✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अतिशय गाजलेला भंपक लेख

स
सोत्रि यांनी
Sun, 08/28/2011 - 12:58  ·  लेख
लेख
नुकतंच (कोणॆ एके काळी) बहुचर्चित झालेला मी मतदान का करावे? हा लेख वाचला. चेतन सुभाष गुगळे (जगभर प्रसिद्ध असलेले चिंतनशील लेखक) यांच्या लेखाचे जगभरात(?) प्रचंड कौतुक झालेलं असून त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली व जगभरांतुन प्रतिसादांचा पाउस पडला (अशी माहिती सदर लेखाच्या शेवटी होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की असे लेख लिहीले जातात. याचं देखील आश्चर्य नाही की असे लेख प्रसिद्धही केले जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक असे लेख मुल्यवान असा वेळ खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या (?) या लेखाच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या लेखाच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला. आता प्रश्न असा उरतो की ज्या कुणी या लेखाच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून प्रतिसाद पाठविले आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे) या लेखातुन बरंच काही चिंतनशील अस वाचायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण लेख वाचल्यावर "असला लेख वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही ‘चिंतनशील’ मिळालं नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा नविन धागा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14610 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

मेल्या असुर्‍या तुला बरा

प्रीत-मोहर
Mon, 08/29/2011 - 17:26 नवीन
मेल्या असुर्‍या तुला बरा माझ्या शिव्यांचा अणुभव तो? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

अवतार

श्रावण मोडक
Mon, 08/29/2011 - 17:38 नवीन
अरे बाबा बिकाचे अनेक अवतार असतात. वेळकाळानुरून तो अवतार घेतो. कधी उंट, कधी बोका, कधी पोपट, कधी कोल्हा, कधी लांडगा... या क्रमाने तो बिबट्याही होतो. या सकळ प्राणीमात्रांचे एकेक गुण एकाच ठिकाणी महायचे असतील तर ते बिकामध्येच पाहता येतात. थोडा अधिक कट्ट्यांवर येत जा. म्हणजे तुला समजेल ते. मी उगाच त्याच्या बाजूला हाताची घडी, तोंडावर बोट असा बसत नसतो. ;) पुढच्या दोन-चार कट्ट्यांना तर त्याच्या हाताच्या टप्प्यातही येणार नाही मी. ;) प्रीमो ही फक्त ब(ड)बडी आहे रे. विश्वास नसेल तर बांबू हाऊसमध्ये जे तिला भेटले त्यांना विचार. तिनं त्या दिवशी भल्या-भल्या बोलघेवड्यांना मौनात जाण्यास भाग पाडलं होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

उगीच पुड्या सोडु नका. तुमी

प्रीत-मोहर
Mon, 08/29/2011 - 17:45 नवीन
उगीच पुड्या सोडु नका. तुमी व्हता काय कट्ट्याला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मग?

श्रावण मोडक
Mon, 08/29/2011 - 17:53 नवीन
उगीच पुड्या सोडु नका.
अजून नाही सोडलेल्या. सोडू का? धम्या, पराला विचार आणि मग उत्तर दे. ;)
तुमी व्हता काय कट्ट्याला?
होतो. तसंही धम्यानं पुरावा दिलाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

ऐला ..

प्रीत-मोहर
Mon, 08/29/2011 - 18:01 नवीन
ऐला .. घ्या मांजराला बोक्याला उंदीर(की बोकेच?) साक्ष झाल की हो हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

बिबट्या..

धमाल मुलगा
Mon, 08/29/2011 - 17:48 नवीन
श्री.कुकडोलकर लिखीत 'बिबट्या कुठे जाणार?' ह्या पुस्तकाचा उपयोग शेख बिबट्या कार्यकर्ते ह्यांचे बिबटेगिरी आणि अडचणी समजावोन घेण्यास कितपत उपयोग होऊ शकेल? >>तिनं त्या दिवशी भल्या-भल्या बोलघेवड्यांना मौनात जाण्यास भाग पाडलं होतं. आणि पुढं आठवडाभर त्या मौनाची भाषांतरं ऐकता ऐकता आमचे कान किटले होते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

धम्या तु संभाळुन रहा हो

प्रीत-मोहर
Mon, 08/29/2011 - 17:50 नवीन
धम्या तु संभाळुन रहा हो आता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

गरज नाही

श्रावण मोडक
Mon, 08/29/2011 - 17:55 नवीन
श्री.कुकडोलकर लिखीत 'बिबट्या कुठे जाणार?' ह्या पुस्तकाचा उपयोग शेख बिबट्या कार्यकर्ते ह्यांचे बिबटेगिरी आणि अडचणी समजावोन घेण्यास कितपत उपयोग होऊ शकेल?
गरज नाही. इथं जा, परिच्छेद क्रमांक ३ वाच. आता मी मेलोच... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मोडक द Deer!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/29/2011 - 18:09 नवीन
मोडक द Deer!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

गुण

विनायक प्रभू
Mon, 08/29/2011 - 18:18 नवीन
बिका मधे एवढे गुण आहेत हे आतापर्यंत मला कसे कळले नाही बॉ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

स्टेल्थ

श्रावण मोडक
Mon, 08/29/2011 - 18:23 नवीन
स्टेल्थ! तुम्हालाही कळले नाही यातच बिकाच्या या गुणाची पावती आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

अच्छा अच्छा!

धमाल मुलगा
Mon, 08/29/2011 - 19:48 नवीन
उंट,अरब ते संपादकत्व अशा खडतर प्रवासाचं हे इंगित मोठं रोचक (आहाहा..काय पर्फेक्ट चानस घावला ह्यो शब्द लिवायला!) आहे. ;) अवांतरः परिच्छेद क्र.३ मधली शेवटची ओळ वाचून मात्र पक्की खात्री पटलीच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

गुर्जींची शिकवणी

सहज
Mon, 08/29/2011 - 18:17 नवीन
अरे बाबा बिकाचे अनेक अवतार असतात. वेळकाळानुरून तो अवतार घेतो. कधी उंट, कधी बोका, कधी पोपट, कधी कोल्हा, कधी लांडगा... या क्रमाने तो बिबट्याही होतो. या सकळ प्राणीमात्रांचे एकेक गुण एकाच ठिकाणी महायचे असतील तर ते बिकामध्येच पाहता येतात. बिकाजी एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व ऐकले होते, पशुतुल्य व्यक्तिमत्व म्हणुन नव्याने ओळख करुन दिलीत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मेलो

श्रावण मोडक
Sun, 08/28/2011 - 22:38 नवीन
मेलो... मेणबत्ती अशी सार्थ ठरेल असं वाटलं नव्हतं... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सोक्या हा लेख अतिशय हीन ,

माझीही शॅम्पेन
Sun, 08/28/2011 - 22:36 नवीन
सोक्या हा लेख अतिशय हीन , सडका आणि भम्पक आहे (म्हणजे लेख भयंकर आवडण्यात आला आहे :) ) सोक्या स्वता:ला जरा आवारा , श्रावण महिन्यात इतक मायलेज मिळेल अस वाटल नव्हत (अरे कुठे कुठे दगड मारशील;))
  • Log in or register to post comments

अरेरे!

प्रियाली
Sun, 08/28/2011 - 22:36 नवीन
एका सुसंस्कृत धाग्याचे विडंबन केल्याबद्दल सोकाजींचा निषेध! विडंबनासाठी जो धागा वापरलात त्याबद्दल डब्बल निषेध.
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Sun, 08/28/2011 - 22:43 नवीन
विडंबनासाठी पॉलिष्टरचाच धागा वापरावा. गुगळ्यांचा वापरू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

आयला, तू पण!

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 08/28/2011 - 22:59 नवीन
"आयला, तू पण!"१ १. You too Brutus! या जगप्रसिद्ध वाक्याचे शब्दशः भाषांतर करण्यापेक्षा सुंदर भाषांतर करणे मला जास्त श्रेयस्कर वाटले. बाकी प्रियालीने सोकाजींचा निषेध केला आहे२ म्हणून मी ही करते. २. स्लटवॉकची कल्पना भलतीच प्रसिद्ध पावत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ठ्या....

सोत्रि
Sun, 08/28/2011 - 23:02 नवीन
थत्ते चाचा, फ़ुटलो ना हसुन हसुन! <इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली /> <इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली /> <इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली /> <इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली /> <इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली /> - (विमल पॉलिष्टरचे कपडे घालणारा ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

''विडंबनासाठी पॉलिष्टरचाच

५० फक्त
Sun, 08/28/2011 - 22:52 नवीन
''विडंबनासाठी पॉलिष्टरचाच धागा वापरावा. गुगळ्यांचा वापरू नये.' पुर्वी विडंबनासाठी नाडी वापरायचे, आता धाग्यापर्यंत आले, भलतेच चिकित्सक झालेत बोवा मिपाकर,
  • Log in or register to post comments

मला तर पुस्तक प्रचंड आवडले

मृत्युन्जय
Sun, 08/28/2011 - 23:28 नवीन
मला तर पुस्तक प्रचंड आवडले ब्वॉ. लेखकाने चित्र अगदी डोळ्यासमोर उभे केले आहे. शैली एकदम ओघवती आहे आणि पुस्तक वाचायला सुरु केल्यावर वाचुनच संपवले होते. पेंढारकर जेव्हा ढांगेचे वर्णन करतात तेव्हा तो पर्वत अगदी जिवंत भासतो. ते वातावरण मोजक्या शब्दात अगदी प्रभावीपणे समोर ठेवले आहे. मी तर असे म्हणेन की जर कोणी अजुन हे पुस्तक वाचले नसेल तर त्वरित वाचुन काढावे.
  • Log in or register to post comments

गल्ली चुकलात काय हो ??

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 08/28/2011 - 23:29 नवीन
गल्ली चुकलात काय हो ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हो रे. आता शोधतो रस्ता परत.

मृत्युन्जय
Sun, 08/28/2011 - 23:31 नवीन
हो रे. आता शोधतो रस्ता परत. झोल झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१ अतिशय सहमत तुमच्याशि

५० फक्त
Sun, 08/28/2011 - 23:41 नवीन
+१ अतिशय सहमत तुमच्याशि मृत्युन्जय, बहुधा तुम्हाला असं लिहायचं असावं. 'मला तर मतदान प्रचंड आवडले ब्वॉ. लेखकाने मतदान केद्र अगदी डोळ्यासमोर उभे केले आहे. मतदारांची रांग एकदम ओघवती आहे आणि मतदान करायला सुरु केल्यावर करुनच संपवले होते. लेखक जेव्हा रांगेचे वर्णन करतात तेव्हा ती रांग अगदी जिवंत भासते. ते वातावरण मोजक्या नोटात अगदी प्रभावीपणे टेबलाच्या ड्रावर मध्ये ठेवले आहे. मी तर असे म्हणेन की जर कोणी अजुन मतदान केले नसेल तर त्वरित करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सोकाजीराव, अनेक अनेक

सुहास झेले
Sun, 08/28/2011 - 23:29 नवीन
सोकाजीराव, अनेक अनेक शुभेच्छा... ;-) आता ह्या धाग्याला मरण नाही.... जिओ :) :)
  • Log in or register to post comments

@सोकाजीराव त्रिलोकेकर

साती
Sun, 08/28/2011 - 23:48 नवीन
@ सो़काजीराव त्रिलोकेकर या लेखाच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हा लेख वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे हा तुमचा एकच मुद्दा मान्य. मलाही हा लेख वाचल्यावर हाच प्रश्न पडला होता. पण आपले मि पा साहित्य किती प्रगल्भ आहे ह्याची ती एक पोच होती "असला लेख वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" पण हे जरा भडक विधान आहे. या लेखातला विषय चांगला आहे. लेख वाचुन वेळ वाया अजिबात जाणार नाही. फक्त ह्या लेखाबद्दल एवढा जो फुगा/बुडबुडा केला गेला आहे, त्याअपेक्षेने लेख जर वाचला तर अपेक्षाभंग पदरी पडु शकतो. कसलीही समीक्षा न करता नुसतंच हा लेख वाचु नका म्हणणे योग्य नव्हे 100% सहमत. लेखाबद्दल जरा अजुन थोडे लिहीले असते तर लेख आणखी वजनदार झाला असता. - (अतिशय गाजलेली) सातीजी
  • Log in or register to post comments

मुद्दा मान्य आहे तर...

सोत्रि
Mon, 08/29/2011 - 09:08 नवीन
तुम्हाला मुद्दा मान्य आहे हे वाचून बरे वाटले. << या लेखातला विषय चांगला आहे. >> तो लेख दोन परिच्छेदातही आटोपता येईल. त्याकरिता इतका फापटपसारा कशाला? यापेक्षा उत्तम लेख मिपावर आहेत. इतक्या वेळेत तिथले शंभर कसदार लेख वाचून होतील. << कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे लेख वाचु नका म्हणणे योग्य नव्हे >> भंपक या एका शब्दातच सर्व लेखाची समीक्षा केली आहे. अजून वेगळे काय लिहायचे? सोकाजीराव त्रिलोकेकर भ्रमणध्वनी - सध्या तुटला आहे Electronic Mail Address :- सोत्रि@बटाट्याचीचाळ.कॉम - (सोकावलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

चूक ५० फक्त

आशु जोग
Mon, 08/29/2011 - 01:43 नवीन
+१ अतिशय सहमत तुमच्याशि मृत्युन्जय, बहुधा तुम्हाला असं लिहायचं असावं. 'मला तर मतदान प्रचंड आवडले ब्वॉ. लेखकाने मतदान केद्र अगदी डोळ्यासमोर उभे केले आहे. मतदारांची रांग एकदम ओघवती आहे आणि मतदान करायला सुरु केल्यावर करुनच संपवले होते. लेखक जेव्हा रांगेचे वर्णन करतात तेव्हा ती रांग अगदी जिवंत भासते. ते वातावरण मोजक्या नोटात अगदी प्रभावीपणे टेबलाच्या ड्रावर मध्ये ठेवले आहे. मी तर असे म्हणेन की जर कोणी अजुन मतदान केले नसेल तर त्वरित करावे. हे आहे ५० फक्त यांचे लिखाण प्रश्न पडलाय या रुपांतराला काय म्हणावे ? भाषांतर नको जाउदे वेशांतर म्हणूया
  • Log in or register to post comments

जोग साहेब, ५० फक्तनी निदान

धन्या
Mon, 08/29/2011 - 10:02 नवीन
जोग साहेब, ५० फक्तनी निदान त्यांचं मत तर मांडलं. या धाग्याला हातभार लावण्यापलीकडे तुम्ही काय केलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

हे रुपांतर जाम आवडले !

आशु जोग
Tue, 08/30/2011 - 23:20 नवीन
हे रुपांतर जाम आवडले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

हे रुपांतर जाम आवडले !

आशु जोग
Tue, 08/30/2011 - 23:21 नवीन
हे रुपांतर जाम आवडले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

छे, आज एक मिपाकर असल्याची शरम

गणपा
Mon, 08/29/2011 - 03:18 नवीन
छे, आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली.
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Mon, 08/29/2011 - 13:37 नवीन
मिपाच्या बाब्याशी सहमत आहे. सतत दारु सारख्या समाजाची नासाडी करणार्‍या विषयावर लिहिणार्‍या सोत्रि ह्यांनी गुगळेंसारख्या वैश्विक सत्य उमगलेल्या माणसाची उडवलेली टर बघून आज मिपाकर असल्याची शरम वाटली. गेले काही दिवस अनेक जण गुगळेंच्या खिलाडू वृत्तीचा आणि भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यावर जे तोंडसुख घेत आहेत त्यात अजुन एक भर पडलेली बघून दु:ख झाले. आज आपण नव्याने मिपावार येणार्‍यांसमोर काय चित्र उभे करतो आहे हे ह्या लोकांच्या लक्षात कसे येत नाही ? श्री. सोत्रि ह्यांनी असे लिखाण करुन एक मोठा अपराध केला आहे, हे वैश्विक सत्य त्यांना आणि त्यांची तळी उचलणार्‍या इतरांना समजेल तोच सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

>>दारु सारख्या समाजाची हा

नितिन थत्ते
Mon, 08/29/2011 - 16:39 नवीन
>>दारु सारख्या समाजाची हा कुठल्या प्रकारचा समाज? सोकाजीराव यांच्या नावामागे श्री लावता आणि गुगळ्यांचा नुसता उल्लेख? कुठे फेडाल ही पापं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छे, आज एक मिपाकर असल्याची शरम

मितभाषी
Mon, 08/29/2011 - 16:52 नवीन
छे, आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली गणपाशेठशी सहमत. आता चोर पोलिस वकील न्यायाधीश सगळेच एक झाल्यावर 'सामान्य जन्ता' काय करनार? (शरमिन्दा)भावश्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

काही उठवळ धाग्याबद्दल हेच

मराठी_माणूस
Mon, 08/29/2011 - 09:38 नवीन
काही उठवळ धाग्याबद्दल हेच म्हणता आले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील

विजुभाऊ
Mon, 08/29/2011 - 13:49 नवीन
Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 29/08/2011 - 13:37. श्री. सोत्रि ह्यांनी असे लिखाण करुन एक मोठा अपराध केला आहे, हे वैश्विक सत्य त्यांना आणि त्यांची तळी उचलणार्‍या इतरांना समजेल तोच सुदिन. एवढेच बोलून मी माझे ९१ शब्द संपवतो असे लिहायचे राहिलयक बहुतेक पराजी
  • Log in or register to post comments

आता बास्स हं ! (इथे दोन्ही ओठ

इरसाल
Mon, 08/29/2011 - 17:10 नवीन
आता बास्स हं ! (इथे दोन्ही ओठ दुमडून दातांमध्ये दाबलेले आणि डोळे विस्फारलेले अशी स्मायली) मस्करीची कुस्करी नको व्हायला. नाहीतर धागा..........................(सं-फाडक सूचना)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा