माळरान अन् ते दोघे!! -- २
माळरान अन् ते दोघे!! -- १
त्या हिरव्या झाडाचे
एक कोवळे फुल
त्या खोडसाळ वार्याने
खुडले
चटका देणारी उन्हे होतीच
वार्याच्या जोडीला
.
बिचारे येऊन पडले
वठलेल्या झाडाच्या आसर्याला
फुलाचे हाल त्याला बघवत नव्हते
.
आपले सुकलेले पान
आपसूकच
गाळले अखेर त्या फुलासाठी
बहुदा शेवटचे
.
वठलेल्या झाडाची मुळे
आता खरेतर घुसमटली आहेत
त्यांना आता मातीचा कारावास अन्
तिची घट्ट मिठी असह्य झालीये
.
श्वास कोंडणार्या मगरमिठीत
शांत पहुडून राहायचे म्हणजे
.
असं म्हणतात
चिवटपणा हा मुळांचा गुणधर्म
पण फक्त मुळांनाच ठाऊक असते
कि हे तर त्यांचे
विदारक प्राक्तन
(क्रमश:)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०४/१०/२०११)
वाचने
2500
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
सुंदर आहे रे.. नाऊ यू आर इन
मस्तच ...
पुन्हा वाचुन छान
वाचतो आहे
सुंदर
मिका. --छान आवडली ..!! असं
हां... अब बात आने लगी...