Skip to main content

माळरान अन् ते दोघे!! -- २

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 04/10/2011 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
माळरान अन् ते दोघे!! -- १ त्या हिरव्या झाडाचे एक कोवळे फुल त्या खोडसाळ वार्‍याने खुडले चटका देणारी उन्हे होतीच वार्‍याच्या जोडीला . बिचारे येऊन पडले वठलेल्या झाडाच्या आसर्‍याला फुलाचे हाल त्याला बघवत नव्हते . आपले सुकलेले पान आपसूकच गाळले अखेर त्या फुलासाठी बहुदा शेवटचे . वठलेल्या झाडाची मुळे आता खरेतर घुसमटली आहेत त्यांना आता मातीचा कारावास अन् तिची घट्ट मिठी असह्य झालीये . श्वास कोंडणार्‍या मगरमिठीत शांत पहुडून राहायचे म्हणजे . असं म्हणतात चिवटपणा हा मुळांचा गुणधर्म पण फक्त मुळांनाच ठाऊक असते कि हे तर त्यांचे विदारक प्राक्तन (क्रमश:) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०४/१०/२०११)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2511
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

येउ द्या पुढचा भाग ... वाचत आहे ...

पुन्हा वाचुन छान वाटले. संपुर्ण क्रमशः कविता वाचल्या आहेतच.

मिका. --छान आवडली ..!! असं म्हणतात चिवटपणा हा मुळांचा गुणधर्म पण फक्त मुळांनाच ठाऊक असते कि हे तर त्यांचे विदारक प्राक्तन

चिवटपणा हा मुळांचा गुणधर्म पण फक्त मुळांनाच ठाऊक असते कि हे तर त्यांचे विदारक प्राक्तन.......... हां... अब बात आने लगी... अता कविता मुळ धरायला लागलीये,इस लीये... अब...आने दोव... आने दोव