विजुभौ,
कुल्फी, करवंद, जांभळाची आठवण लै भारी !!!
पण फोटू पाहिजे होते राव जांभळाचे, करवंदाचे, आणि कुल्फीवाल्याचे नाही ते माठाचे सुद्धा !!!
( आता जरा गडबडीत आहे, सायंकाळी पुन्हा एकदा करवंद, जांभळं आणि कुल्फी खाईन. )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा विजुभाऊ..
आईला वाळवण घालायच्या कामात मदत करायला परवानगी नसते. ती करताना काम कमी आणि खादाडी जास्त असते हे आईही ओळखुन असते.
साबुदाण्याच्या पापड्या,,लोणच,,चिंचा..काय मिळेल गच्चीत ते सरळ हादडायचे,,,आमची तर टोळीच होती,,कोणाला जरी कुठ काय वाळत ठेवल आहे ह्याचा सुगावा लागला की तिथ धाड मारुन त्या वस्तुवर आम्ही डल्ला मारुन मोकळे व्हायचो..
कुल्फी वरुन आठवले बर्याच वेळा कुल्फी वाल्याला ऐ कुल्फीवाले अशी हाक मारुन आम्ही मुले लपुन बसायचो,,तो बिचारा इकडे तिकडे बघत बसायचा...मग एकदा दोनदा त्याला असे तंगवले की मग त्याच्या कडुन कुल्फी विकत घ्यायची ...
करवंदे चाखताना ती लाल की पांढरी आहेत त्या वरुन चिमणी आहेत की कावळा आहेत हे ठरवायचो.
आम्ही ह्याच कोंबडा आणि कोंबडी अशी नाव ठेवली होती,लाल =कोंबडा,पांढर= कोंबडी..
करवंदाच्या जाळीत जाऊन करवंद वेचण्याची मजा कही औरच !!!!!
(जंगलातला हा रानमेवा मनसोक्त हादणारा)
मदनबाण.....
ही पण बालपणीची एक सुरेख आठवण आहे. आम्ही वाड्यात रहायचो. आमची पण धमाल टोळी होती.
दुपारी गोरेआजी अन् लिमयेआजी वाळवण टाकायच्या.. साबुदाण्याच्या पापड्या, पापड, शिंगाडे, चिंचा, सांडगे. ते सगळ्यांना खायला आवडो वा ना आवडो.. पण त्यावर गनिमी काव्याने फडशा पाडण्यात एक वेगळीच मजा असायची.
दुपारी सगळे झोपले की आम्ही हळूच बोळातून सुगावा घेत असू.. कोण येतंय.. गॅलरीत कोण आहे.. लिमयेआजी आमच्यावर दबा धरून बसल्यात का.. नेमके लिमयेकाका गॅलरीत पेपर वाचत बसलेले दिसायचे.. मग ते जास्तोवर आमचे हळूच पहाणे.. कोण कसे जाणार ते ठरविणे.. मग शेवटी सगळे चिडीचूप झाल्यावर..... धाड टाकायचो.. आणि सभेचा जिना.. आमचा अड्डा.. तिथे बसून आज्यांना कसे गंडवले याची चर्चा करत सगळं फस्त!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो..
काय बोललात!
लहानपणी सुट्टीत मामाच्या घरी गेल्यावर मागच्या टेकड्यांवर असलेल्या जंगलात करवंद खादडत बोकाळणे हा आमच्या भावंडांचा आवडीचा उद्योग होता.
मस्त लिहिलंय.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
करवंदाच्या जाळीत शिरुन तोडून आणणे आणि मग वाड्याच्या ओसरीवर निवांत पाय पसरुन खात बसणे...
व्वा.. नुस्ती मज्जा.. :)
जांभळं फक्त खायला आवडतात, ती तोडायच्या भानगडीत नाही बॉ पडत.
एकदा प्रयत्न केला होता जांभळाच्या झाडावर चढायचा, पण असा आपटलो की परत चढायची ईच्छाच नाही झाली.. :D
ही घ्या करवंद आमच्या पुरंदरच्या भटकंतीमध्ये सापडलेली.
जर दिसत नसतील तर
http://picasaweb.google.com/zakasrao/Purandar/photo#5192109913189526274
इथे क्लिक करा.
विजुभाउ लेख नेहमीप्रमाणेच छान. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
मे महिन्यात गेलो होतो त्यामुळे कच्चीच होती म्हणा.
पण कित्येक वर्षानी करवंदाची जाळी पाहिली आणि दिल खुष झाला. :)
करवंद पिकलेली असती तर गड चढायला अजुन तासभर उशीर झाला असता ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
माझे अत्यंत प्रिय फळ.
डिसेंबर / जानेवारी सुमारास बाजारात येते.
परंतु मुंबईत मिळत नाही. पुण्यास विपुल प्रमाणात मिळते.
हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे गरवारे पुलावरचा (चितळ्यांच्या दारातला) बागवान.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
>>> वडच्या हिरव्यागार पानावर ठेवलेले ते कुल्फ़ीचे पांढरे शुभ्र काप पहात रहावे असे वाटत असतानाच जीभ डोळ्यांवर आक्रमण करते आणि बघताबघता कुल्फ़ी तोंडात विरघळुन जाते.
-- अगदी :)
प्राजु म्हणते तश्शा सगळ्या आठ्वणी जाग्या झाल्या....मस्तच लेख्....परत एक चान्स मिळू शकतो का छोटं व्ह्यायचा? :(
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
संग्रह करून ठेवण्यासारखी आहे विजुभाऊ. किती सुंदर लिहिता तुम्ही..! मानलं बुवा..
आणि हे सगळं.. म्हणजे आंबे, कुल्फीवाला, करवंदे आणि जांभळं.. हे इतकं खाल्ल आहे या ट्रीपमध्ये की बस्स!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मला पण आमच्या घरापाशी येणार्या कुल्फीवाल्याची आठवण आली. पण आमचा कुल्फीवाला हातगाडीवर कुल्फीचा लाकडी खोका घेऊन यायचा. हातगाडीला खालती घंटा बांधलेली असायची. ती किणकीणावर कुल्फीवाला आला की पोरांचा गराडा पडलाच गाडीला. तसाच यायचा गोळेवाला.
(अवांतर: बरेचदा मी कुल्फीचे पाणी चांगले नसते या कारणामुळे कुल्फीला मुकलो आहे. :( तसे कुल्फीवाल्याच्या आरोळीवरून आमच्या इथे येणार्या कल्हई वाल्याची आरोळी आठवली. 'ए क्लैSSSSSSSSSSSSS' अशी मजेदार आरोळी द्यायचा. तसेच एक मोडाची कडधान्ये विकणारा देखील यायचा. त्याची पण आरोळी गंमतशीर होती. 'क्वाSSSचाचैSSSचैSSSSSSSSS मोडाचै, मटकी येSS, वाटाणा येSSSS, हरभरा ये'. यातला क्वाSSSचाचैSSSचै चा अर्थ मला तर कधीच नाही कळला. :) कदाचित त्याच्या आरोळीच्या आधीची ती तान असेल. :) )
करवंदे तर को़कणात उदंड खाल्ली. आमच्या गावापासून माझ्या आत्याची सासुरवाडी असलेल्या 'मणचे' या गावापर्यंत चालत जावे लागे. तेव्हा उदंड करवंदाच्या जाळ्या लागत मधे. आमची आजी कसल्याश्या मोठ्या पानाचा झटपट द्रोण करून द्यायची. मग आमची नातवंडांची पैज कोणाचा द्रोण आधी भरतो. करवंदाचा चीक देखील आवडायचा खायला. विजुभाऊ मस्त आठवण करून दिलीत हो......
पुण्याचे पेशवे
विजुभाऊ,
आठवणी येतात असं आपण म्हणतो आठवणी जातात असं कधी म्हणत नाही.
तुमचा हा सुंदर लेख वाचून मला आठवणी आल्या.
देशील कां रे देवा
फिरूनी माझे बालपण
करीन मी माझे
सर्वस्व तुला अर्पण
देशील कां रे देवा
फेरूनी माझे ते
अमोल क्षण
ती माझी
कागदाची होडी
अन
ते खळखळ्ते पाणी
ते आंबे,गरे,फणस
अन
ती टपोर करवंदे,जांभळे,
ऐकशील कां रे देवा
फिरूनी माझी
ही विनवणी
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
नेहमीप्रमाणे मस्त लेख झाला आहे...
परत जुन्या आठवणींना उजाळा....
हे काळी मैना काळी मैना डोंगरची काळी मैना......
अशी आरोळी खेडेगावचा एक शेतकरी आणि त्याच्या डोक्यावरची ती चौकोनी टोपली...अजूनी डोळ्यासमोर येते...बिचारा उन्हात फिरून थंडगार पाणी पिण्यासाठी आमच्याकडे येत होता...आई त्याला आंबिल प्यायला द्यायची....जाताना भरपूर करवंद देऊन जात होता...आठवड्यातून एकदा त्याची फेरी असायची....
कुल्फीवरून आठवले आम्ही असे बर्फाचा गोळा खायचो....मस्त मजा यायची कधी कधी दोन दोन कलर एकाच गोळ्याला लावून ते कलर एकमेकांत कसे मिक्स होतात ते पाहात असू.....
कुरड्या आणि सालपापड्या काय विचारता? तो तर विक पॉइंट्...जी चोरून खाण्यात मजा ती कशात नाही असे त्यावेळी वाटायचे....आता नाही....:)
सालपापड्या ओल्याच छान लागतात्....पण कुरडया जरा उन्हात वाळवून अर्धवट ओल्या खाण्यात मजा...:)
या लेखावरून परत वाटते लहानपण देगा देवा...
येऊ दे अजूनी पुढील लेख्.....वाट पाहात आहे....खूप वाट पाहायला लावू नका....:)
प्रतिक्रिया
एप्रील च्या ऐवजी जून करा :)
रानमेवा..
वाळवण :)
जांभळं!
असेच म्हणतो
वाह!
विजुभौ
व्वा....तोंडाला पाणी सुटलं...
ही घ्या
अवांतर
खानदेशी बोरे..
करवंद...
लहानपणी
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
काय काय...
विजुभाऊ झकास
तुमचि ही मालिका..
सहमत..
सुंदर
करवंदे आवडता रानमेवा आहे
वा सुरेख!
कोकणा प्राण तळमळला
विजुभाऊ,
बहोत अच्छे
हाही लेख
आला एप्रिल आला.........