Skip to main content

ससे आणि जादुगार -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 10/11/2011 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
छोटे छोटे ससे कसे टकमक इंद्रधनू बघती - बघता कोपऱ्यात ते रुसुनी मुकाट का बसती ! चुन्यात बुडुनी आलो वाटे, लाल ना कुणी निळे - रंग कुणाचे ना नारंगी कुणीच ना काळे पिवळे ! एक छडी जादूची घेऊन तिथेच जादुगार आला - हिरमुसलेले तुम्ही दिसता कोपऱ्यात ह्या का बसला ?' 'आम्ही सारे असे पांढरे - रंगित नाही, शुभ्र कसे ?' - एकमुखाने वदले सारे जादुगार तो मनीं हसे ! मूठ उघडुनी जादुगार तो रंगित चकती दावितसे भरभर जादूच्याच छडीने रंगित चकती फिरवितसे - फक्त पांढरा रंगच दिसला- फिरता चकती गरगर ती ! हसू लागले ससे बघुनिया जादू रंगित चकतीवर ती ! मिसळुन सारे रंग जगीचे शुभ्र ससे बनलात तुम्ही , मुळीच ना तुम्ही बिनरंगी- बहुरंगी आहात तुम्ही ! ' आनंदाने फिरू लागले सर्व ससे अवतीभवती - गुप्त जाहला जादुगार तो जादुची छडी अन् चकती !

वाचने 2072
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आवडली.

विदेशां -खूपच मस्त मूठ उघडुनी जादुगार तो रंगित चकती दावितसे भरभर जादूच्याच छडीने रंगित चकती फिरवितसे - अप;रतिं म्हणेन ...!!

विदेशां -खूपच मस्त मूठ उघडुनी जादुगार तो रंगित चकती दावितसे भरभर जादूच्याच छडीने रंगित चकती फिरवितसे - अप;रतिं म्हणेन ...!!

अरे वा माझ्यावर कविता ! :) मस्तच ! :) (फोटु जालावरुन घेतलाय.)

पण बाणाने दिलेला तो ससा सगळ्या जगातला दुष्ट आहे!