✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माळरान अन् ते दोघे!!

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 10/03/2011 - 11:24
कधी कधी आपण मनाच्या या दोन्ही अवस्थांमधून जात असतो. कधी मनाचा हिरवेपणा, तर कधी ओसाड. अशाच काहीशा अवस्थांची ही दैनंदिनी. म्हटले तर कविता, म्हटले तर कथा.... कोणत्याही एका साच्यात ते बसवणं शक्यचं नव्हतं. ते ओघवतच हवं होत.
*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|
एक विशाल माळरान त्या माळरानावर दोनचं झाडे एक हिरवे, रसरसलेले अन दुसरे... . खूप वारा असे त्या माळरानात अगदी भिन्नाट म्हणावे तसा खरे तर वार्‍याची काहीच चूक नाही वाहणे हा तर त्याचा धर्म शिवाय त्याला अडवायलाही कोणीचं नाही तिथे . . वार्‍यावर डोलणार्‍या हिरव्या फांद्या पाहून ते दुसरे वठलेले झाड हलकेच हसायचे स्वताशीच बहुदा त्याच्या काही आठवणी जाग्या होतं . बरीचं पाने गळून गेली आहेत त्याची . . आता त्याच्या पोटात एक ढोली तयार झाली आहे नाही बहुदा पोकळी निर्वात नाही पण पोकळीच आहे . काय गंमत आहे ना त्याची पोकळीसुद्धा मोकळी नाही . त्या माळरानावर आज खूप सारे काळे ढग जमलेत त्यांच्या सावलीने काजळी धरलीय ते उजाड माळरान सावळेसे भासतेय त्या सावल्यांच्या वर एकच हिरव्या झाडाची निळसर गुलाबी कळी वेडी... एकटीच हसणारी . त्या मुरलीधराच्या मुकुटावरील मोरपिसासारखी . . देव तरी कसा ना कुठेही प्रकटतो (क्रमशः) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०३/१०/२०११)
  • माळरान अन् ते दोघे!! -- २
  • माळरान अन् ते दोघे!! -- ३
  • माळरान अन् ते दोघे!! -- ४
  • माळरान अन् ते दोघे!! -- ५
  • माळरान अन् ते दोघे!! -- ६
  • माळरान अन् ते दोघे!! -- ७
  • माळरान अन् ते दोघे!! -- ८
  • माळरान अन् ते दोघे!! -- ९
  • माळरान अन् ते दोघे!! -- (भाग १ समाप्त)

Book traversal links for माळरान अन् ते दोघे!!

  • माळरान अन् ते दोघे!! -- २ ›

प्रतिक्रिया द्या
3040 वाचन

💬 प्रतिसाद (6)

कळी हिरव्या झाडावर आलीये. यात

पाषाणभेद
Mon, 10/03/2011 - 14:28 नवीन
कळी हिरव्या झाडावर आलीये. यात वठलेल्या झाडाची भुमीका काय ते आगामी भागात समजेल काय? अन कवितेत क्रमश: बहूदा पहिल्यांदा पाहतोय.
  • Log in or register to post comments

यात वठलेल्या झाडाची भुमीका

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 10/03/2011 - 14:42 नवीन
यात वठलेल्या झाडाची भुमीका काय ते आगामी भागात समजेल काय?
होय.
अन कवितेत क्रमश: बहूदा पहिल्यांदा पाहतोय.
ह्याला कविता म्हणावे कां कसं? म्हणूनच सुरवातीचे प्रास्ताविक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

(No subject)

कवितानागेश
Mon, 10/03/2011 - 14:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments

हं......

प्रास
Mon, 10/03/2011 - 16:13 नवीन
मिकाभौंच्या प्रतिभेचा कथा-कवितारूपी मुक्तकस्वरुपातला करुण आविष्कार बघून नेमकं काय वाटलं ते पुढल्या भागात (जो बहुदा शेवटचा असेल तर) सांगितले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती. :-)
  • Log in or register to post comments

फार खोल आहे ...

विश्वेश
Mon, 10/03/2011 - 16:17 नवीन
आता त्याच्या पोटात एक ढोली तयार झाली आहे नाही बहुदा पोकळी निर्वात नाही पण पोकळीच आहे
  • Log in or register to post comments

मिका. --छान आवडली ..!!

प्रकाश१११
Tue, 10/04/2011 - 22:34 नवीन
मिका. --छान आवडली ..!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा