✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सौंदर्याचा बाजार

ड
डॉ.श्रीराम दिवटे यांनी
Tue, 08/09/2011 - 09:54  ·  लेख
लेख
नटांच्या सिक्स पॅकअॅब्जचे प्रदर्शन असू द्या किंवा नट्यांच्या पुष्ट उरोजांचे अर्धावृत्त दर्शन आजच्या चित्रपटातील हा मसाला भलताच चटकदार बनविला जातोय. याची चटक डोळ्यांना अशी लागते की कुठून कुठून लौल्यस्राव सुरु होतील याचा नेम नाही. सेन्सार मंडळच नेमके आतपर्यंत कोरडे ठणठणीत पडलेय की काय याची शंका येते. अशा उत्तान दृश्याला ते कात्री लावण्याच्या भानगडीत पडत नाहीत की त्यांच्या अनेक भानगडींतून त्यांना वेळ मिळत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आजच्या चित्रपटसृष्टीला अश्लीलतेचे एवढे मोठे खग्रास ग्रहण लागलेय की ते सुटता सुटण्याची शक्यता मावळलीय. नटनट्यांच्या अंगावरचे एकेक वस्त्र मात्र फिटत चाललेय... कुठे त्या मधुबालेचा सोज्वळ अन् कुठे आजच्या हिरॉईन्सचे स्वीमिंग पुलावरचे देहप्रदर्शन, खोलवरचे किसींग शॉटस्, अन् बेडवरचे नग्न सीन्स. ही त्रयी असल्याशिवाय पिक्चर चालणारच नाही काय? चित्रपटाच्या कथेवर संवादावर मेहनत घेण्यापेक्षा अशा अश्लीलतेवरच भर देण्याचा प्रयत्न निर्माता, दिग्दर्शक व नट नट्यासुद्धा करतात. अभिनयाच्या बाबतीत पूर्णतः शून्य कामगिरी बजावून अंगप्रदर्शनाच्या वेळी मात्र शंभर टक्के योगदान देणाऱ्‍या कैक अभिनेत्री (खरे तर बायाच!) पैशाला पासरी झाल्यात. एखादी नवी नटी तिच्या अंगभूत अभिनयाऐवजी तिच्या उघड्या अंग'ऊता'नेच जाणली गणली जाते. तिला जर जास्तीच ऊत असेल तर पटकन नको ते पिक्चर्स मिळत जातात आणि ती भाबडी त्या ऊतातच ऊतू जाते. इतकी की भानावर आल्यावर अंगावर तसेच मनावर बरेच परिणाम झालेले असतात. आपली इमेज सुधारण्यात तिची जिंदगी जाते. काही नट्या लवकर सावरतात तर काही वाहतच जातात. आजच्या नंबर वन अभिनेत्रीँचे पहिले चारपाच चित्रपट आठवून पहा. तेव्हा त्यांनी कशी स्वस्तात मदमस्त कामं केली होती ते कळेल. मग तो खिलापमधला किस असो वा परिंदामधला बेडसीन, तालमधली फोटोग्राफी असो वा आजुबामधली आरसेमहालाची न्हाणी किंवा जंगललवमधले मध चाटणे असो वा हममधला चिल्लर काढण्याचा शॉट. कुठलीच नटी या देहप्रदर्शनाला मुकली नाही अन् ते शॉट देतांना एकदाही चुकली नाही हे विशेष!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संस्कृती
नाट्य
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
चित्रपट
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
मत
माध्यमवेध
माहिती
वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8575 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

डॉ. साहेब

वसईचे किल्लेदार
Tue, 08/09/2011 - 10:38 नवीन
डॉ. साहेब पैशाला अवास्तव महत्व आल्यामूळे हे सगळे अभीप्रेत आहे. पश्च्यात्यांचा थोडाफार प्रभाव ही सुद्धा एक बाब आहे ... यांखेरिज आणखी काही कारणे असू शकतात. यांवर काही उपाय असल्यास सांगा. _________________________________________________ जो जे वांछील तो ते लाहो ...
  • Log in or register to post comments

सुमार

मराठी_माणूस
Tue, 08/09/2011 - 12:09 नवीन
ह्या क्षेत्रात सुमार बुध्दिमत्तेचे, पैशाला हपापलेले लोक जास्त आहेत, त्यांच्या कडुन कसल्या अपेक्षा करणार . त्यात त्याना प्रोत्साहीत करायला प्रेक्षकही आहेत. (नुकत्याच एका धाग्यात एका चित्रपटात दाखवलेल्या किळसवाण्या दृश्यांचा उल्लेख आहे, तरीही , लोक म्हणातात एकदा पहायला हरकत नाही. आता बोला)
  • Log in or register to post comments

हायला !

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/09/2011 - 12:15 नवीन
हिरॉईन्सचे स्वीमिंग पुलावरचे देहप्रदर्शन, खोलवरचे किसींग शॉटस्, अन् बेडवरचे नग्न सीन्स
कुठला हो कुठला शिणीमा ?
  • Log in or register to post comments

मी

विनायक प्रभू
Tue, 08/09/2011 - 12:27 नवीन
मी पण - मी पण परा मला पण घेउन चल
  • Log in or register to post comments

चालेल

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/09/2011 - 13:05 नवीन
चेक आला का आपला ? शनिवारी लगेच पोचतोच बघा ठाण्याला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

बराच अभ्यास दिसतोय !!

शाहिर
Tue, 08/09/2011 - 12:33 नवीन
अशा चित्र पटांची यादी जाहिर करा बघु ..म्हणजे आम्ही ते पाहुन त्यांचा निषेध करु अवांतर : चटकदार आहे हे मान्य करत आहत तर ?? अति अवांतर : बूम बघितला का हो तुम्ही ??
  • Log in or register to post comments

शॉट

विनायक प्रभू
Tue, 08/09/2011 - 12:31 नवीन
खोलवरचे किसिंग शॉट मी कधीच बघितले नाहीत हे नमुद करु इच्छितो.
  • Log in or register to post comments

अग्गायायायायाया......

धमाल मुलगा
Tue, 08/09/2011 - 15:18 नवीन
=)) =)) =)) मास्तऽऽर...मास्तऽर भावनांना आवर घाला मास्तऽऽर! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

अकलेचा बाजार

इंटरनेटस्नेही
Tue, 08/09/2011 - 13:16 नवीन
असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या अकलेचा बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!
  • Log in or register to post comments

अकलेचा बाजार

इंटरनेटस्नेही
Tue, 08/09/2011 - 13:30 नवीन
असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या अकलेचा बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!
  • Log in or register to post comments

अकलेचा बाजार

इंटरनेटस्नेही
Tue, 08/09/2011 - 13:30 नवीन
असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या 'अकलेचा' बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!
  • Log in or register to post comments

इंटया, कबुल आहे विषय तुझ्या

धन्या
Tue, 08/09/2011 - 14:05 नवीन
इंटया, कबुल आहे विषय तुझ्या आवडीचा आहे. पण म्हणून काय एकच प्रतिसाद तीन वेळा दयायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

कशाला

गवि
Tue, 08/09/2011 - 13:34 नवीन
कशाला सेन्सॉरबिन्सॉर? जबरदस्तीने तर करत नाहीयेत ना तसे सीन्स..? करेनात.. फार तर काही काळाने बघून बघून डिसेन्सिटायझेशन होईल.. तेही ठीकच. ज्यांना अभिनय बघायचाय त्यांच्यासाठी काही अभिनयाचा दुष्काळ झालाय आणि त्याऐवजी वस्त्रगहाळपणाचा सुकाळ झालाय असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments

काही नट्या लवकर सावरतात तर

वपाडाव
Tue, 08/09/2011 - 13:35 नवीन
काही नट्या लवकर सावरतात तर काही वाहतच जातात.
अधोरेखीतांची यादी मिळाल्यास छान वाटेल... वाहत्या पाण्यात हात धुवुन घेण्याची इच्छा आहे....
  • Log in or register to post comments

कमाल आहे!

सुनील
Tue, 08/09/2011 - 14:07 नवीन
फार बारकाईने पिक्चर पाहता बॉ तुम्ही!
  • Log in or register to post comments

श्यामच्या मॉमचा सल्ला

योगप्रभू
Tue, 08/09/2011 - 14:23 नवीन
बाळ श्याम, अरे असा हताश होऊ नकोस. सध्या जरी हे निर्माते, कलाकार आणि प्रेक्षक 'थर्ड क्लास पीपल' असले तरी काळाच्या ओघात सुधारतील. वाईटानंतर चांगले येतच असते. तू आशावादी राहा. उद्या 'संत राखी', 'वीरबाला मल्लिका' असे उदात्त चित्रपट नक्की निर्माण होतील. आपल्याकडे आता कुठे डायनासॉरच्या जीवनशैलीवरचे ज्युरासिक पार्कसारखे चित्रपट बनू लागले आहेत. आदिमानवांच्या जीवनावरचा चित्रपट कधी बनणार? आपण खूप मागे आहोत रे अजुन. तुझी मॉम
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/09/2011 - 14:26 नवीन
योगप्रभू ह्यांच्याशी सहमत. सध्या आम्ही 'ब्राह्मण मुळचे स्पार्टन' ह्या डॉक्युमेंटरीची आतुरतेने वाट पहात आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

तर तर!

धमाल मुलगा
Tue, 08/09/2011 - 15:22 नवीन
शिवाय, 'स्पॅनिअर्ड्स आणि कोकणस्थ साम्यस्थळे ' ह्या 'हे सारे येते कोठून' च्या पुढील अभ्यासपुर्ण विवेचनाच्या प्रतिक्षेत आम्हीही आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

चुकून...

पंगा
Tue, 08/09/2011 - 22:16 नवीन
...'स्पॅनिअर्ड्स आणि कोकणस्थ स्थळे' असे वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आणखी चूक

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/10/2011 - 00:10 नवीन
मी 'स्पॅन्यर्ड्स आणि कोकणस्थी चाळे' असं वाचलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

?

पंगा
Wed, 08/10/2011 - 00:59 नवीन
कोकणस्थी चाळे
याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या नजरचुकीबद्दल आणखी

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/10/2011 - 05:36 नवीन
माझ्या नजरचुकीबद्दल आणखी माहिती देऊ शकत नाही. तसदीबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

अग्ग्ग्ग्ग्गं.....

धमाल मुलगा
Wed, 08/10/2011 - 13:32 नवीन
=)) हे हौस म्हणून विचारताय की इंट्रेष्ट म्हणून? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

अरेरे..

योगी९००
Tue, 08/09/2011 - 15:14 नवीन
तुमचा लेख वाचून बरेच चित्रपट पहायचे राहून गेले असे वाटले..(खिलाप, जंगललव).. अजून काही उदाहरणे द्यावीत म्हणजे ते सर्व चित्रपट पाहून (जर चित्त ताळ्यावर असेल) तर मोठी प्रतिक्रिया देईन.. उदाहरणे देताना पुढील शब्दांचा मुक्त वापर असावा..म्हणजे लेख वाचूनच मुड बनेल.. मादक, उत्तान, मदमस्त, मुसमुसलेली जवानी, भरगच्च,अंतर्वस्त्रं, काचोळी (अजून सुचत नाहीत...तुम्हीच सुचवा.....)
  • Log in or register to post comments

बोंबला!

धमाल मुलगा
Tue, 08/09/2011 - 15:25 नवीन
अरे बाबा... डाक्टरांचं नाव श्रीराम आहे...मस्तराम नव्हे! असं काय करतोयस? :D -कडक बुन्देला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/09/2011 - 15:35 नवीन
अरे बाबा... डाक्टरांचं नाव श्रीराम आहे...मस्तराम नव्हे! असं काय करतोयस?
आम्ही तर ऐकलय की डाक्टरांना मराठी आंतरजालचे मस्ताराम* म्हणतात म्हणुन ? *रमताराम वेगळे आणि मस्ताराम वेगळे.
-कडक बुन्देला
=)) खपलो =)) परवाच पुन्हा एकदा वाचुन संपवले. ठोक्या तुकाराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धन्यवाद

रमताराम
Wed, 08/10/2011 - 00:45 नवीन
*रमताराम वेगळे आणि मस्ताराम वेगळे. खुलाशाबद्दल धन्यवाद. पण ते रमताराम नि मस्तराम यांची भेट घडवून आणण्याचे काम तुम्ही शिरावर घेतले होते त्याचे काय झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

या सर्व प्रतिक्रियाना मिळून ..

मिसळपाव
Tue, 08/09/2011 - 16:32 नवीन
.. "सर्वोत्तम प्रतिक्रिया संच पुरस्कार" देण्यात यावा अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो !! :-)))))))))))))))))))))))))))) - "स्ट्रेस मॅनेजमेंट" ची नड भागलेला, मिसळपाव
  • Log in or register to post comments

_/\_

टवाळ कार्टा
Tue, 08/09/2011 - 20:44 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

कोएना मित्राला कसे विसरलात

टवाळ कार्टा
Tue, 08/09/2011 - 20:46 नवीन
कोएना मित्राला कसे विसरलात :P
  • Log in or register to post comments

मधुबाला

प्रियाली
Tue, 08/09/2011 - 20:49 नवीन
मधुबालेसारख्या तथाकथित सोज्ज्वळ बाया आज सिनेमाबाहेर प्रत्यक्षात तरी आढळतात का? हा लेख म्हणजे कहींपे निगाहे कहींपे निशाना असे तर नाही ना?
  • Log in or register to post comments

इम्रान हाशमीच्या गाठोड्यातील

डॉ.श्रीराम दिवटे
Tue, 08/09/2011 - 21:56 नवीन
इम्रान हाशमीच्या गाठोड्यातील कोणतीही दशमी काढून पहा, म्हणजे त्याला सिरियल किसर का म्हणतात ते कळेल.
  • Log in or register to post comments

मागणी तसा पुरवठा....

दैत्य
Tue, 08/09/2011 - 23:08 नवीन
इम्रान हाशमीच्या गाठोड्यातील कोणतीही दशमी काढून पहा, म्हणजे त्याला सिरियल किसर का म्हणतात ते कळेल. अहो डॉक, मागणी तसा पुरवठा..... सिनिमे समाज 'प्रबोधना' साठी नाही 'धना'साठी काढले जात असावेत...आणि अश्या शॉट्समुळे प्रबोधन होत नाही हेही खरं कसं मानावं? तीही एक कला आहे ;)
  • Log in or register to post comments

"ओन्ली सेक्स अ‍ॅन्ड शाहरुख

शाहरुख
Tue, 08/09/2011 - 23:30 नवीन
"ओन्ली सेक्स अ‍ॅन्ड शाहरुख गेट सोल्ड इन द इंडस्ट्री" असे मधे कुठल्यातरी सौंदर्यवतीने म्हटले होते.
  • Log in or register to post comments

काय अभ्यास

रमताराम
Wed, 08/10/2011 - 01:08 नवीन
काय अभ्यास, काय अभ्यास.. (पहा/ऐका: कणेकरांची फिल्लमबाजी)
  • Log in or register to post comments

असे का ?

इरसाल
Wed, 08/10/2011 - 10:45 नवीन
पहिल्या दोन प्रतिसाद नंतर एकही प्रतिसाद लेखाला धरून नाही.
  • Log in or register to post comments

असहमत. माझा सातवा आठवा असेल.

गवि
Wed, 08/10/2011 - 10:58 नवीन
असहमत. माझा सातवा आठवा असेल. पण विषयाला सोडून नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा