Skip to main content

अतिशय गाजलेला भंपक लेख

लेखक सोत्रि यांनी रविवार, 28/08/2011 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच (कोणॆ एके काळी) बहुचर्चित झालेला मी मतदान का करावे? हा लेख वाचला. चेतन सुभाष गुगळे (जगभर प्रसिद्ध असलेले चिंतनशील लेखक) यांच्या लेखाचे जगभरात(?) प्रचंड कौतुक झालेलं असून त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली व जगभरांतुन प्रतिसादांचा पाउस पडला (अशी माहिती सदर लेखाच्या शेवटी होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की असे लेख लिहीले जातात. याचं देखील आश्चर्य नाही की असे लेख प्रसिद्धही केले जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक असे लेख मुल्यवान असा वेळ खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या (?) या लेखाच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या लेखाच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला. आता प्रश्न असा उरतो की ज्या कुणी या लेखाच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून प्रतिसाद पाठविले आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे) या लेखातुन बरंच काही चिंतनशील अस वाचायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण लेख वाचल्यावर "असला लेख वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही ‘चिंतनशील’ मिळालं नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा नविन धागा.

वाचने 14673
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

मला तरी संपूर्ण लेख वाचल्यावर "असला लेख वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही ‘चिंतनशील’ मिळालं नाही.
हेच त्यांना म्हणायचं असतं. पण ते वेळीच ओळखण्याएवढं चाणाक्षपण तुमच्यासारख्यांकडं नसल्यानं त्यांना आख्खा लेख लिहावा लागतो. या कष्टाबद्दल त्यांचे क्षमाप्रार्थी होण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावरच टीकेचा सूर लावता. यालाच खऱ्याची (खरे - सत्य. खरे आडनाव नव्हे. नाही तर तुम्ही इथून थेट आम्हाला अंताजी खऱ्यांकडे न्यायचे) दुनिया नाही असे म्हणतात. ;)

सोकाजी खाल्लीस माती आता युद्धाला तयार राहा ;) सदर टर उडवला गेलेला लेखक.. त्याची सर्व तकाद पणाला लावून पुढील एक आठवडा या धाग्यावर धुमाकूळ घालेल अणि हा धागा कसा पहिल्या ३ धग्यांवर राहिल याची काळजी घेइल.. असो.. तुम्हाला शुभेच्छा

श्रावणातल्या धुळवडीची आवसेच्या मुहुरतावरची सुरुवात

In reply to by नावातकायआहे

नाकाआ शी सहमत. तसा मी ९९.९९% सगळ्यांशी सहमत असतो.

कुणी काय लिहावं आणि कुणी काय वाचावे हे सांगणारे टिकुजीराव कोण? मिपावर टोळ्या करुन नविन लेखकांना नाउमेद करणार्यांची तळी भरायची वेळ झाली आहे असे वाटते.

In reply to by मितभाषी

भावश्या, लेका बर्‍याच दिवसांनी इथे आला असशील तर जरा अभ्यास* वाढव ! लेखाची कॅटेगरी बघितलीस का ? पाकक्रिया - कारण 'जिलबी' टाकली आहे विडंबन आणि समिक्षा* * अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक - ('उमेदीने' तळी भरणारा) सोकाजी

In reply to by आशु जोग

आशु, 'अभ्यास वाढवा' आणि 'मोठे व्हा' ह्यांत खुप फरक आहे. त्यासाठी अभ्यास वाढवा मग आपोआपच मोठे व्हाल :) - (मनाबरोबरच तनं अभ्यासणारा) सोकाजी

हा हा....

In reply to by नितिन थत्ते

थत्तेचाचा, नव्ह नव्ह, कंस अज्याबत इसरलो न्हाइ. कंसमामास्नी कसा काय इसर्णार हो. पन त्यो फकस्त पर्तीसादात असतुया! - ( कंसाला मारलेला (ब्रिजेश) ) सोकाजी

हा सोकाजी सोकावला आहे! चांगल्या लेखनाची अशी पिसं काढल्याबद्दल निषेध!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

"आप कौनसी हैसीयत से निषेध कर रहे हो" (आठवा कणेकरांची फिल्लमबाजी) म्हणजे हा निषेध करणारे बिका सं.मं मधले की पूनम मधले? :P म्हणजे पुढची स्ट्राटेजी ठरवायला बरे! - (स्ट्राटेजीक) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रतिसादा गणिक बदलणारी स्वाक्षरी बघून आय. डी. हॅक झाल्याची शंका येतेय... ((एका महान आय डी ची आठवण झाली....))

In reply to by सोत्रि

सोकाजी, तुम्ही असे प्रश्न विचारून विषय बदलायचा जो प्रयत्न केला आहे तो अश्लाघ्य आहे. मी अतिशय गंभीरपणे तुमचा निषेध केला होता.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अतिशय गंभीरपणे केलेल्या निषेधाचा स्विकार करुन तितक्याच गंभीरपणे जाहीर माफी मागीतल्या गेली आहे ! - (मोठ्या मनाचा मोकळा) सोकाजी

In reply to by सोत्रि

- (मोठ्या मनाचा मोकळा) सोकाजी
खरं तर तुम्हाला भेटल्यानंतर "(मोकळ्या मनाचा मोठ्ठा) सोकाजी" असं जास्त चपखल बसेल असे नम्रपणे नमूद करतो. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वा वा... गोगोड कंपूबाजी पाहून द्वोळे पाणावले ;) -- जाहीर कम्पुकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हे बघा! अवांतर करणारे संपादक आणि मिपावर सतत अवांतर प्रतिसाद येतात म्हणून लोक इतरांना दोषी ठरवतात. (सध्या घासुगुर्जी) प्रियाली

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मिष्टर स्पा! गप पडा! बघून घेऊ तुम्हाला! तुमच्या पहिल्या धाग्याचे उत्तर मिळेल तुम्हाला! "आप कौनसी हैसीयत से निषेध कर रहे हो" (आठवा कणेकरांची फिल्लमबाजी) म्हणजे हा निषेध करणारे बिका सं.मं मधले की पूनम मधले? म्हणजे पुढची स्ट्राटेजी ठरवायला बरे! - (स्ट्राटेजीक) स्पाकाजी ;)

सोकाजी, तुमच्या खवत लवकरच एक पाशवी आयडी "अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!" असं मोठ्या फॉण्टमधे लिहीणार आहेत असं भविष्य वर्तवण्यात आल्या जात आहे. तुमचं खरं नाव सोकाजी का? नसेल तर तुम्ही अशी टोपणनावं घेऊन खरी नावं वाटवीत अशा सदस्यनामाने लिहीणार्‍या आयडीच्या लेखावर भंपक असे शेरे कसे मारू शकता? आजचा अभ्यास पूर्ण केलात का? मग आजचा तुमचा शब्द आहे megalomania. याचा थोडा अभ्यास करा आणि मोठे व्हा. ठीक? सोडा हो, तुम्ही तुमची कॉकटेल्स काढा, मस्त एकत्र बसू, गप्पा मारू, कॉकटेल्सचा आस्वाद घेऊ, जग कसं 'रोचक' आहे यावर थोडीबहुत चर्चा करू आणि पुन्हा आपापल्या घरी जाऊन मिपावर दंगामस्ती करू! कशाला उगाच अ‍ॅंटीलॅक्सेटीव्हच्या बाटल्या प्यायच्या?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पूर्ण सहमत आहे. ते लॅक्सेटिव्ह वगैरे पिऊन पिऊन कट्टाळा आलाय सध्या!

In reply to by पैसा

बौद्धीक बद्धकोष्ठ, बोळा तुंबणे वगैरे शब्दांचा अभ्यास कर गं. तू अजून "मोठी होशील"! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण कोणत्याही बौद्धकोष्ठाला कोणतं तरी लॅक्सेटिव्ह उपयोगी पडेल, अँटिलॅक्सेटिव्ह घेतलं तर बूच मारल्या जाईल ना!!! ;) (की त्याचसाठी म्हणतेस तसं?)

In reply to by पैसा

म्हणूनतर म्हटलं ना "कशाला उगाच अ‍ॅंटीलॅक्सेटीव्हच्या बाटल्या प्यायच्या?" बौद्धीक बद्धकोष्ठ झालंय याची जाहिरात करणारे लेख वाचणे म्हणजे अ‍ॅंटीलॅक्सेटीव्हच्या बाटल्या पिण्यासारखंच नाही का! काय करावं या नवीन सभासदांचं? सगळं कसं उचकटून सांगावं लागतं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ जोजोकाकू, तुमचं जालीय वय माझ्यापेक्षा २ वर्षं जास्त आहे हे सदासर्वदा सांगायलाच पाहिजे का हो? ;)

In reply to by पैसा

जोजोकाकू, तुमचं जालीय वय माझ्यापेक्षा २ वर्षं जास्त आहे हे सदासर्वदा सांगायलाच पाहिजे का हो?
किती तो प्रामाणिकपणा! यमी लाजली असेल ना... ;)

In reply to by श्रावण मोडक

इश्श्य! यमी येईलच आता, जरा थांबा हो (यमीचे काका)! ;)

In reply to by श्रावण मोडक

किती तो प्रामाणिकपणा! यमी लाजली असेल ना...
यमी लाजणार ? लोकाला लाज आणेल ती. :P

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नको, नको!!! काही सांगू नका. तुम्ही भोगलं ना ते दुःख. बास्स झालं. त्याची दर्दभरी कहाणी नको... ;) अशा कहाण्या म्हणजे पुन्हा ते दिवस जगणं असं म्हणतात... ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बक्षीसाची ऐडिया आधीच फोडून जाहीर केल्याबद्दल जाहीर निषेध! आता सोकाजींना अभिनंदन स्वीकारण्यावाचून गत्यंतर दिसत्त नाही. त्या गत्यंतर नसण्याबद्दल आणखी एक अ‍ॅडिशनल
अभिनंदन!!

In reply to by प्रियाली

विषय निषेध बघुन भीत भीतच प्रतिसाद बघितला, तर एकदम मोठ्या फॉन्ट मधे अभिनंदन बघुन एकदम भंजाळलोच! पण एकंदरीत प्रतिसाद वाचता पाशवी आयडीकडुन पाठिंबा मिळालेला पाहुन थोडे मांस चढले अंगावर आणि हाय रे कर्मा.... वजन कमी करण्याच्या प्रयत्नांचा एकदम बोर्‍या वाजला म्हणुनश्यान पाशवी आयडीचा 'निसेद'. (ऑलरेडी ह्या आयडीने अभिनंदन केले गेल्या असल्यामुळे निषेध जरा मवाळ होउन निसेद झाला आहे) - (मवाळ 'निसेद' व्यक्त करणारा ) सोकाजी

इतक्या चांगल्या लेखाला जिलबी व विडंबन क्याटेगिरीत टाकल्याबद्दल सोकाजीरावांचा तीव्र णिसेद !!!!! (नव्यांना प्रोत्साहन देणारी) प्रीमो

In reply to by प्रीत-मोहर

(नव्यांना प्रोत्साहन देणारी) प्रीमो
आज्जे, आयडीपुरता तुझ्यापेक्षा सोकाजी काही आठवडे तरी मोठा आहे गं... निघाली सह्यांची नकला करायला... ;)

In reply to by श्रावण मोडक

मग तर त्यांनी जास्ती प्रोत्साहन द्यायला नको का? ;) आणि काय हो काका तुम्हाला बै सगळ्या गोष्टीत निगेटिव शोधायची भारी हौस... माझी सह्या कापी करण्याची सवय दिसली आणी प्रोत्साहन देते ते तेव्ढ नाय दिसल ;) हे बर नाय हां

In reply to by प्रीत-मोहर

मग तर त्यांनी जास्ती प्रोत्साहन द्यायला नको का?
ते तर देतातच गं. सातत्यानं कॉकटेलवर लिहिणारा दुसरा कोण आहे सांग पाहू?
आणि काय हो काका तुम्हाला बै सगळ्या गोष्टीत निगेटिव शोधायची भारी हौस...
सगळ्या? यादी दे.
माझी सह्या कापी करण्याची सवय दिसली आणी प्रोत्साहन देते ते तेव्ढ नाय दिसल
दिसलं की. प्रोत्साहनाला हरकत नाहीच आपली. नव्यांना या शब्दाविषयी तुला तपशील पुरवला. पण कॉप्या करण्याचा नादच असा की तिकडं लक्षच जात नाही ना...

In reply to by प्रीत-मोहर

मला आज्जी म्हणुन स्वतःचे वय लपवण्याच्या क्षीण प्रयत्नांबद्दल श्री श्रावण मोडके यांना हॅप्पी बर्थ्डेच्या शुभेच्छा व ही मेणबत्ती :)

In reply to by प्रीत-मोहर

तुमची मेणबत्तीसुद्धा उमेदीची वर्षं संपल्यासारखी, रया गेलेली, म्हातारी दिसते आहे. चांगली तरणीताठी तरी निवडायची. श्रामोंना बरं वाटलं असतं.

In reply to by राजेश घासकडवी

जे आहे ते असे आहे ... असच्च स्वीकाराव लागेल ;) @ श्रामोण्णा मेणबत्ती हुडकत होते तुम्च्यासाठी .. वाटल्यास बिकाशेखना विचारा ;)

In reply to by प्रीत-मोहर

मेणबत्ती हुडकत होते तुम्च्यासाठी .. वाटल्यास बिकाशेखना विचारा
उंदराला मांजर साक्ष. म्हण अशीच आहे म्हणून उंदीर आणि मांजर म्हटलं. एरवी चुचुंद्री (किंवा चिचुंद्री) आणि बोका म्हटलं असतं. ;)

In reply to by श्रावण मोडक

उंदराला मांजर साक्ष. म्हण अशीच आहे म्हणून उंदीर आणि मांजर म्हटलं. एरवी चुचुंद्री (किंवा चिचुंद्री) आणि बोका म्हटलं असतं.
ओ श्रामो'काका', तुमी चिटींग करुन र्‍हायले... तुमीच परवा 'बिका अरबी उंट आहेत' असं म्हणाला होतात.. आता मांजर/बोका म्हणताय... पैले नक्की करा, कण्फुसन होतंय... :D बाकी प्रीमोला कायपण म्हणा, ती शिव्याच देते, त्यामुळे फरक पडत नै... :-) --असुर

In reply to by असुर

अरे बाबा बिकाचे अनेक अवतार असतात. वेळकाळानुरून तो अवतार घेतो. कधी उंट, कधी बोका, कधी पोपट, कधी कोल्हा, कधी लांडगा... या क्रमाने तो बिबट्याही होतो. या सकळ प्राणीमात्रांचे एकेक गुण एकाच ठिकाणी महायचे असतील तर ते बिकामध्येच पाहता येतात. थोडा अधिक कट्ट्यांवर येत जा. म्हणजे तुला समजेल ते. मी उगाच त्याच्या बाजूला हाताची घडी, तोंडावर बोट असा बसत नसतो. ;) पुढच्या दोन-चार कट्ट्यांना तर त्याच्या हाताच्या टप्प्यातही येणार नाही मी. ;) प्रीमो ही फक्त ब(ड)बडी आहे रे. विश्वास नसेल तर बांबू हाऊसमध्ये जे तिला भेटले त्यांना विचार. तिनं त्या दिवशी भल्या-भल्या बोलघेवड्यांना मौनात जाण्यास भाग पाडलं होतं. :)

In reply to by प्रीत-मोहर

उगीच पुड्या सोडु नका.
अजून नाही सोडलेल्या. सोडू का? धम्या, पराला विचार आणि मग उत्तर दे. ;)
तुमी व्हता काय कट्ट्याला?
होतो. तसंही धम्यानं पुरावा दिलाच आहे.

In reply to by श्रावण मोडक

ऐला .. घ्या मांजराला बोक्याला उंदीर(की बोकेच?) साक्ष झाल की हो हे

In reply to by श्रावण मोडक

श्री.कुकडोलकर लिखीत 'बिबट्या कुठे जाणार?' ह्या पुस्तकाचा उपयोग शेख बिबट्या कार्यकर्ते ह्यांचे बिबटेगिरी आणि अडचणी समजावोन घेण्यास कितपत उपयोग होऊ शकेल? >>तिनं त्या दिवशी भल्या-भल्या बोलघेवड्यांना मौनात जाण्यास भाग पाडलं होतं. आणि पुढं आठवडाभर त्या मौनाची भाषांतरं ऐकता ऐकता आमचे कान किटले होते. ;)

In reply to by धमाल मुलगा

श्री.कुकडोलकर लिखीत 'बिबट्या कुठे जाणार?' ह्या पुस्तकाचा उपयोग शेख बिबट्या कार्यकर्ते ह्यांचे बिबटेगिरी आणि अडचणी समजावोन घेण्यास कितपत उपयोग होऊ शकेल?
गरज नाही. इथं जा, परिच्छेद क्रमांक ३ वाच. आता मी मेलोच... ;)

In reply to by श्रावण मोडक

बिका मधे एवढे गुण आहेत हे आतापर्यंत मला कसे कळले नाही बॉ?

In reply to by विनायक प्रभू

स्टेल्थ! तुम्हालाही कळले नाही यातच बिकाच्या या गुणाची पावती आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

उंट,अरब ते संपादकत्व अशा खडतर प्रवासाचं हे इंगित मोठं रोचक (आहाहा..काय पर्फेक्ट चानस घावला ह्यो शब्द लिवायला!) आहे. ;) अवांतरः परिच्छेद क्र.३ मधली शेवटची ओळ वाचून मात्र पक्की खात्री पटलीच. ;)

In reply to by श्रावण मोडक

अरे बाबा बिकाचे अनेक अवतार असतात. वेळकाळानुरून तो अवतार घेतो. कधी उंट, कधी बोका, कधी पोपट, कधी कोल्हा, कधी लांडगा... या क्रमाने तो बिबट्याही होतो. या सकळ प्राणीमात्रांचे एकेक गुण एकाच ठिकाणी महायचे असतील तर ते बिकामध्येच पाहता येतात. बिकाजी एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व ऐकले होते, पशुतुल्य व्यक्तिमत्व म्हणुन नव्याने ओळख करुन दिलीत. धन्यवाद.

In reply to by राजेश घासकडवी

मेलो... मेणबत्ती अशी सार्थ ठरेल असं वाटलं नव्हतं... ;)

सोक्या हा लेख अतिशय हीन , सडका आणि भम्पक आहे (म्हणजे लेख भयंकर आवडण्यात आला आहे :) ) सोक्या स्वता:ला जरा आवारा , श्रावण महिन्यात इतक मायलेज मिळेल अस वाटल नव्हत (अरे कुठे कुठे दगड मारशील;))

एका सुसंस्कृत धाग्याचे विडंबन केल्याबद्दल सोकाजींचा निषेध! विडंबनासाठी जो धागा वापरलात त्याबद्दल डब्बल निषेध.

In reply to by प्रियाली

विडंबनासाठी पॉलिष्टरचाच धागा वापरावा. गुगळ्यांचा वापरू नये.

In reply to by नितिन थत्ते

"आयला, तू पण!" १. You too Brutus! या जगप्रसिद्ध वाक्याचे शब्दशः भाषांतर करण्यापेक्षा सुंदर भाषांतर करणे मला जास्त श्रेयस्कर वाटले. बाकी प्रियालीने सोकाजींचा निषेध केला आहे म्हणून मी ही करते. २. स्लटवॉकची कल्पना भलतीच प्रसिद्ध पावत आहे.

In reply to by नितिन थत्ते

थत्ते चाचा, फ़ुटलो ना हसुन हसुन! इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली /> इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली /> इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली /> इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली /> इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली /> - (विमल पॉलिष्टरचे कपडे घालणारा ) सोकाजी

''विडंबनासाठी पॉलिष्टरचाच धागा वापरावा. गुगळ्यांचा वापरू नये.' पुर्वी विडंबनासाठी नाडी वापरायचे, आता धाग्यापर्यंत आले, भलतेच चिकित्सक झालेत बोवा मिपाकर,