माळरान अन् ते दोघे!!
कधी कधी आपण मनाच्या या दोन्ही अवस्थांमधून जात असतो.
कधी मनाचा हिरवेपणा, तर कधी ओसाड.
अशाच काहीशा अवस्थांची ही दैनंदिनी.
म्हटले तर कविता, म्हटले तर कथा....
कोणत्याही एका साच्यात ते बसवणं शक्यचं नव्हतं.
ते ओघवतच हवं होत.
*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|*|
एक विशाल माळरान
त्या माळरानावर
दोनचं झाडे
एक हिरवे, रसरसलेले
अन दुसरे...
.
खूप वारा असे त्या माळरानात
अगदी भिन्नाट म्हणावे तसा
खरे तर वार्याची काहीच चूक नाही
वाहणे हा तर त्याचा धर्म
शिवाय
त्याला अडवायलाही कोणीचं नाही तिथे
.
.
वार्यावर डोलणार्या हिरव्या फांद्या पाहून
ते दुसरे वठलेले झाड
हलकेच हसायचे स्वताशीच
बहुदा त्याच्या काही आठवणी जाग्या होतं
.
बरीचं पाने
गळून गेली आहेत त्याची
.
.
आता त्याच्या पोटात एक
ढोली तयार झाली आहे
नाही बहुदा पोकळी
निर्वात नाही पण
पोकळीच आहे
.
काय गंमत आहे ना
त्याची पोकळीसुद्धा
मोकळी नाही
.
त्या माळरानावर आज
खूप सारे काळे ढग जमलेत
त्यांच्या सावलीने काजळी धरलीय
ते उजाड माळरान सावळेसे भासतेय
त्या सावल्यांच्या वर एकच
हिरव्या झाडाची
निळसर गुलाबी कळी
वेडी... एकटीच हसणारी
.
त्या मुरलीधराच्या मुकुटावरील
मोरपिसासारखी
.
.
देव तरी कसा ना
कुठेही प्रकटतो
(क्रमशः)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०३/१०/२०११)- माळरान अन् ते दोघे!! -- २
- माळरान अन् ते दोघे!! -- ३
- माळरान अन् ते दोघे!! -- ४
- माळरान अन् ते दोघे!! -- ५
- माळरान अन् ते दोघे!! -- ६
- माळरान अन् ते दोघे!! -- ७
- माळरान अन् ते दोघे!! -- ८
- माळरान अन् ते दोघे!! -- ९
- माळरान अन् ते दोघे!! -- (भाग १ समाप्त)
कळी हिरव्या झाडावर आलीये. यात
यात वठलेल्या झाडाची भुमीका
(No subject)
हं......
फार खोल आहे ...
मिका. --छान आवडली ..!!