळायचे ठरवले होते, पण बाणा, तु मुद्देच असे मांडलेस की सहमत होण्याशिवाय पर्याय नाही.
श्री.शरद पवार केंद्रीय कॄषीमंत्री आहेत ना ? मग राजकारण्यांनी सुद्धा सनदशीर मार्गाने वागायला हवे ना ?
ह्या तच सर्व आले. सव्वा लक्ष वेळा सहमत. - ( असंतोषी ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

च्यायला, कशाला हवी दुपार. केला बॉ फोन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/25/2011 - 09:40 नवीन
श्री अण्णांच्या कृतीला आमच्या पाठींबा असतो, श्री अण्णांच्या कृतीकडे आम्ही सर्वसामान्य मोठ्या अपेक्षेने पाहात आहोत. अशावेळी श्री अण्णांनी विधानं करतांना काळजी घ्यायला हवी, आमच्या भावना श्री अण्णांना कळवा अशा आणि काही भावना आपण बॉ व्यक्त केल्या. अध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास मु.पो. राळेगणसिद्धीच्या कार्यालयात फोन केल्यावर वरील विषयावर बोलतांना संबंधित माणूस गांगरला, हे मात्र नक्की. असो, आत्ता कुठं मला बरं वाटलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री अण्णांच्या कृतीला आमच्या

मदनबाण
Fri, 11/25/2011 - 09:45 नवीन
श्री अण्णांच्या कृतीला आमच्या पाठींबा असतो, श्री अण्णांच्या कृतीकडे आम्ही सर्वसामान्य मोठ्या अपेक्षेने पाहात आहोत. अशावेळी श्री अण्णांनी विधानं करतांना काळजी घ्यायला हवी, आमच्या भावना श्री अण्णांना कळवा अशा आणि काही भावना आपण बॉ व्यक्त केल्या. ह्या सर्व अण्णा समर्थकांच्या भावना आहेत्,त्यात मी सुद्धा येतो.पण ते काही इश्वरी अवतार नाहीत ! चूक त्यांच्या कडुन सुद्धा होउ शकते आणि त्यांनी त्यांच्या चुकीच्या विधानाचे समर्थन केलेले नाही हे त्यांच्या दुसर्‍या वक्तव्या वरुन स्पष्ट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुधारणा झाली ही चांगलीच गोष्ट झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/25/2011 - 09:58 नवीन
एकदा बोलून गेल्यावर काय बोलतोय हे लक्षात आल्यावर झालेली चुक सुधारणेची गरज होतीच. आणि आता सर्व देश त्यांना जेव्हा ओळखायला लागला आहे, तेव्हा अशी चूक किंवा असा बालीशपणा त्यांच्या प्रतिमेला आणि वयाला आत्ता शोभणारा नाही. इतकाच माझा मुद्दा आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बडे बडे

कुंदन
Fri, 11/25/2011 - 11:42 नवीन
बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी छोटी घटनाएं होती रहती है ! असे आर आर म्हणले तेंव्हा नाही हो फोन केला तुम्ही ? ही पार्शलिटी बरी नव्हे. असो , मला द्या नंबर , मी करतो तिकडे फोन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत. पण कदाचित आर. आर. कडुन

शिल्पा ब
Fri, 11/25/2011 - 11:43 नवीन
सहमत. पण कदाचित आर. आर. कडुन वेगळी अपेक्षाच नसेल. बाकी प्रा.डॉ. यांचे विचार वाचुन वाईट वाटलं अन त्यावरचं बाणाचं उत्तर पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

कुंदन सेठ. जेलात गेलो तर जामिन घ्यायला येणार काय ? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/25/2011 - 21:14 नवीन
असे आर आर म्हणले तेंव्हा नाही हो फोन केला तुम्ही ? ही पार्शलिटी बरी नव्हे.असो , मला द्या नंबर , मी करतो तिकडे फोन. लंबर दिला असता पण तुम्ही काय बोलाल त्यांना ते मला माहिती नाही. काही भानगडी झाल्या तर मी जाईन जेलात. आणि तुमचा मला पत्ता माहिती नाही. मला तर जामिनही मिळणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला लंबर देणार नाही. :) शिल्पा ब म्हणतात 'प्रा.डॉ. यांचे विचार वाचुन वाईट वाटलं' माझ्या कोणत्या विचाराचं वाईट वाटलं जरा लिहा बरं. म्हणजे पुढे संवाद चालू ठेवता येईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

........कृती

मराठी_माणूस
Fri, 11/25/2011 - 10:59 नवीन
........कृती मूर्खपणाचीआहे, ह्या मूर्खपणाच्या कृतीचे कित्येक बुध्दीमान्/श्रमजीवी वर्गातुन समर्थन करण्यात आले आहे. त्यातील बर्‍याच लोकांचा प्रतिसाद अण्णांसारखा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्या मूर्खपणाच्या कृतीचे

मदनबाण
Fri, 11/25/2011 - 11:09 नवीन
ह्या मूर्खपणाच्या कृतीचे कित्येक बुध्दीमान्/श्रमजीवी वर्गातुन समर्थन करण्यात आले आहे. त्यातील बर्‍याच लोकांचा प्रतिसाद अण्णांसारखा होता. यथा राजा तथा प्रजा ही म्हण आठवली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

असे उलट का असावे?

मन१
Fri, 11/25/2011 - 11:37 नवीन
मागे म न से आमदार वांजळेंनी विधानसभेमध्ये थेट अबू आझमींच्या कानाखाली भडकावल्यावर गुदगुल्या होणारे कित्येक जण आता मात्र लोकशाही मूल्य वगैरे बोलताना पाहून मौज वाटली.
  • Log in or register to post comments

हेच!

आनंदी गोपाळ
Fri, 11/25/2011 - 14:46 नवीन
अगदी सहमत @ मनोबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

खुप मोठी राजकिय खेळी

अविनाशकुलकर्णी
Fri, 11/25/2011 - 11:40 नवीन
खुप मोठी राजकिय खेळी कॉंग्रेसने केलीय का??? १] पवारांवर हल्ला केला आणि हल्लेखोराकडुन महागाईचे कारण दिले गेले. पवारांची पत आपोआप घसरली. २]दिवसभर मिडियावर ह्याची चर्चा केली गेली. आणि ह्या व्यक्तीने सुखरामवर (जे भ्रष्ट आहेत हे सिद्ध झालंय) हल्ला केल्याचे वारंवार दाखविले गेले. पवार भ्रष्ट असल्याचे आपोआप सुचित झाले. ३] महागाईचा आणि पवारांच्या मंत्रालयाचा संबंध नाही हे कुठेही दाखवले नाही. ४] टिम अण्णाच्या लोकांना चर्चेला आणुन ह्या सगळ्या गोष्टीला भ्रष्टाचारविरोधी आंदोलन कसे कारणीभुत आहे ह्यावर चर्चा केल्या गेल्या. लोकांच लक्ष आता पवारांवर आणि हिंसक आंदोलनांवर जाईल ह्याची काळजी घेतली जातेय.
  • Log in or register to post comments

+१

सोत्रि
Fri, 11/25/2011 - 15:27 नवीन
ह्या सर्व प्रतिसादांच्या गदारोळातला सर्वांत लॉजिकल प्रतिसाद. १०१% सहमत. हे सर्व राजकारण असते. आपण उगीच भावनाप्रधान होउन चूक की बरोबर असे करत आपापसात भिडतो. - (राजकीय खेळ अभ्यासणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

+१

ईन्टरफेल
Fri, 11/25/2011 - 21:10 नवीन
+१०००००००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

काय हरकत आहे खरं बोलायला?

पिलीयन रायडर
Fri, 11/25/2011 - 11:47 नवीन
अण्णा "चुकुन" खरं बोलुन गेले.. नंतर उगाच सारवा सारव केली.. सगळेच मनातुन खुश आहेत.. फक्त इमेज साठी "ह्याचा निषेध केला पहिजे" टाइप बोलत आहेत.. बोला की खरं... आणि ह्या अशा कृत्याने काय होणार आहे का साध्य वगैरे वगैरे... अरे ह्या देशात काही साध्य व्हाव म्हणुन नीट प्लान करुन काही होतं का??? राजकारणी लोक मनला येइल तसं वागु लागले तर जनता पण मनाला येइल तसं वागणार ना... आज राव उलट जास्त काम करा.. संध्याकाळी पार्टि करा... उत्सव वाटला पाहिजे...
  • Log in or register to post comments

च्यायला !

परिकथेतील राजकुमार
Fri, 11/25/2011 - 12:00 नवीन
मिपा आज चालू कसे काय आहे ? लगेच बंद करा ! नाहीतर ...... शरद पवार झिंदाबाद.
  • Log in or register to post comments

:)

गणपा
Fri, 11/25/2011 - 12:33 नवीन
तुझं 'सौंदर्य फुफाटा निरिक्षण केंद्र' उघडं आहे का रे आज? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हम्म

परिकथेतील राजकुमार
Fri, 11/25/2011 - 12:45 नवीन
ते काये, इकडे आम्ही केरोसीन, दगडं, जुनी टायर्सचा साठा वैग्रे केला आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहाराची देखील व्यवस्था इथेच आहे. म्हणून आमचे केंद्र उघडे आहे. उगाच आता त्यावरून राजकारण करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

>>तुझं 'सौंदर्य फुफाटा

नावातकायआहे
Fri, 11/25/2011 - 22:39 नवीन
>>तुझं 'सौंदर्य फुफाटा निरिक्षण केंद्र' उघडं आहे का रे आज? _ _/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हल्ल्याचा

चिरोटा
Fri, 11/25/2011 - 13:17 नवीन
'तोबा तोबा' म्हणत हल्ल्याचा निषेध अनेक मर्‍हाटी नेत्यांनी केलाय. हल्ले करून प्रश्‍न सुटत नाहीत - मनोहर जोशी(मग आपण्/आपले कार्यकर्ते ईतकी वर्षे अहिंसेची खिल्ली का उडवत होते?) हा हल्ला निषेधार्हच आहे. महाराष्ट्रात त्यांची संतापजनक प्रतिक्रिया उमटणे सहाजिक आहे. हल्लेखोराला महागाईविरोधातच राग व्यक्त करायचा होता तर मनमोहन सिंग यांच्यापासून सुरुवात करायची होती -राज ठाकरे(अबु आझमींला कानफटात मारली तर आनंद आणि पवारांना मारली तर दु:ख?) शरद पवारांवरील हल्ल्याचा मी निषेध करतो. अपराध्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. - अनंत गीते( १९९२ च्या दंगलीत भाग घेणार्‍यांनाही शिक्षा झाली पाहिजे ना?) शरद पवारांवरील हल्ला घृणास्पद आहे’- बाळासाहेब ठाकरे( हल्ला घ्रुणास्पद आहे की नाही ह्यासाठी बाळासाहेब कुठले यंत्र वापरतात?) www.saamana.com
  • Log in or register to post comments

ही नेते मंडळी देशाचे प्रश्न

मदनबाण
Fri, 11/25/2011 - 13:21 नवीन
ही नेते मंडळी देशाचे प्रश्न सोडवताना कधी एकत्र येताना दिसतात काय ? फक्त त्यांची पगारवाढ करुन हवी असेल आणि असे काही अघटित घडले की लगेच हे लोक एकी दाखवायला पुढे सरसावताना मात्र दिसतात ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा