मिपा कट्टा - ३० जुलै
मस्त रिमझिम पावसात 'शुध्द शाकाहारी कट्ट्यासाठी' स्वादमध्ये पोहचलो तेव्हा घड्याळात संध्याकाळचे ६:३० वाजले होते आणी नेहमीच्या सवयीप्रमाणे एकाही कट्टेकरयाचा तिथे पत्ता नव्हता. भराभर सगळ्यांना फोन करुन 'कोण कुठे अडकलय?' याचा अंदाज घेतला. '१ कप वाफाळता चहा आणी समोर भारताची बॅटींग' असा दुहेरी योग जिथे तुम्ही अनुभवाल तिथे बाकीच्या जगाचा विसर तुम्हाला नक्कीच पडेल, तसा मलाही पडला. मग रामदास काका त्यांनतर थोड्या फार फरकाने माझीही शॅम्पेन(हा 'तो' असावा कि 'ती' ह्या बद्दल मला नेहमी शंका पडत असे.) :) मला येवून जॉईन झाले. बरेच तर्क वितर्क करूनही शॅम्पेनराव आयडेंटिटी सांगायलाच तयार होईना, "सगळे जमा झाले कि मग खुलासा करतो." असं सांगुन उगाचच आमची उत्सूकता वाढवत होते. एकीकडे गप्पा मारता मारता दुसरीकडे बटाटेवड्यावर ताव मारण्याचे उद्योगही चालू होते. रिकाम्या झालेल्या बटाटेवड्याच्या प्लेट्स पाहायला मग मिपाचे तरुण रक्ताचे(कि गरम डोक्याचे) :) लेखक स्पा यांचे आगमन झाले, मग त्यांच्या मला 'हे नको ते नको' करण्याच्या भानगडींमूळे त्या वेटरच्या चेहरयावरचे भाव 'मग बोर्नवीटा आणून देवू का?' असे झाले होते. एव्हाना लाईट्स गेल्याने आम्ही मग रस्त्यावर येवून उभे राहिलो त्याच वेळेस मेहदंळे काका त्यांच्या नेहमीच्या 'कुर्ता पायजमा आणी खांद्यावर शबनम' या पेहरावात न येता चक्क जीन्स आणी टी-शर्ट या वेशात आले होते त्यामुळे त्यांच्या मागोमाग आलेल्या प्राचीचाही बराच गोधंळ उडाला. निदे आणी मस्त कलंदर हे जोडपंही पाठोपाठ आल्याने आम्ही सर्व पुन्हा एकदा आत जावून बसलो आणी गप्पांचा फड पुन्हा रंगात आला त्यात गगनविहारी आम्हाला येवून सामील झाले.
मिसळपाव आणी बटाटेवड्यांचा आस्वाद घेता घेता चर्चा जोरात रंगली होती......सुड, मिका, इंटरनेटस्नेही, लीमाऊजेट अशी मंडळी अजूनही यायची बाकी होती.
मकमावशीच्या चेहरयाकडे बघून तुम्हाला काय वाटतं?.....उत्तर सांगा बक्षीस जिंका!
झणझणीत मिसळपाव!
अजून एक फोटो.. :)
कट्ट्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्येच बिपीनदा आणी परा यांचेही फोन येवून गेले. शेवटी थाळीची वेळ झाल्याने आम्ही खाली बेसमेंटकडे निघालो त्याचवेळी सुधांशू आणी इंटरनेटस्नेही हे दोघेही येवून आम्हाला जॉईन झाले. लीमाऊ आणी मिकांचा अजूनही पत्ता नव्हता.
बेसमेंटमधल्या ह्या पेंटीगवरुन काकांनी इथे मिपावर वदनी कवळ घेता नावाचा लेख बरयाच दिवसांपुर्वी टाकला होता.
बेसमेंटला गेल्यावर इंट्या सर्वात शेवटी आल्याने सगळ्यांना ओळाखायला सांगून त्याची ओळख परेड चालू केली. मकीकडे बोट करुन "लीमाऊजेट का?" असं विचारणं इथपर्यंत तर सगळं ठिक होतं पण रामदास काकांकडे निर्देश करुन "हे नक्कीच विजूभाऊ असणार" असं त्याने बोलताच संपूर्ण बेसमेंटमध्ये जोरदार हास्याचे फवारे उडाले. रामदास काकांच्या अर्धवट राहीलेल्या बरयाच लेखांची चर्चा झाली त्यावरुनच मग धंद्याचा पुढील भाग काकांनी सर्वांना सांगीतला.
स्वादची शुध्द शाकाहारी थाळी!
डावीकडून प्राची, मस्त कलंदर, निदे, गवि, रामदास काका, जॅक स्पॅरो(स्पावड्या), किसन शिंदे, विमे, सुड, इंटरनेटस्नेही आणी माझीही शॅम्पेन.
मंडळींच जेवण होऊन टेबलही मोकळा झाला होता....बरयाच उशीरने माऊताई त्यांच्या यजमानांसोबत आल्या होत्या, डावीकडे वरच्या बाजुला त्यांच जेवण चाललयं....कन्या आजारी असल्याने मिकांना यायला जमलं नव्हतं.
सर्वात शेवटी सुडने डब्यातून भाजणीचे वडे न आणता हे आणलं होतं, काय दिसतय??? ढोकळा!! छॅ, तो ढोकळा नसून पनीर बर्फी आहे. 'फोटोसहीत पाकक्रुती लवकरच टाकण्यात येईल' अशी जाहीर घोषणाही लगेच करण्यात आली.
बर्फी खावून यंग जनरेशन दात दाखवतय..:D
शेवटी हॉटेल बंद होण्याची वेळ झाल्याने सगळ्यांना आवरते घ्यावे लागले. :( पावसाची रिमझीम चालूच होती आणी सगळ्यांनी एकमेकांचे निरोप घेतले.
प्रतिक्रिया
बदलापूरच्या मुलींबद्दल
बदलापूरच्या सुनांबद्दल ?
नाही... सुनांबद्दलच... फारच
लिहीणारच होतो, पण म्हटलं उगा
या प्रतिसादानंतर ते वाजणारच
सुना नाही हो,
छोटा गोडबोले?
आम्हालाही ते उद्योग कळ्ळेच
छान
अरे वा जोर्दार झालेला असणार कट्टा!
मकीमावशीच्या चेहर्यावरचे
अरे कोलेज संपल म्हणून मकी
अगं ए...
हॅ हॅ हॅ!
वा सूरेख झाला कट्टा
मस्त रे!!!! कट्टा झकास झालेला
किसनमहाराजांचा विजय असो! बिझी
आँ??
मुलगा मोठा झाला. आपली
ही आमच्या रेवतीआज्जीची
देशपांडेकाकू शेजारीच बसल्याने
माझ्या प्रतिसादांवरूनच कित्ती
उत्तम
वा वा वा
काका, वरून आठव्या आणि नवव्या
सविस्तर प्रतिसाद
शिंदे सरकार, धागा उत्तम फोटु
>>शिंदे सरकार, धागा उत्तम
>>शिंदे सरकार, धागा उत्तम
>>असेच म्हणतो. पुढील सर्व
झकास
शुशा आणि सुका कट्टा असला तरी
मी वेस्टर्न इंडिया भागाची ईनो
पहिल्या आणि सर्वात मोठ्या
आणि च्यायला "भाऊ"च निघाला.
आरक्षणातून लायसेनधारी
=)) विमे! =))
आरक्षणातून लायसेनधारी
छान झालाय कट्टा आणि वृत्तांत
Pagination