✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

..

प
प्रियाली यांनी
Sat, 07/12/2008 - 02:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17391 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

न
नंदन Sat, 07/12/2008 - 02:55 नवीन

बापरे

एकदम डेंजर कलाटणी! #:S. कथा आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 07/12/2008 - 03:22 नवीन

सहमत

कथालेखिकेच्या पूर्वलौकिकाला जागणारी कथा बरेच दिवसांनी वाचायला मिळाली. फार आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
क
केशवसुमार Sat, 07/12/2008 - 19:07 नवीन

हेच म्हणतो!

प्रियालीताई, एकदम डेंजर कलाटणी! :O कथा आवडली. पण गबाळ्याला मारायला नको होते. :( . अपघाता पर्यंत ठीक आहे.. #:S (अहिंसक)केशवसुमार स्वगतः ही जर सत्य कथा असली तर ह्या ताईं पासून सांभाळून रहायला हवे.. :B तरी बघितलस ना त्या जालसर्वज्ञाचे काय हाल केले ते :T
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रियाली Sat, 07/12/2008 - 19:26 नवीन

केसु

गबाळ्याला मारायला नको होते.
अहो त्याला मारलं नसतं तर डेंजर कलाटणी कशी मिळाली असती? ;) भयकथेत एखाद्याला न मारणे = विडंबनात बाई-बाटली न आणणे. ;)
तरी बघितलस ना त्या जालसर्वज्ञाचे काय हाल केले ते
कोण हो नेमके? नाही, ही सत्यकथा नाही. :) असती तर मात्र शेवट कथानायिकेसारखा नसता झाला. :D (शाब्दिक हिंसातज्ज्ञ)प्रियाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवसुमार Sat, 07/12/2008 - 19:46 नवीन

हा हा हा!!!

भयकथेत एखाद्याला न मारणे = विडंबनात बाई-बाटली न आणणे. ;) हा हा हा .. ह बाकी एकदम खर!! (सहमत)केशवसुमार हे घ्या आमचं बाई बाटली शिवायचे एक विडंबन ;) (निर्लेप)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Sat, 07/12/2008 - 19:58 नवीन

अपघात

असं अपघाताने एखादं विडंबन किंवा भयकथा पडू शकते खरी. ;) तुम्हाला प्रतिसाद तिथेच दिला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 07/13/2008 - 08:42 नवीन

अरे भाड्यांनो

अरे (माझ्या प्रिय मित्रांनो), असे नका रे छळू ! येथील व्यवस्थापनाविषयी आमची निराशा व्यक्त करून आम्ही वाचन मात्र झालो, तेव्हा लगेच प्रियाली ची भयकथा आली. असे नका रे छळू ! चालेल. अम्ही वाचनमात्र नाही आता. पण व्यवस्थापनाशी लढतच राहणार. व्यवस्थापनच्या डोकेदुखीचे कारण बनण्यची जबाबदारी आता तुमची. प्रियाली, कथा छानच आहे. विशेषतः पहिला भाग अत्यंत छान आहे. अर्थात कथा प्रियालीची असल्याने दुसरा भाग काहीतरी गोच करणार ही खात्री होतीच. पण ती गोचही विशेष वाटली नाही यावेळी. जरा विचार करून सांगतो. आणखी मस्त होऊ शकली असती, असे वाटते. - (लेखनमात्र) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
क
केशवसुमार Sun, 07/13/2008 - 13:07 नवीन

वा वा!!

सर्किटशेठ, वाचनमात्र चे लेखनमात्र हे उत्तम.. अभिनंदन!! (वाचकमात्र)केशवसुमार स्वगत१: इतिहासाचा फड आता पुन्हा सुरू होणार 'केश्या' टिंग टिंग टिंग.. (तमाशाप्रेमी)केशवसुमार स्वगत२ व्यवस्थापनच्या डोकेदुखी काय हे सर्किटशेठ, कुठल्याही व्यवस्थापनाला कधी डोके असते का? मग डोकेदुखी कशी होणार? (बुचकळ्यात)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्रियाली Sun, 07/13/2008 - 16:20 नवीन

गोची

धन्यवाद सर्केश्वर. कथा आणि पुनरागमानाबद्दल. :) बाकी, गोचीचं काय घेऊन बसलात? आपण आलात आता सर्वांची पुन्हा गोची. तिच सर्वांत भारी नाही का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
क
केशवसुमार Sun, 07/13/2008 - 12:58 नवीन

तुम्हाला प्रतिसाद तिथेच दिला आहे

प्रियालीताई, (विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक) तिथे अस काही तरी दिसते आहे नक्की काय लिहिले होते? :? (बुचकळ्यात)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Sun, 07/13/2008 - 16:18 नवीन

मनोगताला मिपाचे वाकडे

नक्की काय लिहिले होते?
अहो इतकेच लिहिले होते की मृत्युशिवाय असणारी भयकथा इथे वाचावी. आणि वर भूलनगरीचा दुवा दिला होता. बस्स एवढेच! प्रशासक महाराजांना ते विषयांतर वाटावे याचे नवल वाटते. ती गोष्ट मनोगतावर देऊन वर पूर्वप्रसिद्धी: मिसळपाव असे लिहिण्याची खुमखुमी आली आहे. तसे केले तर आख्खी गोष्टच उडवून टाकतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ट
टारझन Sun, 07/13/2008 - 03:30 नवीन

सहमत

बिच्चार्‍या बाळ्या-गबाळ्याला "फुल्लस्टॉप" नसता दिला तर बरं झालं असंत... त्याला फार फार तर "कॉमा" त टाकल असतं. बाकी तुमच्या कथेत मोड(ट्विस्ट) आणन्याच्या कौशल्याबद्दल दाद घेऊन गेलात .. (केकता कपूर को हरा दिया).. कथा संपल्याची हुरहुर... अवांतर (खरी घटना) : आमच्या शाळेतल्या एका अशाच मूलाची आठवण झाली (कोणी म्हणे तो लवकर जन्मला होता.) सर्व मुले त्याच दप्तर रोज न चुकता कचर्‍याच्या बादलीत टाकत असत. त्याला मागून पोर टपल्या मारत.शाळेतून घरी जायच्या रोडवरून मुले कधी त्याला सरळ चालू देत नसत.त्याल खाली ढकलत. त्यामूळे तो कधी सहलीला पण याचा नाही. त्याच शर्ट रोज शाईने भरवलं जायचं... तो रोजचं गिर्‍हाईक असायचा. त्याची आई नेहमी बिचारी मुख्याध्यापकांच्या केबिन बाहेर तक्रारी साठी बसलेली असायची. त्यात तो ऑलरेडी २ शाळांत असाच त्रास झाला म्हणून आमच्या शाळेत आला होता. या सगळ्यामूळे त्याचा आत्मविश्वासच हरवला होता. आपलाच कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 07/12/2008 - 03:04 नवीन

छान कथा.

पण येवढा डेंजर शेवट का बरे केला? (व्यथित डॅनी) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 07/12/2008 - 03:05 नवीन

बापरे..

सॉलिड कथा.... एकदम अशी कलाटणी मिळेल असं वाटलं नव्हतं.. सुन्न झालं डोकं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 07/12/2008 - 03:27 नवीन

एकदम खतरनाक!

दोन भागांत विभागली हे बरे केले. कलाटणी आणखीन जोरदार झाली. अवांतर : लहान मुलांकडून थोड्याशाच बालसुलभ क्रूरतेमुळे भयंकर हानी होऊ शकते. त्याविषयी काही महिन्यांपूर्वी "अटोनमेंट" नावाचा चित्रपट बघितला. यात एक १२-१४ वर्षांच्या मुलीला आपल्या मोठ्या बहिणीच्या प्रियकराबद्दल हेवा/असूया/राग असे काही वाटते. "हा मुलींना त्रास देतो" असा काही आपल्या मनाचा ग्रह ती मुद्दामून करून घेते. एका परिस्थितीत त्या तरुणावर दुसर्‍या एका मुलीवर बलात्कार केल्याचा खोटा वहीम येतो - पण पुरावा नसल्यामुळे तो सुटणार असतो (वहीम खोटाच असतो.) ही छोटी मुलगी आपण त्या घटनेची साक्षीदार असल्याचे स्वतःला पटवून घेते, आणि पोलिसांना साक्ष देऊन त्याला गोत्यात आणते. तिच्या मोठ्या बहिणीच्या, आणि त्या तरुणाच्या आयुष्याचे वाटोळे होते - त्या क्षणी मात्र "आपण ताईला वाचवले" असे छोटीला वाटते. पण आयुष्यभर ती ते गुपीत मनात धरून अस्वस्थ होते. "ती त्याची काही भरपाई करू शकते का?" असा चित्रपटातला मुख्य संघर्ष आहे. हा चित्रपट २००८ सालच्या ऑस्करसाठी उमेदवार होता.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 07/12/2008 - 03:33 नवीन

धन्यवाद

कथेच्या पहिल्या भागात कथा कोणत्या अंगाने जाणार हे कळू द्यायचं नव्हतं. लहान मुलांच्या बालसुलभ क्रूरतेबद्दल तुम्ही म्हणाला ते अगदी खरं. बर्‍याचदा त्यांना होणार्‍या परिणामांची कल्पना नसते हे सर्वच मान्य करतील पण बरेचदा लहान मुले एखादा अपघात घडला किंवा वाईट घटना घडली तर योग्यप्रकारे रेसिप्रोकेट करतात असे नाही. त्यांना त्यातील गांभीर्य जाणवत नाही किंवा दु:ख, पश्चात्ताप यांची चटकन टोचणी लागत नाही असे पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
स्वप्निल.. Sat, 07/12/2008 - 06:10 नवीन

एकदम भन्नाट....

प्रियाली, प्रमोद देव यांचा लेख वाचल्यानंतर तुमचे लिखाण वाचन्याची इच्छा होतीच्.. त्यातच ही सुंदर कथा..शेवट कलाटणी पन एकदम खासच.... आवडली.... स्वप्निल..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/12/2008 - 06:22 नवीन

!!!

हा गबाळ्या तर भलताच शॉक देऊन गेला !!! (हे सर्व वाचुन सुन्न झालेला) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 07/12/2008 - 07:15 नवीन

प्रियाली इज बॅक

प्रियाली इज बॅक!! तो विषय, ती हातळणी एकदम प्रियाली ब्रँड जरी फारसा आवडत नसला तरी क्रमशः हा शब्द वाचायला मिळाव असं वाटत होत.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 07/12/2008 - 08:46 नवीन

वा..

वा.. बर्‍याच दिवसांनी प्रियाली तुमची कथा वाचायला मिळाली! मेजर धक्का बसला!! आवडली गोष्ट...
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 07/12/2008 - 09:01 नवीन

एकदम सही

एकदम सही कथा !!! अजुन कथा वाचायला आवडेल...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 07/12/2008 - 09:06 नवीन

जबरा....

कथा जबरदस्त झालीये. आपण कथेला जी अनपेक्षित कलाटणि दिलीत ती खासच. आणी जाताजाता भिंतीच्या छताला गबाळ्या पालीसारखा चिकटला होता. त्याचे ते बटबटीत डोळे माझ्यावर रोखलेले होते आणि जीभ मध्येच लपकन माझ्या दिशेने बाहेर येत होती. हे वाक्य तर प्रचंड अंगावर येते.(हि दुसरी कलाटणी म्हणता येइल....) अभिज्ञ
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/12/2008 - 09:16 नवीन

सुंदर कथा

गबाळ्या असह्य तान देऊन गेला. पहिल्या भाग हसरा झाल्यानंतर दुसरा भाग धक्का देणारच, पण तो धक्का कसा असेल याची इतकी अनपेक्षीत कल्पना नव्हती. भिंतीच्या छताला गबाळ्या पालीसारखा चिकटला होता. त्याचे ते बटबटीत डोळे माझ्यावर रोखलेले होते आणि जीभ मध्येच लपकन माझ्या दिशेने बाहेर येत होती. झपाटणारी लेखन शैली, आणि सुंदर कथा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 07/12/2008 - 09:27 नवीन

सुंदर कथा !!!

झपाटणारी लेखन शैली, आणि सुंदर कथा !!!
असेच म्हणतो!! धक्का अतिशय अनपेक्षित होता. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चतुरंग Sat, 07/12/2008 - 09:26 नवीन

प्रियाली, फारच उत्कंठावर्धक आणि घडीव कथा.

मतकरींच्या कथेची आठवण झाली. रत्नाकर मतकरींच्या भयकथा मी मन लावून वाचत असे. भीतीतर वाटायचीच पण त्याचीच एक अनामिक ओढही वाटायची. तितक्याच ताकदीची शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा खूप दिवसांनी वाचली. उत्तम कथेबद्दल अभिनंदन! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 07/12/2008 - 15:04 नवीन

रत्नाकर मतकरींच्या कथा

रत्नाकर मतकरींच्या भयकथा मी मन लावून वाचत असे. भीतीतर वाटायचीच पण त्याचीच एक अनामिक ओढही वाटायची.
मलाही, कधीतरी ऑर्कुटवर कोणीतरी टाकली तर एखादी वाचली असावी परंतु गेल्या अनेक वर्षांत मतकरींच्या कथा वाचायला मिळाल्या नाहीत याची रूखरूख वाटते. माझ्या अतिशय आवडीचा प्रकार किंवा त्यांच्या कथांमुळेच गूढकथा हा प्रकार मला लिहायला आवडतो असे म्हटले तर चालेल.
मतकरींच्या कथेची आठवण झाली. तितक्याच ताकदीची शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा खूप दिवसांनी वाचली.
नाही हो, तेवढा सराईतपणा यायला अद्याप अवकाश आहे परंतु तुमचा प्रतिसाद सुखद वाटला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Sat, 07/12/2008 - 09:26 नवीन

धक्काच..

गबाळ्याचं ऐकून धक्काच बसला! कलाटणी लै भारी.... कथामांडणी अतिशय सुरेख अन् ओघवती... आपला, (प्रियालीचा फ्यॅन आणि मित्र) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 07/12/2008 - 09:28 नवीन

स्पूकी..

हॅलोवीन तर अजून लांब आहे..!! अंदाज चुकले! पण शेवट जबरदस्त..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 07/12/2008 - 10:33 नवीन

कल्पनेतले

कल्पनेतले असले तरी स्वभावाचे चपखल प्रतिबिंब आले आहे कथेत. वात्रट॑पणामुळे आणि अगोचरपणामुळे झालेल्या गुन्ह्याची टोचणी निर्मळ असो वा नसो मनाला नेहमीच डाचत असते. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 07/12/2008 - 10:38 नवीन

जबरा

कथा आहे. आधीचा भाग वाचल्यावर ह्या भागात असलेली कलाटणी जास्तच जबरा होती. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 07/12/2008 - 11:24 नवीन

योगायोग?

प्रियाली च्या कथा वाचायच्या नाहीत असे ठरवले होते. पण रहावले नाही आणि वाचली. 'वास्तविक' हा 'योगायोग' आहे. मला पालीची भीती वाटत नाही पण आता...प्रियालीची वाटु लागली आहे. (भयभीत!) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 07/12/2008 - 11:26 नवीन

(भयभीत!) प्र

(भयभीत!) प्रकाश घाटपांडे =)) =)) =)) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
स
साती Sat, 07/12/2008 - 14:16 नवीन

आवडली

कथा आवडली. साती
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Sat, 07/12/2008 - 14:29 नवीन

शोकिंग

बापरे घाबरलेच मी. खिळवुन ठेवणारी कथा आहे.. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Sat, 07/12/2008 - 14:44 नवीन

मस्त

नमस्कार, खूपच छान्. एकदम गिरकी घेउन वळते ही गोष्ट. आवडली. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 07/12/2008 - 15:07 नवीन

आभारी आहे

मध्यंतरी बराचकाळ इतर कामांत गुंतलेली असल्याने ही कथा अर्धवट लिहून बासनात बांधून ठेवली होती. ;) ती कालपरवा पूर्ण केली तेव्हा ती वाचकांना आवडेल का नाही याबाबत शंका होती. कथा आवडली असे प्रतिसादातून आणि इतरत्र कळवणार्‍या सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Sat, 07/12/2008 - 17:11 नवीन

भयाली

या आपल्या 'त्या' जगातल्या नावाला साजेशी कथा! आता कुठे पाल दिसली की ही कथा आठवणार हमखास!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 07/12/2008 - 17:25 नवीन

बारसं

या आपल्या 'त्या' जगातल्या नावाला साजेशी कथा!
माझं "त्या" जगात बारसं करण्याबद्दल धन्यवाद. ;)
आता कुठे पाल दिसली की ही कथा आठवणार हमखास!
ये हुई ना बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
प
प्रकाश घाटपांडे Sun, 07/13/2008 - 08:30 नवीन

भयाली

अरे "भयाली" हे तर एकदम समर्पक नाव. आता हेच नाव फिट्ट डोक्यात बसले. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
भ
भडकमकर मास्तर Sat, 07/12/2008 - 17:49 नवीन

कथा आवडली..

कथा आवडली.. योग्य जागी दोन भाग केले आहेत..) पहिल्या भागात अजिबातच अंदाज आला नाही.. . ( आता तो गबाळ्या डॅशिंग काम करणार , हीरॉईनला संकटातून सोडवायचं वगैरे आणि "दिसतं तसं नसतं " टायपातला प्रेमाईस प्रूव्ह करणार असल्या भ्रमात असल्याने अधिकच मजा आली कथेला...) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 07/12/2008 - 19:38 नवीन

येस्स येस्स. मलाही तेच वाटले होते..

आता तो गबाळ्या डॅशिंग काम करणार , हीरॉईनला संकटातून सोडवायचं वगैरे आणि "दिसतं तसं नसतं " मला पण असेच वाटले होते. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ए
एकलव्य Sat, 07/12/2008 - 18:11 नवीन

@

जबरदस्त!
  • Log in or register to post comments
स
सखी Sat, 07/12/2008 - 19:39 नवीन

कथा आवडली

प्रियाली कथा आवडली. कलाटणी तर जबरदस्तच, काहीतरी वेगळे घडणार असे वाटते होते, पण अंदाज लावता आला नाही. शाळेतले वातावरण, बाई, दंगा करणारी मुले हे सर्व खूप वर्षे मागे घेऊन गेले; तरीही गबाळ्याला सर्वांनी अगदी टोकाला नेऊन, घुसमट होइस्तोवर चिडवले असे वाटते. कुठेतरी वाचल्याचे आठवते की असेच एका मुलाला बाकीची मुले रोज चिडवत असतात, शेवटी तो ताण असह्य होऊन तो एकदिवस सगळ्यांवर बेछूट गोळीबार करतो. गबाळ्या अस्वस्थ करुन गेला, हे मात्र खरे. 'भयाली' नाव तुला अगदी समर्पक आहे :)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 07/12/2008 - 19:42 नवीन

ज ... ब... रा !!!

आधी जेव्हा पहिला भाग वाचला तेव्हा कथा विनोदी अंगाकडे जाणारी वाटली. त्याव्र प्रतिक्रीया देण्याच्या आधीच दुसरा भाग. दुसरा भाग एकदम सुन्न करणारा, अगदी अनपेक्षीत. कदाचित हेच आपल्या "कथालेखनाचे यश" ... खरोखर दुसरा भाग धक्का देऊन गेला ... बाकी चतुरंगशेठ म्हणतात तसे "रत्नाकर मतकरींची" खरेच आठवण झाली. असो. अगदी छान .... अवांतर : आधीच कल्पना दिली असली तरी विचारतो "असा प्रसंग आपल्या पहाण्यात आहे का ?". नाही म्हणजे, प्रेरणा कशी मिळाली ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 07/12/2008 - 19:57 नवीन

प्रेरणा

१) रत्नाकर मतकरींची एक जुनी कथा आहे. मला अगदी बरोब्बर नाव आठवत नाही पण "मला विक्रम दिसतो" अशा काहीशा नावाची आहे. ती वेगळ्या अंगाने जाते परंतु कथेच्या नावावरून ही कथा सुचली. २) अशा प्रकारचा थोडासा भित्रा मुलगा आमच्या वर्गात होता आणि १ली ते १०वी आमच्या वर्गातच होता. कधीतरी २री तिसरीत आम्ही त्याला "ही बघ पाल दिसत्ये भिंतीवर" म्हणून घाबरवत असू, बाकी काही नाही. ;) महाशय सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीत भारी मोठ्या पोस्टवर असल्याचे ऐकून आहे.
बाकी चतुरंगशेठ म्हणतात तसे "रत्नाकर मतकरींची" खरेच आठवण झाली.
याबद्दल खरंच धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Sat, 07/12/2008 - 20:03 नवीन

अजुन एक सांगतो ...

हा कथेचा साज परिचयाचा आहे, असे लिहणे म्हणजे खरेच ताकतीचे काम आहे. आपण ते समर्थपणे पेलले ... मी जर जास्त चुकत नसेन तर "नारायण धारपांच्या" काही कथांचा साज असाच आहे. फक्त आपल्यात व त्यांच्यात फरक असा की तिथे अंदाज असतो की "शेवट" कसा असणार आहे व इथे अगदी "अनपेक्षीत". >>महाशय सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीत भारी मोठ्या पोस्टवर असल्याचे ऐकून आहे. हे पण "अनपेक्षीत" च ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Sat, 07/12/2008 - 20:09 नवीन

नारायण धारप

कथेत साधुपुरूष, समर्थ इ. आणून त्यातील वास्तव टाळतात त्यामुळे त्यांच्या कथांचा शेवट अपेक्षित होऊन जातो. रत्नाकर मतकरींच्या कथांत जे वैविध्य आहे किंवा वेगळ्या मितीतून जग दाखवण्याची कला आहे तिथे धारप कमी पडतात. मला धारप कथा ही आवडतात पण मतकरींच्या अधिक आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
वाचक Sat, 07/12/2008 - 21:23 नवीन

कलाटणी तपशिलामुळे 'अनपेक्षित' वाटली तरी

असे काहीतरी होईल ह्याचा थोडा अंदाज आलाच होता. शैली आणि मांडणी चांगली झाली आहे. अर्थात सातवीतला मुलगा 'पालीला' एवढा का घाबरत होता (तपशिलातील वर्णनामुळे तर अजूनच) ह्याची काही पार्श्वभूमी सांगितली गेली असती तर अजून थोडा 'उठाव' आला असता कथेला असे आपले माझे मत. अवांतर (आणि फुकटचा सल्ला): कथालेखिकेचा एकंदर आवाका लक्षात घेता 'मुद्दाम धक्कातंत्राचा' वापर टाळावा अशी एक अनाहूत सूचना
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 07/12/2008 - 22:25 नवीन

धन्यवाद

सर्वप्रथम प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अर्थात सातवीतला मुलगा 'पालीला' एवढा का घाबरत होता (तपशिलातील वर्णनामुळे तर अजूनच) ह्याची काही पार्श्वभूमी सांगितली गेली असती तर अजून थोडा 'उठाव' आला असता कथेला असे आपले माझे मत
पालीला घाबरण्यासाठी वयाची अट नसते. अनेक प्रौढ माणसेही पाली, उंदीर, झुरळ यांना घाबरतात. त्यापाठी काही सबळ इतिहास किंवा घटना असतेच असे नाही. किळस ही एकच भावना पुरेशी आहे. तसेच, संपूर्ण गोष्ट ही एका सातवीतल्या मुलीच्या नजरेतून मांडलेली आहे. त्यामुळे वर्गात नवीन आलेल्या मुलाची पार्श्वभूमी अनावश्यक आहे असे माझे मत.
कथालेखिकेचा एकंदर आवाका लक्षात घेता 'मुद्दाम धक्कातंत्राचा' वापर टाळावा अशी एक अनाहूत सूचना
याबद्दल विस्ताराने सांगावे, विशेषतः कथालेखिकेचा एकंदर आवाका लक्षात घेता या वाक्याबद्दल. कथेशी संबंधीत नसल्यास खरडही चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक
च
चकली Sat, 07/12/2008 - 21:53 नवीन

कथा आवडली

खूप दिवसांनी भयकथा वाचली. मला रत्नाकर मतकरींच्या कथा आवडतात. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा