Skip to main content

मिपा कट्टा - ३० जुलै

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 01/08/2011 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त रिमझिम पावसात 'शुध्द शाकाहारी कट्ट्यासाठी' स्वादमध्ये पोहचलो तेव्हा घड्याळात संध्याकाळचे ६:३० वाजले होते आणी नेहमीच्या सवयीप्रमाणे एकाही कट्टेकरयाचा तिथे पत्ता नव्हता. भराभर सगळ्यांना फोन करुन 'कोण कुठे अडकलय?' याचा अंदाज घेतला. '१ कप वाफाळता चहा आणी समोर भारताची बॅटींग' असा दुहेरी योग जिथे तुम्ही अनुभवाल तिथे बाकीच्या जगाचा विसर तुम्हाला नक्कीच पडेल, तसा मलाही पडला. मग रामदास काका त्यांनतर थोड्या फार फरकाने माझीही शॅम्पेन(हा 'तो' असावा कि 'ती' ह्या बद्दल मला नेहमी शंका पडत असे.) :) मला येवून जॉईन झाले. बरेच तर्क वितर्क करूनही शॅम्पेनराव आयडेंटिटी सांगायलाच तयार होईना, "सगळे जमा झाले कि मग खुलासा करतो." असं सांगुन उगाचच आमची उत्सूकता वाढवत होते. एकीकडे गप्पा मारता मारता दुसरीकडे बटाटेवड्यावर ताव मारण्याचे उद्योगही चालू होते. रिकाम्या झालेल्या बटाटेवड्याच्या प्लेट्स पाहायला मग मिपाचे तरुण रक्ताचे(कि गरम डोक्याचे) :) लेखक स्पा यांचे आगमन झाले, मग त्यांच्या मला 'हे नको ते नको' करण्याच्या भानगडींमूळे त्या वेटरच्या चेहरयावरचे भाव 'मग बोर्नवीटा आणून देवू का?' असे झाले होते. एव्हाना लाईट्स गेल्याने आम्ही मग रस्त्यावर येवून उभे राहिलो त्याच वेळेस मेहदंळे काका त्यांच्या नेहमीच्या 'कुर्ता पायजमा आणी खांद्यावर शबनम' या पेहरावात न येता चक्क जीन्स आणी टी-शर्ट या वेशात आले होते त्यामुळे त्यांच्या मागोमाग आलेल्या प्राचीचाही बराच गोधंळ उडाला. निदे आणी मस्त कलंदर हे जोडपंही पाठोपाठ आल्याने आम्ही सर्व पुन्हा एकदा आत जावून बसलो आणी गप्पांचा फड पुन्हा रंगात आला त्यात गगनविहारी आम्हाला येवून सामील झाले. मिसळपाव आणी बटाटेवड्यांचा आस्वाद घेता घेता चर्चा जोरात रंगली होती......सुड, मिका, इंटरनेटस्नेही, लीमाऊजेट अशी मंडळी अजूनही यायची बाकी होती. मकमावशीच्या चेहरयाकडे बघून तुम्हाला काय वाटतं?.....उत्तर सांगा बक्षीस जिंका! झणझणीत मिसळपाव! अजून एक फोटो.. :) कट्ट्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्येच बिपीनदा आणी परा यांचेही फोन येवून गेले. शेवटी थाळीची वेळ झाल्याने आम्ही खाली बेसमेंटकडे निघालो त्याचवेळी सुधांशू आणी इंटरनेटस्नेही हे दोघेही येवून आम्हाला जॉईन झाले. लीमाऊ आणी मिकांचा अजूनही पत्ता नव्हता. बेसमेंटमधल्या ह्या पेंटीगवरुन काकांनी इथे मिपावर वदनी कवळ घेता नावाचा लेख बरयाच दिवसांपुर्वी टाकला होता. बेसमेंटला गेल्यावर इंट्या सर्वात शेवटी आल्याने सगळ्यांना ओळाखायला सांगून त्याची ओळख परेड चालू केली. मकीकडे बोट करुन "लीमाऊजेट का?" असं विचारणं इथपर्यंत तर सगळं ठिक होतं पण रामदास काकांकडे निर्देश करुन "हे नक्कीच विजूभाऊ असणार" असं त्याने बोलताच संपूर्ण बेसमेंटमध्ये जोरदार हास्याचे फवारे उडाले. रामदास काकांच्या अर्धवट राहीलेल्या बरयाच लेखांची चर्चा झाली त्यावरुनच मग धंद्याचा पुढील भाग काकांनी सर्वांना सांगीतला. स्वादची शुध्द शाकाहारी थाळी! डावीकडून प्राची, मस्त कलंदर, निदे, गवि, रामदास काका, जॅक स्पॅरो(स्पावड्या), किसन शिंदे, विमे, सुड, इंटरनेटस्नेही आणी माझीही शॅम्पेन. मंडळींच जेवण होऊन टेबलही मोकळा झाला होता....बरयाच उशीरने माऊताई त्यांच्या यजमानांसोबत आल्या होत्या, डावीकडे वरच्या बाजुला त्यांच जेवण चाललयं....कन्या आजारी असल्याने मिकांना यायला जमलं नव्हतं. सर्वात शेवटी सुडने डब्यातून भाजणीचे वडे न आणता हे आणलं होतं, काय दिसतय??? ढोकळा!! छॅ, तो ढोकळा नसून पनीर बर्फी आहे. 'फोटोसहीत पाकक्रुती लवकरच टाकण्यात येईल' अशी जाहीर घोषणाही लगेच करण्यात आली. बर्फी खावून यंग जनरेशन दात दाखवतय..:D शेवटी हॉटेल बंद होण्याची वेळ झाल्याने सगळ्यांना आवरते घ्यावे लागले. :( पावसाची रिमझीम चालूच होती आणी सगळ्यांनी एकमेकांचे निरोप घेतले.

वाचने 13358
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by रेवती

देशपांडेकाकू शेजारीच बसल्याने प्राची गरीब गाय झाल्यासारखी वाटते आहे.
ती गरीब गायच आहे, फक्त इथे दंगा घालतेय. पहिल्यांदा मलाही पटलं नव्हतं, ही तीच प्राची आहे असं!! खुद के साथ बाता: बाकी, सगळ्या काका-काकवांनी आज मला काकू म्हणायचा चंग का बांधलाय?? त्यांना आम्ही काका-काकू म्हणतो याचा निषेध वाटतं!!

In reply to by मस्त कलंदर

माझ्या प्रतिसादांवरूनच कित्ती वाईट वाटलेय हे समजले असेल. असा कट्टा, रामदासकाकांच्या गप्पा ;), जेवण सगळं मिस् केलं. छ्या! पुन्हा इनो.

नवे, जुने मिपाकर भेटल्याचे पाहून ड्वोले .... मकी काकी मात्र 'व्हॉच्यु टॉकिंन बाउट विलीसची' आठवण ताजी करत आहेत. मकी काकींच्या समोर बहुदा गविकाका / विमेकाका बसले असावे असावेत त्यामुळे बहुदा हे जेवण कधी ऑर्डर करणार आहेत, बटाटेवडा, मिसळपाव काय चालले आहे. असो आपण दोन घास ... असे काहीसे भाव असावेत.

कट्टा झकास झालेला दिसतो आहे. :) पण व्यक्तींची नावे आणि फोटो यांची सांगड घालायला काही जमली नाही. :(

अतिशय ओघवतं आणि खुमासदार वर्णन, श्री. किसन देवा.. लेखन मनापासुन आवडले. फोटोग्राफ्स देखील उत्तम! :) ** कट्टा अतिशय जोरदार झाला! आणि धम्माल मजा आली! सर्व मान्यवरांना भेटुन आनंद झाला.. जोरदार पाऊस असल्याने माझं आर-सिटी घाटकोपर येथे खरेदी आणि मग कट्टा असं जे नियोजन होतं ते बर्‍यापैकी गंडल.. आधी घरातुन निघताना पाऊस थोडासा कमी झाला होता मात्र घाटकोपर येथे पोहचे पर्यंत खुपच उशीर झाला.. शेवटी कसं बसं अत्यावश्यक तेवढं काम उरकुन, बस ने ठाण्याला निघालो, वाटेत पावसाचा वाढता वेग बसचा वेग आणखीन मंद करत होता.. शेवटी कसं बसं एकदाचं तीन हात नाक्याला पोहोचलो.. नौपाडा विभाग शोधण्यात आणखीन वेळ गेला.. त्यानंतर किसनदेव यांनी प्रत्यक्ष हॉटेल पर्यंत पोहोचण्यासाठी फोनवर मार्गदर्शन केले.. (अंगभुत आळसामुळे आम्ही पत्ता लिहुन घेतलाच नव्हता! ;) ) तो पर्यंत मंडळी स्वाद मधील वरची मिसळीची/बटाटेवड्यांची खादाडी संपवुन आमची आणि अन्य काही मंडळीची वाट पाहत होती तिथे पोहोचलो. तेवढ्यात सुडचे आगमन झाले आणि नंतर आमची 'धम्माल गँग' बेसमेंटकडे मुख्य कार्यक्रम - स्वादची अमर्यादित थाळी चापणे करता रवाना झाली.. मित्रमंडळी आणि कट्टे म्हटलं तसा माझा कल आहे प्रामुख्याने मांसाहारी खाद्यपदार्थ आणि तोंडी लावायला अल्पसं अपेय! मात्र 'स्वाद'च्या जेवणाची चव एवढी भन्नाट होती, की आता मी कदाचित कायमचा शाकाहरी होईन की काय अशी माझी मलाच भिती वाटु लागली! ;)एका बाजुला स्वादचं रुचकर भोजन आणि सोबत रामदास काका, मस्त कलंदर ताई, निदे, गगनविहारी आदी विद्वजनांचीशी चर्चा आणि इतर मान्यवर मिपा मित्रपरिवारा सोबत सोबत मनमोकळ्या गप्पा, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच! निघता निघता लीमा ताईचे त्यांच्या यजमानांसहित आगमन झाले, यामुळे अजुन काही काळ आम्हा सर्वांना गप्पा मारता आल्या.. शेवटी मात्र हॉटेल चालकांनी 'क्लोजिंग टाईम' अशी हाक दिल्यानंतर मात्र आम्हांला निघावे लागले.. आम्ही 'माझीही शॅम्पेन' सोबत ठाणे स्थानक येथे रवाना झालो आणि तिथुन बोरिवली करता बीईएसटी बस पकडली.. पावसाचा जोर आता ठाण्यात तरी कमी झाला होता, मात्र जस जशी बस मुंबईच्या दिशेने रवाना होऊ लागली तस तसा पाऊस पुन्हा वाढला! आता मात्र आम्हाला चिंता लागली की आम्ही आज'च' घरी पोहोचोतोय की नाही? ;) कारण रात्रीचे १२ केव्हाच वाजुन गेले होते.. बसचा वेग अजुन ट्रॅफिक मध्येच विरुन चालला होता.. आणि जेव्हा आम्ही आमचे गंतव्यस्थानक 'बोरीवली पश्चिम' येथे पोहोचलो तेव्हा रात्रीचे १२.३० वाजले होते..देवकृपेने १२.३९ ची शेवटची चर्चगेट लोकल मिळाली तेव्हा मात्र आम्ही भरून पावलो! ** अश्या दिलखुलास आणि ध्म्माल कटट्यांना आमची रोज येण्याची तयारी आहे! एक अतिशय मेमोरेबल कट्टा!

शिंदे सरकार, धागा उत्तम फोटु झकास !! घरनं निघणार तेवढ्यात एक मित्र दारात उभा, त्याच्या आईनं म्हणजे देशपांडे काकूंनी (हे फक्त नामसाधर्म्य आहे, आक्षेप नसावा ;) ) नानकटाई पाठवली होती. ह्या भल्या माणसाने घरात आल्याआल्या नानकटाईची पिशवी माझ्या हातात ठेवलंन्. चहाचं आधण टाकलेलंच होतं म्हटलं आता जरा आरामातच निघावं, गाड्यांचं टाईमटेबल कोण बघतंय एकदा असं काही खाणं पुढ्यात असल्यावर !! जी गाडी सुटली तिच्यानंतर सरळ पाऊण तासानं गाडी होती. गाडीला हीऽऽ गर्दी !! बर्फीचा ( खाद्यपदार्थाचं नाव ) डबा आणि त्यातली बर्फी नीट पोहोचली हेच फार.

In reply to by सूड

>>शिंदे सरकार, धागा उत्तम फोटु झकास !! असेच म्हणतो. पुढील सर्व कट्ट्यांचे फोटो काढण्याचे कंत्राट तुला देण्यात यावे असा ठराव मांडत आहे.

In reply to by सूड

>>शिंदे सरकार, धागा उत्तम फोटु झकास !! असेच म्हणतो. पुढील सर्व कट्ट्यांचे फोटो काढण्याचे कंत्राट तुला देण्यात यावे असा ठराव मांडत आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>असेच म्हणतो. पुढील सर्व कट्ट्यांचे फोटो काढण्याचे कंत्राट तुला देण्यात यावे असा ठराव मांडत आहे. काय बोलताय? पण टेंडर कधी निघाले ते कळ्ळंच नाही.

झकास फोटू आणि वर्णन रे किसन. आता पुढच्या कट्ट्याला नक्कीच हजेरी लावली पाहिजे.

शुशा आणि सुका कट्टा असला तरी उपस्थितीवर त्याचा काहीही फरक पडणार नाही हे माहित होते. मात्र सकाळपासून पावसाचा एकूण रागरंग पाहून किती जणांना जमेल असा प्रश्न पडला. त्यातून सध्या मध्यरेल्वे ची परिस्थिती जरा जास्तच नाजूक आहे. थोडा पाऊस पडला तरी सर्दी पडसे होते तिला. सुदैवाने तसे काही झाले नाही आणि लांबवरून येणारे बरेच जण येऊ शकले. यालाच मुंबईकरांचे स्पिरीट म्हणतात बहुतेक. काही जणांना स्पिरीट म्हटले की दुसरेच काही आठवते म्हणे. ;-) असो, तर स्टेशन वर कुणालाही विचारा प्रकारचा पत्ता, त्यातून मी नेमका तो लिहून घेतला नव्हता, त्यामुळे ३-४ जणांना विचारणे, सूड आणि गविंना फोन करणे (दोघेही मागून येत होते) या प्रकारातून गेल्यावर मी इच्छित स्थळी पोहोचलो. तिथे ४-५ जण कोंडाळे करून उभे होते. रामदासकाका, स्पा, किसन आणि अजून दोन नवे चेहरे. त्यातील मुलगी म्हणजे प्राची असणार हे झटकन लक्षात आले. मी स्पा च्या समोर जाऊन उभा राहिल्यावर, "हे बघा विमे आले" असे तो म्हणाला. त्या नंतर विसेक सेंकंद माझ्या बाजूला उभी असलेली प्राची वळून रिकाम्या रस्त्याकडे पाहत यात नक्की मेहेंदळे काका कुठे असतील याचा अंदाज घेत होती. दुसरी व्यक्ती म्हणजे शाम्पेन भाऊ निघाला. (आणि च्यायला "भाऊ"च निघाला. मिपावर ३३% आरक्षण आणा रे.) मग निदे, मकीमावशी आणि गवि आले. प्रथमच भेटणाऱ्या मिपाकरांच्या वलखी-पालखी झाल्या. त्यातून प्राची ही मकीमावशीची विद्यार्थिनी आहे हे कळले. जेवताना त्या बाजूबाजूला बसल्या होत्या. अशा ठिकाणी शिक्षकांबरोबर बसायचे म्हणजे वेगळाच अनुभव. मला का कोण जाणे सर्कशीतील वाघ आणि शेळीचे एकत्र जेवण या प्रकारची आठवण येत होती. जेवण सुरु केल्यावर प्रत्येकाने ओळख सांगण्याचा उपक्रम (दचकू नका, पल्याडले नाही) राबवला गेला. वेगवेगळ्या सदस्यनामांमागच्या गोष्टी ऐकताना मजा आली. जेवण सुरु करताना सुरु झालेला हा उपक्रम जेवण संपेपर्यंत चालला. दर १-२ ओळखीनंतर काहीतरी अवांतर निघायचे. अवांतर म्हणण्यापेक्षा पंचतंत्र किंवा अरेबियन नाईट्स मध्ये एका गोष्टीतून दुसरी निघते तशा गोष्टी निघत गेल्या. जेवण संपता संपता ली माऊ मावशी आल्या. या वेळेला त्या एकट्या न येता बोका काकांना पण घेऊन आल्या होत्या. (मरतोय आता बहुतेक) बाकी स्वाद ची मिसळ आणि थाळी झकास. चवीला उत्तम (आणि खिशाला पण). सूड ने आणलेली बर्फी पण झकास. मात्र ३ वाट्या बासुंदी खाल्ल्यामुळे सूड ची बर्फी एकच खाऊ शकलो याचे खंत आहे. सूड परत बर्फी करून आणेल अशी आशा असल्याने चिंता नाही. सदर बर्फीला दरड-बर्फी नाव ठेवण्याचे रेकमेंडेशन देत आहे (प्रेरणा मकीमावशी ची कमेंट) ज्यांना इच्छा असूनही या कट्ट्याला येता आले नाही, त्यांना भेटायचा योग लवकरच यावा ही इच्छा. स्पा/सूड, ऐकताय ना? पुढच्या कट्ट्याचे मनावर घ्या. मात्र थोडे आधी व्यनी करून कळवा. मी वेस्टर्न इंडिया भागाची ईनो ची एजेन्सी घेऊन ठेवीन म्हणतो. काही काही टेरीटरीत तुफान खप होईल असा अंदाज आहे. विश्वनाथ ईनोंदळे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मी वेस्टर्न इंडिया भागाची ईनो ची एजेन्सी घेऊन ठेवीन म्हणतो. काही काही टेरीटरीत तुफान खप होईल असा अंदाज आहे.
पैल्या गिर्हाईकाचं नाव ल्हिउन घ्या....

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आणि च्यायला "भाऊ"च निघाला. मिपावर ३३% आरक्षण आणा रे. पाय ची किंमत ३.१४ ची ओळख झाल्यावर हे विधान मागे घ्याल ही ग्यारन्टी

आरक्षणातून लायसेनधारी व्यक्तींना वगळण्यात यावे अशी उपसूचना मांडतो =)) =)) =)) असेच नमूद करू इच्छितो