✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

Sonar Of Thoughts

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Wed, 10/12/2011 - 19:43  ·  लेख
लेख
Sonar of Thoughts ! जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि त्यात बुडालेली ही मुलगी. मी काढलेला एक फोटो, गोव्यात. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (Oxford : Ghalib Life & Letters हे पुस्तक).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही. :-) जयंत कुलकर्णी
  • Sonar Of Thoughts -काय झाले होते त्या दिवशी..........भाग -२...
  • Sonar Of Thoughts - भाग - ३. लिमाउजेट यांचे अभिनंदन. :-)

Book traversal links for Sonar Of Thoughts

  • Sonar Of Thoughts -काय झाले होते त्या दिवशी..........भाग -२... ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
32564 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/13/2011 - 21:17 नवीन
मस्त. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

सूर्यबिंबाविन क्षितिजावरती

गणेशा
गुरुवार, 10/13/2011 - 16:30 नवीन
सूर्यबिंबाविन क्षितिजावरती दाटलेला मेघकल्लोळ ... पुसट तुझ्या वाटेवरती, भासांचाच फक्त लोळ ... सरसरत्या मोहक क्षणांचा साठलेला पर्णकल्लोळ ... आठवांच्या अभिषेकास, आसवांची नाजुक ओळ ... नजरेच्या आकाशावरती थरथरलेला भावकल्लोळ ... भिजलेल्या समुद्रावरती, सैरभैर विचारांची टोळ ... ----- शब्दमेघ
  • Log in or register to post comments

झक्कास... फक्त तो "लोळ" शब्द

धन्या
गुरुवार, 10/13/2011 - 17:07 नवीन
झक्कास... फक्त तो "लोळ" शब्द मात्र खटकला. लोळ म्हटलं की आगीचा लोळ आठवतो. आणि इथं विझल्याची भावना आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

वाटेवरती उडणार्‍या

गणेशा
गुरुवार, 10/13/2011 - 17:13 नवीन
वाटेवरती उडणार्‍या धुळीस-फुफाट्यास पण लोळ च म्हणतात ना ? मला तसे वाटले म्हणुन लोळ शब्द लिहिला.. तसे नसेल तर शब्द बदलला जाईन
  • Log in or register to post comments

माझी एक कविता , पण ती आधी

मनीषा
गुरुवार, 10/13/2011 - 17:33 नवीन
माझी एक कविता , पण ती आधी लिहिलेली आहे. हे छायाचित्र पाहताना मला ती आठवली ... पानावर हिरव्या ओल्या थेंब हळू थरथरतो आकाशी मेघ काळा मग दूर दूर जातो । लाटांवर सळसळतो गर्द केशरी वर्ख अन मनातही उपजतो आठवांचा विखारी डंख । थबकते सांज क्षणभर निळसर जलाशयावर हळुवार एक उसासा निसटतो तप्त धरेतून । चमकतो गगनी तारा अन शीळ घुमवितो वारा डोळ्यात माझ्या अवचित झाकोळ कुठुनसा येतो ।
  • Log in or register to post comments

आपण केलेली आहे ना मग हरकत

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 10/13/2011 - 20:44 नवीन
आपण केलेली आहे ना मग हरकत नाही जूनी असली तरीही. मी हा फोटो का घेतला, तेव्हा काय झाले होते हे मी सर्व नंतर लिहीणार आहे. पण एक सांगतो सगळ्यांच्या भावना अत्यंत त्याच आहेत ज्या त्या तरूणीच्या मनात होत्या......किंवा असतील. याला म्हणतात विषयाची एकरूप होणे........ छान कविता. उत्तम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

'पण एक सांगतो सगळ्यांच्या

५० फक्त
Fri, 10/14/2011 - 09:51 नवीन
'पण एक सांगतो सगळ्यांच्या भावना अत्यंत त्याच आहेत ज्या त्या तरूणीच्या मनात होत्या.' हे जर माझ्या कवितेविषयी असेल तर मला एक पेश्शल बक्षिस पायजेल त्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

आम्ही तुम्हाला एक पेशल बक्षीस

जयंत कुलकर्णी
Fri, 10/14/2011 - 10:39 नवीन
आम्ही तुम्हाला एक पेशल बक्षीस देऊ पण ते यासाठी नाही................... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

वा वा!

पैसा
गुरुवार, 10/13/2011 - 18:48 नवीन
या निमित्ताने मस्त काव्य कट्टा झाला हा!
  • Log in or register to post comments

पाहता खोल डोहात, मोती जरी

कवितानागेश
गुरुवार, 10/13/2011 - 20:49 नवीन
पाहता खोल डोहात, मोती जरी मिळाले, या कातळास माझ्या, सजवू कसे परी मी. थांबले मेघ तिथेच, नभ अचंबित पाहे, डोळ्यास रुक्ष माझ्या, भिजवू कसे परी मी.
  • Log in or register to post comments

माझे काम अवघड होत चाललेले

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 10/13/2011 - 20:54 नवीन
माझे काम अवघड होत चाललेले आहे. बहुदा मला ते कोणातरी तज्ञ व्यक्तीला द्यावे लागणार असे दिसते. असो. तसेही करता येईलच......... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आपण दोघेच असायचो जेव्हा

शानबा५१२
गुरुवार, 10/13/2011 - 22:21 नवीन
आपण दोघेच असायचो जेव्हा इथे, तेव्हा समुद्रात वादळे असायची. आज समुद्रही शांत अन तूही नाही आहेस, पण मनात वादळे उठलेत.
  • Log in or register to post comments

चारोळी छान ! उठली आहेत असे

जयंत कुलकर्णी
Fri, 10/14/2011 - 08:51 नवीन
चारोळी छान ! उठली आहेत असे पाहिजे होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

अप्रतीम फोटो आणि त्या

jaypal
गुरुवार, 10/13/2011 - 23:06 नवीन
वरील कविता सुध्दा. हा फोटो बघत बघत २/३ वेळा शोभाताई घुरटुंची " माजीया प्रियाला प्रीत कळेना" ऐकली आणि अजुनही मस्तपैकी संमोहीत झाल्या सारख वाटतय सगळ्यांचे धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

ज्ञानेश...
गुरुवार, 10/13/2011 - 23:52 नवीन
जयंतराव, फारच सुरेख फोटो आहे ! हॅट्स ऑफ !! कविता वगैरे सुचणे कठीण आहे, पण हे वाचल्यानंतर माझ्याच काही ओळी आठवल्या- "अवेळी अशा आज कोणाकडे जायचे? कुठे घेऊनी आपले हे रडे, जायचे? मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली.. तरीही कुठे थांबले हे तडे जायचे... तळ्याएवढा शांत मीही तटी व्हायचो, तरी स्तब्ध पाण्यात काही खडे जायचे !!"
  • Log in or register to post comments

// मनाची कितीदातरी भिंत मी

जयंत कुलकर्णी
Fri, 10/14/2011 - 08:55 नवीन
// मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली.. तरीही कुठे थांबले हे तडे जायचे...// आवडले. कितीही लिंपा तडे हे जातातच. नाहीतर ओलावा संपत आल्यावर, असलेले हे मोठे होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

उफ़क पर एक शाम का सितारा सिर्फ़ रह जाएगा..

वाहीदा
Fri, 10/14/2011 - 00:10 नवीन
समंदर की गहराई .. उदासी का मंजर.. चुप सा यह आसमान.. आश्ती चारोओर और यह सैलाब मेरे दिलमें ! ले चल तू मुझे दूर कहीं.. उछलती हुए मछलीयोंकी तरह... ए जिंदगी, सिमटले तू मुझे अपनी आगोश मे, पिछे छुट जायेंगे यादोंके भंवर, हट जायेंगें यह काले बाद्ल थम जाएगी यह रात यहीं उफ़क पर एक शाम का सितारा सिर्फ़ रह जाएगा.. एक नया सवेरा, एक नया उजाला लिए लेकर आएगी एक सुबह नवेली जाना हैं मुझे उस पार.. राह दिखायेंगी मुझे यहीं सोच नई (आश्ती : शांती, सैलाब : वादळ, उफ़क : क्षितीज आगोश : आलिंगन) ~ वाहीदा काझी (उर्दू-हिंदीत लिहील्याबध्दल दिलगीरी कारण तेच पटकन सुचले )
  • Log in or register to post comments

बहोत खुब वाहीदा! आप तो बडी

अनामिक
Fri, 10/14/2011 - 00:59 नवीन
बहोत खुब वाहीदा! आप तो बडी छुपी रुस्तुम निकली!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

लाख रुपये कि बात!!!

अभिजीत राजवाडे
Fri, 10/14/2011 - 02:28 नवीन
क्या बात है वाहिदा. अत्यंत भावपुर्ण, अर्थमय तरल कविता. एखाद मस्त गाण एकताना जी मजा येते अगदी तसच वाटल. आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

उत्तम

तिमा
Fri, 10/14/2011 - 18:04 नवीन
वाहीदाजी, सुंदर कविता लिहिली आहे आपण. उर्दुमुळे एक वेगळेच वजन येते काव्याला. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

मस्त!

मन१
Fri, 10/14/2011 - 22:00 नवीन
आवडले. वरची मनीषाचीही कविता आवडली.(बाय द वे उर्दुत लिहिलेल्या प्रकाराला कविता म्हणता येते का?) एकूनातच नुस्ता फोटो देउन एकाहून एक लिहायला लावणार्‍या जयंतरावांची कल्प्नाही भन्नाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

धन्यवाद !

वाहीदा
Fri, 10/14/2011 - 22:52 नवीन
बाय द वे उर्दुत लिहिलेल्या प्रकाराला कविता म्हणता येते का? उर्दूत कवितेला नज्म(Nazm) म्हणतात . बाकी जयंत सरांची कल्पना खरंच भन्नाट , मला तर सगळ्यांच्याच कविता आवडल्या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

आणखी एक कविता.

अभिजीत राजवाडे
Fri, 10/14/2011 - 02:30 नवीन
मी आणखी एक कविता सादर करत आहे. अभिप्राय कळवावा हि विनंती. Image removed.
  • Log in or register to post comments

अभिजीत जी तुमच्या काव्यचित्र

गणेशा
Fri, 10/14/2011 - 10:32 नवीन
अभिजीत जी तुमच्या काव्यचित्र मला दिसत नाहि हो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत राजवाडे

आता दिसत॑य का?

अभिजीत राजवाडे
Fri, 10/14/2011 - 17:07 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

वाहिदा जी, बहार आणलीत!

बहुगुणी
Fri, 10/14/2011 - 02:51 नवीन
उस बेहेतरीन तस्वीर को चार चांद लगा दिये आपके लफ्ज़ोंने! तुमच्या शब्दांचंच हे स्वैर मराठी रुपांतरः Image removed.
  • Log in or register to post comments

नवाजिशे-करम !!

वाहीदा
Fri, 10/14/2011 - 22:57 नवीन
बहुगुणीकाका, जयंत सर, अनामिक, अभिजीत राजवाडे,तिरसिंगराव घाणेकर, मनोबा खरंच मनापासून आभार ! बहुगुणी काका तुम्हीच माझ्या नज्म ला चार चांद लावले , तिचे स्वैर मराठी भाषांतर मस्तच ! यह तुम्हारी नवाजिशे-करम, जो मेरे नज्म को चार चांद लगा दिए वरना इस नाचीज को कोई इतनी आसानी से समझ न पाता.... शुक्रिया !! नवाजिश : kindness करम : favour , generosity नाचीज : तुच्छ , petty, trivial
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

माझ्या चारोळी

प्रिया ब
Fri, 10/14/2011 - 09:16 नवीन
दूर दूर वर काहीच दिसत नाही.... दिसत आहे फक्त निळंशार पाणी... टक लावून बसले आहे मी तुझ्या वाटेकडे विश्वास आहे मला येशील तू परत जरी असशील क्षितिजापलिकडे.. ~~ प्रिया
  • Log in or register to post comments

नकोच हे जीवन....

प्रभाकर पेठकर
Fri, 10/14/2011 - 09:58 नवीन
कसा घसरला पाय? का न आवरले संस्कारांनी? तूही फिरविलीस पाठ कलंकिनी ठरविले समाज नजरांनी. हा अथांग सागर, घेई सामाऊन आज मजला, भरले नयन आकाशाचे, असहाय्य वाटे आज त्याजला. खंबीर हा पत्थर पाठीशी, परंतु निश्चल, निरुपयोगी ह्या क्षणाला ढाळेल चार अश्रू तोही कळली जर मम व्यथा त्याजला जाते सोडून जग हे, नकोच ती स्वार्थी नाती, विषण्ण, उद्विग्न मन माझे, विझेल ज्योत अन उरेल कृष्ण वाती.
  • Log in or register to post comments

वहिदा, ज्ञानेश, प्रभाकर,

गणेशा
Fri, 10/14/2011 - 10:31 नवीन
वहिदा, ज्ञानेश, प्रभाकर, शानबा आल्या आल्या तुमचे लेखन वाचायला मिळाले आज. अप्रतिम लिहिलेले आहे. वहिदा खुपच उत्तुंग काव्य .. गविंच्या कवितेनंतर या थीम वर तुमची कविता सर्वात जास्त भावली... प्रभाकर जी, मला वाटते या धाग्यावर तुम्हीच पहिली कविता लिहिली आहे , ती पुर्ण मोठी लिहिना अजुन.. छान आणि वेगळेच शब्द आहेत त्यात...
  • Log in or register to post comments

मी प्रेमवेडी....

प्रभाकर पेठकर
Fri, 10/14/2011 - 14:22 नवीन
तुम्हीच पहिली कविता लिहिली आहे , ती पुर्ण मोठी लिहिना अजुन.. प्रयत्न करतो आहे आवडल्यास प्रतिसादावे.. ----oOo---- मी प्रेमवेडी दिलास आधार प्रथम जीवनी, पुलकित झाले किती मन्मनी, तूझीच झाले प्रथम प्रथमदर्शनी, सुवर्णप्रेम तव विश्वास मनी. दिल्या-घेतल्या प्रेमशपथा, किती बांधले मनात इमले, सख्या म्हणाल्या प्रेमवेडी मी अन्, किती प्रेमवीर दु:खात बुडाले. फुले बहरली प्राजक्तांची, ओंजळ भरली प्राजक्तांनी, प्राजक्तांची प्रसन्नता मज, प्राजक्तांनी अर्पण केली. असा कसा रे बदललास अचानक.... असा कसा रे बदललास अचानक, मोहात कुणाच्या गुंतलास अचानक, तुझीच होते, तूझी न राहिले, क्षणात सारे प्रेमविश्व जळाले. आज ह्या क्षणी.... क्रुद्ध वादळे मनात साही, एकही नौका सागरात नाही, नसे कुणाची साथ आज ही, अशी कशी ही करूण भैरवी... अशी कशी ही करूण भैरवी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

एक जुनी कविता येथे देण्याचा

गणेशा
Fri, 10/14/2011 - 11:04 नवीन
एक जुनी कविता येथे देण्याचा मोह होतो आहे पुन्हा ! सागराचे नीर दर्पण | विखुरले नभांकण | वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत || ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत || धरणीची ग्लान झोप | मेघांचे सूरेल गीत | उसवले श्वासधागे | अंतरात || छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप | शब्दांध झाली आसवे | आठवात || ---- शब्दमेघ
  • Log in or register to post comments

मला एकदम ३ कविता सुचल्यात...

योगप्रभू
Fri, 10/14/2011 - 11:09 नवीन
तुमच्या विनंतीला मान देऊन मी एकदम मला स्फुरलेल्या ३ कवितांच्या पहिल्या दोन ओळी टाकतोय. त्या आवडल्यास आख्खे काव्य टाकण्याचीही माझी तयारी आहे. तेवढं पुस्तकाचं लक्षात असू द्या. :) १) जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहाते २) सागर किनारे दिल ये पुकारे तू जो नही तो मेरा कोई नही है ३) मै एक सदी से बैठी हूं इस राह से कोई गुजरा नहीं
  • Log in or register to post comments

तुमच्या स्पर्धेत मीही

जयंत कुलकर्णी
Fri, 10/14/2011 - 11:29 नवीन
तुमच्या स्पर्धेत मीही आहे............. यूँ न रह रह कर हमें तरसाईये आइये आ जाईये आ जाईये... फिर वही दानिस्ता ठोकर खाईये.. फिर मेरी आग़ोश में गिर जाईये मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी अपनी दुनिया छोड़ कर आ जाईये ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी जी में आता है यहीं मर जाये -सागर निझामी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

ने

प्रचेतस
Fri, 10/14/2011 - 11:32 नवीन
ने मजसी ने परत मातृभूमीला... सागरा प्राण तळमळला, तळमळला. सागरा... --स्वातंत्र्यवीर सावरकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

हो एका दृष्टीने हे ही बरोबर

जयंत कुलकर्णी
Fri, 10/14/2011 - 11:33 नवीन
हो एका दृष्टीने हे ही बरोबर आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ह्या धाग्यावर पैला प्रतिसाद

वपाडाव
Fri, 10/14/2011 - 16:12 नवीन
ह्या धाग्यावर पैला प्रतिसाद आहे.....कवितेचा प्रयत्न उद्यापर्यंत करतो..... पण मला एक गाणे आठौले ते म्हणजे.... तु बिन बताये मुझे ले चल कहीं, जहां तु मुस्कुरायें मेरी मंझिल वहीं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

योगप्रभू मान गये तुम्हे !!

वाहीदा
Fri, 10/14/2011 - 23:22 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

शुक्रिया!

योगप्रभू
Sat, 10/15/2011 - 10:58 नवीन
वाहिदाजी, माझ्या प्रतिसादातील गंमत समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. हसण्यासाठी जन्म आपुला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

जयंत सर, माझा अजुन एक

५० फक्त
Fri, 10/14/2011 - 12:52 नवीन
जयंत सर, माझा अजुन एक प्रयत्न, थोडासा दुबळा आहे मान्य, पणं समोर दिसणा-या चौकटी तोड्ण्याचा छंदच लागलाय हल्ली. इथंच बसले होते आई बाबा मि मागच्या बागेत झोक्यावर मोठा आला वारा तेंव्हा माझ्या झोक्याएवढा बरोबर एक उंच लाट .............................. मी केवढी ओरडले होते त्या लाटेकडे बघुन जी गेली माझ्या... आई बाबांना घेउन किती वर्षे झाली मला इथं येउन बसते तीच लाट पुन्हा एकदा येईल म्हणुन फसते येणा-या प्रत्येक लाटेला एकच निरोप देते आई बाबाना परत आणा नाहीतर मी येउ का तिथे ............
  • Log in or register to post comments

(No subject)

गवि
Fri, 10/14/2011 - 12:59 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१०००

वाहीदा
Fri, 10/14/2011 - 23:05 नवीन
आईग्ग्ग ५०फक्त, तुमच्या कविताने अगदी काळीजच पिळवटून टाकलं :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अतिशय तरल आणि भावस्पर्शी

प्रचेतस
Fri, 10/14/2011 - 13:17 नवीन
अतिशय तरल आणि भावस्पर्शी कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

वेगळा विचार व चित्र रंगवलेले

जयंत कुलकर्णी
Fri, 10/14/2011 - 13:24 नवीन
वेगळा विचार व चित्र रंगवलेले आहे तुम्ही. पहिल्यापेक्षा खूपच चांगले आहे. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

क्या बात है।

प्रभाकर पेठकर
Fri, 10/14/2011 - 14:29 नवीन
क्या बात है, श्री. ५० फक्त. कविता अगदी अंगावर येते आहे. न राहवून दोनदोनदा वाचली. अप्रतिम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

खूप 'त्रास'दायक कविता! मान

प्यारे१
Fri, 10/14/2011 - 15:59 नवीन
खूप 'त्रास'दायक कविता! मान गये! त्सुनामिचा अनुभव घेतलेल्यांना खरंच असंच काहीसं वाटत असेल. अवांतरः च्यायला, 'डोक्या'ला मार लागलाय तर पार चौखूरच उधळलंय की.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

प्र का टा आ.

प्यारे१
Fri, 10/14/2011 - 16:04 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

परत वाचल्यावर असे वाटले की जर

जयंत कुलकर्णी
Sat, 10/15/2011 - 07:23 नवीन
परत वाचल्यावर असे वाटले की जर एखाद्याच्या आयुष्यात असा प्रसंग आला असेल आणि जर त्याने ही कविता वाचली तर............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

या विभागात आम्हाला गती

गणपा
Fri, 10/14/2011 - 15:04 नवीन
या विभागात आम्हाला गती नाही. तस्मात एक मराठी जुने गीत आठवले ते देत आहे. Get this widget | Track details | eSnips Social DNA
  • Log in or register to post comments

मित्रहो आणि मैत्रिणींनो, खाली

जयंत कुलकर्णी
Sat, 10/15/2011 - 07:32 नवीन
मित्रहो आणि मैत्रिणींनो, खाली सगळ्यांच्या कवितेचा स्लाईडशो टाकला आहे म्हणजे सगळ्या एकद्म वाचायला मिळतील. मला वाटते आपण बक्षिसासाठी २० तारीख (येणारी) ही अंतीम ठरवावी. अर्थात त्यानंतर आपल्या सर्वांना हा धागा चालू ठेवायचा असेल तर जरूर चालू ठेवू शकता. या स्लाईडशो मधे काही चुका असल्यास कळवाव्यात, म्हणजे दुरूस्त करता येतील, नवीन कविता त्यात घातल्या जातील त्यामुळे लिहीत रहा.......... यात सागर निझामीची ही एक गज़ल टाकली आहे कारण मला तॊ मुखपृष्ट म्हणून टाकायची होती पण ति रिशफल झाली आहे . :-( जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा