✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अतिशय गाजलेला भंपक लेख

स
सोत्रि यांनी
Sun, 08/28/2011 - 12:58  ·  लेख
लेख
नुकतंच (कोणॆ एके काळी) बहुचर्चित झालेला मी मतदान का करावे? हा लेख वाचला. चेतन सुभाष गुगळे (जगभर प्रसिद्ध असलेले चिंतनशील लेखक) यांच्या लेखाचे जगभरात(?) प्रचंड कौतुक झालेलं असून त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली व जगभरांतुन प्रतिसादांचा पाउस पडला (अशी माहिती सदर लेखाच्या शेवटी होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की असे लेख लिहीले जातात. याचं देखील आश्चर्य नाही की असे लेख प्रसिद्धही केले जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक असे लेख मुल्यवान असा वेळ खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या (?) या लेखाच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या लेखाच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला. आता प्रश्न असा उरतो की ज्या कुणी या लेखाच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून प्रतिसाद पाठविले आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे) या लेखातुन बरंच काही चिंतनशील अस वाचायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण लेख वाचल्यावर "असला लेख वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही ‘चिंतनशील’ मिळालं नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा नविन धागा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14610 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

हेच

श्रावण मोडक
Sun, 08/28/2011 - 13:16 नवीन
मला तरी संपूर्ण लेख वाचल्यावर "असला लेख वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही ‘चिंतनशील’ मिळालं नाही.
हेच त्यांना म्हणायचं असतं. पण ते वेळीच ओळखण्याएवढं चाणाक्षपण तुमच्यासारख्यांकडं नसल्यानं त्यांना आख्खा लेख लिहावा लागतो. या कष्टाबद्दल त्यांचे क्षमाप्रार्थी होण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावरच टीकेचा सूर लावता. यालाच खऱ्याची (खरे - सत्य. खरे आडनाव नव्हे. नाही तर तुम्ही इथून थेट आम्हाला अंताजी खऱ्यांकडे न्यायचे) दुनिया नाही असे म्हणतात. ;)
  • Log in or register to post comments

अरेरे

स्पा
Sun, 08/28/2011 - 14:01 नवीन
सोकाजी खाल्लीस माती आता युद्धाला तयार राहा ;) सदर टर उडवला गेलेला लेखक.. त्याची सर्व तकाद पणाला लावून पुढील एक आठवडा या धाग्यावर धुमाकूळ घालेल अणि हा धागा कसा पहिल्या ३ धग्यांवर राहिल याची काळजी घेइल.. असो.. तुम्हाला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

श्रावणात धुळवड

नावातकायआहे
Sun, 08/28/2011 - 14:19 नवीन
श्रावणातल्या धुळवडीची आवसेच्या मुहुरतावरची सुरुवात
  • Log in or register to post comments

१+

विनायक प्रभू
Sun, 08/28/2011 - 17:42 नवीन
नाकाआ शी सहमत. तसा मी ९९.९९% सगळ्यांशी सहमत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

कुणी काय लिहावं आणि कुणी काय

मितभाषी
Sun, 08/28/2011 - 14:50 नवीन
कुणी काय लिहावं आणि कुणी काय वाचावे हे सांगणारे टिकुजीराव कोण? मिपावर टोळ्या करुन नविन लेखकांना नाउमेद करणार्यांची तळी भरायची वेळ झाली आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

अभ्यास वाढवा...

सोत्रि
Sun, 08/28/2011 - 18:23 नवीन
भावश्या, लेका बर्‍याच दिवसांनी इथे आला असशील तर जरा अभ्यास* वाढव ! लेखाची कॅटेगरी बघितलीस का ? पाकक्रिया - कारण 'जिलबी' टाकली आहे विडंबन आणि समिक्षा* * अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक - ('उमेदीने' तळी भरणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

अभ्यास वाढवा... ही मोठे व्हा

आशु जोग
Tue, 08/30/2011 - 23:24 नवीन
अभ्यास वाढवा... ही मोठे व्हा ची कोपी वाटते आपला (मने अभ्यासणारा) जोग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आशु, 'अभ्यास वाढवा' आणि 'मोठे

सोत्रि
Wed, 08/31/2011 - 09:45 नवीन
आशु, 'अभ्यास वाढवा' आणि 'मोठे व्हा' ह्यांत खुप फरक आहे. त्यासाठी अभ्यास वाढवा मग आपोआपच मोठे व्हाल :) - (मनाबरोबरच तनं अभ्यासणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

तुमच्या लेखाचे नाव छान आहे,

आशु जोग
Sun, 08/28/2011 - 15:01 नवीन
तुमच्या लेखाचे नाव छान आहे, जाम आवडले ! दिलखुश ! तुमी स्वतःच भम्पक म्हटल्यामुळे वाचायचे राहुन गेले
  • Log in or register to post comments

:)

आत्मशून्य
Sun, 08/28/2011 - 15:16 नवीन
हा हा....
  • Log in or register to post comments

(कंस विसरलात का सोकाजीराव?)

नितिन थत्ते
Sun, 08/28/2011 - 17:55 नवीन
(कंस विसरलात का सोकाजीराव?)
  • Log in or register to post comments

थत्तेचाचा, नव्ह नव्ह, कंस

सोत्रि
Sun, 08/28/2011 - 18:12 नवीन
थत्तेचाचा, नव्ह नव्ह, कंस अज्याबत इसरलो न्हाइ. कंसमामास्नी कसा काय इसर्णार हो. पन त्यो फकस्त पर्तीसादात असतुया! - ( कंसाला मारलेला (ब्रिजेश) ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हा सोकाजी सोकावला आहे!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/28/2011 - 18:10 नवीन
हा सोकाजी सोकावला आहे! चांगल्या लेखनाची अशी पिसं काढल्याबद्दल निषेध!
  • Log in or register to post comments

"आप कौनसी हैसीयत से निषेध कर

सोत्रि
Sun, 08/28/2011 - 18:20 नवीन
"आप कौनसी हैसीयत से निषेध कर रहे हो" (आठवा कणेकरांची फिल्लमबाजी) म्हणजे हा निषेध करणारे बिका सं.मं मधले की पूनम मधले? :P म्हणजे पुढची स्ट्राटेजी ठरवायला बरे! - (स्ट्राटेजीक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

एका महान आय डी ची आठवण झाली...

नन्दादीप
Sun, 08/28/2011 - 18:23 नवीन
प्रतिसादा गणिक बदलणारी स्वाक्षरी बघून आय. डी. हॅक झाल्याची शंका येतेय... ((एका महान आय डी ची आठवण झाली....))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

सोकाजी, तुम्ही असे प्रश्न

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/28/2011 - 18:53 नवीन
सोकाजी, तुम्ही असे प्रश्न विचारून विषय बदलायचा जो प्रयत्न केला आहे तो अश्लाघ्य आहे. मी अतिशय गंभीरपणे तुमचा निषेध केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

अतिशय गंभीरपणे केलेल्या

सोत्रि
Sun, 08/28/2011 - 19:58 नवीन
अतिशय गंभीरपणे केलेल्या निषेधाचा स्विकार करुन तितक्याच गंभीरपणे जाहीर माफी मागीतल्या गेली आहे ! - (मोठ्या मनाचा मोकळा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/28/2011 - 21:06 नवीन
- (मोठ्या मनाचा मोकळा) सोकाजी
खरं तर तुम्हाला भेटल्यानंतर "(मोकळ्या मनाचा मोठ्ठा) सोकाजी" असं जास्त चपखल बसेल असे नम्रपणे नमूद करतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

वा वा.

स्पा
Sun, 08/28/2011 - 21:19 नवीन
वा वा... गोगोड कंपूबाजी पाहून द्वोळे पाणावले ;) -- जाहीर कम्पुकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मिष्टर स्पा! गप पडा! बघून घेऊ

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/28/2011 - 22:02 नवीन
मिष्टर स्पा! गप पडा! बघून घेऊ तुम्हाला! तुमच्या पहिल्या धाग्याचे उत्तर मिळेल तुम्हाला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

प्रियाली
Sun, 08/28/2011 - 22:38 नवीन
हे बघा! अवांतर करणारे संपादक आणि मिपावर सतत अवांतर प्रतिसाद येतात म्हणून लोक इतरांना दोषी ठरवतात. (सध्या घासुगुर्जी) प्रियाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ऑ?

स्पा
Mon, 08/29/2011 - 18:36 नवीन
मिष्टर स्पा! गप पडा! बघून घेऊ तुम्हाला! तुमच्या पहिल्या धाग्याचे उत्तर मिळेल तुम्हाला! "आप कौनसी हैसीयत से निषेध कर रहे हो" (आठवा कणेकरांची फिल्लमबाजी) म्हणजे हा निषेध करणारे बिका सं.मं मधले की पूनम मधले? म्हणजे पुढची स्ट्राटेजी ठरवायला बरे! - (स्ट्राटेजीक) स्पाकाजी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

त्यापेक्षा मोकाजी जास्त चपखल

मृत्युन्जय
Sun, 08/28/2011 - 23:32 नवीन
त्यापेक्षा मोकाजी जास्त चपखल आहे असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

श्री. ले. की. बोले यांच्या डायरीतून ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/28/2011 - 20:54 नवीन
सोकाजी, तुमच्या खवत लवकरच एक पाशवी आयडी "अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!" असं मोठ्या फॉण्टमधे लिहीणार आहेत असं भविष्य वर्तवण्यात आल्या जात आहे. तुमचं खरं नाव सोकाजी का? नसेल तर तुम्ही अशी टोपणनावं घेऊन खरी नावं वाटवीत अशा सदस्यनामाने लिहीणार्‍या आयडीच्या लेखावर भंपक असे शेरे कसे मारू शकता? आजचा अभ्यास पूर्ण केलात का? मग आजचा तुमचा शब्द आहे megalomania. याचा थोडा अभ्यास करा आणि मोठे व्हा. ठीक? सोडा हो, तुम्ही तुमची कॉकटेल्स काढा, मस्त एकत्र बसू, गप्पा मारू, कॉकटेल्सचा आस्वाद घेऊ, जग कसं 'रोचक' आहे यावर थोडीबहुत चर्चा करू आणि पुन्हा आपापल्या घरी जाऊन मिपावर दंगामस्ती करू! कशाला उगाच अ‍ॅंटीलॅक्सेटीव्हच्या बाटल्या प्यायच्या?
  • Log in or register to post comments

मी पूर्ण सहमत आहे. ते

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/28/2011 - 21:08 नवीन
मी पूर्ण सहमत आहे. ते लॅक्सेटिव्ह वगैरे पिऊन पिऊन कट्टाळा आलाय सध्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे?

पैसा
Sun, 08/28/2011 - 21:31 नवीन
तुम्ही पाणी बिणी प्यायल्यासारखे लेक्सेटिव्ह पिताय की काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

पित होतो ताई, पित होतो! काय

बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/28/2011 - 21:58 नवीन
पित होतो ताई, पित होतो! काय सांगू तुम्हाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बॉर्रर्र

पैसा
Sun, 08/28/2011 - 22:02 नवीन
पण अजून एक शंका आहे, अदिती "अँटिलॅक्सेटिव्ह कशाला प्यायचं" असं काहीतरी म्हणत होती.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अँटिलॅक्सेटिव्ह

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/28/2011 - 22:08 नवीन
बौद्धीक बद्धकोष्ठ, बोळा तुंबणे वगैरे शब्दांचा अभ्यास कर गं. तू अजून "मोठी होशील"! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ते खरं ग

पैसा
Sun, 08/28/2011 - 23:03 नवीन
पण कोणत्याही बौद्धकोष्ठाला कोणतं तरी लॅक्सेटिव्ह उपयोगी पडेल, अँटिलॅक्सेटिव्ह घेतलं तर बूच मारल्या जाईल ना!!! ;) (की त्याचसाठी म्हणतेस तसं?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणूनतर ना

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/29/2011 - 00:12 नवीन
म्हणूनतर म्हटलं ना "कशाला उगाच अ‍ॅंटीलॅक्सेटीव्हच्या बाटल्या प्यायच्या?" बौद्धीक बद्धकोष्ठ झालंय याची जाहिरात करणारे लेख वाचणे म्हणजे अ‍ॅंटीलॅक्सेटीव्हच्या बाटल्या पिण्यासारखंच नाही का! काय करावं या नवीन सभासदांचं? सगळं कसं उचकटून सांगावं लागतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

छ्या:!

पैसा
Mon, 08/29/2011 - 20:17 नवीन
ओ जोजोकाकू, तुमचं जालीय वय माझ्यापेक्षा २ वर्षं जास्त आहे हे सदासर्वदा सांगायलाच पाहिजे का हो? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रामाणिक

श्रावण मोडक
Mon, 08/29/2011 - 20:21 नवीन
जोजोकाकू, तुमचं जालीय वय माझ्यापेक्षा २ वर्षं जास्त आहे हे सदासर्वदा सांगायलाच पाहिजे का हो?
किती तो प्रामाणिकपणा! यमी लाजली असेल ना... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

इश्श्य!

पैसा
Mon, 08/29/2011 - 21:17 नवीन
इश्श्य! यमी येईलच आता, जरा थांबा हो (यमीचे काका)! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ख्या ख्या ख्या

परिकथेतील राजकुमार
Wed, 08/31/2011 - 12:36 नवीन
किती तो प्रामाणिकपणा! यमी लाजली असेल ना...
यमी लाजणार ? Image removed. Image removed. लोकाला लाज आणेल ती. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

नको...

श्रावण मोडक
Sun, 08/28/2011 - 22:04 नवीन
नको, नको!!! काही सांगू नका. तुम्ही भोगलं ना ते दुःख. बास्स झालं. त्याची दर्दभरी कहाणी नको... ;) अशा कहाण्या म्हणजे पुन्हा ते दिवस जगणं असं म्हणतात... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

निषेध!

प्रियाली
Sun, 08/28/2011 - 23:46 नवीन
बक्षीसाची ऐडिया आधीच फोडून जाहीर केल्याबद्दल जाहीर निषेध! आता सोकाजींना अभिनंदन स्वीकारण्यावाचून गत्यंतर दिसत्त नाही. त्या गत्यंतर नसण्याबद्दल आणखी एक अ‍ॅडिशनल अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

विषय निषेध

सोत्रि
Mon, 08/29/2011 - 18:44 नवीन
विषय निषेध बघुन भीत भीतच प्रतिसाद बघितला, तर एकदम मोठ्या फॉन्ट मधे अभिनंदन बघुन एकदम भंजाळलोच! पण एकंदरीत प्रतिसाद वाचता पाशवी आयडीकडुन पाठिंबा मिळालेला पाहुन थोडे मांस चढले अंगावर आणि हाय रे कर्मा.... वजन कमी करण्याच्या प्रयत्नांचा एकदम बोर्‍या वाजला म्हणुनश्यान पाशवी आयडीचा 'निसेद'. (ऑलरेडी ह्या आयडीने अभिनंदन केले गेल्या असल्यामुळे निषेध जरा मवाळ होउन निसेद झाला आहे) - (मवाळ 'निसेद' व्यक्त करणारा ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

इतक्या चांगल्या लेखाला जिलबी

प्रीत-मोहर
Sun, 08/28/2011 - 21:48 नवीन
इतक्या चांगल्या लेखाला जिलबी व विडंबन क्याटेगिरीत टाकल्याबद्दल सोकाजीरावांचा तीव्र णिसेद !!!!! (नव्यांना प्रोत्साहन देणारी) प्रीमो
  • Log in or register to post comments

आज्जे

श्रावण मोडक
Sun, 08/28/2011 - 21:58 नवीन
(नव्यांना प्रोत्साहन देणारी) प्रीमो
आज्जे, आयडीपुरता तुझ्यापेक्षा सोकाजी काही आठवडे तरी मोठा आहे गं... निघाली सह्यांची नकला करायला... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

मग तर त्यांनी जास्ती

प्रीत-मोहर
Sun, 08/28/2011 - 22:07 नवीन
मग तर त्यांनी जास्ती प्रोत्साहन द्यायला नको का? ;) आणि काय हो काका तुम्हाला बै सगळ्या गोष्टीत निगेटिव शोधायची भारी हौस... माझी सह्या कापी करण्याची सवय दिसली आणी प्रोत्साहन देते ते तेव्ढ नाय दिसल ;) हे बर नाय हां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ऐक जरा...

श्रावण मोडक
Sun, 08/28/2011 - 22:19 नवीन
मग तर त्यांनी जास्ती प्रोत्साहन द्यायला नको का?
ते तर देतातच गं. सातत्यानं कॉकटेलवर लिहिणारा दुसरा कोण आहे सांग पाहू?
आणि काय हो काका तुम्हाला बै सगळ्या गोष्टीत निगेटिव शोधायची भारी हौस...
सगळ्या? यादी दे.
माझी सह्या कापी करण्याची सवय दिसली आणी प्रोत्साहन देते ते तेव्ढ नाय दिसल
दिसलं की. प्रोत्साहनाला हरकत नाहीच आपली. नव्यांना या शब्दाविषयी तुला तपशील पुरवला. पण कॉप्या करण्याचा नादच असा की तिकडं लक्षच जात नाही ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

मला आज्जी म्हणुन स्वतःचे वय

प्रीत-मोहर
Sun, 08/28/2011 - 22:23 नवीन
मला आज्जी म्हणुन स्वतःचे वय लपवण्याच्या क्षीण प्रयत्नांबद्दल श्री श्रावण मोडके यांना हॅप्पी बर्थ्डेच्या शुभेच्छा व ही मेणबत्ती :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

लेट करंट...

श्रावण मोडक
Sun, 08/28/2011 - 22:33 नवीन
लेट करंट!!! ;) मेणबत्ती संप्रदायच शेवटी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

आज्जीबाई

राजेश घासकडवी
Sun, 08/28/2011 - 22:34 नवीन
तुमची मेणबत्तीसुद्धा उमेदीची वर्षं संपल्यासारखी, रया गेलेली, म्हातारी दिसते आहे. चांगली तरणीताठी तरी निवडायची. श्रामोंना बरं वाटलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

जे आहे ते असे आहे ... असच्च

प्रीत-मोहर
Sun, 08/28/2011 - 22:40 नवीन
जे आहे ते असे आहे ... असच्च स्वीकाराव लागेल ;) @ श्रामोण्णा मेणबत्ती हुडकत होते तुम्च्यासाठी .. वाटल्यास बिकाशेखना विचारा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

उंदराला

श्रावण मोडक
Sun, 08/28/2011 - 22:41 नवीन
मेणबत्ती हुडकत होते तुम्च्यासाठी .. वाटल्यास बिकाशेखना विचारा
उंदराला मांजर साक्ष. म्हण अशीच आहे म्हणून उंदीर आणि मांजर म्हटलं. एरवी चुचुंद्री (किंवा चिचुंद्री) आणि बोका म्हटलं असतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

ऑ... मी तर ऐक्ल होत बिकाशेख

प्रीत-मोहर
Sun, 08/28/2011 - 22:46 नवीन
ऑ... मी तर ऐक्ल होत बिकाशेख तुम्च्या कंपुतले आहेत ... हे कधे घडल ? अरेरे .. पहाताय ना चाचाजान!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मोठ्ठी हो...

श्रावण मोडक
Sun, 08/28/2011 - 22:50 नवीन
मोठ्ठी हो गं ब(ड)बडे... तुला अजून कंपू समजलेलाच नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

उंदराला मांजर साक्ष. म्हण

असुर
Mon, 08/29/2011 - 16:53 नवीन
उंदराला मांजर साक्ष. म्हण अशीच आहे म्हणून उंदीर आणि मांजर म्हटलं. एरवी चुचुंद्री (किंवा चिचुंद्री) आणि बोका म्हटलं असतं.
ओ श्रामो'काका', तुमी चिटींग करुन र्‍हायले... तुमीच परवा 'बिका अरबी उंट आहेत' असं म्हणाला होतात.. आता मांजर/बोका म्हणताय... पैले नक्की करा, कण्फुसन होतंय... :D बाकी प्रीमोला कायपण म्हणा, ती शिव्याच देते, त्यामुळे फरक पडत नै... :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा