✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

..

प
प्रियाली यांनी
Sat, 07/12/2008 - 02:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17391 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

व
वाचक Sun, 07/13/2008 - 01:54 नवीन

प्रयत्न करतो

आपल्या कथेतील वाक्य पहा "त...तिचे डोळे बघ. लाल लाल..बाहेर आलेले...आणि ती जीभ बघ कशी लपकन बाहेर येते. मला खूप भीती वाटते." ह्या वाक्यातून माझा असा समज (का कोण जाणे) झाला होता की ह्यामागे काही तरी पार्श्वभूमी आहे (असावी) कारण तुमचे म्हणणे बरोबर आहे की पालीची बर्‍याच मोठ्या माणसांनाही भिती वाटते पण ती ३भिती - पालीला हाकलणे अथवा मारणे, हात लावणे इत्यादी 'कृतीं' बद्दल प्रामुख्याने असते आणि त्यातही 'किळस' ह्या संकल्पनचेचा भाग जास्त असतो. सर्व सामान्य मोठ्या माणसांना 'पाल माझ्याकडे बघते आहे' किंवा 'मला खायला/चावायला/गिळायला येईल' अशा स्वरुपातली ती भिती नसते (नसावी). ह्या वरील गृहितकावर मला वाटले की 'गबाळ्याच्या भूतकाळात पालीशी किंवा तत्सम प्राकाराशी निगडित काही भीषण आठवण आहे'. "कथालेखिकेचा एकंदर आवाका..." तुमचे ह्याआधीचे बरेच लिखाण मी वाचले आहे. 'कथा' विभागात सर्वात प्रथम स्मरते ती 'एका रिकाम्या पडलेल्या गावाची गोष्ट (नेमके नाव आत्ता आठवत नाही)'. त्या कथेत सुरेख वातावरण निर्मिती आणि पूर्णपणे अनपेक्षित अशी कलाटणी होती - इतकी की कलाटणी वाटूही नये. त्या सफाईचा वरील कथेत थोडासा अभाव जाणवला - कारण अंदाज बांधता येत होता (अगदी अचूक तपशिलात नव्हे...). अर्थात हे माझे वैयक्तिक मत (आणि माझे स्वताचे साहित्यिक कतृत्व (? कसा लिहायचा) काहीच नसल्यामुळे त्या मताला फारशी किंमत देण्याचेही काहीच कारण नाही).
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 07/13/2008 - 02:20 नवीन

धन्यवाद

वरील गृहितकावर मला वाटले की 'गबाळ्याच्या भूतकाळात पालीशी किंवा तत्सम प्राकाराशी निगडित काही भीषण आठवण आहे'
तुमचे म्हणणे बरोबर आहे. गबाळ्याची भीतीही इतर सामान्य माणसांप्रमाणे नाही. ती तशी असती तर तो जीव घेऊन पळाला नसता. त्याच्या भीतीमागे काही मनोविकार, भूतकाळातील घटना घडलेल्या असाव्यात (किंवा नसाव्यात). माझ्या माहितीतील एक बाई होत्या (बाई म्हणजे त्यांना चांगली दोन मोठी मुले होती) त्यांना मांजर पाहिले की थरथर कापायला होई. दातखिळी बसल्यासारखे होई पण असे का व्हावे याचे कारण त्यांना माहित नव्हते. खोदून विचारले तरी सांगता येत नव्हते. एखाद्या माणसाचे असे का होत असावे हे सांगता येत नाही परंतु त्याच्या किळसेची तीव्रता ही इतरांपेक्षा अतिशय जास्त असू शकते. या लघुकथेत हा भाग आलेला नाही कारण गबाळ्या शाळेत नवा आहे, नायिकेला त्याच्याबद्दल माहिती नाही.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत (आणि माझे स्वताचे साहित्यिक कतृत्व (? कसा लिहायचा) काहीच नसल्यामुळे त्या मताला फारशी किंमत देण्याचेही काहीच कारण नाही).
तुम्ही भूलनगरी वाचली असावी. तिचा बाज वेगळा. त्यामानाने ही कथा एकांगी आहे कारण अगदी शेवटचा परिच्छेद सोडला तर ती १२-१३ वर्षांच्या कथानायिकेच्या अनुभवात आणि शब्दांत बांधलेली आहे. बाकी, मत देण्यासाठी साहित्यिक कर्तृत्व असायला पाहिजे असे काही नाही. वाचक या नात्याने तुम्हाला खटकलेली गोष्ट सांगायची मुभा असायलाच हवी आणि आहेच आणि त्याबद्दल मी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 07/13/2008 - 03:54 नवीन

कथा आवडली

प्रियाली, कथा मस्त आहे. शेवटचा धक्का पर्फेक्ट. तुझ्या कथांमधून धारपांपेक्षा मतकरींची जास्त आठवण येते. ते कुठल्याही तथाकथित आणि नेहमीच्या गूढकथांमधे वापरण्यात येण्यार्‍या संज्ञा आणि कल्पना न वापरता मस्त इफेक्ट आणतात. तुला जमली आहे ती स्टाईल. गबाळ्याचा मृत्यू झाल्यावर मी विचार करत होतो की खरंच असं झालं होतं का? पण शेवट वाचल्यावर कळले... बाकी, तुला भयाली हे नाव पण शोभून दिसेल. बिपिन.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 07/14/2008 - 11:24 नवीन

जबरदस्त

प्रियाली, जबरदस्त कलाटणी दिलीत दुसर्‍या भागात. अचानक अंगावरच आली कथा. हे असं खरच घडूही शकतं.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 07/14/2008 - 12:03 नवीन

मस्त

कथा आवडली .. कथानायिकेला जसा गबाळ्या पालीच्या ठिकाणी दिसतो तसेच गबाळ्याला पण कुणी दिसत असावे का ? असा प्रश्न पडला. असे प्रश्न पडणे, नंतर पण कथेचा विचार करणे, हाच भयकथेच्या यशाचा मापदंड. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 07/14/2008 - 12:25 नवीन

वलय.

मागे वपुंचा "वलय" असाच काहिसा कथा संग्रह वाचनात आला होता. सरळ वाटणा-या कथेचा शेवट काहिसा अनपेक्षीत धक्कयाने होतो असाच एकंदरीत सर्व कथांचा बाज होता.प्रियाली ताइंची गबाळ्या हि कथा सुध्दा त्याच धाटणीची वाटली. ह्या लेखनप्रकाराला "भयकथा" असे नक्कि म्हणता येइल का? (चु.भु.दे.घे.) हा कथासंग्रह वाचूनहि आता दहाएक वर्षे झाली असतिल,तरीहि जाणकारांनी ह्यावर अधिक प्रकाश टाकावा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 07/14/2008 - 12:47 नवीन

सॉल्लिड

मस्त कथा. शेवट अन्-एक्स्पेक्टेड. एकदम गबाळ्याचा अंत का? अपघात वगैरे चाललं असतं. मनस्वी "केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा."
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 07/14/2008 - 14:53 नवीन

धन्यवाद!

नव्याने प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद. अभिज्ञ, अनपेक्षित वळणाच्या सर्वच कथा भयकथा असू शकतील असे नाही. परंतु एखादी कथा वाचून भयनिर्मिती (कथेत किंवा वाचकाच्या मनात) होत असेल तर तिला भयकथा म्हणता यावे. मनस्वी, गबाळ्याचा अंत झाला नसता तर तो छतावर कसा लटकला असता? :) भयकथेसाठी प्रसंगनिर्मिती आहे इतकेच.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 07/14/2008 - 14:59 नवीन

करेक्ट

तर तो छतावर कसा लटकला असता?
बरोबर आहे गं. सही एकदम! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
म
मनिष Mon, 07/14/2008 - 14:58 नवीन

छान कथा...

गोष्ट आवडली! :) गबाळ्याप्रमाणेच कथानायिकेचाही चिरडून मृत्यू झाला असता तर 'करावे तसे भरावे' सारखा प्रिमाईस सिद्ध झाला असत असे उगाचच वाटले. :) - (अघोरी) मनिष
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा