Skip to main content

Sonar Of Thoughts

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 12/10/2011 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
Sonar of Thoughts ! जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि त्यात बुडालेली ही मुलगी. मी काढलेला एक फोटो, गोव्यात. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (Oxford : Ghalib Life & Letters हे पुस्तक).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही. :-) जयंत कुलकर्णी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33109
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

In reply to by वाहीदा

आवडले. वरची मनीषाचीही कविता आवडली.(बाय द वे उर्दुत लिहिलेल्या प्रकाराला कविता म्हणता येते का?) एकूनातच नुस्ता फोटो देउन एकाहून एक लिहायला लावणार्‍या जयंतरावांची कल्प्नाही भन्नाट

In reply to by मन१

बाय द वे उर्दुत लिहिलेल्या प्रकाराला कविता म्हणता येते का? उर्दूत कवितेला नज्म(Nazm) म्हणतात . बाकी जयंत सरांची कल्पना खरंच भन्नाट , मला तर सगळ्यांच्याच कविता आवडल्या !!

उस बेहेतरीन तस्वीर को चार चांद लगा दिये आपके लफ्ज़ोंने! तुमच्या शब्दांचंच हे स्वैर मराठी रुपांतरः

In reply to by बहुगुणी

बहुगुणीकाका, जयंत सर, अनामिक, अभिजीत राजवाडे,तिरसिंगराव घाणेकर, मनोबा खरंच मनापासून आभार ! बहुगुणी काका तुम्हीच माझ्या नज्म ला चार चांद लावले , तिचे स्वैर मराठी भाषांतर मस्तच ! यह तुम्हारी नवाजिशे-करम, जो मेरे नज्म को चार चांद लगा दिए वरना इस नाचीज को कोई इतनी आसानी से समझ न पाता.... शुक्रिया !! नवाजिश : kindness करम : favour , generosity नाचीज : तुच्छ , petty, trivial

दूर दूर वर काहीच दिसत नाही.... दिसत आहे फक्त निळंशार पाणी... टक लावून बसले आहे मी तुझ्या वाटेकडे विश्वास आहे मला येशील तू परत जरी असशील क्षितिजापलिकडे.. ~~ प्रिया

कसा घसरला पाय? का न आवरले संस्कारांनी? तूही फिरविलीस पाठ कलंकिनी ठरविले समाज नजरांनी. हा अथांग सागर, घेई सामाऊन आज मजला, भरले नयन आकाशाचे, असहाय्य वाटे आज त्याजला. खंबीर हा पत्थर पाठीशी, परंतु निश्चल, निरुपयोगी ह्या क्षणाला ढाळेल चार अश्रू तोही कळली जर मम व्यथा त्याजला जाते सोडून जग हे, नकोच ती स्वार्थी नाती, विषण्ण, उद्विग्न मन माझे, विझेल ज्योत अन उरेल कृष्ण वाती.

वहिदा, ज्ञानेश, प्रभाकर, शानबा आल्या आल्या तुमचे लेखन वाचायला मिळाले आज. अप्रतिम लिहिलेले आहे. वहिदा खुपच उत्तुंग काव्य .. गविंच्या कवितेनंतर या थीम वर तुमची कविता सर्वात जास्त भावली... प्रभाकर जी, मला वाटते या धाग्यावर तुम्हीच पहिली कविता लिहिली आहे , ती पुर्ण मोठी लिहिना अजुन.. छान आणि वेगळेच शब्द आहेत त्यात...

In reply to by गणेशा

तुम्हीच पहिली कविता लिहिली आहे , ती पुर्ण मोठी लिहिना अजुन.. प्रयत्न करतो आहे आवडल्यास प्रतिसादावे.. ----oOo---- मी प्रेमवेडी दिलास आधार प्रथम जीवनी, पुलकित झाले किती मन्मनी, तूझीच झाले प्रथम प्रथमदर्शनी, सुवर्णप्रेम तव विश्वास मनी. दिल्या-घेतल्या प्रेमशपथा, किती बांधले मनात इमले, सख्या म्हणाल्या प्रेमवेडी मी अन्, किती प्रेमवीर दु:खात बुडाले. फुले बहरली प्राजक्तांची, ओंजळ भरली प्राजक्तांनी, प्राजक्तांची प्रसन्नता मज, प्राजक्तांनी अर्पण केली. असा कसा रे बदललास अचानक.... असा कसा रे बदललास अचानक, मोहात कुणाच्या गुंतलास अचानक, तुझीच होते, तूझी न राहिले, क्षणात सारे प्रेमविश्व जळाले. आज ह्या क्षणी.... क्रुद्ध वादळे मनात साही, एकही नौका सागरात नाही, नसे कुणाची साथ आज ही, अशी कशी ही करूण भैरवी... अशी कशी ही करूण भैरवी...

एक जुनी कविता येथे देण्याचा मोह होतो आहे पुन्हा ! सागराचे नीर दर्पण | विखुरले नभांकण | वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत || ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत || धरणीची ग्लान झोप | मेघांचे सूरेल गीत | उसवले श्वासधागे | अंतरात || छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप | शब्दांध झाली आसवे | आठवात || ---- शब्दमेघ

तुमच्या विनंतीला मान देऊन मी एकदम मला स्फुरलेल्या ३ कवितांच्या पहिल्या दोन ओळी टाकतोय. त्या आवडल्यास आख्खे काव्य टाकण्याचीही माझी तयारी आहे. तेवढं पुस्तकाचं लक्षात असू द्या. :) १) जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहाते २) सागर किनारे दिल ये पुकारे तू जो नही तो मेरा कोई नही है ३) मै एक सदी से बैठी हूं इस राह से कोई गुजरा नहीं

In reply to by योगप्रभू

तुमच्या स्पर्धेत मीही आहे............. यूँ न रह रह कर हमें तरसाईये आइये आ जाईये आ जाईये... फिर वही दानिस्ता ठोकर खाईये.. फिर मेरी आग़ोश में गिर जाईये मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी अपनी दुनिया छोड़ कर आ जाईये ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी जी में आता है यहीं मर जाये -सागर निझामी.

In reply to by जयंत कुलकर्णी

ने मजसी ने परत मातृभूमीला... सागरा प्राण तळमळला, तळमळला. सागरा... --स्वातंत्र्यवीर सावरकर.

In reply to by जयंत कुलकर्णी

ह्या धाग्यावर पैला प्रतिसाद आहे.....कवितेचा प्रयत्न उद्यापर्यंत करतो..... पण मला एक गाणे आठौले ते म्हणजे.... तु बिन बताये मुझे ले चल कहीं, जहां तु मुस्कुरायें मेरी मंझिल वहीं !!

In reply to by वाहीदा

वाहिदाजी, माझ्या प्रतिसादातील गंमत समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. हसण्यासाठी जन्म आपुला.

जयंत सर, माझा अजुन एक प्रयत्न, थोडासा दुबळा आहे मान्य, पणं समोर दिसणा-या चौकटी तोड्ण्याचा छंदच लागलाय हल्ली. इथंच बसले होते आई बाबा मि मागच्या बागेत झोक्यावर मोठा आला वारा तेंव्हा माझ्या झोक्याएवढा बरोबर एक उंच लाट .............................. मी केवढी ओरडले होते त्या लाटेकडे बघुन जी गेली माझ्या... आई बाबांना घेउन किती वर्षे झाली मला इथं येउन बसते तीच लाट पुन्हा एकदा येईल म्हणुन फसते येणा-या प्रत्येक लाटेला एकच निरोप देते आई बाबाना परत आणा नाहीतर मी येउ का तिथे ............

In reply to by ५० फक्त

वेगळा विचार व चित्र रंगवलेले आहे तुम्ही. पहिल्यापेक्षा खूपच चांगले आहे. धन्यवाद !

In reply to by ५० फक्त

क्या बात है, श्री. ५० फक्त. कविता अगदी अंगावर येते आहे. न राहवून दोनदोनदा वाचली. अप्रतिम.

In reply to by ५० फक्त

खूप 'त्रास'दायक कविता! मान गये! त्सुनामिचा अनुभव घेतलेल्यांना खरंच असंच काहीसं वाटत असेल. अवांतरः च्यायला, 'डोक्या'ला मार लागलाय तर पार चौखूरच उधळलंय की.... ;)

In reply to by ५० फक्त

परत वाचल्यावर असे वाटले की जर एखाद्याच्या आयुष्यात असा प्रसंग आला असेल आणि जर त्याने ही कविता वाचली तर............

मित्रहो आणि मैत्रिणींनो, खाली सगळ्यांच्या कवितेचा स्लाईडशो टाकला आहे म्हणजे सगळ्या एकद्म वाचायला मिळतील. मला वाटते आपण बक्षिसासाठी २० तारीख (येणारी) ही अंतीम ठरवावी. अर्थात त्यानंतर आपल्या सर्वांना हा धागा चालू ठेवायचा असेल तर जरूर चालू ठेवू शकता. या स्लाईडशो मधे काही चुका असल्यास कळवाव्यात, म्हणजे दुरूस्त करता येतील, नवीन कविता त्यात घातल्या जातील त्यामुळे लिहीत रहा.......... यात सागर निझामीची ही एक गज़ल टाकली आहे कारण मला तॊ मुखपृष्ट म्हणून टाकायची होती पण ति रिशफल झाली आहे . :-( जयंत कुलकर्णी.

In reply to by जयंत कुलकर्णी

सर, सहाव्या पानावर कोणाची कविता आहे दिसत नाही फक्त पांढरे रिकामे पेज दिसत आहे :-(

In reply to by वाहीदा

हो बरोबर आहे. पुढची कविता आलि की हेही दुरूस्त करू म्हणून कंटाळा केला.

In reply to by जयंत कुलकर्णी

एकंदर २२ कविता आलेल्या दिसत आहेत परंतु वरील अल्बम मध्ये चौदांचाच समावेश झाला आहे. अल्बम मध्ये समावेशासाठी काही निकष/नियम ठरविलेले आहेत का?

In reply to by प्रभाकर पेठकर

नम्स्कार ! निकष्/नियम काही नाही हो ! प्रत्येकाची एक म्हणून टाकली आहे. जर आपल्याला दुसरी टाकायची असेल तर तसे सांगा. तसे करू किंवा सगळ्या टाकायच्या असतील तर तसेही करू.....

In reply to by जयंत कुलकर्णी

दुसरी टाकायची असेल तर तसे सांगा. तसे करू किंवा सगळ्या टाकायच्या असतील तर तसेही करू..... छे..छे मला तसे अजिबात म्हणायचे नाही. अहो, ह्या दांडग्या कवींच्या पंगतीत माझे पान खरे तर काटकोनात मांडायचे पण आपण नावाजून पंक्तीतच बसविले आहे हाच मोठा सन्मान झाला. असो. धन्यवाद.

(माझाही एक प्रयत्न सांभाळून घ्या :)) ------------------------------------------------------------------------------ प्रिया केवळ एकदाच म्हणालस मला नौसेनेत प्रवेश मिळालाय एकादी कागदी होडी वाहून जावी तसा पटकन नाहीसा झालास.. लोक म्हणतात तू कायमचा गेलास पण परतुनी का नाही आलास माझा वाळूचा किल्ला मोडायला अरे किती वाट पाहु तुशी प्रिया वारा होऊन रुंजी घालतोयस अन् पाऊस होऊन बरसतोयस मीच येते आता तुला भेटायला वाळूचा कण होऊन गेलीय मी तुझ्याच शिंपल्यात मोतीव्हायला ------------------------------ माझीही शॅम्पेन

आमचाही एक साधासुधा प्रयत्न...... हुंदक्याची जागा गाणे घेऊदेत अश्रूंची जागा फुले घेऊदेत ढगांची जागा रंग घेऊदेत सागराची जागा मन घेऊदेत विचारांची जागा कृती घेऊदेत अंधारची जागा प्रकाश घेऊदेत आणि हे प्रिये, जमले तर, त्याची जागा मला घेऊदेत................

सगळ्या कवींना माझा मानाचा मुजरा! ईतके प्रतिभावान लोक ज्या एका परिवाराचे सदस्य आहेत त्या परिवाराची सदस्या असल्याचा मनापासून अभिमान वाटतोय __/\__ !!

काल जिंदगी ना मिलेगी बघत असताना जावेद्जींच्या फरहान ने म्हटलेल्या काही ओळी या चित्रासाठी समर्पक वाटल्या म्हणून हा प्रयत्न....! पिघलते हूये नीलम सा बेहता यह समां.... नीली नीली सी ये खामोशीयां....! सरसराती हुई टेहनियां, पत्तियां... कह रही है की बस तुम्ही हो यहां... सिर्फ मैं हूं.. मेरी सांसे और मेरी धडकने... ऐसी गहराईयां... ऐसी तनहाईयां... और सिर्फ मैं..... अपने होने का मुझे यकीं आ गया....!! मला वाटतं.. रचनेचा न कलेचा आनंद घ्यावा म्हणून हा यत्न...!!

माझी शँपेन, जयंतराव मस्त कविता .. विकाल .. मस्त वाटली रचना वाचुन अप्रतिम... स्लाईड शो नेहमीप्रमाणे पाहता आला नाही.. असो ..

इथे सर्वांनी 'एक से बढकर एक' -- कविता लिहिल्या आहेत ... तरीही माझी एक (नविन) कविता ! पराजित आज मी -- आले तुझ्या किनारी | अथांग जळ सामोरी -- मी तृषित या किनारी || कित्येक आशा मनी -- अन् पाहिली किती स्वप्ने | स्मृती तयांच्या अशा -- विखूरल्या या किनारी || भावनांचे अनेक पक्षी -- विहरती मुक्त गगनी | सावल्यांचा खेळ त्यांच्या -- चाललासे या किनारी || उसळत्या तव लाटा -- किरणांची मिरवीत नक्षी | रोखती मज आता -- मी बंदीवान या किनारी || धीर गंभीर तुझी गाज -- असते सदैव कानी | मंत्र जणु मुक्तीचा -- मज भासे या किनारी || असीम तुझी व्याप्ती -- आलोट तुझी शक्ती | सामर्थ्य पार करण्या -- मी मागते या किनारी || दिसते मज ती नौका -- शीड जिचे भरारी | डौलाने काढीत वाट -- येईल या किनारी || मग थांबेल हे क्षितीज -- मजसाठी दूर किनारी | लाटांसवे तुझ्याच -- मी जाईन त्या किनारी ||

एकापेक्षा एक सुन्दर चित्रकविता आहेत! हा माझाही एक प्रयत्न तो शांत, मीही शांत वरवर भासते आतून काही गुप्त खळबळ गाजते आभाळ मेघांनी भरुन धुमसे तरी सांडेच ना, का खिन्न घुसमट दाटते? या कातळाचे एक अविचल अंग मी नि:शब्द, निर्वातात खिळुन अपंग मी या सागराचा गूढ, गहन तरंग मी आकांत आलापीत अनवट राग ते मेघांतली अस्वस्थ हुरहुर पेलण्या, येते इथे आभाळझड नित झेलण्या ती दुष्ट जाते दूर मज अवहेलण्या मी श्रांत, निश्वासून मन चुरगाळते !