✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

Sonar Of Thoughts

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Wed, 10/12/2011 - 19:43  ·  लेख
लेख
Sonar of Thoughts ! जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि त्यात बुडालेली ही मुलगी. मी काढलेला एक फोटो, गोव्यात. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (Oxford : Ghalib Life & Letters हे पुस्तक).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही. :-) जयंत कुलकर्णी
  • Sonar Of Thoughts -काय झाले होते त्या दिवशी..........भाग -२...
  • Sonar Of Thoughts - भाग - ३. लिमाउजेट यांचे अभिनंदन. :-)

Book traversal links for Sonar Of Thoughts

  • Sonar Of Thoughts -काय झाले होते त्या दिवशी..........भाग -२... ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
32564 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

सुंदर

प्रचेतस
Wed, 10/12/2011 - 19:52 नवीन
कविता वगैरे काही लिहिता येत नाही मला, पण फोटो मात्र अतिशय सुरेख आलाय.
  • Log in or register to post comments

काढला आहे.

प्रभाकर पेठकर
Wed, 10/12/2011 - 20:07 नवीन
फोटो मात्र अतिशय सुरेख आलाय 'आलाय' म्हणण्यापेक्षा 'काढला आहे' म्हणा. कारण 'आलाय' मध्ये कॅमेराचा मोठेपणा आहे तर 'काढला आहे' मध्ये छायाचित्रकाराच्या कौशल्याचा सत्कार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

होय

प्रचेतस
Wed, 10/12/2011 - 20:10 नवीन
फोटो चांगला काढला आहे असेच म्हणायचे आहे.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत....

प्रभाकर पेठकर
Wed, 10/12/2011 - 20:14 नवीन
होय, कल्पना आहे मला. उगीच जरा जाणवले ते आपल्यापर्यंत पोहोचविले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्लीज फोटो, पिकासा थ्रु

गणेशा
Wed, 10/12/2011 - 19:58 नवीन
प्लीज फोटो, पिकासा थ्रु द्याना. दिसत नाहिये. .
  • Log in or register to post comments

From October 12, 2011 बघा हे

जयंत कुलकर्णी
Wed, 10/12/2011 - 20:10 नवीन
Image removed.From October 12, 2011 बघा हे दिसते का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

मस्त छायाचित्र.

प्रभाकर पेठकर
Wed, 10/12/2011 - 20:02 नवीन
अतिशय मस्त छायाचित्र. क्रुद्ध वादळे मनात साही, एकही नौका सागरात नाही, नसे कोणाची साथ आज ही, अशी कशी ही करूण भैरवी...करूण भैरवी. विश्वासघाताने प्रेमभंग झाल्यामुळे मनात संतापाची वादळे उठली आहेत. निदान समुद्रकिनारी मनाला शांती लाभेल असे वाटले पण तोही, एखादीही नौका नसल्याने, फार उदास उदास दिसतो आहे. आज एकटेपणाची भावना आहे साथीला कोणीच नाही. एका रम्य प्रेमकथेची ही करूण भैरवी आहे.
  • Log in or register to post comments

झक्कास !!!

धन्या
Wed, 10/12/2011 - 20:08 नवीन
मुळ फोटो आणि हा कल्पनाविलास, दोन्ही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आपणही प्रयत्न करावा ही

जयंत कुलकर्णी
Wed, 10/12/2011 - 20:14 नवीन
आपणही प्रयत्न करावा ही विनंती..... पुस्तक मस्त आहे.....:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मस्त ! टाळ्यांची

जयंत कुलकर्णी
Wed, 10/12/2011 - 20:14 नवीन
मस्त ! टाळ्यांची स्मायली.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मस्त ओळी प्रभाकर जी .. पुढे

गणेशा
Wed, 10/12/2011 - 20:20 नवीन
मस्त ओळी प्रभाकर जी .. पुढे लिहा अजुन. @ जयंत जी, मस्त फोतो, दिसला (लहान आकारात आहे, पण दिसला हे महत्वाचे.. ) लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

त्याच्यावर क्लिक केले तर मुळ

जयंत कुलकर्णी
Wed, 10/12/2011 - 20:23 नवीन
त्याच्यावर क्लिक केले तर मुळ मोठा फोटो दिसेल. तो जरूर बघावा त्याशिवाय आपल्याला ओळी स्फुरणार नाहीत. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

येथे पिकसा पण ब्लॉक आहे हो

गणेशा
Wed, 10/12/2011 - 20:32 नवीन
येथे पिकसा पण ब्लॉक आहे हो [:)] पण त्यातील फोटो मिपा वर दिसतात मला. असो त्या छोट्याश्या फोटोवरुन्च लिहितो.. पुस्तका साठी नाही.. तुमच्यासाठी ... अवांतर : तुमच्या या विषयामुळे अश्याच चित्र कविता असणार्या माझ्या " आई.." ह्या विषयावरील कविता पुन्हा द्याव्यात असे वाटते आहे.. नक्कीच आवदतील तुम्हाला.. त्या सर्व चित्र कविता आहेत , फक्त हे अजुन सआंगितले नव्हते.. प्रत्येक कविता ही एक वेग़ळी थीम वेगळे चित्र आहे .. मला आता कविता लिहिताना त्याच ओळी आठवत आहेतम त्यामुळे मुद्दाम वेगळे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. आता या नंतर जो रिप्लाय देयीन ती कविताच असेन [:)]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

व्वा...

मन१
Wed, 10/12/2011 - 23:23 नवीन
अर्थवाही आणि चित्रदर्शी रचना आवडली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पुस्तका ऐवजी दुसरे काहितरी

अविनाशकुलकर्णी
Wed, 10/12/2011 - 20:14 नवीन
पुस्तका ऐवजी दुसरे काहितरी ज्याने मनातिल वादळे शांत होतिल असे बक्षीस असावे.. असे भित भित सुचवत आहे..
  • Log in or register to post comments

मग तुम्ही लिहिणार आहात का ?

जयंत कुलकर्णी
Wed, 10/12/2011 - 20:24 नवीन
मग तुम्ही लिहिणार आहात का ? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

छान फोटो.

मितभाषी
Wed, 10/12/2011 - 20:26 नवीन
छान फोटो.
  • Log in or register to post comments

चित्रकविता २

गणेशा
Wed, 10/12/2011 - 21:03 नवीन
नयनांच्या बांधावरती शांत सागर गहिरा आठवांच्या वाटेवरती मेघांचा सावळा पसारा सुन्न संध्यासमयी हा खेळ सावल्यांचा भिरभिरनार्‍या नजरांनी मनपक्षी शोधती किनारा भासांचे प्रवाह स्तब्ध कळेना माझे प्रारब्ध दूर क्षितिजावरती सूर्य निशब्द मावळणारा - शब्दमेघ(गणेशा) (मला दिसलेले छोटे चित्र : खोल सागर, मुलगी, मेघ; कलर : ब्लॅक & व्हाईट म्हणुन संध्या समय/ दुपार्/सकाळ हे कळाले नाही, मी संध्यासमय घेवुन लिहिली, जर मुळ फोटोत ते स्पष्ट आणि वेगळे असेन तर तशी नविन कविता देईन))
  • Log in or register to post comments

चित्रकविता ३

गणेशा
Wed, 10/12/2011 - 21:26 नवीन
समुद्राच्या सुक्ष्म लाटेवरती मन माझे स्वार होती सुन्न किनार्‍यावर आज अस्पष्ट असंख्य वार होती तरल स्वप्नांचा ईमला वाळुसम मज भासती एकाच लाटेसरशी स्वप्नभंग पावती मेघांच्या आडुन किरणांची अबोल आकंती नांदी ओघळणार्‍या आसवांची मावळणारी कांती - शब्दमेघ
  • Log in or register to post comments

मस्त ! दोन्हिही छान

जयंत कुलकर्णी
Wed, 10/12/2011 - 21:31 नवीन
मस्त ! दोन्हिही छान !...........मला १ जास्त भावली....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

धन्यवाद ! मलाही पहिलीच

गणेशा
Wed, 10/12/2011 - 21:35 नवीन
धन्यवाद ! मलाही पहिलीच आवडली. ओफिसमधुन जाता जाता दूसरी लिहिली सहज. गुड नाईट, निघतो आहे १५ मिनिटात आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

माझाही एक प्रयत्न---आमची

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/12/2011 - 23:14 नवीन
माझाही एक प्रयत्न---आमची प्रेरणा-संदिप खरे यांची ही कविता,,,मी हजार चिंतांनीही डोके खाजवतो आणी अर्थातच तीची सलीलदांनी लावलेली चालही,,,कारण तीच चाल मनात असतांन्ना ही खालील कविता सुचली आहे... मी शोधत आहे अजुन काही वाटाही हा हुषार मजला म्हणतो अता टाटाही मज ठाऊक आहे लहान होते जेंव्हा हा बिलंदय्राही असाच होता तेंव्हा आता मी आजहि पुन्हा तशी ती नाही हा अथांग मजला हसूनी देतो ग्वाही आयुष्य म्हणाले वर्षे सरली काही तारुण्यही नुकते वळून मागे पाही वाय्रावर माझी आता उडते बाही तो हसून उडवी शंख शिंपले काही आता तो मजला खुणवी खोल अथांगं मज मिठीत घेण्या वारा देई बां$$ग पण अजूनी का मन म्हणते माझे नाही मी शोधू म्हणता उमगत...काही...नाही हा पहिल्या पासुन असाच आहे द्वाड मनी दावी स्वप्ने अंबट काही गोड आता तर मनी मी ठरवीत आहे काही हा किती बोलवो पुन्हा यायचे नाही कधी होइल आता पुन्हा आजची सांज मज ठाऊक नाही घालीन कुठला बांध या इथवर पुन्हा वळून येणे नाही ही शपथ घेतली कितिदा?...अठवत नाही....
  • Log in or register to post comments

वा!!!

अभिजीत राजवाडे
गुरुवार, 10/13/2011 - 04:43 नवीन
कविता छान जमली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अरे व्वा........

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 10/13/2011 - 07:34 नवीन
अरे व्वा........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सुप्पर!!

मी ऋचा
गुरुवार, 10/13/2011 - 12:41 नवीन
सुप्पर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अभि,,,ज.कु. आणी,,,मी ऋचा...

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/13/2011 - 13:28 नवीन
अभि,,,ज.कु. आणी,,,मी ऋचा... तिघांचेही आभार... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

वर्ल्डक्लास

इंटरनेटस्नेही
Wed, 10/12/2011 - 23:28 नवीन
एकदम द वर्ल्डक्लास फोटो. कीप ईट अप!
  • Log in or register to post comments

बापरे , कविता काय लिहणं जमणार

आत्मशून्य
गुरुवार, 10/13/2011 - 00:17 नवीन
बापरे , कविता काय लिहणं जमणार ? मलातरी फोटॉकडे बघून ग्रीक कथांमधील समूद्रकिनारी असलेल्या देवळांच्या पायर्‍यावरील अपोलो देवतेची आठवण येतेय... आणी देवा बद्दल काही लिहायच म्हणजे... तो विनोद नाहीका ठरणार इथं ?
  • Log in or register to post comments

अभिप्राय अवश्य कळवावा.

अभिजीत राजवाडे
गुरुवार, 10/13/2011 - 04:32 नवीन
जयंतराव, उत्तम प्रकाशचित्र!!! त्यातली रचना आणि पोत मनाला भावतो आहे. मी मुक्तछंदात हे प्रकाशचित्र पाहुन मला जे सुचल ते प्रकाशचित्रावरच उमटवले आहे. माफ करा. तुमच्या प्रकाशचित्र मी तुमच्या अनुमती शिवाय वापरलं. जर तुमची हरकत असेल तर मी हे प्रकाशचित्र काढुन फक्त शब्द इथे प्रकाशित करतो. कवितेवरील तुमचा अभिप्राय अवश्य कळवावा. Image removed.
  • Log in or register to post comments

छान आहे.............कविता

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 10/13/2011 - 07:36 नवीन
छान आहे.............कविता चित्रावर टाकायची कल्पना मस्त........ हे चित्र डेस्कटॉपवर मस्त दिसते........... फक्त सगळ्यांनी ते आपल्यापाशीच ठेवावे ही विनंती......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत राजवाडे

आभार!!!

अभिजीत राजवाडे
गुरुवार, 10/13/2011 - 09:23 नवीन
खुप खुप आभार,जयंतराव!!!
  • Log in or register to post comments

(No subject)

गवि
गुरुवार, 10/13/2011 - 11:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

क्या बात है !........मी

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 10/13/2011 - 12:06 नवीन
//सर्व साक्षी सागराच्या पापणीला ओल नाही.................// क्या बात है !........ मी लिहावं म्हटल तर एक ओळ सुचेल तर शप्पत ! आणि येथे कितीतरी लोकांनी चांगले लिहिलंय, खरंच दैवी देणगीच म्हणायला हवी ती.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

@मी लिहावं म्हटल तर एक ओळ

निनाद मुक्काम …
गुरुवार, 10/13/2011 - 18:50 नवीन
@मी लिहावं म्हटल तर एक ओळ सुचेल तर शप्पत ! आणि येथे कितीतरी लोकांनी चांगले लिहिलंय, खरंच दैवी देणगीच म्हणायला हवी ती.... सहमत पद्यात लिहिणे म्हणजे दैवी देणगी . आम्ही ह्याबाबतीत कर्मदरिद्री मात्र फोटोवर कविता मस्त दिसत आहे . सध्या येथे तीन दिवस सतत पाऊस पडत आहे . त्या वातावरण हा धागा एकदम फिट्ट बसला आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अप्रतिम .. खुप्च

गणेशा
गुरुवार, 10/13/2011 - 12:08 नवीन
अप्रतिम .. खुप्च आवडले. आतापर्यंत येथे आवडलेल्या ओळी.. अबिजित तुझे चित्र दिसले नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्त...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/13/2011 - 15:09 नवीन
श्री. गवि साहेब, छायाचित्रातील वातावरणास अजिबात न विस्कटवता, मोजक्याच चार ओळींमध्ये अतिशय परिणामकारक शब्दांची निवड करून, चित्रनायिकेच्या भावभावनांना कवितारुपात चितारण्यात आपण यशस्वी झाला आहात. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खल्लास..

चिगो
गुरुवार, 10/13/2011 - 17:17 नवीन
फक्त चार ओळींत जादू केलीत, गवि... अतिशय सुंदर आणि समर्पक.. छा गये !! जयंतजी, अत्यंत सुंदर फोटो काढलाय तुम्ही.. दोघांचेही अभिनंदन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फोटो अप्रतिम. मला कवितेत एवढी

इरसाल
गुरुवार, 10/13/2011 - 12:13 नवीन
फोटो अप्रतिम. मला कवितेत एवढी गती नाही. पण उगाचच गोरिला चित्रपटात गोरिलाच्या हातावर उदास बसलेली नायिका आठवली.(पाठीमागचा खडक म्हणजे गोरिला भासतोय आणि खालचे कातळ त्याचा हात).
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो .

नन्दादीप
गुरुवार, 10/13/2011 - 12:48 नवीन
अप्रतिम फोटो . कविता वगैरे आपल्याला जमत नाही. पण फोटो मात्र अssssssssप्रतिम...... बाकी तुम्हाला एका ऐवजी २-३ पुस्तके घेवून यावी लागणार बहुतेक....
  • Log in or register to post comments

.........ऐलतिरी करूण किती

विकाल
गुरुवार, 10/13/2011 - 13:37 नवीन
.........ऐलतिरी करूण किती शांत माझी वादळे..., नित संग तुझा अन संथ अशी साथ रे...! किती कोवळा किनारा कल्पिला कसा रे.. अन आज असे आटले अश्रू अपरिमित रे...! परतूनी येशील नित्यनवा तू हीच आस रे.... या नभांनी आक्रमिले... अन उन्मुक्त देहाला.. तुझ्या जलधारांची आस रे.....!!!
  • Log in or register to post comments

//.........ऐलतिरी करूण किती

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 10/13/2011 - 13:48 नवीन
//.........ऐलतिरी करूण किती शांत माझी वादळे..., // शांत वादळे.........मस्त विरोधाभास. तसेच ऐलतरावर आहेत ही. समोर शांत गहिरा खोलपणा आहे ...... तसेच जलधारांची ऐवजी जलधारांचीच असे म्हटले तर... क्या बात है, सुंदर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकाल

विकाल मस्तच रे .. जयंत जी

गणेशा
गुरुवार, 10/13/2011 - 15:37 नवीन
विकाल मस्तच रे .. जयंत जी तुमच्या धाग्यामुळॅ खुप मजा आणलेली आहे. मागे एकदा जिप्सिं बरोबर असे बोलणे झालेले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकाल

छान

तिमा
गुरुवार, 10/13/2011 - 18:41 नवीन
फोटो छान, त्याच्यावरच्या कविता छान, एकंदर धाग्यातल्या प्रतिक्रियांवरचे सुसंस्कृत वातावरण छान ! मिपाचा प्रवास असाच चालू राहू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकाल

नमस्कार, मिपावर अशाही

जयंत कुलकर्णी
Fri, 10/14/2011 - 08:19 नवीन
नमस्कार, मिपावर अशाही धाग्याचे १०० प्रतिसाद होतात्/होतील हे बघून बरे वाटले आणि काव्य शास्त्र विनोदेन.........याची आशा वाटली............ हे लिहिल्याबद्दल आपलेही आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

माझा एक प्रयत्न (श्री.

५० फक्त
गुरुवार, 10/13/2011 - 14:32 नवीन
माझा एक प्रयत्न (श्री. वल्ली श्री प्यारे व कविवर्य मनराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कविता करण्यात आलेली आहे, हे लक्षात घेउन प्रतिसाद द्यावेत), किती वेळ झाला इथे बैसले मी तो म्हणाला मला की इथुन दिसतातच डॉल्फिन नामी दहा मिनिटेच घालुन बसा मांडी तो म्हणाला मला की येतिल डॉल्फिनच्या झुंडी म्हणाले मी आता वाट फार पाहिली तो म्हणाला मला की होय रात्र खास जाहिलि मला वाटलेच होते मी फसणार आहे तो म्हणाला मला की बाराची गाडी सुटणार आहे.
  • Log in or register to post comments

बाराची गाडी सुटणार आहे.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/13/2011 - 14:42 नवीन
बाराची गाडी सुटणार आहे. बाबो...बाबो...क..ह..र... फाट फुट फट्याक... ;-) ख-ह-प-लो :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

भले शाब्बास !!!

धन्या
गुरुवार, 10/13/2011 - 14:44 नवीन
जे न देखे रवी ते देखे कवी असं जे म्हणतात ते यामुळेच. बाकी सारी दुनिया त्या चित्राकडे पाहून व्याकुळ भैरवी आणि आर्त विराणी गात असताना तुम्ही मात्र चक्क खुसखुशीत आणि तरीही शेवटचं कडवं वाचून अंगावर रोमांच उमटवणारी कविता लिहिलीत. मान गये उस्ताद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

प्रचेतस
गुरुवार, 10/13/2011 - 21:54 नवीन
५०फक्त रॉक्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हॅहॅहॅ... एकदम खुसखूशीत

किसन शिंदे
गुरुवार, 10/13/2011 - 15:07 नवीन
हॅहॅहॅ...:D एकदम खुसखूशीत कविता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पहिलाच प्रयत्न छान आहे...

गणेशा
गुरुवार, 10/13/2011 - 16:22 नवीन
पहिलाच प्रयत्न छान आहे... रात गई सो बात गई ! ह्या हिशोबाने पुन्हा आज नविन कल्पनेने ह्या चित्रावरती एक कव्फिता करावी म्हणतो.. खुप दिवसानी असे मनापासुन लिहावेशे वाटते आहे.. आलोच ५ मिनिटात अवांतर : एका पेक्षा जास्त कविता देत असल्याबद्दल क्षमस्व. तसे काव्त्य विभागात शकयतो लवकर माझ्या कविता देत नाही मी.. पण येथे तो संयम झाकुन ठेवावा म्हणतो आहे.. म्हनुन एक कविता आज देतोच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा