✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपाकरांना मिपाकरांची (कट्टाविरहीत) ओळख – 2

स
सोत्रि यांनी
Tue, 08/30/2011 - 16:16  ·  लेख
लेख
डिस्क्लेमर: नाजुक तब्बेतीच्या मिपाकरांनी जरा इनो जवळ ठेवूनच हा धागा वाचण्याचे करावे. नुकताच पुण्यनगरीत डेक्कनच्या पूनम नामक ‘तीर्थ’क्षेत्री एक कट्टा झाला. कट्टा नव्हे दंगा... नव्हे... नव्हे दंगलच झाली. या या या, खी खी खी, ठो ठो ठो, ठॅ ठॅ ठॅ अश्या गोंगाटातच ही दंगल झाली. या दंगलीचे दंगेखोर होते बिका, परा आणि योगप्रभू, बाकीचे सर्व (मि)पा(क)मर दंगलग्रस्त होते ;). (मागच्या ओळख धाग्याचा कट्टा फारच सोवळ्यातला कट्टा होता. तेव्हा मी सर्वांना पहिल्यांदाच भेटणार असल्यामुळे सर्वजण सोवळ्यात आले असावेत अशी आता दाट शंका येतेय ;) ) या वेळी जे. पी. मॉर्गन याची भेट असे कट्ट्याचे कारण होते. बाकी कोण कोण येणार याचा काहीच अंदाज नव्हता. तर हजर असणारे आणि प्रथमच भेट्णारे मिपाकर होते योगप्रभू, जातीवंत भटका, जे. पी. मॉर्गन, मृत्यून्जय, असुर तर जुणॆ मिपाकर होते परा, बिका, धम्या, श्रामो आणि मी. या दंगलीस कारणीभूत असलेल्या दंगेखोर मिपाकरांची आणि दंगलग्रस्त मिपाकरांची ही ओळख. दंगेखोर परा (परिकथेतील राजकुमार): या गृहस्थाशी, अरे नाही; मुंज्या आहे हा अजून, नव्यानेच ओळख झाली. ही ओळख अशी की “नभोवाणी केंद्र किंवा आकाशवाणी केंद्र”. हे केंद्र जसे 24*7 काही ना काही प्रसारीत करत असते तसा परा यावेळी काही ना काही प्रसारीत करत होता (की प्रसवत होता ;)). तेही त्याच्या ‘तार’वाणीने. बहुधा तो आधीच ‘कावेरी’ नामक तीर्थक्षेत्री जाउन ‘पावन’ होउन आला असावा, अशी दाट शंका मला आणि धम्याला अजूनही येतेय. या कट्ट्याचे सोवळे मोडून त्याचे दंगलीत रुपांतर करण्याची सुरुवात याने केली. अतिशय ‘भन्नाट’ जोक्स आणि किस्से सांगायला सुरुवात करुन. (लेका भन्नाटचे पुढचे भागही याच जोमात येउदेत की रे!) बिपीन कार्यकर्ते: मागच्या भेटीत यांनी पुस्तक वगैरे भेट दिले होते हे मी जाहीर केले आणि यांची खरडवही दुथडी भरुन वाहुन गेल्यामुळॆ यावेळी ते असल्या फंदात पडले नाहीत (माझी सुपारी देणाच्या विचार त्यांनी केलेला आहेच, पण म्हणून मी भितो की काय...). तर यावेळी ते आले होते ‘अरेबिअन नाइट्स’ चा खजिना बरोबर घेउन, आणि या खजिना लुटीमुळेच दंगलीने उग्र रुप धारण केले. काय त्या एकेक अरबी उंटिणींच्या सुरस आणि चमत्कारीक कथा. अरबी मानवी (पक्षी:माणूस) विश्व त्यांनी उलगडून दाखविले :P पण त्यांचा संचार यावेळी फक्त अरबस्तानापुरता मर्यादित नव्हता. ‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीप्रमाणेच त्यांनी तमाम दंगलग्रस्तांना विश्वसंचार घडवून आणला. मानवी मनाच्या कंगोऱ्यांबरोबरच शारिरीक कंगोरेही उलगडून दाखावले, अगदी अलगद पदर (कांद्याचा हो) उलगडावा तसे. पण त्यामुळे दंगलीचा प्रभाव वाढतच होता आणि झिंग चढलेल्या जातियवादी नेत्याच्या आवेशात ते दंगलीला चिथावणी देत होते. योगप्रभू: यांना मी प्रथमच भेटत होतो. आल्या आल्या यांनी अगदी खांद्यावर हात वगैरे टाकून अगदी पार चड्डीतली (संघाची नव्हे, शाळेतली) ओळख असल्यासारखे गप्पा मारायला सुरुवात केली आणि मला जिंकूनच घेतले. पण पुढे येणाऱ्या दंगलरुपी वादळापूर्वीचा हा शांत भाव आहे हे कुठे मला ठाऊक होते. पर्‍या आणि बिकांनी दंगा करायला सुरुवात केली आणि मग योगप्रभू ही काय चीज आहे ते कळले. तोपर्यंत वैश्विक सूत्रे मांडुन वैश्विक सुसूत्रता आणणारा एक अभ्यासू असंच समजून बसलो होतो मी. बिकांनी त्यांची 'माझी लालच' असे म्हणून दर वेळेप्रमाणे "लाल वारुणी" ऑर्डर केल्या; मग डरकाळी फोडून योगप्रभूंनीही माझीही लाल हे दाखवले... म्हणजे "लाल वारुणी" ऑर्डर केली. पण त्याआधी त्यांनी 'कमी तिथं आम्ही' या भूमिकेतून मर्दानी दारु व्हिस्की माझ्याबरोबर शेअर केली होती. मग पुढे ती वारुणी आणि व्हिस्की यांची जी काही दंगल योगप्रभूंच्या शरिरात झाली ती बाहेरच्या दंगलीला उग्र करुन गेली. बरं झाले पण हे झाले. यामुळे योगप्रभूंची पोतडी हळुहळू उघडली जाऊ लागली आणि बाहेर येऊ लागल खरंखुरं 'वैश्विक सत्य'. अस्सल रोमनाळ, खंग्री, चावट, वाह्यात, इरसाल, दांडगट, रासवट, भयंकर.....(शब्द संपले) असल्या किश्शांची आणि फटाक्यांची माळ चालू झाली. यांचाही मग वैश्विक संचार सुरू झाला आणि त्याचा शेवट कॅंपातुन फिरुन सदाशिव पेठेत झाला. कॅम्पातल्या मुली आणि सदाशिव पेठेतील मुली यांच्यामध्ये फरक काय? हे त्यांनी तोंडी तर सांगितलेच, वर अक्षरश: "मांडूनही" दाखवले. ;) 'शब्द'प्रभू असण्याबरोबरच योगप्रभू हे कलाकारही आहेत, हाडाचे नाही कागदाचे. त्यांचे 'वैश्विक सूत्र' त्यांनी चक्क ओरी'गामी' मधूनच मांडून दाखवले. तसेच ओरी या शब्दाचा एक नवीन अर्थही समस्तांना विषद केला. गामी सगळ्यांनाच माहिती असते म्हणा. योगप्रभूंनी आता 'ओरीगामी'ची मालीका लवकर चालू करावी अशी मी त्यांना विनंती करतो. दंगलग्रस्त जे. पी. मॉर्गन: याला भेटण्यासाठी हा कट्टा आयोजीत केला आणि हाच पठ्ठ्या सर्वात उशीरा आला. कारण काय तर म्हणे 'कसे असतील सगळेजण कोनजाने' हा प्रश्न त्याला पडला होता. त्यामुळे कुंपणावरच बसून गंमत बघु असा विचार करुन तो आला होता. पण त्याचे टायमिंग एकदम हुकले. तो येइपर्यंत कट्ट्याचं दंगलीत रुपांतर झालं होतं. आणि मग आल्यावर नुसताच बावचळून आणि भंजाळून गेला होता. कोणाचे ऐकू आणि किती ऐकू असा एकदम बिचारा झाला होता की काहीच बोलला नाही. शेवटी मात्र धीर करुन जोकचा एक फटाका फोडलाच त्याने, लवंगीच होता कारण दंगलग्रस्त होता तो यावेळी. मृत्यून्जय: एक धीरगंभीर व्यक्तिमत्व दंगलीत पार झाकोळुन गेलं असं मला वाटत. पण दंगलीच्या सुरुवातीपासून असल्यामुळॆ दंगलीचा आनंद घेउन जोकचा एक आपटबारही फोडून घेतला पठ्ठ्याने. पण याचीही पहिलीच वेळ असल्याने (सर्वांना भेटण्याची) जास्त काही न बोलता ऐकतच बसल्यामुळे अजून एकदा त्यांना घेउन बसावे लागणार आहे असे दिसते. असूर: टेबलावरील बाटल्या, ग्लास आणि धडाधड सुटणार्‍या ऑर्डरी बघुन, "च्यायला मी पितही नाही आणि खातही नाही तरीही या बलदंड बिलाचा भागीदार व्हावे लागणार" असा विचारी चेहरा करुन खर्‍या अर्थाने दंगलग्रस्त झाला होता. त्यात अजून नवीन लग्न झाल्यामुळे फोनवरुन "रिमोट कंट्रोल्ड" होऊन 'लग्नग्रस्त' असल्याची जाणीवही करुन देत होता. त्याने घेतलेल्या चॉकलेटचे रहस्य या "सध्या लग्न झाले आहे" (हे विधान त्याचेच आहे) या परिस्थितीत दडलेले होते, हे दिसत होतंच. कुंपणावरचे दंगलग्रस्त जातीवंत भटका : मी यायच्या आधीच याचे आगमन झाले होते. मी पावसातून, गारव्यातून असा आत आडोश्याला आलो तोच बहदराने मला पेटती शिग्रेट ऑफर केली. त्यावेळी त्या शिग्रेटीचे इतके महत्व होते की त्या पुण्याबद्दल त्यालाही त्याच्या बायकोकडे परदेशात भटकंती करायला मिळो अशी इश्वरचरणी मी प्रार्थना करतो. त्या ऑफर केलेल्या शिग्रेटीच्या झुरक्यातला आनंद शब्तातीत आहे. बरं, हे कुंपणावरचे दंगलग्रस्त आयटीग्रस्त आहेत माझ्यासारखेच. मग काय सूर आणखीनच जुळले. पण हा "आयटीग्रस्तांचा दोस्ताना" बिकांना कुठे बघवतोय, दंगलखोर ना हे. लगेच 'अतिशय गंभीरपणॆ' त्यांनी त्यांचा जळजळीत निषेध तिथल्या तिथे नोंदवला :( धमाल मुलगा: मागच्या आणि या जन्मी केलेल्या महाभयंकर पापांमुळे याच्या खाण्या-पिण्याला डॉक्टरांनी 'बुच' लावले आहे. तरीही त्या बुचाला थोडे भगदाड पाडुन याचे पापं करण चालुच आहे. पण पुर्वाश्रमीचा दंगेखोर असला तरीही या कट्ट्याचा आयोजक या नात्याने त्याला ना धड दंगेखोर होता आले ना धड दंगलग्रस्त. ना पोलीसही. श्रावण मोडक: वादाच्या वेळी मिपावर यांची साक्ष घेतली जाते ते काही उगाच नाही याची प्रचिती यांनी करुन दिली. अतिशय पोक्त होउन सगळ्यांची मजा बघत बसले होते. दंगल थोडी कमी होतेय, असे झाले की लगेच काहीतरी काडी लावायचे योगप्रभूंना. पण दंगल पेटली पुन्हा की लगेच पोक्त हौन मिश्कीलपणे सगल्यांकडे बघत बसायचे. शिका शिका यांच्याकडुन..... सोकाजी: 'सगळ्यात महत्वाचे, मादक द्रव्य' या तत्वाला चिकटून बसला होता हा सोक्या, दंगलग्रस्ताचा आव आणून. असो आत्मप्रौढीचा प्रमाद नाही करत, नाहीतर आहेतच बिका निषेधाचा खलिता घेऊन. (मरतोय आता मी ;)) आता जरा सचित्र ओळख
डावीकडुन : जे.पी. मॉर्गन, बिका, श्रामो, जातीवंत भटका, असुर, सोकाजी, योगप्रभु, परा, मृत्युन्जय आणि फोटो काढणारा धमु :)
बाकी चित्रांसाठी इथे टिचकी मारा.
नोट: पराठा कट्ट्यालाही जायचे फार मनात होते, पण ते जमले नाही :(  तो धागा वाचुन ऑलरेडी इनो घेतल्या गेला आहे.

Book traversal links for मिपाकरांना मिपाकरांची (कट्टाविरहीत) ओळख – 2

  • ‹ नविन मिपाकरांना मिपाकरांची (कट्टाविरहीत) ओळख
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
अनुभव
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
19277 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

हम्म...... करा मज्जा

विजुभाऊ
Tue, 08/30/2011 - 16:27 नवीन
हम्म...... करा मज्जा लेको. त्या धम्याला नक्की कसले बुच मारले आहे हो? मागल्यावेळॅस्ला बरा होता की. (खा मटर उसळ ख शिकरण असे म्हणणार होतो पण..........)
  • Log in or register to post comments

घरीच बसलो होतो तंगड्या वर

अन्या दातार
Tue, 08/30/2011 - 16:32 नवीन
घरीच बसलो होतो तंगड्या वर करुन असे म्हणणारेमृत्युंजय, आणि नागफणी ट्रेकहून यायला उशीर झालेले सोकाजी इथे अवतरलेले पाहून यांचा परकाया प्रवेश झाला होता का अशी शंका येत आहे!!
  • Log in or register to post comments

अन्या लेका, ही दंगल

सोत्रि
Tue, 08/30/2011 - 16:44 नवीन
अन्या लेका, ही दंगल शुक्रवारी, दिनांक 26 ऑगस्ट रोजी झाली होती. नागफणी ट्रेक आणि पराठा कट्टा शनिवारी, दिनांक 27 ऑगस्ट रोजी होता हे मी जाता जाता नम्रपणे नमुद करू इच्छितो. - (विनम्र) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

क्षमस्वमे!

अन्या दातार
Tue, 08/30/2011 - 16:51 नवीन
ओक्के! स्वारी. (क्षमाप्रार्थी) अन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

प्रकाटाआ

सोत्रि
Tue, 08/30/2011 - 16:49 नवीन
द्विरुक्तीमुळे प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हो. शनिवारी तंगड्या वर करुन

मृत्युन्जय
Tue, 08/30/2011 - 16:47 नवीन
हो. शनिवारी तंगड्या वर करुन घरीच बसलो होतो. हा कट्टा शनिवारी झाला म्हणुन कोण म्हणतय रे? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी

अर्धवट
Tue, 08/30/2011 - 16:37 नवीन
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी केलेला सवंग लोकप्रियतेचा प्रयत्न असे निरिक्षण नोंदवतो.. सूड घेतल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments

असहमत.

आत्मशून्य
Tue, 08/30/2011 - 16:54 नवीन
फटू छान आलेत म्हणून कट्टाविरहीत ओळखीला उपस्थीत असणार्‍यांसोबत धमुचे विशेष अभीनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

कस्चं कस्चं!

धमाल मुलगा
Tue, 08/30/2011 - 17:33 नवीन
क्यामेर्‍याची कमाल ती. हां, आता दोन घोट पोटात गेल्यावर हात एकदम स्थिर झाल्यानं फोटू ब्लर आहे नाहीत असं म्हणशीला तर द्याट इज अ‍ॅक्शेप्टेड. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

अर्ध्या !!

सुहास..
Tue, 08/30/2011 - 17:03 नवीन
काय रे ! ऑर्कुट चे टेस्टोमेनियल सदर मिस करतो आहेस की काय ?? ये तिकडे , मी तुझे लिहीतो , तु माझे लिही..हवे तर बरहाच्या कृपेने मराठीत लिहुन तिथे कॉपी-पेस्ट करु ! काय म्हणतोस ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

" क्षीण " शब्द अ‍ॅडवायचा

मृत्युन्जय
Tue, 08/30/2011 - 17:20 नवीन
" क्षीण " शब्द अ‍ॅडवायचा राहिला का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

=)) =))

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/30/2011 - 17:22 नवीन
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी केलेला सवंग लोकप्रियतेचा प्रयत्न असे निरिक्षण नोंदवतो..
ह्याच ह्याच प्रतिक्रियेची प्रतिक्षा होती ;) कित्ती कित्ती तो जळफळाट म्हणतो मी. मागच्यावेळी आमचे विजुभौ किती आग्रहाने थांबवत होते तर थांबला नाहीस, आणि आता सूड घेतोस होय रे ? अवांतर :- असुर्‍या नेहमी गणपतीच्या दिवसातच कसा अवतिर्ण होतो हा मला कायम पडत आलेला प्रश्न आहे. मागच्यावेळी भेटला तेव्हा देखील भाद्रपदच चालु होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

हॅ हॅ हॅ!!!

धमाल मुलगा
Tue, 08/30/2011 - 17:22 नवीन
आम्ही सांगितलं होतं की बाबा, जा आणि दिल्लीत ठाण मांडून बस म्हणून? पण नाही, तुलाच दत्ताजी शिंदे व्हायची हौस फार! आम्ही काय करणार? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

सोकाजीराव,

प्रास
Tue, 08/30/2011 - 16:42 नवीन
एकूण तुमचा पुण्यभूमधला हा कट्टाही चांगला पार पडला असं दिसतंय. ग्रेट ग्रेट मिपाकरांना याची देही बघणे तुमच्या कॅमेराच्या डोळ्यांद्वारे शक्य झालेय हे ही नसे थोडके..... आता तुम्ही म्हणता तसे नाजुक प्रकृतीचे नसूनही दुसर्‍यांदा जाऊन इनो घेणे क्रमप्राप्त....
  • Log in or register to post comments

मज्जा - मज्जा चाललिय...

साबु
Tue, 08/30/2011 - 16:46 नवीन
च्यायला... तो पराठा कट्टा आणि हा...वारुणि कट्टा.... मजा करताय.... :)
  • Log in or register to post comments

झकास

प्रचेतस
Tue, 08/30/2011 - 18:07 नवीन
फोटू व वृत्तांत झकास. काही किस्से मिपावर पण येउ द्यात की. ;)
  • Log in or register to post comments

ते किस्से जर इथे मिपावर लावले

सोत्रि
Tue, 08/30/2011 - 18:16 नवीन
ते किस्से जर इथे मिपावर लावले तर माझा आयडी बॅन होइल ;) - (किस्सेबाज) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=)

आत्मशून्य
Tue, 08/30/2011 - 18:32 नवीन
थोडक्यात जर अजून धमाल हवी असेल तर तिथं उपस्थीत असणेला काही पर्याय नाही तर :) - पर्यायशून्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

=)

सूड
Tue, 08/30/2011 - 19:06 नवीन
अगदी अगदी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

च्यायला! ते किस्से इथे टाकले

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/31/2011 - 13:46 नवीन
च्यायला! ते किस्से इथे टाकले तर माझाही आयडी ब्यान होईल, कायमचा. आणि काही किश्श्यांसाठी योगप्रभूंना पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनचा आधार घ्यावा लागेल ते वेगळंच. त्याशिवाय नीट कळणार नाहीत. त्यापेक्षा करा अजून एखादा कट्टा आणि बसू सगळे एकत्र! काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खॅ खॅ खॅ!!!

धमाल मुलगा
Wed, 08/31/2011 - 14:25 नवीन
एक फोटू कटाक्षानं टाळलाच मी. तू सुरस आणि चमत्कारिक अरेबियन नाईट्सचे किस्से सांगत होतास तेव्हा तुझ्या पाठीमागे ३ वेटर्स, आणि दोन्ही कॅप्टन्स उभे राहून गम्मत ऐकत होते :D >>त्यापेक्षा करा अजून एखादा कट्टा आणि बसू सगळे एकत्र! काय म्हणता? फकस्त येकच इनंती, येताना सगळं सोवळं ओवळं खुंटीला टागूनच यावे. अहो, कुस्त्यांची दंगल बघायला जायाचं तर भट्टीची पांढरीफेक कापडं घालून जाऊच ने! भट्टी सगळी मोडणार अन कापडं लाल मातीनं रंगल्याबिगर र्‍हातील व्हय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मिपाकर मित्रहो, भेटीगाठी चालू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/30/2011 - 18:12 नवीन
मिपाकर मित्रहो, भेटीगाठी चालू ठेवा. फोटू बघून आनंद वाटला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हो का?

धमाल मुलगा
Tue, 08/30/2011 - 19:16 नवीन
आणखी किती दिवस शेंड्या लावणार आहात? ;) त्या यशवंत्याला एक दिवस घाला गाडीत अन् या इकडं! पायजे तं आपण पिरंगुटला एखादं फार्महौस घेऊ भाड्यानं. काय म्हंता? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा. डॉ. ... बरेच दिवस झाले

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/31/2011 - 13:47 नवीन
प्रा. डॉ. ... बरेच दिवस झाले तुम्ही येणार येणार असे ऐकतो आहे. का येऊन गेलात आणि आम्हाला पत्ताच नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धमु, यशवंतला दीव्य मराठीच्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/31/2011 - 19:08 नवीन
धमु, यशवंतला दीव्य मराठीच्या कार्यालयातून उचलून थेट पुण्यात हजर केले असते पण मीच जरा माझ्या कामात जरा गुंतून गेलो आहे. बिका, पुण्यात यायचं असेन तेव्हा तुम्हाला कळवणार नाही, असे होणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लै भारी

jaypal
Tue, 08/30/2011 - 18:24 नवीन
यकदम खंग्री कट्टा जमिवलाय की पठ्यांनो. च्या मारी आमसनीच टाईम घावना. एक डाव सम्द्यास्नी बघतोच आता. Image removed.
  • Log in or register to post comments

हाँऽऽऽ....

धमाल मुलगा
Tue, 08/30/2011 - 18:34 नवीन
तू नुसती आश्वासनं दे ! हल्ली ठाण्याच्या जंगलात हिंडणंही बंदच दिसतंय तुझं. तू कधी यावास कट्ट्याला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

पाउस संपला

jaypal
Tue, 08/30/2011 - 18:38 नवीन
की जंगल भट्कंती चालु होईल(पावसात केमरा वापरता येत नाही :-(). सध्या भटकंतीस आराम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/30/2011 - 18:45 नवीन
तू नुसती आश्वासनं दे ! हल्ली ठाण्याच्या जंगलात हिंडणंही बंदच दिसतंय तुझं. तू कधी यावास कट्ट्याला?
त्यानी आधी दोन दिवस सलग मिपवर येऊन दाखवावे ;) बाकी सगळे नंतर. तो येणार, मग आपण कट्टा करणार... हे ऐकुन ऐकुन आणि बोलून बोलून माझ्या एका मोबाईलचा स्पिकर हेडफोन बंद झाला. अवांतर पण महत्वाचे :- येतो , बघतो, जमवतो अशा स्वरुपातली आश्वासने देऊन, साधा फोन देखील न करणार्‍या काही इसमांची अब्रु ह्या धाग्यात वेशीला का टांगलेली नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मित्रांनो

jaypal
Tue, 08/30/2011 - 18:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>त्यानी आधी दोन दिवस सलग

धमाल मुलगा
Tue, 08/30/2011 - 18:54 नवीन
>>त्यानी आधी दोन दिवस सलग मिपवर येऊन दाखवावे Wink बाकी सगळे नंतर. +१ :D
अवांतर पण महत्वाचे :- येतो , बघतो, जमवतो अशा स्वरुपातली आश्वासने देऊन, साधा फोन देखील न करणार्‍या काही इसमांची अब्रु ह्या धाग्यात वेशीला का टांगलेली नाही ?
कारण त्यांच्या अब्रुला फ्ल्यू झाला होता असं कळते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>> कारण त्यांच्या अब्रुला

पाषाणभेद
Wed, 08/31/2011 - 01:01 नवीन
>> कारण त्यांच्या अब्रुला फ्ल्यू झाला होता असं कळते. =)) तुला तशरीफ अर्थ अभिप्रेत आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

नाय ए.....

धमाल मुलगा
Wed, 08/31/2011 - 14:22 नवीन
>>तुला तशरीफ अर्थ अभिप्रेत आहे काय? =)) =)) =)) नुसता तेव्हाढ्याच जागी कसा फ्ल्यू होईल? तेव्हढंच होतं त्याला............. जाउदे. पब्लिक हाणेल मला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

तुला अजुन जित्ता पाहुन लय

गणपा
Tue, 08/30/2011 - 19:11 नवीन
तुला अजुन जित्ता पाहुन लय आणंद झाला हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

+१

श्रावण मोडक
Tue, 08/30/2011 - 19:17 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+२

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/31/2011 - 13:48 नवीन
जयपालाचे स्वागत! आता तसाच एकदा आपला ब्रिटिस दादूस कुठे गायबलाय ते शोधा बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ए कोन रे त्यो जैपालाला

विजुभाऊ
Tue, 08/30/2011 - 19:15 नवीन
ए कोन रे त्यो जैपालाला बोल्तोय. हितं ठान्याच्या पोरोग्रामला जैपाल भौ हास्पिट्लात्न येळात येळ काडुन हाज्री द्युन ग्येले व्हत्ये
  • Log in or register to post comments

विजूभौ, जयपालजी तुम्हाला

पाषाणभेद
Wed, 08/31/2011 - 01:04 नवीन
विजूभौ, जयपालजी तुम्हाला भेटले? आम्हाला तर ते कधीचे हरवल्याचे समजले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वाईट.

रेवती
Tue, 08/30/2011 - 19:48 नवीन
वाईट.
  • Log in or register to post comments

काय वाईट? -(साईट) ध.

धमाल मुलगा
Tue, 08/30/2011 - 20:07 नवीन
काय वाईट? -(साईट) ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वाईट आहात सगळेजण! मी येते

रेवती
Tue, 08/30/2011 - 20:19 नवीन
वाईट आहात सगळेजण! मी येते डिसेंबरात्........तू सगळ्यांसाठी कट्टा ठरवायचास्.......आहे कबूल? (बाईट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

रेवतीतै धम्यावरी

jaypal
Tue, 08/30/2011 - 20:25 नवीन
विसंबला त्याचा ..................... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वाटलच होतं.......आता गप्प

रेवती
Tue, 08/30/2011 - 20:29 नवीन
वाटलच होतं.......आता गप्प बसलाय धम्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

च्यायला!

धमाल मुलगा
Tue, 08/30/2011 - 20:33 नवीन
ये जुर्रत? नुसती बोलाची कढी अन बोलाचा भात नको! सोयीच्या तारखा आधी (मराठीतः वेल इन अ‍ॅडव्हान्स) कळवल्यास, योग्य ती कार्यवाही केली जाईल. :) अर्रे, समजलात काय? आँ? मिपाच्या आद्य कट्टा संयोजकावर हा असा अविश्वास? हा हन्त हन्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कळवल्या जाईल.

रेवती
Tue, 08/30/2011 - 20:49 नवीन
कळवल्या जाईल.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वाट बघा

jaypal
Tue, 08/30/2011 - 20:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगदी छान! जैपाला, तुझ्या त्या

रेवती
Tue, 08/30/2011 - 21:04 नवीन
अगदी छान! जैपाला, तुझ्या त्या चित्रांची सवय लावलियेस आम्हाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

चित्रपाल इज ब्याक वेल्कम

प्रीत-मोहर
Tue, 08/30/2011 - 21:54 नवीन
चित्रपाल इज ब्याक :) वेल्कम चित्रपाल दा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

तेच म्हणतो मी. कुठे हरवले

पाषाणभेद
Wed, 08/31/2011 - 01:10 नवीन
तेच म्हणतो मी. कुठे हरवले होते कोण जाणे इतक्या दिवस. दुसरे असे की: >>> नोट: पराठा कट्ट्यालाही जायचे फार मनात होते, पण ते जमले नाही तो धागा वाचुन ऑलरेडी इनो घेतल्या गेला आहे. >>> Submitted by रेवती on Tue, 30/08/2011 - 20:49. >>>कळवल्या जाईल. इनो घेतल्या गेला आहे, कळवल्या जाईल हे काय आहे? मान्य आहे की शुद्धलेखनाला फाटा आहे पण इतके अपभ्रंशीत शब्दरचना अपेक्षीत नाही. हा मटा नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

मिष्टर भेद, साधारण ३०-३५

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/31/2011 - 13:52 नवीन
मिष्टर भेद, साधारण ३०-३५ टक्के मराठी जनतेसाठी प्रमाण बोली भाषा आहे ती... असं नका बोलू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा