देऊळ.!! तु झोप मी जागा आहे!!
गेल्या आठवड्यात पाहिलेल्या रा-वण मुळे डोक्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता त्यामुळेच कि काय? किमान महिनाभर आता कोणताच सिनेमा पहायचा नाही असच ठरवलं होतं, पण गिरिश आणी उमेश कुलकर्णी या जोडीचा देऊळ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होतो आहे म्हटल्यावर मला माझा निर्णय बदलावाच लागला.
महाराष्ट्रातलं एक गाव, मंगरूळ!! ज्या गावात दळणवळाणासाठी चांगले रस्ते नाहीयेत, शेतीसाठी लागणार्या पाण्याची टंचाई मोठी आहे, चांगलं रुग्णालय नाही, विजेटंचाई अशा समस्या आहेत पण त्याबरोबरच या मागासलेल्या गावात मोबाईल फोन्स, संगणक, रंगीत दुरचित्रवाणी यासारखं तंत्रज्ञान मात्र पोहचलयं यातला विरोधाभास जाणवतो.
अशा त्या गावात राहणारा एक साधा-सज्जन देवभोळा तरूण केशा!! आपली हरवलेली 'करडी' गाय शोधता शोधता त्याला माळावर असलेल्या उंबराच्या झाडात त्याला गुरूदेव दत्त दिसतात आणी मग तो हि बातमी संपुर्ण गावभर करतो. तिथून पुढे एक साधं गाव ते एक मोठं तिर्थक्षेत्र असा त्या गावाचा प्रवास सुरू होतो. सुरूवातीला त्याच्या या बोलण्यावर काहिजण विश्वास ठेवतात तर काही जण त्याचं म्हणणं उडवून लावतातं. गावातल्या महिला मंडळात या गोष्टीची चवीचवीने चर्चाही होते.
काहितरी नविन करायचं या ध्यासातून तिथले तरूण कार्यकर्ते मग या बातमीचा उपयोग करून घ्यायचं ठरवतात, फोन मेसेजेस, वर्तमानपत्रातील बातम्या याद्वारे दत्तगुरूंच जागृत ठाणं असा आपल्या गावाचा ते व्यवस्थितरित्या प्रचार करतात, याबाबतीत महासंग्राम हा वृत्तपत्रकार त्यांना मदत करतो. सुरूवातीला या सगळ्या गोष्टींना विरोध दर्शवणारे गावाचे प्रमूख भाऊसाहेब वरिष्ठांच्या दबावापुढे झुकतात आणी देऊळ बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देतात.
केशा बरोबरच भाऊसाहेब आणी गावातल्या सगळ्यांना समजूतीच्या चार गोष्टी सांगणारे जेष्ठ आणी जाणकार अण्णा मात्र सुरूवातीपासूनच त्या सगळ्यांना समजवतात पण शेवटी त्यांचाही नाईलाज होतो.
""
पुढे काय होतं?? देऊळ बांधून होतं का?? भाऊसाहेब आणी अण्णांची नंतरची भुमिका काय असते??
या सगळ्या गोष्टींसाठी देऊळ हा सिनेमा तुम्ही सिनेमागृहातच जाऊन पहायला हवा.
गिरिश कुलकर्णीने केशाच मद्ध्यवर्ती पात्र अगदी व्यवस्थितरित्या साकारलयं. चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यात त्याने त्याच्यातला अभिनेता अगदी समर्थपणे पेललाय. आतीशा नाईक, विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, ज्योती सुभाष, सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या भुमिकेप्रमाणे योग्य कामं केली आहेत.
ह्रषिकेश जोशी, महासंग्राम पत्रकार किशोर कदम, श्रीकांत यादव आणी त्यांच्याबरोबर असलेल्या अभिनेत्यांनी तरूण कार्यकर्ते धम्माल वठवलेत.
डॉ.मोहन आगाशेंचा साहेब अगदीच कमी वेळा समोर येतो. हिंदी अभिनेते नसिरूद्दीन शहा हे ही एका दृष्यापुरते अनपेक्षितपणे आपल्या समोर येतात.
सर्वात जास्त उत्सूकता होती ती नाना पाटेकरांचा भाऊसाहेब आणी अण्णा असलेल्या दिलीप प्रभावळकर या दोन दिग्गजांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची, पण शेवटी शेवटी अगदी छोट्या स्वरूपात का होईना माझी ती इच्छा पुर्ण झाली. अर्थात त्यांनी त्यांच्या भुमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने पार पाडल्याच ही गोष्ट वेगळी.
"अगदी शुन्य मिनिटात करतो" हा नाना पाटेकरांचा डायलॉग धम्माल आणतो.
कंचुकी तंग दाटली उरी, मट्रीअल आत मायीना...
आनं माळावर प्रकटला दत्त, पर भाव मनी दाटना....
आध्यात्माचा ताप भारी आनं केशाभोवती जमती नारी... यांसारखे चुरचूरीत संवाद मजा आणतात. कथा, पटकथा आणी संवादांच या तिन्ही आघाड्यावरचं काम गिरीश कुलकर्णीने चांगलच जमवलयं.
देवा तुला शोधू कुठं आणी तु झोप तुझा दत्त जागा आहे हि दोन्ही गाणी निदान श्रवणीय तरी आहेत पण त्यातलं आयटम साँग हे मात्र सहनशिलतेच्या पलिकडचं आहे. त्याचे नेमके शब्दचं कानावर पडत नाहीत. एखाद्या चांगल्या पुलाव भातामध्ये अचानक खडा लागावा तसं ह्या आयटम साँग बद्दल माझं मत झालयं अर्थात हे माझं स्वतःच वैयक्तीक मत आहे.
मंगेश धाकडेच पार्श्वसंगीत ठिक आहे.
सुरूवातीपासून चांगला चाललेला चित्रपट मध्ये थोडासा रेंगाळतो पण शेवट बघण्याची उत्सुकताही तेव्हढीच निर्माण करतो. उमेश कुलकर्णीच दिग्दर्शन वळूच्या तुलनेत थोडसं कमी पडलयं असं जाणवतं.
वळू या चित्रपटामुळे गिरिश आणी उमेश कुलकर्णी यांच्याकडून अपेक्षा खुप वाढलेल्या होत्या अगदी तेवढ्या नाही पण त्याच्यापेक्षा थोड्या कमी अपेक्षा या जोडीने नक्कीच पुर्ण केल्यात.
एकंदरीत काय तर, एकदा तरी सिनेमागृहात जाऊन देऊळ बघायला हरकत नाही.
*** (३/५) वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त परिक्षण. नक्की बघणार हा
सुरेख
+१
किसनदेवा, अभिनंदन. नाही
चांगले परीक्षण. चित्रपट बघेन
मस्त लिहिलं आहेस परीक्षण..
मस्त हो किसनराव....अश्या
पिक्चर नक्की बघेन!
किसनराव, सुंदर परीक्षण...
+१ टु धनाजीराव आता ती
मी उद्याच जाऊन बघतो. - पिंगू
देऊळ
ते वळूचं कौतुक करु नका राव.
(पोळ) सोकाजी खॅ खॅ खॅ...
ते वळूचं कौतुक करु नका राव.
नाही नाही तुला असं एकटं कसं
सगळीकडे एवढी छान छान परीक्षण
परिक्षण छान लिहिलं आहे. आपली
विभावरी देशपांडे, उषा
पक्का खेडवळ आहे.
+१
टाईप?
अजुन अक्कल कशी पाज ळली नाही याचेच आश्चर्य वाटत होते..
शाहीर नाव घेतलेला
छान परिक्षण!
मस्त!!
नक्की बघेन ( त्यावर दुसरा
सध्या हा चित्रपट "दत्तनाम
बातमी वाचली. निव्वळ पब्लिसिटी
हिंदूंनी पण उठसूट धार्मिक
धर्मांधाच्या गोष्टी सोडा हो!!
गाणे ऐकून प्रतिक्रिया देण्यात
शिन्देसरकार झक्कास परिक्षण.
परिक्षण आवडलं
या विषयावर
’देव’ नाही ’देवळा’त ...
डॉन शी सहमत !
@डॉनसाहेब
’देव’ नाही ’देवळा’त ...
अगदी मनातलं लिहिलंय डॉनराव...
डॉन राव तुमच आणि आमच परीक्षण
करेक्ट ...
छोटा डॉन आणी कीसन
<<तर मग ग्रामीण भागातील
>>एक नंबर!! अगदी अगदी !!!
तर मग ग्रामीण भागातील लोकांना
'वाजले की बारा' मध्ये रेडीमेड
खुपच छान परीक्षण.....
आज देऊळ चित्रपट पहिला , वरच
मानसिकता पटली नै..